Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करणं चुकीचं - मुख्यमंत्री ठाकरे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखा जाहीर
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.03 जून ते 10 जून, 2022 घेण्यात येणार आहेत
तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.11 जून ते 28 जून 2022
तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.
करुणा शर्मा यांचा मुंडे करूणा धनंजय याच नावाने उमेदवारी अर्ज वैध
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून करुणा निवडणुकीच्या रिंगणात
पोट निवडणुकीसाठी एकूण 17 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे वैध
CM Uddhav Thackeray : विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन- मुख्यमंत्री
-देशात सर्वात कमी मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात आहे
-महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं चुकीचं आहे.
-केवळ महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय
-चांगली कामं विरोधकांना कधी दिसतच नाही
-मी जन्मानं मुंबईकर, मला याचा अभिमान
-रावणाची जीव बेंबीत, तसा काही जणांचा मुंबईत आहे.
Mumbai News : शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.
अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हटवा या मागणीसाठी लोकसभेत नवनीत राणा यांचा ठिय्या. लोकसभा अध्यक्ष यांच्या समोर वेलमध्ये आंदोलन. त्यांना समजावण्यासाठी आता लोकसभा अध्यक्ष त्यांच्या दालनामध्ये चर्चा करत आहेत
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक यांची टिटवाळ्यातील जमीन आणि ठाण्यातील दोन फ्लॅट्स अशी एकूण 11.35 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
- सेन्सेक्समध्ये 134 अंकांची घसरण तर निफ्टी 39 अंकांनी खाली
- निफ्टी बॅंकेच्या निर्देशांकातही घसरण
- एअरटेलनं 2015 सालच्या स्पेक्ट्रम ड्यूचे 8 हजार 815 कोटी भरल्याने समभाग तेजी
- एसबीआय, एचडीएफसी, महिंद्रा ॲंड महिंद्रा, युपीएल, टाटा मोटर्सचे समभाग तेजीत
- कच्च्या तेलाचे भाव जागतिक स्तरावर 119 डाॅलर प्रति बॅरलवर
- डाॅलरच्या तुलनेत रुपया 76.20 वर
जालना : पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल (24 मार्च) दुपारी घडली. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील संकणपुरी गावात ही घटना घडली. उमेश नाचण वय 11 वर्ष, करण नाचण वय 14 वर्ष आणि अजय टेकाळे वय 13 वर्ष अशी या मृत मुलांची नावं आहेत. हे तिघे काल दुपारी गावातील नदीवर पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. मात्र अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचा ( NIA ) दोन ठिकाणी छापा
दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे बुलढाण्यात कनेक्शन असल्याने छापा
छाप्यात संशयास्पद सिमकार्ड ,कागदपत्रे व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी टाकण्यात आले छापे
या संदर्भात जानेवारी 2020 मध्ये आंध्रप्रदेशात NIA ने गुन्हे दाखल केले होते
या बाबत बुलढाणा पोलिसांचा बोलण्यास नकार
वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच गोरेगाव येथील पुर्नविकास होत असलेल्या पत्रा चाळीला यापुढे सिद्धार्थनगर नावानं ओळखलं जाईल असेही आव्हाड यांनी जाहीर केलं.
मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती 100 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीचा पुर्नविकास कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल अशी घोषणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे, म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळीचा पुर्नविकास या आणि अशा अनेक विषयांबाबत विधानसभा सभागृहात नियम 293 अन्वये चर्चा करण्यात आली. या चर्चेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज उत्तर दिले.
देशातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?
शहरं | पेट्रोल (प्रति लिटर) | डिझेल (प्रति लिटर) |
मुंबई | 112.51 | 96.70 |
दिल्ली | 97.81 | 89.07 |
चेन्नई | 103.67 | 93.71 |
कोलकता | 107.18 | 92.22 |
भोपाळ | 109.85 | 93.35 |
रांची | 100.96 | 94.08 |
बंगळुरु | 103.11 | 87.37 |
पाटना | 108.37 | 93.49 |
चंदिगढ | 96.59 | 83.12 |
Petrol-Diesel Price Today 25 March 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांची धाकधुक वाढवली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) प्रत्येकी 83 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरनं वधारले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात. दरम्यान, जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलामुळं भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वक्तव्य केलं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
BBD Chal : वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच गोरेगाव येथील पुर्नविकास होत असलेल्या पत्रा चाळीला यापुढे सिद्धार्थनगर नावानं ओळखलं जाईल असेही आव्हाड यांनी जाहीर केलं.
मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती 100 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीचा पुर्नविकास कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल अशी घोषणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे, म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळीचा पुर्नविकास या आणि अशा अनेक विषयांबाबत विधानसभा सभागृहात नियम 293 अन्वये चर्चा करण्यात आली. या चर्चेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज उत्तर दिले.
निवारा देणे हे म्हाडाचे काम असून त्यासोबतच सामाजिक जाणीवेतून देखील म्हाडा काम करत आहे. परळमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग येथील इमारतीमधील 100 खोल्या कॅन्सरचे उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईंकासाठी दिल्या आहेत. तळीये गावात अतिवृष्टी झाली. त्यावेळीच तळीये गावाचा पुर्नविकास म्हाडा करेल असे जाहीर केले होते. जून 2022 पर्यंत म्हाडा तळीये गावातील लोकांना 600 फुटांचे घर देणार आहे. मुंबईतील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी एक नवे वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे. 19 मजल्यांची एक इमारत बांधण्यात येत आहे. ताडदेव येथे 32 कोटी खर्च करुन 928 महिला राहू शकतील अशी इमारत बांधण्यात येत आहे. तसेच पालघर येथे 20 एकरची जागा मिळाल्यास तिथे एक चांगले वृद्धाश्रम बांधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Petrol-Diesel Price Today 25 March 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांची धाकधुक वाढवली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) प्रत्येकी 83 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरनं वधारले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात. दरम्यान, जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलामुळं भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वक्तव्य केलं आहे.
देशात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत जे बदल करण्यात आले होते ते 137 दिवसांनी करण्यात आले होते. त्यापूर्वी देशात इंधन दर स्थिर होते. आता सलग दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्यानंतर आज मात्र देशातील दर स्थिर आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -