Bulletproof Glass : काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खान याला देखील धमक्या येत असल्याने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढवण्यात आली होती. विशेष काळजी म्हणून सलमानच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये बुलेटप्रूफ काच (Bulletproof Glass) लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुलेटप्रुफ काचेची किंमत किती असते? या मुद्दा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. बंदुकीच्या गोळीला आर पार न जाऊ देणाऱ्या काचेची किंमत किती? ही काच मिळवण्यासाठी कोणते नियम असतात जाणून घेऊयात...
सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी बुलेटप्रुफ काचेचा (Bulletproof Glass) वापर केला जातो. अनेक व्हीआयपी आणि व्यावसायिक त्यांच्या घराच्या बाहेर, कार्यालयांच्या बाहेर आणि त्यांच्या कारला ही बुलेटप्रुफ काच लावतात. त्यामुळे त्यांना सुरक्षा मिळते. बुलेट प्रुफ काच सामान्य काचेपेक्षा जाड आणि मजबूत असते.
सुरक्षेच्या दृष्टीने बुलेटप्रूफ काच सर्वोत्तम मानली जाते. मारलेली गोळी या काचेतून आरपार जाऊ शकत नाही. या ग्लासमध्ये अनेक प्रकारचा कच्चा माल वापरला जातो, ज्यामध्ये पॉली कार्बोनेट, लॅमिनेटेड ग्लास आणि नीलम यांचा समावेश आहे. ही काच सामान्यत: एकापेक्षा जास्त थरांमध्ये असते, ज्यामुळे गोळीच्या धडकेमुळे काच फुटत नाही.
उद्योगपती, राजकारणी आणि कलाकार ही काच आपल्या कारला बसवून घेतात. बुलेटप्रुफ काचेचे दर त्याचा प्रकार, जाडी आणि डिझाईन अशा अनेक बाबींवर अवलंबून असतात. मीडिया रिपोर्टनुसार, घरामध्ये बुलेट प्रूफ काच बसवण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट अंदाजे ₹5000 ते ₹10,000 इतका खर्च येतो. मात्र, काचेच्या जाडीत आणि दर्जात बदल झाल्यास हा खर्च आणखी वाढू शकतो. भारतात, कोणतीही व्यक्ती त्याच्या सुरक्षिततेसाठी ही काच बसवून घेऊ शकते.
बुलेटप्रूफ काचेवर गोळी लागली तर ती जागेवर तिथेच थांबते. सोप्या भाषेत, बुलेटप्रूफ काच सहजपणे फुटत नाही आणि एक गोळी त्यामधून एकाच वेळी जाऊ शकत नाही. मात्र, लष्करी जवानांसह विविध ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या बुलेट प्रूफचा काचेचा (Bulletproof Glass) दर्जाही वेगळा आहे. एकाच ठिकाणी वारंवार गोळ्या झाडल्या गेल्याने काही बुलेटप्रूफ काचा देखील तुटतात तर काही फार काळ तुटत नाहीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या