Maharashtra Breaking News LIVE Updates: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 25 Dec 2021 10:18 PM
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणतात. 

आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. 10 जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे. तसंच 60 वर्षावरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

15 ते 18 वर्षांतील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु करणार

सोमवारी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षांतील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु कऱणार असल्याची मोठी घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

PM Modi Live : कोरोना अजूनही गेलेला नाही!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं आहे, भारत कोरोनाविरुद्धच्या लढाईत कामगिरी करत आहे. आतापर्यंत 141 कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे, भारताची आर्थिक स्थितीही उत्साहजनक आहे. पण कोरोना अजूनही गेलेला नसल्याने काळजी महत्त्वाचं आहे.  

PM Modi Live : ओमायक्रॉनविरुद्ध काळजी घेणं गरजेचं

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी यावेळी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.  

डोंबिवलीत मंगळवारी पाणी पुरवठा बंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 150 दशलक्ष लीटर नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने मंगळवार 18 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत महानगरपालिकेच्या नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम विभागामध्ये होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी डोंबिवलीकर नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगर पालिकेचे सहकार्य करावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

औरंगाबादेत दोन जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग

औरंगाबादेतील नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेल्या एनआरआय कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी ओमायक्रॉन बाधित आढळली होती. तेथे अहवाल निगेटिव्ह आल्याने आधी आई, बहीण आणि वडील असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, येथे तपासणीअंती ओमायक्रॉन बाधित मुलीचे 50 वर्षीय वडील कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. ते ओमायक्रॉन बाधित आहेत की नाही, याचे निदान होण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला स्वॅब नमुना पाठविण्यात आला होता. या तपासणीचा अहवाल शनिवारी मिळाला आणि त्यातून हा व्यक्ती ओमायक्रॉनबाधित असल्याचे समोर आले. शिवाय आणखी एक 32 वर्षीय व्यक्तीला नाव या विषाणूची बाधा झाली आहे.

ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या एका चार महिन्याचा मुलाचा संशयास्पद मृत्यू 

ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या एका चार महिन्याचा मुलाचा संशयास्पद मृत्यू 


काल पासून बेपत्ता होता हा मुलगा आज सकाळी घराजवळच असलेल्या पाण्याच्या ड्रम मध्ये शेजारच्यांना आढळला मृतदेह 


कळवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काही जणांना चौकशी साठी घेतले ताब्यात 


काल दुपारी राहत्या घरातून कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार आई शांताबाई शंकर चव्हाण यांनी कळवा पोलीस ठाण्यात केली होती.

मराठवाडा आर्थिक मंथन बैठकीला मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची पाठ 

लातूर : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत लातूर येथे मराठवाड्यातील सर्व बँकर्स यांच्या उपस्थितित मराठवाडा आर्थिक मंथन  बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व खासदार निमंत्रित होते. मात्र भागवत कराड आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशिवाय या बैठकीला कुणीही हजर नव्हते.

जालना-जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुटा गावात दरोडा, महिलांना मारहाण करून अंगावरील दागिने ओरबाडून पळ

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुटा गावात शेतवस्तीवर मध्यरात्री महिलांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडलीय. 4 ते 5 दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत महिलांना जबर मारहाण केली. ज्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्यात .त्यांना उपचारासाठी जालन्यातील  शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..यावेळी दरोडेखोरांनी अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार जाफराबाद पोलीस ठाण्यात देण्यात आलीय..

मंगळवेढा-सोलापूर रोडवर बेगमपूरनजीक अर्टिगा आणि टेम्पो अपघातात तिघांचा मृत्यू, 5 जखमी

मंगळवेढा-सोलापूर रोडवर बेगमपूरनजीक अर्टिगा आणि टेम्पो अपघातात तिघांचा मृत्यू, 5 जखमी

सुशासन दिवसाच्या कार्यक्रमात शासनाने घालून दिलेल्या नियमांचा फज्जा

ओमायक्रोन व्हेरीयंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंधांची सुरुवात झाली आहे... कालच राज्य सरकारने रात्रिकालीन जमावबंदीचे आदेश काढत सामाजिक, धार्मिक आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपस्थितांची संख्या ही निश्चित केली आहे... मात्र आज नागपुरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या सुशासन दिवसाच्या कार्यक्रमात शासनाने घालून दिलेल्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले... नागपूरच्या शिक्षक सहकारी बँकेत झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते... या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी येण्याच्या आधी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी आणि इतर भाजप आमदारांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बुथ प्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुख असलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले... यावेळी कार्यक्रम आणि सत्काराच्या उत्साहात भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोरोनाच्या नियमांना तिलांजली देताना दिसून आले... अनेकांच्या चेहऱ्यावरून मास्क गायब होते... तर सोशल डिस्टंसिंगचा ही फज्जा उडाला होता... एवढच नाही तर दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह माजी महापौर अर्चना डेहनकर ह्या मंचावरच विना मास्क बसल्याचे पाहायला मिळाले... त्यामुळे जनतेसाठी असलेले नियम राजकीय पक्ष आणि नेत्यांना लागू नाहीत का असा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माण झालंय...

सांगलीत विवाहित प्रेमी युगुलाची आत्महत्या

सांगलीत विवाहित प्रेमी युगुलाची आत्महत्या


कुपवाड-बुधगाव रस्त्यावरील मळ्यात दोघांची आत्महत्या.


कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल..

दादरमधील ब्लड टेस्टिंग लॅबमधील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह, लॅब सील
दादर पश्चिमेला असलेल्या ब्लड टेस्टिंग लॅबमधील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ती लॅब सील करण्यात आली आहे

 

काल ब्लड टेस्टिंग लॅब मधील  कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट समोर आल्यानंतर ही लॅब सील करण्यात आली 

 

कोरोना पॉझिटिव्ह  आलेल्या व्यक्तींना सौम्य लक्षणे असल्याने होम क्वांरटाइन केले गेले असल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे

 

ब्लड टेस्ट करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीकडून ही कोरोनाची बाधा झाल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

 

या लॅब मध्ये मध्ये आलेल्या किंवा  या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोधून त्यांच्या कोरोना चाचणी करण्याचं काम प्रशासनाकडून केले जाईल
उस्मानाबाद मधील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक के टी पाटील यांचे निधन

उस्मानाबादमधील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक के टी पाटील यांचे निधन


आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील चिंचणी- अंबक या गावात  जन्म झाला. 


सुरुवातीपासूनच शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या बप्पा यांनी 1952 मध्ये इंग्लिश मधून ओनर्स व बीए.बी.टी पदवी घेतली होती.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या कांदिवली येथील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला परवानगी नाकारली,खासदार गोपाळ शेट्टी यांचा दावा

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कांदिवली येथे वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार होता परंतु राज्य सरकारने पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिली नाही असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे त्यामुळे आजचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबईत येणार होते परंतु काल राज्य सरकारने ऐनवेळी परवानगी नाकारली त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला असा भाजपने दावा केला आहे.

पार्श्वभूमी

1.ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध,थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी नाकारली


Maharashtra Corona Omicron Update  new guidelines  : राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. या जमावबंदीच्या दरम्यान राज्यात सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आणण्यात येणार आहेत.  


संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळा- मुख्यमंत्री 


विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील 110 देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.


एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत.  ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.


2. मुंबईत नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्याची मनाई, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे आदेश


3. कोरोनाच्या सावटाखाली देशभरात नाताळचं सेलिब्रेशन, जगभरातल्या चर्चवर रोषणाई, नाताळासाठी सरकारची नियमावली


4. एसटीच्या विलिनीकरणाचं डोक्यातून काढून टाका, विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, एसटी कर्मचारी कोणतं पाऊल उचलणार याकडे लक्ष


5. फोन टॅपिंग अहवाल कसा लिक झाला याबाबत देवेंद्र फडणवीसच माहिती देऊ शकतात, राज्य सरकारचा मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात दावा


6. कोरेगाव-भीमा चौकशी आयोगास आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ; राज्य सरकारची परवानगी


7. फुकट दारू आणि जेवणासाठी मुंबईतील एपीआय विक्रम पाटलांची बार मॅनेजरला मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, वरिष्ठांकडून चौकशीचे आदेश


8. हवाई दलाच्या मिग-21 विमानाचा जैसेलमेरजवळ अपघात, पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हांचा मृत्यू


9. आदित्य ठाकरेंवरील आक्षेपार्ह वक्तव्य नितेश राणेंना भोवण्याची शक्यता, शिवसेनेकडून निलंबनाची मागणी


10. राज्यात कोरोना रुग्णांमध्येही सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, शुक्रवारी 1410 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 23 नवे ओमायक्रॉनबाधित

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.