Maharashtra Breaking News LIVE Updates : मराठा आरक्षण उपसमितीची वर्षां बंगल्यावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठक संपली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Feb 2022 08:31 PM
दुचाकी आणि इनोव्हाच्या धडकेत हिंगोलीमध्ये दोघांचा मृत्यू  

हिंगोली जिल्ह्यातील वसमत परभणी रोडवर चिखली पाटी दरम्यान इनोव्हा आणि मोटरसायकलच्या धडकेने मध्ये मोटरसायकलवर प्रवास करणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची वर्षां बंगल्यावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठक संपली

Maratha Reservation :  मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, या मागणीसाठी खासदार संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. या  प्रश्नी मराठा आरक्षण उपसमितीची वर्षां बंगल्यावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठक संपली. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणापुर्वी त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आले होते बैठकीला मराठा आरक्षण उपसमीतीच्या सदस्यांसोबत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे एमडी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, प्रधान सल्लागार सिताराम कुंटे देखील उपस्थित होते. 

ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातली  25 फेब्रुवारीला होणारी सुनावणी आता सोमवारी 28 फेब्रुवारीला होणार आहे. 

Russia Ukraine War : अहमदनगर जिल्ह्यातील 18 विद्यार्थी युक्रेनला अडकले

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असून अहमदनगर (Ahmadnagar)  जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या एज्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. यापैकी जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. हे सर्व विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी पालकांना दिली आहे, मात्र युध्दजन्य परिस्थितीमुळे त्यांच्याजवळील पैसे संपत असल्याने केंद्र सरकारने तातडीने आम्हाला मायदेशी परत घेऊन जाण्याची विनंती विद्यार्थी करत आहेत.

Narayan Rane : नारायण राणे यांची शुक्रवारी पत्रकार परिषद

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ओरोस शरद कृषी भवन येथे  शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. 

Maratha Reservation: मराठा आरक्षण उपसमितीची बैठक 'वर्षा'वर सुरू


मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु झाली आहे. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. या बैठकीला बाळासाहेब थोरात, आशुतोष कुंभकोणी, प्रधान सल्लागार सिताराम कुंटे उपस्थित आहेत. 

MNS: सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसेची वेट अॅन्ड वॉचची भूमिका

मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज आंगणेवाडीतील भराडीदेवीचं दर्शन घेतल. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसे वेट अ‍ॅन्ड वाॉचच्या भूमिकेत असल्याचं म्हणत कोणकोण जेलमधे जातायत, आणखी कोणाचा नंबर आहे हे पाहतोय असं सूचक वक्तव्य केलं. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली जेलमधे टाकतात तेव्हा आमच्या कुटुंबियांना कसं वाटतं ते जरा यांना समजू देत. खूप मोठी लिस्ट आहे, खूप जण जेलमधे जाणार आहेत. ज्या दिवशी हे जेलची पायरी चढतील तेव्हा यांना कळेल खोटे गुन्हे दाखल करून कसं जेलमधे पाठवलं जातं असंही ते म्हणाले.

MNS: सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसेची वेट अॅन्ड वॉचची भूमिका

मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज आंगणेवाडीतील भराडीदेवीचं दर्शन घेतल. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसे वेट अ‍ॅन्ड वाॉचच्या भूमिकेत असल्याचं म्हणत कोणकोण जेलमधे जातायत, आणखी कोणाचा नंबर आहे हे पाहतोय असं सूचक वक्तव्य केलं. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली जेलमधे टाकतात तेव्हा आमच्या कुटुंबियांना कसं वाटतं ते जरा यांना समजू देत. खूप मोठी लिस्ट आहे, खूप जण जेलमधे जाणार आहेत. ज्या दिवशी हे जेलची पायरी चढतील तेव्हा यांना कळेल खोटे गुन्हे दाखल करून कसं जेलमधे पाठवलं जातं असंही ते म्हणाले.

Pandharpur News :  माघी यात्रेत विठुरायाच्या खजिन्यात तब्बल सव्वा कोटी रुपयांचे दान

Maharashtra Pandharpur News :  नुकत्याच झालेल्या माघी यात्रेत विठ्ठल भक्तांनी देवाच्या चरणी भरभरून दान दिल्याने विठुरायाच्या खजिन्यात तब्बल सव्वा कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या दोन वर्षानंतर ही यात्रा झाल्याने हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी आले होते.  त्यामुळे यंदा माघी यात्रा ही विक्रमी झाली होती . यात्रा संपल्यावर मंदिर समितीकडून उत्पन्नाची मोजण्याकरता आली. या वर्षी माघी यात्रेमध्ये 1 कोटी 24 लाख 45 हजार 233 रुपये जमा झाले आहेत . गेल्या वर्षी माघ यात्रेमध्ये 73 लाख 60हजार 725 एवढे उत्पन्न मिळलेहोते . यंदाच्या उत्पन्नात तब्बल 50 लाखांची वाढ झाली आहे . 

HSC Board Exam : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल

HSC Board Exam : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.  बारावीचे 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर हे आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे. दोन दिवसाच्या पेपर मध्ये हा बदल करण्यात आला आहे

Paper Scam : आरोग्य भरती गैरव्यवहार प्रकरण : 3816 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Paper Scam : परीक्षा घोटाळा प्रकरणातील धागेदोरे समोर येत आहेत. याच गैरव्यवहार प्रकरणातील आरोग्य भरती परीक्षेच्या गट ड मधील गैरव्यवहारातील 3816 पानांचे दोषाआरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आले. हे दोषारोप पत्र आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षा गैरव्यावहाराचे असून एकूण 20 आरोपी आहेत. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ महेश बोटले मुख्य आरोपी आहेत.

नवाब मलिकांच्या अटकेचा निषेध दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेसनं वाशीममध्ये केलं आंदोलन

राज्याचे  अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते  नवाब मलिक यांना काल ईडीने काल जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेवून अटक केली.   मात्र  चौकशीला बोलावून राज्याच्या मंत्र्याला अटक करणे  म्हणजे  भाजपच्या  केंद्र सरकारच्या केंद्रीय यंत्रणेच  गैरवापर करून  केलेली अटक  म्हणजे सूडबुद्धीच  राजकारण असून अटक केल्याच्या  निषेधार्थ  वाशीमच्या   मंगरूळपीर  इथ राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या  विरोधात घोषणाबाजी करत  भाजपच्या  घाणेरड्या  राजकारणा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले  आणि केलेल्या कारवाई चुकीच असल्याच निवेदन मंगरूळपीर तहसीलदार यांना देण्यात आले. 

Nashik Breaking : नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी नाशिकमध्ये भाजप आक्रमक

Nashik Breaking : नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी नाशिकमध्ये देखील भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिक यांच्या फोटोला जोडे मारत भाजपने आंदोलन केले. नवाब मलिक यांचा चेहरा गजाआड असणाऱ्या फोटोला जोडीमारो आंदोलन, आंदोलनादरम्यान आघाडी  "संजय राठोड, अनिल देशमुख, नवाब मलिक तो झाकी है। संजय राऊत बाकी अनिल परब बाकी है" सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. 

Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, यवतमाळ येथील दत्त चौकात आंदोलन

यवतमाळ: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना इडीने अटक केली. त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. यवतमाळ शहरातील दत्त चौकात आंदोलन करून संतपा व्यक्त केला. मंत्री मलिक यांचा राजीनामा घेण्यात आला नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

Gondia Crime: गोंदिया शहरात अज्ञात व्यक्तीकडून दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू

गोंदिया शहराच्या बसंत नगर भागात काल रात्री अज्ञान आरोपीने दोघांवर केला हल्ला हल्यात राजा खांडेकर याचा मृत्यू तर आशिष ठाकूर हा गंभीर जखमी .जखमींवर नागपुरात उपचार सुरु आहे. मृतक आणि जखमी दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

ED : ईडी अधिका-यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता 

ED : ईडी अधिका-यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. ईडीच्या रिमांड काॅपीमध्ये नवाब मलिकांबद्दल चुकीची माहिती असल्याचा आरोप, जमीन खरेदीवेळी नवाब मलिक हे महसुल मंत्री होते, असं ईडीनं रिमांड कॅापीमध्ये लिहिलं आहे आणि हे त्यांनी कोर्टात सादर केलं आहे

Gangubai Kathiawadi : गंगूबाई काठियावाडी चित्रपटावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू; निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण

Gangubai Kathiawadi :  गंगूबाई काठियावाडी चित्रपटावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. निर्माते म्हणाले,'शेवटच्या क्षणी नाव बदलणे शक्य नाही. ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याच्याकडे गंगूबाईच्या दत्तक मुलाचा पुरावा नाही. 2011 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल कोणी इतकी वर्षे बोललं नाही. चित्रपटात गंगूबाईंचा अपमान झालेला नाही.'

Nagpur Breaking : नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी नागपुरात भाजपकडून आंदोलन


Nagpur Breaking : नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी नागपुरात भाजपकडून आंदोलन केले जात आहे. नागपूरच्या झाशी राणी चौकावर हे आंदोलन होत आहे. भाजपच्या आंदोलनामध्ये शहरातील आमदार आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहे. दरम्यान ज्या झाशी राणी चौकावर हे आंदोलन होत आहे.  तो अत्यंत जास्त वर्दळीचा परिसर असल्यामुळे आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

Solapur Breaking : सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालसमोर राष्ट्रवादीचे आंदोलन करण्यात आलीय. केंद्रातील भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकत्यांकडून निदर्शने करण्यात येताएत. आंदोलनानंतर जवळपास 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नवाब मालिकानी भाजपच्या अनेकांची पोलखोल केल्याने त्यांच्या विरोधात सुड उगरण्याचे काम सुरु असल्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाटाच्या पठारावर मेलेल्या कोंबड्या आणि मासांचे तुकडे आढळले

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाटाच्या पठारावर मेलेल्या कोंबड्या आणि मासांचे तुकडे आढळले. यामुळे तिलारी घाटात दुर्गंधी पसरली असून निसर्गप्रेमी संघटना आक्रमक झालीय. शिनोळी आणि आसपासच्या परिसरातून कोंबड्या आणि त्यांची घाण टाकत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे अन्यथा मोठे आंदोलन करण्याची निसर्गप्रेमींनी तयारी दर्शवलीय.

युक्रेन-रशिया युद्ध! भारतीय शेअरात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी घसरला

#BreakingNews युक्रेन-रशिया युद्ध! भारतीय शेअरात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी घसरला


 


 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Nawab Malik : आजचा दिवस राजकीय रणकंदनाचा! मलिकांना सरकारचा 'महा'पाठिंबा, तर राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक


Nawab Malik Arrested : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून आंदोलन करण्यात  येणार आहे. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयाजवळ आंदोलन करणार आहेत. तर, मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. 


बुधवारी,  ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला. 


मलिकांना सरकारचा 'महा'पाठिंबा



तीन मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळालेल्या नवाब मलिकांचं मंत्रिपद कायम ठेवण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे. बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  आज मंत्रालयाजवळ महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार आंदोलन करणार आहे. तर, शुक्रवापासून जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे.

 


 

IOCL, Petrol-Diesel Price Today 24 February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढता तणाव संपूर्ण जगासाठी चिंतेचं कारण ठरला आहे. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सर्व घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवरही होताना दिसत आहे. असं असलं तरी देशात मात्र आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक (Crude Oil Prices) गाठला आहे. पण तरिही देशात पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच देशात सध्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. तसेच निवडणुकांनंतर देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडू शकतो, असा अंदाजही तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 


देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.