Maharashtra Breaking News LIVE Updates : संभाजीरांजेंना पाठिंबा देण्यासाठी खासदार धैर्यशील माने आझाद मैदानात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Feb 2022 06:01 PM
Mumbai : मुंबईतील चार कोविड सेंटर बंद

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे मुंबईतल्या 9 जम्बो कोविंड सेंटरपैकी 4 कोविड सेंटर पालिकेकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटर मधील शेवटच्या तीन रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर जम्बो कोव्हिडं सेंटर आता बंद करण्यात आले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले

युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले. रोमानियाहून एअर इंडियाचं पहिलं विमान भारतात परतलं आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.

Solapur News Update :  सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर

Solapur News Update :  सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. मतदान झालेल्या 16 पैकी 16 जागांवर सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनला एकही जागा जिंकता आली नाही. दूध संघ बचाव पॅनलच्या उमेदवार  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची सून वैशाली साठे देखील पराभूत झाल्या आहेत. 


 


 

Beed News Update : परळीत चाकूने वार करून महिलेची हत्या, मुलगी गंभीर जखमी 

Beed News Update :  परळी शहराजवळच आयेशा नगर येथे एका 50 वर्षीय महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात मृत महिलेची 16 वर्षीय मुलगी देखील जखमी झाली आहे. मदिना शेख असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयित हल्लेखोर तरुण माजलगाव तालुक्यातील आहे.  

Asaduddin Owaisi : सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अद्याप तुरुंगाबाहेर का? असदुद्दीन ओवैसी

Asaduddin Owaisi : सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अद्याप तुरुंगाबाहेर का आहेत? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

संभाजीरांजेंना पाठिंबा देण्यासाठी खासदार धैर्यशील माने आझाद मैदानात

खासदार संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संभाजीराजे आझाद मैदानात आले आहेत. राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसावे लागले तो माझ्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे, हे भूषणावह नाही असं खासदार धैर्यशील माने म्हणाले.

Raj Thackeray : मराठी ही जगातील दहावी भाषा, भाषा टिकण्यासाठी मराठीत बोलणं गरजेचं ध्यक्ष राज ठाकरे

Raj Thackeray : मराठी ही जगातील दहावी भाषा आहे. भाषा टिकण्यासाठी मराठीत बोलणं गरजेचं असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. 


  
लवासा प्रकल्पाबाबत केलेले आरोप योग्य, मात्र ते करायला बराच उशिर झाला - हायकोर्ट

लवासा प्रकल्पाबाबत केलेले आरोप योग्य, मात्र ते करायला बराच उशिर झाला - हायकोर्ट


लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टानं निकाली काढली


मात्र सध्याच्या स्थितीत तिथलं बांधकाम पाडण्याचे निर्देश देता येणार नाहीत - हायकोर्टात


शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय - हायकोर्ट


या प्रकल्पासाठी कोणत्याही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत हे मान्य - हायकोर्ट


लवासासाठी कायद्यात नव्यानं केलेल्या तरतूदींना आव्हान देत एड. नानासाहेब जाधव यांनी दाखल केली होती याचिका


लवासा प्रकल्पाला विरोध करणा-या जनहित याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर

मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामं आता थांबवा- हायकोर्ट

धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाल्यास पीडित नुकसानभरपाईसाठी पात्र, त्यांचं पुनर्वसन करणं शासनाची जबाबदारी असल्याचे हायकोर्टाने सांगितले.  भिवंडीतील इमारत दुर्घटनेत अनेकांचे जीव गेल्यानंतर हायकोर्टानं दाखल करून घेतलेली सुओ मोटो याचिका निकाली लागली आहे. यावेळी प्रशासनाच्या कारभारावर कोर्टाचे तीव्र ताशेरे


 
Pune School: पुण्यातील शाळा 2 मार्चपासून सुरू

पुण्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळा 2 मार्चपासून सुरू होणार आहे. 

Pune News Updates : आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

Pune News Updates :  आरोग्य भरतीच्या पेपरफुटीबद्दल पुणे सायबर पोलीसांनी आणखी दोघांना अटक केलीय.  गोपीचंद सानप आणि नितीन जेऊरकर अशी या दोघांची नावे आहेत.  गोपीचंद सानप हा वर्धा जिल्ह्य़ात आरोग्य सेवक म्हणून काम करतो असुन तो मुळचा बीड जिल्ह्य़ातील आहे.  तर अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी सुधाकर जेऊरकर हा अमरावतीचा असुन त्यान पेपर फोडण्यासाडी मुख्य आरोपींना मदत केल्याचं  पोलीसांच म्हणणय.  पेपरफुटीत सहभागी असल्याबाबत मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर पुणे सायबर पोलीसांनी आता एजंट्सकडे लक्ष केंद्रित केल्याने आरोग्य भरतीतील घोटाळ्यात  सहभागी राज्यातील एजंट्सच धाबं दणाणलय.

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल

Rashmi Shukla: पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.


दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Bachchu Kadu : बच्चू कडू यांचे गावागावात जाऊन स्वच्छ्ता अभियान..
Bachchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतुन अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यातील गावा गावामध्ये जाऊन "स्वच्छ्ता वर्ष २०२२" राबिण्यात येत आहे. २३ फेब्रुवारी संत गाडगे महाराज जयंती पासून ते २० डिसेंबर संत गाडगे महाराज पुण्यतिथी पर्यंत स्वच्छ्ता वर्ष राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात गाडगे महाराज यांच्या जयंती दिनी चांदूराजार येथून झाली. आज अचलपूर, परतवाडा मध्ये स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली. परतवाडा येथील आठवडी बाजारामध्ये आधी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली त्यानंतर संपुर्ण आठवडी बाजाराची स्वच्छ्ता करण्यात आली. ज्यामध्ये राज्यमंत्री बच्चु कडू यांनी स्वतः साफ सफाईमध्ये सहभाग घेतला.. त्यानंतर अचलपूर शहरातील गांधी पुल परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही अशीच मोहीम आता ग्रामीण भागातील 100गावात राबविण्यात येणार असुन आपलं गाव आणि आपलं शहर हे सुंदर राहिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिली.

 
Ambajogai : विषबाधेमुळे दोन मुलींचा मृत्यू; आई आणि मुलाची प्रकृती चिंताजनक..अंबाजोगाई तालुक्यातील घटना

Ambajogai :  अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी परिसरात राहणारे काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या दोन मुली साधना (वय ६) आणि श्रावणी (वय ४) यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना आज  सकाळी घडली. तर, पत्नी भाग्यश्री (वय २८) आणि मुलगा नारायण (वय ८ महिने) यांची प्रकृती चिंताजनक आहे.  रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला.

Kolhapur : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Kolhapur : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. कोल्हापुरातील शिवाजी पुलावर मराठा कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता अडवला. 


 

Bhandara : भंडारा जिल्ह्यात क्रीडा महोत्सवाला सुरूवात

Bhandara : भंडारा जिल्ह्यात आजपासून खासदार क्रीडा महोत्सव आयोजन केले गेले असुन. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.सुनील मेंढे केले आहे.काल भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील पिंपळगाव येथे बैलगाड्या शर्यतीचे आयोजन केले असून आयोजना पुर्वीच खा सुनील मेंढे यांनी बैलाची कास धरत बैलगाड्या चालवण्याचा आनंद मनसोक्त लुटला आहे.त्यांच्या हा बैलगाड्या चालविण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून जिल्ह्यात या व्हिडीओ ची चर्चा सुरू आहे.सुप्रीम कोर्टाने बैलगाड्या शर्यतीवरील बंदी हटवल्याने तसेच कोरोना ची तीसरी लाट ओसरत असतांना पिंपळगाव येथे ऐतिहासिक बैलगाड्या शर्यतीचे आयोजन केले असुन या शर्यतीचे 97 वे वर्षे आहे.

Tuljapur : तुळजाभवानी मंदिरातील सहा पुजारी निलंबित ; उस्मानाबादच्या जिल्हाधिकार्‍यांची कारवाई

Tuljapur : उस्मानाबादच्या जिल्हाधिकार्‍यांची कारवाई. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना बंदी असताना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात दर्शन घातले. त्यामुळे आता सहा पुजाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.  कलेक्टर यांच्या आदेशाप्रमाणे गाभाऱ्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. 


तुळजाभवानीच्या मुर्तीला पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार जपणूक करण्याची गरज असताना सुद्धा याचे उल्लंघन झाल्यामुळे कारवाई करण्यात आली खासदार आणि आमदारांना अनाधिकृतपणे मंदिरातील गाभार्‍यात नेऊन दर्शन दिल्या प्रकरणी सहा पुजाऱ्यांना मंदिर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये चार पुजाऱ्यांवरती सहा महिने तर दोघावरती तीन महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे.

रायगड जिह्यातील सुमारे 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

रायगड जिह्यातील सुमारे 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. कर्जत, नागोठणे, खोपोली, महाड, माणगाव, पनवेल, खालापूर,पेण, तळा, अलिबाग येथील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.


 

Sambhaji Raje Chhatrapati Protest : छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला सुरूवात ; नाशिकहून मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईला रवाना

Sambhaji Raje Chhatrapati Protest :मराठा समाजाच्या विविध मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati Protest ) आझाद मैदानात करणार उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे. नाशिकहून मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते मुंबईला येत आहेत. आघाडी सरकारने छत्रपतीचा विश्वासघात केल्याचा समर्थकांचा आरोप आहे. छत्रपतीच्या महाराष्ट्रात त्यांच्या वंशजांना उपोषण करावे लागते हे दुर्दैव अशी आंदोलकांची भावना आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

पार्श्वभूमी

मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण


खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करणार आहेत. 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आज 11.30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. त्यानंतर त्यांच्या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. नेमका आजचा कार्यक्रम कसा असेल... 


सकाळी 10:50 वजता मरीन ड्राईव्ह येथून सर्व समन्वयकांसह संभाजीराजे हुतात्मा चौक येथे येमार आहेत. त्यानंतर ११ वाजता हुतात्मा चौक, मुंबई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करणार आहेत. 11:15 वाजण्याच्या दरम्यान आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आगमन होणार आहे, त्यानंतर संभाजीराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. 11:30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करतील, त्यानंतर उपोषणास सुरुवात होणार आहे.


महाराष्ट्र, बंगाल वगळता इतर राज्यात ईडीला काम नाही का?, मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं 


Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यात तपास यंत्रणांना काम नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. लोकसत्ताच्या 74 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायावरुन भाजपला इशारा दिला. आता तुमची वेळ आहे. घाला धाडी, प्रत्येकाचा दिवस असतो. लक्षात ठेवा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं. 


Yashwant Jadhav : 24 तास उलटले तरी यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरूच, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी


Shivsena Corporator Yashwant Jadhav : गेले 24 तास उलटून गेले तरी अद्याप शिवसेना नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे.  शुक्रवारी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली होती. दरम्यान, याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आयकार विभागाच्या छापेमारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मध्यरात्री यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढल्याचे समझल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र आले होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.