एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : गौणखनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पुण्याच्या कंपनीला 10 कोटी 80 लाखांचा दंड

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : गौणखनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पुण्याच्या कंपनीला 10 कोटी 80 लाखांचा दंड

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

मंत्रिमंडळ कॅबीनेट बैठक, मास्क आणि पेट्रोल दराविषयी बैठकीत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यावर टीका केल्यांनातर पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सरकार दर कमी करण्याचा विचार करत आहे. पेट्रोलचे दर कमी करता येईल का यासंदर्भांत आजच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. डिझेलचे दर 1 रुपयांनी कमी करता येतील का हे ही तपासलं जाणर अशी माहित सूत्रांनी दिली आहे. पेट्रोल- डिझेलवरील कर, कराची केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तिजोरीत किती रक्कम? कर रचनेतील बदलाची सविस्तर माहिती दिलेली आहे.  
मंत्रीमंडळ बैठकीत मास्क वापरासंदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क घालणं गरजेच आहे अशा प्रकारची मागणी केली. आज विषय चर्चेला येऊ शकतो.  

मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक

राज्य सरकारने खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले  मराठा समाजाचे प्रश्न अद्याप न सुटल्याने मराठा तरुण आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे पाच जणांचे शिष्टमंडळ अजित पवारांसोबच्या बैठकीला हजर असणार आहे.  28 फेब्रुवारी रोजी मान्य केलेल्या मागण्यांसंदर्भात मराठा समन्वयकांचे प्रश्न बैठकीत मांडले जाणार
सात महत्त्वाच्या मागण्यांबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे मराठा समाजात नाराजी  आहे. 

 नवनीत राणांविरोधात गुन्हा नोंद करण्यासंदर्भात पोलिसांकडून आढावा बैठका 
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले.  राऊतांच्या आरोपानंतर आर्थिक गुन्हे शाखा नवनीत राणा यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.  अंडरवर्ल्ड प्रकरणी खार पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. युसूफ लकडावालाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचा जबाब होणार नाही आणि न्यायालयात केस टिकणार नाही.  त्यामुळे नवनीत राणा विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून बैठकांना सुरुवात झाली आहे. 

राष्ट्रवादी आणि भाजपत मंत्रीपदं वाटपाचंही  ठरलेलं, आशिष शेलारांचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे नेते रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका  होती. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा असं सरकार करावं, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ठरवलं की आपण तीन पक्षांचं सरकार करू. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिला.  आमचं शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत येत असताना भाजपानं शिवसेनेला सोडायला नकार दिला. लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात आशीष शेलार यांनी यांनी हा गौप्यस्फोट केला.  

 गणेश नाईक डीएनए टेस्टसाठी तयार, भवितव्याचा निर्णय आज होणार 

 ठाणे सत्र न्यायालयाने बुधवारी देखील जामीन न देता निकाल राखून ठेवला. मात्र गणेश नाईक हे डी एन ए टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचे सांगून वकिलांनी मोठा धक्का दिला. या संदर्भात आजच्या सुनावणीला मोठे महत्त्व आहे. नेरूळ आणि बेलापूर पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यात गणेश नाईक यांची कस्टडी मागितल्याने गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

DC vs KKR : आज रंगणार दिल्ली विरुद्ध कोलकाता लढत

DC vs KKR : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्स संघाचं आव्हान असेल. दोन्ही संघ गुणतालिकेत खास स्थानी नसले तरी त्यांची यंदाच्या हंगामातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी काही सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला असून काही सामने अगदी थोडक्यात त्यांच्या हातातून सुटले आहेत. यामुळे आजच्या त्यांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह सातवं स्थान मिळवलं आहे. तर आठव्या स्थानावर असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 8 पैकी 3 सामने जिंकत सहाच गुण मिळवले आहेत. आज होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार.

आज इतिहासात

1740 - पहिले बाजीराव पेशवे यांचे निधन

2008 -  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने ‘पीएसएलव्ही-सी 9’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करून नवीन इतिहास रचला

1998  - माजी भारतीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज, तसचं, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे निधन.

19:31 PM (IST)  •  28 Apr 2022

Bhandara News Update : भंडाराऱ्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक

Bhandara News Update : भंडाराऱ्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना पवनी पोलिसांनी अटक केली आहे. उमरेड तालुक्याच्या दि मर्सी हॉटेलमधून या आरोपींना अटक करण्यात आली आहे.  

19:11 PM (IST)  •  28 Apr 2022

Chandrapur : गौणखनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी 10 कोटी 80 लाखांचा दंड

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गौणखनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पुण्याच्या पाटील कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 10 कोटी 80 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोरपना तहसीलदारांनी भाजप पदाधिकारी असलेल्या मनोज पोतराजे यांच्या तक्रारीवर ही कारवाई केली आहे. पडोली ते वनसडी या रस्त्याच्या बांधकामासाठी कंपनीला 1 हजार ब्रास दगड आणि मुरूम उत्खनन करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, कंपनीने कोरपना तालुक्यातील वनोजा परिसरात मोठ्या प्रमाणात चुनखडीचे उत्खनन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदारांनी मौका चौकशी करून कंपनीला हा दंड ठोठावला आहे.

17:34 PM (IST)  •  28 Apr 2022

मुख्यमंत्र्यांनी नेहमीच योग्य निर्णय घेतले : बाळासाहेब थोरात

मुख्यमंत्र्यांनी नेहमीच योग्य निर्णय घेतले आहेत, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानतंर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 

17:29 PM (IST)  •  28 Apr 2022

Samruddhi Mahamarg : मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री घेणार समृद्धी महामार्गाचा आढावा

Samruddhi Mahamarg :  नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेमुळे 2 मे ला होणारं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं आहे. परिस्थितीचा आढावा घेता आणखी दीड महिना तरी हा महामार्ग सुरु करता येणार नाही.

महामार्ग पॅकेज क्रमांक सात मध्ये क्रेनच्या साहाय्याने काँक्रीट गर्डर पुलालावर ठेवण्याचं काम सुरू होतं. क्रेनच्या साहाय्याने गरड वर उचलताना साधारणपणे दहा फूट उंच उचलल्यानंतर जॅक स्लिप झाल्यामुळे गरड खाली जमिनीवर कोसळलं. तर दोन दिवसांपूर्वी वन्यजीव उन्नत मार्गाचे काम सुरू असताना येथील काम 30 एप्रिलपर्यंत अंतिम टप्प्यात असताना एकशे पाच पैकी काही ट्रीपला अपघात झाला. त्यामुळे सुपरस्ट्रक्चर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. त्यामुळे दीड महिना तरी वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करता येणार नाही.

17:13 PM (IST)  •  28 Apr 2022

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून योगी आदित्यनाथ यांचं कौतुक

Raj Thackeray : उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. याआधीही यूपीतील कामांबद्दल राज यांच्याकडून योगींचं कौतुक करण्यात आलं होतं.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget