एक्स्प्लोर

27 march 2022 Breaking News LIVE Updates : महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचा राज्यव्यापी ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
maharashtra marathi news breaking news live updates 27 march 2022 today sunday marathi headlines maharashtra political news mumbai news national politics news 27 march 2022 Breaking News LIVE Updates : महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचा राज्यव्यापी ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह
Breaking News Live Updates

Background

मेट्रो 2-ए आणि मेट्रो 7चा पहिला टप्पा 10दिवसांत सेवेत, मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र, पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान आणि सुकर होणार

दिग्विजय सिंह यांच्यासह 6 जणांना एक वर्षासाठी सश्रम कारावास, 11 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात शिक्षा

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; 6 दिवसांतील पाचवी वाढ, पेट्रोल 52 तर डिझेल 57 पैशांनी कडाडलं

आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, डिझेल पुन्हा एकदा 57 पैशांनी महागलं आहे. तर पेट्रोलमध्ये प्रति लिटर 52 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत. रविवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. रविवारी पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागलं होतं. तर त्यापूर्वी शुक्रवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, किरकोळ बाजारात आज सकाळपासून पेट्रोल 82 तर डिझेल 81 प्रति लिटरने वधारणार आहे

कोरोनामुळं ब्रेक लागलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून पूर्ववत, चीन सोडून 40 देशांच्या विमान कंपन्यांसाठी भारताचं आकाश मोकळं

मुलांनी मन वळवल्यानंतर सिनेसृष्टीला राम राम करण्याचा विचार सोडून दिला, आमीर खानचं वक्तव्य, तर बॉलिवूडमधल्या वर्णभेदावर नवाजुद्दीनचं बोट

परबांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या भाजप नेत्यांच्या अटकेमुळं काल दिवसभर राजकीय नाट्य, उशीरा रात्री पोलिसांकडून सुटका रा

मेंढपाळाच्या हस्ते सांगलीतल्या अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्याचा पडळकरांचा निर्धार, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटनास तीव्र विरोध

राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

रविवारचा मुहूर्त साधत आयपीएलमध्ये डबल धमाका, मुंबई दिल्लीशी भिडणार तर पंजाब किंग आणि आरसीबी आमनेसामने, चेन्नईला पराभूत करुन केकेआरची विजयी सलामी

विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची चांगली सुरुवात, शेफाली वर्मासह स्मृती मानधनाची शानदार खेळी

23:28 PM (IST)  •  27 Mar 2022

काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार-नाना पटोले

देशात महागाईमुळे जनता बेहाल झालेली आहे...येत्या आठ दिवसात काँग्रेस महागाई विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला महत्व मिळत नाही असे अनेक जण आरडाओरड करीत असतात...महाविकास आघाडी मध्ये आणि देशात काँग्रेस आधीपासून बाप आहे आणि बापच राहणार असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. 

23:12 PM (IST)  •  27 Mar 2022

मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुक्ती संग्रामात लढलेल्या शूरवीवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.  या कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे आणि अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. गेली 2 वर्षे हा दिवस साजरा करता आला नव्हता. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला तसेच इथे असलेल्या शिवकालीन तोफांना सार्वजनिक वर्गणी काढून सागवानी तोफगाडे देखील बसवण्यात आले. ज्याचे उदघाटन केले गेले. सध्याचे ठाण्याचे मध्यवर्ती कारागृह हा ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडविण्याकरिता बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पा यांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पा यांनी २७ मार्च १७३७ साली स्थानिकांच्या सहकार्याने या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ला पोर्तुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला. ठाणे मुक्त केले. यामुळे ठाणेकरांच्या दृष्टीने २७ मार्च हा दिवस खुप महत्वाचा असतो. म्हणून आज ठाणे मुक्ती साजरा करण्यात आला.

23:02 PM (IST)  •  27 Mar 2022

पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील ऑटोला परळीजवळ अपघात, एका वारकरी महिलेचा मृत्यू

वाशिम होऊन पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांच्या सोबत असणाऱ्या एका ऑटोला परळी जवळील दादाहरी वडगाव जवळ अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध वारकरी महिला मृत्युमुखी पडली असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. वाशिम येथील मुगसाजी महाराज यांचा पायी दिंडी सोहळा वाशिमहून पंढरपूर कडे जात असतांना परळी जवळील दादाहारी वडगाव येथे अँटोला  अपघात झाला. पायी दिंडी परळी वैजनाथ मार्गे पंढरपूर कडे निघाली होती.परळीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीतील ऑटो ला अपघात झाला.ही घटना दादाहारी वडगाव जवळ घडली चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात झाला. अपघातामध्ये मयत झालेल्या महिलेचे सुमित्राबाई खाडे (वय 70)असे नाव आहे. अन्य चार वारकरी जखमी झाले असुन त्यांनी प्राथमिक उपचार करून अंबाजोगाईला हलविण्यात आले. जखमींमध्ये समाधान लोखंडे (49) रा.वाशिम, गोकर्णाबाई खंडागळे,हेमलता हतवलकर, नलीनी हांडगे यांचा समावेश आहे. 
21:11 PM (IST)  •  27 Mar 2022

मंत्री धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांना प्रतिउत्तर

बीडच्या धारूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. आता यालाच धनंजय मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. गेल्या 20 वर्षापासून मी मतदार संघातील जनतेची सेवा करत आहे. त्याच्यामुळे मी आमदार झालो मंत्री बनू शकलो, एकदा मंत्री झालो म्हणून मी जनतेला कसा विसरेल मी कायम यांच्या ऋणात राहू इच्छितो म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. मी मी म्हणणारे नेतृत्व जनतेला नको असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आणि आता यालाच धनंजय मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
 
20:47 PM (IST)  •  27 Mar 2022

पाण्याच्या टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

ठाण्यातील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून दोघा कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ठाण्याच्या पाचपाखाडी भागात घडली. टाकीत तयार झालेल्या केमिकलच्या वायूने कामगार अक्षरशः तडफडले. या दुर्घटनेत दोन कामगार बचावले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. स्थानिक नौपाडा पोलीस, अग्निशमन दल आणि ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरु केल्याने दोघा कामगारांचा जीव बचावला. लिफ्ट नसलेली पाच मजली इमारत, गच्चीत २५ फुटांवरील टाकीवर चढून  जाण्यासाठी अरुंद शिडी आणि टाकीच्या झाकणावर असलेला उंच मोबाईल टॉवर अशा विविध अडचणींवर मात करत बचाव पथक आणि डॉक्टरांनी दोन कामगारांचा जीव वाचवला

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 12 March 2024ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 8PM 12 March 2025Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana News | विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? तटकरे स्पष्टच बोलल्या..Job Majha News | ST महामंडळ अंतर्गत नाशिकमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Embed widget