Maharashtra Breaking News LIVE Updates : ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, सुनावणी 4 मे रोजी होणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर, पुढची सुनावणी आता 4 मे रोजी, ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निवडणुकांच्या तारखा प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत त्याला आव्हान, 13 याचिका दाखल आहेत
निल सोमय्या म्हणाले की, हायकोर्टाच्या निर्देशानुसार मी आज चौकशीला हजेरी लावली आहे. किरीटजी सोमय्या यांनीही चार दिवस चौकशीला हजेरी लावली होती आता पुढचे चार दिवस मी चौकशीला आर्थिक गुन्हे शाखेत येईन. किरीटजी यांच्यावर हल्ला झाला हे दुःखद पण महाराष्ट्र सरकारमधले काही फॅक्टर्स आहेत जे याच्याकडे कानाडोळा करतात..केंद्रात आमचं सरकार आहे म्हणून आमच्याबाबतीत घडलेल्या प्रकारची दाद आम्ही केंद्रात मागतो आहोत..
राणा दांपत्याकडून दुसरा एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव
आयपीसी कलम 353 खाली पोलीसांच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्हा
पोलीसांच्या कारवाई कोणताही अडथळा न आणल्याचा राणा दांपत्याचा दावा
रविवारी सकाळी खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय गुन्हा
थोड्याचवेळात हायकोर्टात सुनावणी
कोल्हापूरच्या उचंगी धरणाचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक
पोलीस आणि धरणग्रस्त शेतकरी यांच्यामध्ये बाचाबाची
घळभरणीचे काम थांबवण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा धरणावर मोर्चा
प्रलंबित मागण्या मान्य करा अशी शेतकऱ्यांची मागणी
आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी घेतले ताब्यात
औरंगाबाद येथील मनोज आव्हाड या तरुणाची अमानुष हत्या झाल्यानंतर या घटनेचे पडसाद आता गेवराईत उमटले आहेत. हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पँथर्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेवराई शहरातील दसरा मैदानाजवळ जाळपोळ करत एसटी बसवर तुफान दगडफेक केलीय. हातात काठ्या घेऊन घोषणाबाजी करत येईल त्या एसटी बसची तोडफोड केलीय. या घटनेनंतर गेवराई शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या जाळपोळ आणि दगडफेकीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. याप्रकरणी अज्ञात कार्यकर्त्यांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय..
यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधी नंतर सर्व गोष्टी पूर्व पदावर येत असताना अशा स्पर्धांची आवश्यकता आहे. ,अशा स्पर्धा च्या माध्यमातून खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते,अशाच स्पर्धाच्या माध्यमातून प्रो कबड्डी मध्ये चांगले खेळाडू मिळालेत . प्रो कबड्डीच्या विविध राज्याच्या संघात ठाणे जिल्हा तसच कल्याण डोंबिवली मधून खेळाडू सहभागी झालेत त्यामुळे अशा स्पर्धाची गरज आहे .दरम्या सलग चार दिवस ही स्पर्धा होणार आहे .या स्पर्धेत कल्याण डोंबिवली ,नवी मुंबई ,भिवंडी शहापूर ,ठाणे ,वाशिंद ,सह ठाणे जिल्ह्यातून 91 संघांनी सहभाग घेतला आहे .विशेष म्हणजे या मध्ये महिलांच्या 26 संघानी सहभाग घेतला आहे .
गडचिरोली: माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षेत असलेल्या रक्षकाने आत्राम यांच्या चौकशी गेटसमोर स्वतःवर रिव्हाल्वरने गोळी झाडून केली आत्महत्या..
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरीतील राजमहाल परिसरातील घटना..
हितेश भैसारे मृत पोलीस जवानाचे नाव असून कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न..
शवच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून घटनेचा अधिक तपास सुरू..
#BREAKING : ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, सुनावणी 4 मे रोजी होणार https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-25-april-2022-today-monday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1053403
Devendra Fadnavis : 'राज्यातील घटना पाहता सरकारनं संवादासाठी जागा ठेवली नाही. राज्य सरकारकडून हिटलरशाही सुरू आहे', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवनीत राणा यांच्या घराखाली शिवासैनिकांनी केलेल्या गोंधळाच्या प्रकरणात काल खार पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या सर्व 16 शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
आणखी शिवसैनिकांना अटक करायची आहे की नाही हे तपासण्यासाठी पोलिस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नवनीत राणा यांच्या घराखली घडलेल्या घटनांनंतर त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या एक एफआयआर मध्ये 600-700 अज्ञात शिवसैनिकांवर बॅरिकेड्स तोडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप आहे.
सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता- सूत्र
सर्वपक्षीय बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत करण्यात येणारं
सर्व पक्षीय नेत्यांसोबतच्या बैठकीत मागील सरकारच्या काळात पर्यावरण विभागाने काढलेल्या जीआर बाबत माहिती देण्यात येणार
पर्यावरण विभागाने आत्तापर्यंत काढलेल्या 5 जीआर बाबत आदित्य ठाकरे यांच्याकडून अमलबजावणी संदर्भात माहिती देण्यात आली- सुत्र
पालकमंत्री छगन भुजबळ यांची महापालिकेत एन्ट्री
- महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार
मनपा आयुक्त रमेश पवार आणि इतर अधिकारी उपस्थित
- महापौरांची मुदत सम्पल्यानं मनपात प्रशासकीय राजवट
- प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर भुजबळ यांचा महापालिकेच्या कामकाजावर अंकुश
- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकावर लक्ष केंद्रीत करण्याचा भुजबळ यांचा प्रयत्न
- म्हाडा सदनिका वाटपात घोटाळा झाल्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता आरोप
- आव्हाडांच्या आरोपांनंतर विधानपरिषद सभापतींनी तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची केली होती तडकाफडकी बदली
- नगररचना अधिकारी आणि बांधकाम प्रकल्पाच्या कामकाजाचा भुजबळ घेणार आढावा
Gunratna Sadavarte Updates : गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, सदावर्तेंना आर्थर रोड जेलमध्ये हलवलं जाणार, सदावर्तेंचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचा कोर्टात अर्ज
निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे आज पुण्यात निधन झाले
वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
१९५९ मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम करायला सुरुवात केली
१९९३ मध्ये ते भारताचे केंद्रीय गृहसचिव होते
राज्याचे मुख्य वित्त्सचिव पदाचे कार्यभार देखील त्यांनी सांभाळले
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रवक्ते कधीपासून झाले असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेबाबत पोलिसांनी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना करून ईदनंतर ही सभा घ्यावी असे कळविले असतानाच केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांची सभा एक तारखेला होणारच असं वक्तव्य करून स्वतःचंच हसं करून घेतले आहे असेही महेश तपासे म्हणाले.राज ठाकरे यांची सभा व्हावी आणि त्यातून राज्यातले सामाजिक वातावरण बिघडावे ही भाजपची रणनीती आता उघड झाली आहे. राज ठाकरे हे भाजपाची 'सी' टीम आहे हे आम्ही पहिलेच ओळखलं होते आणि आता केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर यावर शिक्कामोर्तब देखील झाला आहे अशी टीका महेश तपासे यांनी केली. महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था बिघडावी व त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा हा एक कलमी कार्यक्रम घेऊन राणा दांपत्य यांनी मातोश्रीला जाण्याचा चंग बांधला. त्यांच्या या कृतीला भाजपाचे समर्थन होते हे आता महाराष्ट्रातल्या जनतेपासून लपलेले नाही असेही महेश तपासे म्हणाले. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व त्यानंतर होणाऱ्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळत राहिले. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी आता नवीन युक्ती केली पाहिजे यासाठी चिंतन नागपूर व दिल्ली येथे झाले असावे व त्यातून भाजपने आपली राजकीय रणनीती बदलून धार्मिक तेढ, कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण करून सरकारला घेरण्यासाठी काही जबाबदारी राज ठाकरे व राणा दांपत्य यांच्यावर सोपविण्यात आली असा संशय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे अशी शंका महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.
सर्वपक्षीय बैठकीसाठी आत्तापर्यंत मंत्री अस्लम शेख, मंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, वारीस पठाण, रईस शेख पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, इम्प्तियाज जलील
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. ते स्वतः तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपा कार्यालय, नरिमन पॉइंट येथे *दुपारी 1 वाजता पत्रकारांशी संवाद साधतील. *
Pune News Updates : पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस कोल्हापूर कोर्टात दाखल
2020 मध्ये सदावर्तेवर दाखल असलेल्या गुन्हयात सदावर्तेचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस कोर्टात दाखल
नवनीत राणा आणि रवी राणा यांची मुंबई हायकोर्टात धाव
आपल्या विरोधात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात सादर केली याचिका
दुपारी तातडीच्या सुनावणीची मागणी
Gunratna Sadavarte Updates : गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सदावर्तेंकडून जामीनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता
कोल्हापूर-: वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज पुन्हा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार
5 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानं आज 11 वाजता सदावर्तेना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार
दोन जातीत तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्याने सदावर्तेवर कोल्हापूर मधील शाहूपुरी पोलीस ठाण्यात 15 तारखेला 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता
20 तारखेला सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळाल्यानंतर 21 तारखेला कोर्टानें 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती
Navneet Rana Health Update : नवनीत राणांची प्रकृती चांगली, वेळेवर जेवणही केलं, नवनीत राणा यांना स्वतंत्र बराकमध्ये ठेवलं, कोणतीही विशेष सुविधा नाही
Beed Georai News : औरंगाबाद येथील मनोज आव्हाड या तरुणाची अमानुष हत्या झाल्यानंतर या घटनेचे पडसाद आता गेवराईत उमटले आहेत. हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पँथर्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेवराई शहरातील दसरा मैदानाजवळ जाळपोळ करत एसटी बसवर तुफान दगडफेक केलीय. हातात काठ्या घेऊन घोषणाबाजी करत येईल त्या एसटी बसची तोडफोड केलीय. या घटनेनंतर गेवराई शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या जाळपोळ आणि दगडफेकीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. याप्रकरणी अज्ञात कार्यकर्त्यांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कार्यक्रम पार पडत आहे. सोलापुरात तयार करण्यात आलेल्या तब्बल आठ हजार कोटी रुपयांच्या चार महामार्गाचे लोकार्पण आणि 164 कोटी रुपयांच्या सहा महामार्गावरील प्रकल्पांचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडत आहे. सोलापुरातल्या नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित आहेत.
एकीकडे औरंगाबाद पोलीस राज ठाकरे यांच्या सभेला अजूनही परवानगी दिली नाही .दुसरीकडे मात्र मनसे कार्यकर्त्यांनी सभेची तयारी सुरू केली आहे . काल मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर व्यासपीठ उभारणीच्या कामास सुरवात करण्यात आली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाचे पुजन करून कामास सुरवात करण्यात आली आहे.
किरीट सोमय्या मारहाण प्रकरण:
गृहखात्याकडून प्रकरणाची सत्यता पडताळन्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली जाणार
किरीट सोमय्या यांना झालेली जखम खरचं संबंधित हल्ल्यातून झाली की नाही याची पडताळणी करण्यात येणार
"एबीपी माझा"ला सूत्रांची माहिती
भोंग्यांसंदर्भातल्या सर्वपक्षीय बैठकीआधी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
आजच्या सर्वपक्षीय बैठकीतील मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
राज ठाकरेच्या औरंगाबाद सभेआधी सर्वपक्षिय बैठकीत मनसेच्या भूमीकेसंदर्भात पदाधिका-यांमध्ये चर्चा
मनसेकडून बाळा नांदगांवकर,संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई सर्वपक्षिय बैठकीत प्रतिनीधीत्व करणार...
बाळा नांदगांवकर यांच्या निवासस्थानी सध्या या तिघांमध्ये बैठक होईल...त्यानंतर सर्वपक्षिय बैठकीकरता मनसे पदाधिकारी सह्याद्री रवाना होतील
भिवंडी तालुक्यातील पारोळ मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून कामा निमित्त निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .जयवंती जयराम सालकर वय 45 वर्ष व शशिकांत शिंदे वय 35 वर्ष असे अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत.
भिवंडी तालुक्यातील भुईशेत गावात राहत असलेले शशिकांत शिंदे हे नोकरीनिमित्त मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांना रस्त्यात गावात राहणारी जयवंती सालकर गजरा विकण्यासाठी शिंदे यांच्या दुचाकी वर बसल्या व भिवंडीच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र दुचाकी भिवंडी पारोळ महामार्गावरील लाखीवली गावाजवळ असलेल्या जांभूळ पाडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात झाला व त्यात 1 महिला व 1 पुरुष जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . जयवंती जयराम सालकर वय 45 वर्ष व शशिकांत शिंदे वय 35 वर्ष असे अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. सध्या घटनास्थळी तालुका पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदन करता भिवंडीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे व पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.
Congress Maharashtra : केंद्र सरकारच्या विरोधात राज्यात काँग्रेस होणार आक्रमक
काँग्रेस मंत्री आणि आमदारांची उद्या बोलावली बैठक
या बैठकीत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाची ठरणार रूपरेषा
काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर उद्या १ वाजता विधान भवनात बैठक
काँग्रेस मंत्री आणि आमदारांची होणार बैठक
महागाई, केंद्रीय संस्थांचा गैरवापर, केंद्र सरकारची पॉलिसी यासंदर्भात काँग्रेस होणार आक्रमक
निल सोमय्यांची EOW कार्यालयात आज 11 वाजता हजेरी, आर्थिक गुन्हे शाखा(EOW) ,पोलीस आयुक्त कार्यालयात हजेरी लावणार
मुंबई : राणा दाम्पत्याला वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच त्यांच्या जामीन अर्जावर येत्या 29 एप्रिलला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेपर्यंत त्यांचा मुक्काम हा जेलमध्येच असेल. दरम्यान मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला हायकोर्टात आव्हान देत राणा दाम्पत्य आपल्या अटकेविरोधात दाद मागू शकतं.
नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहे. दरम्यान दिल्लीत पोहोचल्यावर सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
satara news Updates : यात्रेतील देवीच्या गाड्याचे चाक छातीवरून गेल्यानं तरुणाचा मृत्यू, साताऱ्यातील कडेगाव येथील यात्रे दरम्यानची घटना, सागर मुरुमकर या युवकाचा मृत्यू, दोन दोघे जखमी, वाई पोलिस ठाण्यात घटनेची नोंद
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील घटना... फर्निचरच्या वर्कशॉप मध्ये आग लागून एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू...
काटोल मधील संचेती लेआऊट मध्ये पहाटे 3 वाजताच्या सुमारास सलीम फर्नीचर मध्ये इलेक्ट्रिक शॉक सर्किट मुळे आग लागली...
भीषण आगीत 88 वर्षीय नुर महम्मद बोधर यांचा मृत्यू झाला आहे...
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले... मात्र वर्कशॉप मध्ये मोठ्या प्रमाणावर तयार फर्निचर तसेच लाकूड असल्याने 2 तास आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते...
या आगीत वर्कशॉप ची मालकी असलेल्या बोधर कुटुंबातील वृद्ध नूर मोहम्मद यांचा होरपळून मृत्यू झाला आहे...
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील घटना... फर्निचरच्या वर्कशॉप मध्ये आग लागून एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू...
काटोल मधील संचेती लेआऊट मध्ये पहाटे 3 वाजताच्या सुमारास सलीम फर्नीचर मध्ये इलैक्ट्रिक शॉक सर्किट मुळे आग लागली...
भीषण आगीत 88 वर्षीय नुर महम्मद बोधर यांचा मृत्यू झाला आहे...
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले... मात्र वर्कशॉप मध्ये मोठ्या प्रमाणावर तयार फर्निचर तसेच लाकूड असल्याने 2 तास आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते...
या आगीत वर्कशॉप ची मालकी असलेल्या बोधर कुटुंबातील वृद्ध नूर मोहम्मद यांचा होरपळून मृत्यू झाला आहे...
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीच आयोजन -
भोंग्यासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीच आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे सहभागी होणार आहेत. भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजर राहणार आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज्य सरकारला मनसेने दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाने तात्काळ सर्वपक्षीय बैठक आमंत्रित केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. सर्व पक्षांचे दोन प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भोंग्याबाबत राज्य सरकारकडून सर्वच प्रार्थनास्थळांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहेत. मार्गदर्शक सुचना जाहीर करण्याच्या आगोदर गृहविभागाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
किरीट सोमय्या सोमवारी केंद्रीय गृहमंत्र्यांची घेणार भेट -
शनिवारी झालेल्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या सामोवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहोत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, मिहीर कोटेचा, आशिष शेलार आणि मनोज कोटक हे महत्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहे.
16 शिवसैनिकांना कोर्टासमोर हजर केलं जाणार
नवनीत राणांच्य़ा घराबाहेर आंदोलन करणाऱ्या 16 शिवसैनिकांना आतापर्यंत पोलिसांकडून अटक केली आहे. आज सर्वांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारतीचे लोकार्पण -
महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारतीचे लोकार्पण. राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते. वेळ- ३ वाजता .स्थळ- विलेपार्ले (पश्चिम) कूपर रुग्णालय परिसर
योगींच्या शपथविधीला महिना -
योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याला आज एक महिना झाला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर –
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील शाळा आणि क्लिनिक मोहल्ला याची पाहणी करणार आहेत. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित राहतील. भगवंत मान दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत.
दिल्ली- सुप्रीम कोर्टात कोणत्या प्रकरणावर सुनावणी ?
दिल्लीतील सरोजिनी नगर परिसरातील झोपडपट्या हटवल्याच्या प्रकरणावर दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिका कर्त्याने असे म्हटलेय की, 1980 पासून येथे राहणाऱ्या 200 कुटुंबांना रस्त्यावर आणले आहे. अचानक झोपडपट्टया हटवल्यामुळे सर्वजण रस्त्यावर आले.
पाठ्यपुस्तकात क्रीडा हा विषय अनिवार्य करावा, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाने या प्रकरणात केंद्र आणि सर्व राज्य, NCERT आणि UGC ला उत्तर मागितले आहे.
पंजाबमध्ये ड्रग्सविरोधोती अभियान -
पंजाबमधील खटकर कलां येथून आजपासून ड्रग्सविरोधीत जागरुकता अभियान सुरु होणार आहे. पंजाब पोलिस आणि प्रशासनाने हे अभियान राबवले आहे. या अभियानादरम्यान नागरिकांसोबत अधिकारी चर्चा करणार आहेत.
"योग प्रभा" कार्यक्रमाचे आयोजन -
नागरी उड्डान मंत्रालयामार्फत आज "योग प्रभा" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी वी.के. सिंहही उपस्थित राहणार आहेत.
'अभिनव कृषी'वर एक दिवसाची कार्यशाळा –
निती आयोगाद्वारे आजपासून 'अभिनव कृषी' कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि परुषोत्तम रूपाला, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ही कार्यशाळा सुरु राहणार आहे.
27 वा कोलकाता चित्रपट महोत्सवाची सुरुवात –
आजपासून 27 व्या कोलकाता चित्रपच महोत्सवाला सुरुवात होणार आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचा ‘अरण्येर दिन रात्रि’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. 40 देशांचे तब्बल 163 चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. पण आता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर आयोजन करण्यात आलेय.
दूरदर्शनचे रंगीत प्रसारण -
दूरदर्शनच्या इतिहासात 25 एप्रिल हा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण 1982 चा हा तोच दिवस होता, जेव्हा दूरदर्शनने पहिल्यांदा रंगीत प्रसारणाची चाचणी सुरू केली होती.
जागतिक मलेरिया दिन -
हिवताप या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो. हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. त्यापूर्वी 25 एप्रिल हा दिवस केवळ ‘आफ्रिकन हिवताप दिवस’ म्हणून ओळखला जात असे.
PBKS vs CSK : चेन्नई आणि पंजाबच्या ‘किंग्स’मध्ये टक्कर, हेड टू हेड आकडे
IPL 2022 News : पंजाब किंग्स (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यामध्ये सोमवारी टक्कर होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगमातील हा 38 वा सामना असणार आहे. दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पंजाबने आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती, मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मयांक अग्रवालच्या नेतृत्वात पंजाब संघाने सात सामन्यात तीन विजय मिळवलेत तर चार पराभवाचा सामना केलाय. दुसरीकडे लागोपाठ पराभव मिळाल्यानंतर धोनीच्या फिनिशिंग टचमुळे चेन्नईची गाडी विजयाच्या पटरीवर परतली आहे. चेन्नईने सात सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. प्ले ऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवशक आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -