Maharashtra Breaking News 26 May 2022 : केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 May 2022 08:05 PM
परभणीत चंद्रकांत पाटलांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांची तिरडी काढून आंदोलन  

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून चंद्रकांत पाटील यांची तिरडी काढून राष्ट्रवादीने निदर्शन केली आहेत. 

चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला साडी चोळी नेसवून राष्ट्रवादीचे आंदोलन 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय. वाशीयेथील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी  चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला साडी चोळी नेसवून आणि खना नारळाची ओटी भरून अनोख्या पध्दतीने आंदोलन केले आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या फोटोला चपलाचा मार देण्यात आला. चंद्रकांत पाटील महिलांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधातील आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी दिलाय.

Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यात वादळी पावसाची जोरदार हजेरी

Yavatmal : झरी तालुक्यातील मुकुटबन आणि परिसरातील बहुतांश भागात वादळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. अशातच काहींच्या घरावरचे टिनपत्रे सुद्धा उडून गेल्याचे दिसून येत आहे. मात्र, या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अर्धा तास विजांच्या गडगड्यासह पडलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ झाली. पावसामुळे रस्त्यावरील झाडे पडली असून विजेचे खांब पडल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर अद्यापही पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.  

Anil Parab : 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीची टीम अनिल परब यांच्या घरातून बाहेर

शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरातून ईडीचे अधिकारी बाहेर पडले आहेत. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर ही टीम बाहेर पडली आहे. तर त्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या अजिक्यतारा या ठिकाणी अद्याप ईडीची एक टीम असून त्याच घरी अनिल परबदेखील आहेत. 

Ketaki Chitale : केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला

Ketaki Chitale : केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.  शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी जामीन देण्यास कोर्टाचा नकार दिला आहे.  त्यामुळे केतकीचा जेल मधला मुक्काम वाढला

Pune News Update : पुण्यात पोस्टार लावून चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीकडून टीका 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पुण्यातील  कोथरूड मतदार संघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात पोस्टर लावून चंपावाणी असा उल्लेख केले आहे. चंद्रकांत पाटील यांना उद्देशून 'घरी जा आणि स्वयंपाक करा' एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? अशा प्रकारचा मजकूर लिहीत चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  

भाजप नेते नरेंद्र मेहता यांना 30 मे पर्यंत अटक न करण्याचे न्यायालचे निर्देश 

मीरा-भाईंदर मधील भाजप नेते नरेंद्र मेहता यांना मुंबई उच्च न्यायालाने दिलासा दिला आहे. 30 मे पर्यंत मेहता यांना अटक न करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश दिले आहेत. याबरोबरच नियमित अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात दाद मागण्याचे  मेहता यांना निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 


मेहतांवर काही दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा  दाखल केला आहे. मेहतांच्या अनेक ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये महागडी कार आणि बरीच रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून मेहतांतर्फे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 30 मे रोजी होणार

Nagpur News Update : नागपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांची प्रतिमात्मक प्रेतयात्रा 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची प्रतिमात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. गणेशपेठ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून मोक्षधाम स्मशान भूमीपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही प्रतिमाकात्मक प्रेतयात्रा काढली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

अनिल परबांच्या घराबाहेर कारवाईच्या विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन

अनिल परब यांच्याविरोधात कारवाईच्या विरोधात वांद्रे  येथे शिवसैनिक जमले आहेत. शिवसैनिक काळी पट्टी लावून करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात  पोलीस तैनात करण्यात आले आहे.

आमदार कालीदास कोळंबकर यांच्या उपोषणाला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांचा पाठिंबा

बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना हक्काची मोफत घरे द्या अशी मागणी करत उपोषणाला बसलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मागणीला समर्थन देत  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार या उपोषणात सहभागी झाले.

Mhada Paper Leak: म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे जळगावात, विजय दर्जींना अटक

जळगाव शहरा मधील बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणी जळगावातून यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावात छापेमारी केली. म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे जळगावात आढळून आले आहेत. या अनुषंगाने गोलाणी मार्केटमधील बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना अटक करण्यात आली आहे.

सारथी संस्थेस खारघर येथे भूखंड देण्यास मान्यता , मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय :  सारथी संस्थेस खारघर येथे भूखंड देण्यास मान्यता  


इतर बातम्या


मास्क वापरत रहा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जनतेला आवाहन


राज्यात 401 टँकर्स सुरू तसेच धरणात 37 टक्के पाणीसाठा


हरभरा उत्पादनात मोठी वाढ. खरेदी कालावधी 28 जूनपर्यंत वाढविण्याची केंद्राला विनंती

नायगाव येथील पोलीसांच्या घरांच्या संदर्भात भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचं आंदोलन

नायगाव येथील पोलीसांच्या घरांच्या संदर्भात भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचं आंदोलन. बीडीडी चाळीतील पोलीस परिवाराला ५० लाखात घर देण्याची  घोषणा सरकारने केलीय, मात्र ही रक्कम जास्त असल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. आता कालिदास कोळंबकर यांनी कर्मचाऱ्यांना मोफत घर द्या, अशी मागणी घेऊन हे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री ते त्यावेळी त्यांनी मोफत घरे देणार असल्याची घोषणा केली होती मग आता ती घरे मोफत का दिली जाणार नाहीत ? असा प्रश्न कोळंबकर यांनी विचारला आहे. शिवाय या घराच्या किमती जरी कमी करून जर घर दिली तरी आमचं सरकार आल्यावर ते सर्व पैसे मी त्या पोलिस बांधवांना परत देईल असे आश्वासन सुद्धा कोळंबकर यांनी यावेळी दिला

'महाराज... तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय...', संभाजीराजे छत्रपतींचं ट्वीट

Nanded Maharashtra News Updates : परिचरिकांचा राज्यव्यापी संप, कामबंद आंदोलन करत नांदेड जिल्ह्यातील हजारो परिचारकांचा संपात सहभाग 

Nanded Maharashtra News Updates : राज्यातील राजातील परिचारकांच्या  पदभरती न होता परिचारिकांची खाजगीकरणातून होणारी भरती रद्द करण्यात यावी याची मागणी करत परिचरिकांनी राज्यव्यापी संप पुकारलाय.नांदेड जिल्ह्यातील हजारो परिचरिकांनी कामबंद आंदोलन करत संपात सहभाग नोंदवलाय. प्रशासकीय बदली रद्द करुन ,विनती बद्दली करण्यात यावी. यासह इतर संवेदनशील प्रलंबित मागण्यासाठी आज राज्यभरात परिचारक संघटनेच्या वतीने संप पुकारलाय. या संपात नांदेड येथील डॉ शंकरराव चंव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपूरी, नांदेड येथील परिचारक सहभागी झाल्या आहेत.

आज शिवसेनेकडून दोन जागांसाठी अर्ज भरण्यात येणार तर राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी सोमवारी अर्ज भरण्यात येणार, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

आज शिवसेनेकडून दोन जागांसाठी अर्ज भरण्यात येणार तर राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी सोमवारी अर्ज भरण्यात येणार 


राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी


सोमवारी 30 तारखेला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रफुल पटेल यांचा फॉर्म भरला जाणार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ शत्रू , शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांची टीका

Raigad News : रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यादरम्यान शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी, त्यांनी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद समोर आणले आहेत. राज्यात महाविकास आघाडी असताना रायगड जिल्ह्यात मात्र बिघाडी असल्याची टीका केली आहे. तर महाड विधानसभामध्ये भाजप ही नगण्य असून अवघे दोन ते अडीच हजार मत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच मूळ शत्रू असल्याची टीका केली आहे.

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचा नातू गुरूज्योत सिंह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचा नातू गुरूज्योत सिंह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश, मंत्री प्राजक्त तनपुरे, महीला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांची उपस्थिती

Sanjay Raut LIVE : राजकीय सूडबुद्धीनं आरोप लावले जात आहेत, आम्ही पक्ष आणि सरकार म्हणून अनिल परबांच्या पाठिशी उभे आहोत, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut LIVE : राजकीय सूडबुद्धीनं आरोप लावले जात आहेत, आम्ही पक्ष आणि सरकार म्हणून अनिल परबांच्या पाठिशी उभे आहोत, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया

वडाळा परिसरातल्या शांतीनगर झोपडपट्टीवर आज बुलडोझर चालणार नाही, स्टे ऑर्डर आल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयानं आपले आदेश मागे

मुंबईतल्या वडाळा परिसरातल्या शांतीनगर झोपडपट्टीवर आज बुलडोझर चालणार नाही. स्टे ऑर्डर आल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयानं आपले आदेश मागे घेतले आहेत. जवळपास 150 झोपड्या जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.  

अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची छापेमारी

ED Raids Anil Parab : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहे. अनिल परब यांच्या 'शिवालय' या शासकीय निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने छापा टाकला आहे. यात त्यांच्या शासकीय निवासस्थानासह खासगी निवासस्थानाचाही समावेश आहे.

Anil Parab: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचा छापा

Anil Parab: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचा छापा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिजनेसला 20 वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.

Cruise drug Case : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आरोपपत्र दाखल करणार

Cruise drug Case : आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आपलं आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता. याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ संपण्यास  अवघे काही दिवस उरले आहेत.

Mumbai : मुंबईतील शांतीनगर येथील झोपडपट्टीवर आज बीएमसीचा बुलडोझर

Mumbai : मुंबईच्या वडाळा शांतीनगर  भागातील 100 झोपड्यांवर उद्या कारावाई करण्यात  येणार आहे.

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. कारण आज संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. या  भेटीनंतर संजय राऊत यांनी ही माहिती दिलीय.

Modi Government : मोदी सरकारला आज आठ वर्षे पूर्ण

Modi Government : मोदी सरकारला आज आठ वर्षे पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची दुसरी टर्म 30 मे 2019 रोजी सुरू झाली.

पार्श्वभूमी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. कारण आज संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. या  भेटीनंतर संजय राऊत यांनी ही माहिती दिलीय. 


मुंबईतील शांतीनगर येथील झोपडपट्टीवर आज बीएमसीचा बुलडोझर


मुंबईच्या वडाळा शांतीनगर  भागातील 100 झोपड्यांवर उद्या कारावाई करण्यात  येणार आहे.


क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आरोपपत्र दाखल करणार


आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आपलं आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता. याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ संपण्यास  अवघे काही दिवस उरले आहेत.


वाराणसी आणि मथुरेत आज दोन महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी 


वाराणसी- ज्ञानवापी प्रकरण : खटला चालवणे योग्य आहे की नाही ? जिल्हा न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे


 मथुरा-कृष्णजन्मभूमी प्रकरण :  मशीद हटवण्याची विनंती करणाऱ्या याचिकेव  दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्या न्यायालयात आज सुनावणी होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील रंजना अग्निहोत्री यांनी ही याचिका दाखल केली आहे. 19 मे रोजी जिल्हा न्यायालयाने या खटल्यातील आदेशात सुधारणा लक्षात घेऊन सुनावणीसाठी मान्यता दिली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिजनेसला 20 वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.


आज इतिहासात


1945 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांचा जन्म


 1999 :  श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने 318 धावांचा विश्वविक्रम केला.


2014 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.