Maharashtra Breaking News LIVE Updates : शिवसेनेचे गायब असलेले शाखाप्रमुख चार दिवसांनी घरी परतले
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज पेट्रोल-डिझेलची दरवाढ स्थिर राहिल्यानंतर उद्या पुन्हा वाढ होणार
उद्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८३ पैशांची वाढ होणार, सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होणार
जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे वक्तव्य
जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाचे दर १२० डाॅलर प्रति बॅरलवर
कणकवली पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवनुरे आणि धीरज व्यंकटेश जाधव या फरारी दोन आरोपींना अटक केली आहे. दोघेही पुण्याचे रहिवासी असून संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 11 आरोपींवर गुन्हा दाखल यातील या दोघैांना आज अटक झाली आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
MMRDA बाबत प्रश्नांबाबत, आणि गेल्या 20-25 वर्षांतील मनपाचा भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला
- आगी लागत असताना अग्निशमन दलाची अपुरी सुविधा, सरकारने अहंकारापोटी प्रकल्प रखडवले
- याची मुंबईकर किंमत मोजत आहे
- आरे कार शेड अहंकारापोटी हलवले, आता परत कार शेड हलवण्यासाठी प्रयत्न करत आहे
- आरेत RTO करत आहेत
- केंद्राने प्रचंड मदत केली, सेनेच्या दोन्ही वचननाम्यांची चिरफाड केली
प्रवीण दरेकर
- सल्लागारांवर खर्च केले पण प्रकल्प पुढे गेले नाहीत
- केंद्राने हजारो कोटी रुपये महाराष्ट्रसाठी रुपये निधी दिले, मात्र प्रकल्प पुढे गेले नाहीत
- मुंबईकरांची फसवणूक केली
Maharashtra Shivsena News : शिवसेनेचे गायब असलेले शाखा प्रमुख चार दिवसांनी घरी परतले आहेत. ठाण्यतील शिवसेनेची अंतर्गत धुसफूस आली चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे मनोज नारकर हे शाखा प्रमुख गायब असल्याचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत उघडकीस आणले होते. स्वतःचे जीवन मी संपवत आहे असे पत्र लिहून नारकर गायब झाले होते. शिवसेनच्या विभागप्रमुखांविरोधात मोठे आरोप करत नारकर गायब होते.
Mumbai News : मुंबईतील दहिसर पूर्व ओवरी पाडा याठिकाणी असणाऱ्या महालक्ष्मी एसआरए सोसायटीच्याखाली उभ्या असलेल्या व्यक्तीवर स्लॅप कोसळला आणि त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला. या घटनेचा संदर्भात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये 304 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दहिसर पोलिस करत असल्याची माहिती झोनचे डीसीपी सोमनाथ घार्गे पो यांनी सांगितले.
सांगली शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील अनेक भागाला अवकाळीचा तडाखा बसत आहे.
कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला आज सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली . हवेचा वेग असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केलं होतं . त्यामुळे परिसरात धूर पसरला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या चार गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
Bhiwandi News : देशभरात पेट्रोलचे भाव गगनाला भिडला असून पेट्रोल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे . पेट्रोल चोरीची अशीच एक घटना भिवंडीत ग्रामीण भागातील शेलार गावच्या हद्दीत रात्री च्या सुमारास घडली आहे . गेल्या काही दिवसांपासून वाहनातून पेट्रोल कमी होत होते मात्र गावात लावण्यात आलेल्या एका सीसीटीव्हीत पेट्रोल चोरीची घटना कैद झाली आहे . घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी गाड्यामधील पेट्रोल चोरी करण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पेट्रोलचे भाव गगनाला भीडले असून आता पेट्रोल वर चोरांनी डल्ला मारायला सुरुवात केली आहे तरी गावात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे
अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणातील मुख्य तीन महिला आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा आमि सत्र न्यायालयाने तीनही आरोपी महिलांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असून साक्षी उमक, प्रिति देशपांडे, मीरा कोलटेके असे अटकपूर्व जामीन मिळालेल्या महिलांची नावं आहेत. 9 फेब्रुवारी पासून या तीनही महिला आरोपी फरार होत्या.
परमबीर सिंह प्रकरण आता राज्य सरकारकडून सीबीआयकडे वर्ग करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एका आठवड्याच्या आत सर्व माहिती ही सीबीआयला द्या असा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात 19 वा साक्षीदार फितूर, साक्षीदार क्रमांक 243 फितूर घोषित
आरोपींना ओळखत नसल्याचं न्यायालयासमोर कबूल केलं
साक्षीदारानं एटीएसवर केले गंभीर आरोप
Nashik news Updates : कैलास जाधव यांच्या तडकाफडकी बदली नंतर रमेश पवार महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार, रमेश पवार मुंबई महापालिकाचे सह आयुक्त पदावर होते कार्यरत, म्हाडाच्या सदनिका घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत कैलास जाधव यांची चार दिवसापूर्वी झाली होती बदली, विधानपरिषद सभापतींनी बदलीचे दिले होते आदेश
Pune News Update : पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका गर्ल्स हायस्कूलमध्ये अकरा वर्षीय मुलीवर शाळेच्या शौचालयातच लैंगिक अत्याचार करण्यात आला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल (23 मार्च) पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक जाणवलं. याचा मोठा फटका हा लाखो हेक्टरवरील आंबा आणि काजू पिकाला बसला आहे. असनी चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात वातावरणात बदल दिसून येत असून मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ देखील आहे. राजापूर तालुक्यातील पूर्व भागात काल दुपारपासून बत्ती देखील गुल झाल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Solapur News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 22 वर्षाच्या आरोपीने लग्नाचे आमीष दाखवत केला अत्याचार
आरोपीने जानेवारी महिन्यात मोहोळ येथे नातेवाईकाच्या घराशेजारील पत्र्याच्या खोलीत केला अत्याचार
घडलेला प्रकार मुलीच्या आईला कळल्यानंतर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली फिर्याद
झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल करुन मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा वर्ग केला जाणार असल्याची माहिती
Devendra Fadnavis Live : प्रवीण चव्हाण पेनड्राईव्ह प्रकरण; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे, लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे गृह खात्याचे आदेश
जागतिक कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. नायमॅक्स क्रूड 1.68 टक्क्यांनी वाढल्यानंतर प्रति बॅरल $ 116.61 वर व्यापार करत आहेत. तर ब्रेंट क्रूड 1.71 टक्क्यांनी वाढल्यानंतर प्रति बॅरल $ 123.31 वर व्यापार करत आहे. कच्च्या तेलाच्या वाढीचा ट्रेंड सुरूच असून आजही तो चढाच राहण्याची शक्यता दिसत आहे.
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 111.67 रुपये | 95.85 रुपये |
दिल्ली | 97.01 रुपये | 88.27 रुपये |
चेन्नई | 102.91 रुपये | 92.95 रुपये |
कोलकाता | 106.34 रुपये | 91.42 रुपये |
Petrol-Diesel Price Today 24 March 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतींत वाढ झाल्यानंतर आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोल (Petrol Price) -डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आली नसून दर स्थिर आहेत.
भारतीय तेल कंपन्यांनी यापूर्वी सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेल (Diesel Price) च्या किमतींमध्ये 80 पैशांहून अधिक वाढ केली होती. या दोन दिवसांत देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 1.60 रुपयांनी महागलं होतं. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे तेल कंपन्यांवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी तेलाच्या किरकोळ किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे.
World Tuberculosis Day : 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेकडून आजच्या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्या माध्यमातून या जीवघेण्या आजारापासून जगभरातल्या लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली जाते. 24 मार्च 1882 साली जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कोचने या जीवघेण्या आजाराच्या बॅक्टेरियाचा शोध लावला होता. त्यामुळे क्षयरोगाच्या निदानामध्ये आणि उपचारामध्ये मोठी मदत मिळाली होती.
Member of the legislative council : सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरु आहे. दरम्यान, यावर्षी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या एकूण 10 विधानपरिषदेच्या आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत जून व जुलै महिन्यात संपत आहे. यासर्व सदस्यांना काल निरोप देण्यात आला. विधिमंडळाच्या प्रांगणात फोटो सेशन करुन निरोप समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
Prasad Lad : मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप असताना आता भाजप नेते प्रसाद लाडही अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रसाद लाड हे पगारदार पतसंस्था प्रवर्गातून मुंबई बँकेचे संचालक आहेत. मात्र, त्यांनी स्वतःच कंपनीचे संचालक असताना ते कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत कामगार असल्याचे नमूद केल्याचा आरोप सहकार सुधार समितीने केला आहे.
मुंबईत बुधवारी बँक कामगारांचे नेते विश्वास उटगी आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला. मुंबई बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत पगारदार नोकर असल्याचे दाखवून ते पगारदार नोकरांच्या पतसंस्था गटातून ते मुंबई बँकेतून निवडून येत असल्याचे सहकार सुधार समितीने म्हटले. मुंबई बँकेचे संचालकपद मिळवण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचे खोटे दस्तावेज दिले. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञा पत्रावर खोटे बोलले आहेत. त्यांनी हा गुन्हा केलेला असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विश्वास उटगी आणि धनंजय शिंदे यांनी केली.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बंडा तात्यांची जीभ पुन्हा घसरली! महात्मा गांधींचा म्हातारा असा उल्लेख करत म्हणाले...
पिंपरी चिंचवड : भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला. अन् पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं भारताला स्वराज्य मिळवायला एक वर्ष लागलं असतं, असं लोकमान्य टिळकांचं एक वाक्य असल्याचं ही बंडा तात्या म्हणालेत. स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते.
बंडा तात्या कराडकर नेमकं काय म्हणाले...
बंडा तात्या कराडकर म्हणाले की, दहा वर्षाच्या काळात भगतसिंहानी केलेली क्रांती ही अभूतपूर्व होती. त्या काळात सुरुवातीला भगतसिंहांवर महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींचा अहिंसावाद भगतसिंहांच्या मनामध्ये ठासवला होता. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे, पण भगतसिंहांचा हा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. 1922ला एक हत्याकांड झालं, त्या हत्याकांडात त्याला समर्थन देण्यात महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा भगतसिंह महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत. पण त्या विषयात आत्ता आपण घुसायचं काही कारण नाही, असं कराडकर म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -