Maharashtra Breaking News LIVE Updates: अलिबाग येथील पावणे तीनशे एसटी कर्मचाऱ्यांची स्वेच्छा मरणाची मागणी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 26 Dec 2021 09:23 PM
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील 3 वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील मानवी चोले या 3 वर्षीय मुलीचा मृतदेह तेथील एका टाकीत आढळून आला आहे. ती 20 डिसेंबरपासून गावातून बेपत्ता झाली होती.

अलिबाग येथील पावणे तीनशे एसटी कर्मचाऱ्यांची स्वेच्छा मरणाची मागणी

अलिबाग येथील एसटी कर्मचाऱ्यांची स्वेच्छा मरणाची मागणी केलीय. अलिबाग एसटी आगारातील पावणे तीनशे कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं निवेदनाद्वारे स्वेच्छा मरणाची मागणी केलीय. शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं एसटी कर्मचऱ्यांनं हा निर्णय घेतलाय.

एकशे आठ वर्षे उत्तमराव मास्ट यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा डोस 

कोरोना लसीकरण मोहीम देशभरात राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. परंतु, नागरिक याला प्रतिसाद देताना दिसून येत नाहीत. अशातच हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेल्या एकशे आठ वर्षे वय असलेले उत्तमराव मास्ट यांनी आज कोरोना लसीकरनाचा पहिला डोस घेतला आहे. शिरडशहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील  विभागाच्या वतीने प्रत्येक घरी जाऊन कोरोना लसीकरण मोहीम राबवत आहे त्याच माध्यमातून उत्तमराव मास्ट यांना लस देण्यात आली आहे. लस देण्यासाठी अनेक जण कुचराई करत आहेत परंतु त्या सर्वांसाठी आदर्श ठरलेत हे उत्तमराव यांचा लस घेतानाचा फोटो केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया ट्विट केला आहे. 


 

एकशे आठ वर्षे उत्तमराव मास्ट यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा डोस

कोरोना लसीकरण मोहीम देशभरात राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. परंतु नागरिक लसीकरणाला प्रतिसाद देताना दिसून येत नाहीत. अशातच हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेल्या एकशे आठ वर्षे वय असलेले उत्तमराव मास्ट यांनी आज कोरोना लसीकरनाचा पहिला डोस घेतला आहे.  

अकोल्यात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण

दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या निदानासाठी रुग्णाचे ‘आरएनए’ सॅम्पल पुण्याला पाठविण्यात आले होते.  

महाराष्ट्रातील 50 मान्यवरांना ‘महाराष्ट्राची गिरीशिखरे’ पुरस्कार प्रदान, 'एबीपी माझा'चे संपादक राजीव खांडेकर यांचाही सन्मान

पीपल्स आर्टस सेंटर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या  हिरक महोत्सवी वर्षपूर्तीचा भव्य दिव्य सोहळा वांद्रेच्या रंगशारदा सभागृहात आज पार पडला. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'महाराष्ट्राची गिरीशिखरे' या पुरस्करांचे वितरण करण्यात आले. 


यावेळी पार्श्वगायिका उषाताई मंगेशकर, पार्श्वगायक सुरेश वाडकर, जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हटटगंडी, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, शास्त्रीय गायिका आशाताई खाडिलकर, संगीत दिगदर्शक अशोक पत्की, मराठी गझल गायक भीमराव पांचाळे, हणमंतराव गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवरांना आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पन्नास व्यक्तिमत्त्वांपैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

परभणीच्या पालम तालुक्यातील पेठशिवणी परिसरात अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 9 जण गंभीर जखमी

परभणीच्या पालम-लोहा महामार्गावरील पेठशिवणी परिसरात आय 10 आणि कृझर या दोन वाहनांत झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 9 जण जखमी झाल्याची घटना घडलीय. परभणीच्या पालम-लोहा महामार्गावर आज दुपारी साडेतीनच्याच्या सुमारास नांदेड हुन पालमकडे येणारी आय 10 व पालम कडुन नांदेडकडे जाणारी क्रूझर या दोन वाहनांत समोरासमोर धडक झाली. या अपघातात आय 10 मधील दोन पुरुष व एका महिलेचा जागिच मृत्यू झाला असून क्रूझर मधील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पेठशिवणी ग्रामस्थांनी तात्काळ नांदेड येथे उपचारासाठी हलवले असुन पालम पोलीस घटनास्थळी पोचले आहे. 

जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

जोडून आलेला शनिवार- रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून आज दीड ते 2 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मंदिर परिसरातदेखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज जेजुरीत सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. 


 

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. 

'रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मी सहन करणार नाही'

'रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मी सहन करणार नाही'


केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पहिल्यांदाच अधिकाऱ्यांवर संतापल्या 


कोरोना काळात रुग्णांच्या झालेल्या हेळसांडीवरून आरोग्य अधिकाऱ्यांना झाडलं


शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने भडकल्या पवार


दिल्लीच्या अधिकाऱ्यांचे उदाहरण देत अधिकाऱ्यांना काम सुधारण्याची दिली समज

पुणे-सोलापूर महामार्गावर 50 लाखांचा गांजा जप्त: यवत पोलिसांची कारवाई

दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस हद्दीत यवत पोलिसांनी गांजा तस्करी करणारी टोळी पकडून 50 लाखाचा गांजा जप्त केलाय..यवत पोलिसांना गुप्त महितीनुसार पाटस हद्दीत मध्यरात्री 1 च्या सुमारास एक मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला..या ट्रकची तपासणी केली असता यात 50 लाख रुपयांचा गांजा आढळून आला आहे..या कारवाईत तब्बल ट्रक मधून प्रवास करणाऱ्या 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..परराज्यातून मुंबईसाठी गांजा विक्रीसाठी चाललेला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे...याबाबत अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत...

विठ्ठल मंदिर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद

विठ्ठल मंदिर देखील रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्री 9 नंतर जमावबंदी आदेश दिल्याने आजपासून विठ्ठल मंदिर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद राहणार

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाला मान्यता घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज संध्याकाळी राज्यपालांना भेटणार

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाला मान्यता घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज संध्याकाळी राज्यपालांना भेटणार, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील राज्यपालांना भेटणार 

 पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंप सत्र सुरू,  नागरिक भीतीच्या छायेत

 पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंप सत्र सुरू,  नागरिक भीतीच्या छायेत


डहाणू तलासरी तालुक्यातील गाव पहाटे पाच वाजून 35 मिनिटांनी पुन्हा 3.9 रिश्टर स्केल या धक्‍क्‍याने हादरली


अच्छाड, तलासरी, धुंदलवाडी, बोर्डी, घोळवड, धानिवली ,आंबोली, कासा भागात जाणवले भूकंपाचे धक्के 


दोन दिवसापूर्वी जाणवले होते जव्हार मोखाडा भागात भूकंपाचे धक्के

 सांगलीत आज 28 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 28 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 26 डिसेंबर 2021 रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह सांगली येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका सुवर्णा पवार , प्रमुख उद्घाटक इंद्रजीत देशमुख सर व संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ सौ जयश्री श्रेणिक पाटील,अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली आहे, 

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डाॅ.जयश्री श्रेणिक पाटील या असणार आहेत, डाॅ.पाटील या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत,आता नुकतेच राज्यपालांच्या हस्ते मेडीक्विन एक्सलन्स पुरस्कारानेही राजभवन मध्ये त्या सन्मानित झालेल्या आहेत ,तसेच उत्तम साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यां ,प्रभावी वक्त्या,चित्रकार,संगीतकार,अभिनेत्री, जात्यावरील ओव्या,उखाणे, पाळणे यांच्या लेखिका म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत,'वेध शब्दांचा' आणि स्त्रीशक्तीची उत्तुंग भरारी तरी स्त्री भ्रूण हत्या का ?त्यांची ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत वैद्यकीय क्षेत्रात हि त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटिवला आहे, त्या एक्स-रे सोनोग्राफी सिटी स्कॅन एमआरआय तज्ञ आहेत ,वेध डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षे वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि विविध विषयावर आतापर्यंत हजारो व्याख्यानं त्या देत आलेल्या प्रभावी वक्त्या आहेत. या अगोदर डाॅ.डी.वाय.पाटील या सारख्या अनेक दिग्गजांनी स्वागताध्यक्षपद भूषिवले आहे, 26 डिसेंबर रोजी होणार्या या साहित्य संमेलनास राज्यभरातून 200 साहित्यिक उपस्थिती लावणार आहेत, उदघाटन सोहळा,पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली जाहीर कोरोना संबंधी नवीन नियमावली

बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली जाहीर कोरोना संबंधी नवीन नियमावली.
लग्नसमारंभात 100 व्यक्तींनाच परवानगी.
इतर सामाजिक कार्यक्रमांना 100 व्यक्तींनाच परवानगी.
रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी असणार.
रेस्टॉरंट , जिम ,सिनेमा आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
पूर्वनियोजित सभा ह्या 50 टक्के क्षमतेने घेता येतील.
पूर्वनियोजित परीक्षा कोविड नियम पाळून घेण्यात येथील.


काल रात्रीपासून नवीन नियमावली जिल्ह्यात लागू.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


१. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण,१० जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठांना बुस्टर डोस, पंतप्रधान मोदींचं जनतेला न्यू इयर गिफ्ट 


PM Narendra Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबधी देखील माहिती दिली. तसंच सध्या सुरु असलेल्या सणांच्या काळातही काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.


नेमक्या तीन घोषणा काय?


पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. 





 


अजूनही काळजी घेणं महत्त्वाचं


कोरोनाच्या संकटाबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारत या संकटाचा सामना मोठ्या शिताफीने करत असल्याचं सांगतिलं. आतापर्यंत 141 कोटी जनतेचं लसीकरण झालं असून आपली अर्थव्यवस्थाही उस्ताहजनक आहे. दरम्यान लसीकरण कोरोनाविरुद्ध एक मोठं शस्त्र असल्याचंही ते म्हणाले. तसंच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, कोरोना अजूनही गेला नसल्याने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.


२. लहान मुलांसाठी पहिल्या स्वदेशी लशीला हिरवा कंदील, १२ ते १८ वयोगटातील मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस मिळणार


३. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस हायकमांड कुणाला कौल देणार याची उत्सुकता शिगेला, संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण आणि के. सी. पाडवींच्या नावाची चर्चा


४. सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंतच शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन मिळणार, काकड आणि शेजारतीसाठी भक्तांना प्रवेश नाही, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानं निर्बंध


५. राज्यातील थंडी कमी होणार... खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, तर २८ आणि २९ डिसेंबरला मराठवाड्यातील काही भागात पावसाचाही अंदाज


६. आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात, वाद विसरुन आफ्रिकन सफारी फत्ते करण्याचा विराटसेनेचा निर्धार, टीम सिलेक्शनचा गुंता सोडवण्याचं आव्हान 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.