ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
देशात गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा एटीएम सेंटर्सची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे सर्व भागातील एटीएमची संख्या घटली आहे. महानगरं, शहर, निमशहरी भाग आणि ग्रामीण भागातील एटीएम सेंटर्सची संख्या घटली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्टेंबर 2024 मध्ये भारतात 2 लाख 55 हजार 78 एटीएम सेंटर्स होती. गतवर्षी ही संख्या 257940 होती. म्हणजेच एटीएम सेंटर्सच्या संख्येत 1 टक्के घट झाली आहे.
सर्वाधिक एटीएम सेंटर्स कमी होण्याचं प्रमाण ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात 2.2 टक्के घसरण पाहायला मिळाली. ग्रामीण भागात 54186 एटीएम केंद्र आहेत.
मेट्रो शहरात म्हणजेच महानगरांमध्ये 67224 एटीएम सेंटर्स आहेत. शहरी भागात 59018, निमशहरी भागात 74650 एटीएम केंद्र आहेत.
बँकर्सच्या मते यूपीआयचा वापर वाढल्यानं एटीएम कार्ड वापरण्याचं प्रमाण कमी झालं. त्यामुळं रोख रक्कम कमी प्रमाणात लागत असल्यानं एटीएमचा वापर देखील कमी झाला. विशेष बाब म्हणजे सप्टेंबर 2024 पर्यंत 8566 व्यवहार यूपीआयद्वारे झाले असून 122 लाख कोटींची देवाण घेवाण झाली आहे.