Maharashtra Breaking News LIVE Updates : पचमढी येथे दर्शनाला जाताना भाविकांच्या कारला भीषण अपघात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Accident : मध्यप्रदेशातील पंचमढी येथे भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी जाताना कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तुषार ज्ञानेश्वरराव झामडे (30 वर्ष), दीपक भाऊरावजी डाखोरे (वय 30), अक्षय गौरखेडे (वय 26 ) यांचा अपघाताता मृत्यू झाला आहे.
Amravati News : अमरावती पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर 9 फेब्रुवारी रोजी शाईफेक झाली होती. यावेळी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. दरम्यान 19 दिवसांनंतर चार आरोपींना जामीन मिळाला आहे. तर एक आरोपीला चार दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. अजय बोबडे, संदीप गुल्हाने, सुरज मिश्रा, महेश मुलचंदानी या चारही आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी जोशी यांनी जामीन दिला आहे.
Mumbai News : मंत्रालयात एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या दुस-या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र मंत्रालयातील कर्मचारी यांनी या महिलेला अडवले.
एसआरए घराची फसवणूक झाली म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही महिला टिटवाळा या ठिकाणी राहायला आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही
मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती झाली आहे. तर हेमंत नगराळे यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ पदी नियुक्ती झाली आहे
Chandrapur News : नागभीड तालुक्यातील हुमा परिसरातल्या जंगलात दोन वाघांच्या आपआपसांत झालेल्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या वेळी नियमित गस्तीदरम्यान वन पथकाला वाघाचा मृतदेह आढळला असून वाघाच्या अंगावर अनेक ठिकाणी झुंजीच्या जखमा आहेत.
बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली असून याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे, त्यासाठी फक्त बीडच्या विषयावर विशेष बैठक बोलवावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री, गृह राज्यमंत्री आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पत्र पाठवून केली आहे.
Buldana : चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथून प्रवासी घेऊन रिक्षा हा चिखलीकडे जात असताना, विद्यार्थ्यांने -आण करणारी अनुराधा शाळेची बस शाळेकडे जात होती. ऑटोमध्ये चालक व ३ प्रवासी होते. सकाळी पावणे दहाच्या सुमारास ऑटोला भरधाव स्कुल बसने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ऑटोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यात धनंजय अनिल वाघ (१६) हा दहावीचा विद्यार्थी जागीच ठार झाला. तो चिखली येथे कोचिंग क्लाससाठी येत होता. माधव केशव इंगळे (६३) यांना उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ऑटोचालक आशिष मदन वाघ (२०) व शुभम गजानन वाघ (२३) गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान,अपघातानंतर स्कूल बसचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघातावेळी बसमध्ये विद्यार्थी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र सुदैवाने त्यापैकी कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.
Dyandeo Wankhede : ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टातील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. ज्ञानदेव वानखडेंची हायकोर्टात बिनशर्त माफी कोर्टात सादर केलेल्या एका भाषांतरात समीर वानखेडेंचं नाव चुकून आल्याचं मान्य केलं.
Jalgaon : औरंगाबादेत राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून ज्या मार्गावरून राज्यपाल जाणार होते त्या मार्गावर राष्ट्रवादीने राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना काळे झेंडे दाखवणायाचा इशारा दिला होता शहरातील आकाशवाणी चौकामध्ये यावेळी राज्यपालांच्या येण्याअगोदरच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी अटक करण्यात आली असून राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी सुनील माळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी राष्ट्रवादी तर्फे जोरदार घोषणाबाजी करत राज्यपाल यांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला.
Hingoli : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजे उपोषणाला बसले आहेत आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडली हे त्यांची शुगर आणि रक्तदाब कमी झाला आहे या उपोषणादरम्यान त्यांच्या तब्येतीला इजा झाली तर याला जबाबदार राज्य सरकार असणार आहे जर सरकार सुरळीत ठेवायचे असेल तर छत्रपती संभाजी राजे यांच्या तब्येतीची सरकारने काळजी घ्यायला हवी अन्यथा जर त्यांच्या तब्येतीमध्ये काही गडबड झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल अशी माहिती मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायकराव भिसे यांनी दिली आहे
Pandharpur News : पंढरपूर: राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पंढरपूर बंदला मोठा प्रतिसाद, शहर व तालुक्यात उस्फुर्त कडकडीत बंद.
ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी लांबणीवर
आता बु़धवारी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणं एकाच वेळी ऐकणार आहे सुप्रीम कोर्ट
आता बुधवारी २ मार्च ला सुनावणी
Aurangabad : औरंगाबाद बिबट्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे. 2 बिबट्याचा मृत्यू झाला आहे . सोयगाव तालुक्यातील गावात 23 आणि 24 फेब्रुवारीला 2 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. मृत शेळीच्या भक्षातून विष दिल्याचा अंदाज. वन विभागाकडून तिघे संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
Sindhudurga Nitesh Rane News : आमदार नितेश राणे ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर, आमदार नीतेश राणे, त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोठ्या सावंत ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर ,नीतेश राणे तिसऱ्यांदा ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर, संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर, जिल्हा सत्र न्यायालयाने नियमित जामीन देताना ओरोस पोलीस स्टेशनमध्ये दर सोमवारी 10 ते 12 दोन तास हजेरी लावण्याची आहे अट , त्यानुसार नीतेश राणे ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर
Nashik NDA News : एनडीएची मुलाखत की 12 वीचा पेपर? आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग
- 5 आणि 7 मार्च चा पेपर एक महिना पुढे ढकलल्यानं विद्यार्थी पालक चिंतेत
5 आणि 7 एप्रिल रोजी होणार पेपर
4 ते 9 एप्रिल दरम्यान एनडीएची होणार मुलाखत
दोन्ही परीक्षा एका वेळी आल्यानं पालक विद्यार्थी चिंतेत
कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार
- शालेय शिक्षण विभागाने देशसेवेसाठी आतुर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहानुभूती ने विचार करण्याची मागणी
- परीक्षेची तारीख बदलण्याची पालक, विद्यार्थ्यांची मागणी
Aurangabad News : औरंगाबाद बिबट्यावर विषप्रयोग; 2 बिबट्याचा मृत्यू, सोयगाव तालुक्यातील गावात 23आणि 24 फेब्रुवारीला 2 बिबट्यांचा झाला मृत्यू, वन विभागाकडून तिघे संशयित ताब्यात
पार्श्वभूमी
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
2. अमेरिकेची युक्रेनला 350 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत, जर्मनी 1 हजार अँटी टँक , 500 स्टिंगर क्षेपणास्त्रे पुरवणार, फोनवरुन झालेल्या चर्चेत झेलेन्सीकींची मोदींकडे राजकीय मदतीची मागणी
3. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन दोन विमानं मायदेशी परतले, 450हून अधिक विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास, मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई
4. नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडेंचे बेकायदेशीररित्या फोन टॅप केल्याचा आरोप, आयपीएस रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल, महाविकास आघाडीचा फडणवीसांवर हल्लाबोल
5. राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न
OBC Reservation : राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समुदायाच्या आरक्षणाबाबत आज महत्त्वाचे निर्देश सुप्रीम कोर्ट देण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने मागितली आहे. ओबीसी आरक्षण प्रकरणात येत्या 28 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचे उत्तर याच सुनावणीवर अवलंबून आहे.
राज्य मागासवर्गाच्या अहवालात काय?
राज्य सरकारनं ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सहा विभागाचा मिळून एकत्रित डेटा जमा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांचे म्हणजे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सांख्यिकी राज्य सरकारने तयार ठेवली आहे. राज्य सरकारच्या विविध संस्था आणि शासकीय प्रणालीद्वारे काढलेल्या माहितीनुसार राज्यात ओबीसी समाज 40 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण 30 टक्के तर ओबीसी शेतकऱ्यांचे प्रमाण 39 टक्के असल्याचे सूचवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या डेटाला अर्जाला दिल्यास आगामी काळात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते
6. 'मला कुणाला दोषी धरायचं नाही; समाजाला न्याय मिळावा हीच इच्छा'; संभाजीराजे छत्रपतींच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस
7. रविवारी राज्यात 782 नव्या रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू; मुंबईकरांनाही दिलासा, कोरोना रुग्णवाढीच्या दरात घट
8.देशातील दहा सर्वात प्रदूषित नद्यांमध्ये कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा समावेश, पंचगंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
9.मणिपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान, 38 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात
10 . भारताकडून धर्मशालाच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा, रविंद्र जाडेजा, श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीनं मालिका खिशात
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -