Maharashtra Breaking News LIVE Updates : भारतीय वायूसेनेच्या विमानाचाअपघात, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 24 Dec 2021 10:21 PM
भारतीय वायूसेनेच्या विमानाचाअपघात, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

भारतीय वायूसेनेच्या विमानाचा अपघात झाला आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मिग-21  विमानाचा अपघात झाला आहे.  पोलीस आणि अग्निशमन
दल घटनास्थळी दाखल झाले आहे.  वैमानिकाचा  शोध सुरु आहे. 

कोरेगाव भीमा चौकशी आयोगास राज्य सरकारकडून आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ

कोरेगाव भीमा चौकशी आयोगास राज्य सरकारकडून आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय.  पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी 1 जानेवारी 2018 मधे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी हा एक सदस्यीय आयोग नेमण्यात आला होता.

मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात वाहनांची रांग

मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात वाहनांची रांग आहे. सुमारे दीड ते दोन किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन पुलाजवळ वाहनांची रांग लागली आहे. 

पुण्यात आज ओमीक्रॉनचे नवे सहा रुग्ण

पुणे जिल्ह्यात ओमीक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या 41 वर

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन केले आहे.  काल ड्रेनेज दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत तर दोषीं विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागासमोर बसून आंदोलन करत आहेत. सोलापुरातील अक्कलकोट रोडवर ड्रेनेजमध्ये दुरुस्ती करताना मजूर पडला होता, त्याला वाचवण्यासाठी एकामागे एक असे 5 जण मदतीसाठी उतरले होते. दुर्घटनेत 6 पैकी 4 जणांचा झाला होता मृत्यू तर दोघांवर अद्याप ही सुरू आहेत उपचार

जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच, कासोडा एरंडोल भागात कार आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण ठार
जळगाव जिल्ह्यातील अपघातांची मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाही गेल्या चार दिवस पासून ही मालिका सुरू असून काल रात्री अकरा वाजे चे सुमारास कार आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याने जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील कासोडा गावात शोक कळा पसरली आहे. कासोदा गावातील बबलू भोसले हे काही काही कामा निमित्ताने आडगाव येथे मोटार सायकल ने आपल्या परिवाराच्या सह गेले होते तिकडून परत येत असताना रात्री आडगाव रस्त्यावर भरधाव कार आणि मोटार सायकलचे सामोरा समोर अपघात झाला आणि मोटार सायकल वरील बारा वर्षीय मुला सह तीन जागीच ठार झाले आहेत कार ही पलटी होऊन कार मधील दोन जण जखमी झाले आहेत. 

पार्श्वभूमी

नवे वर्ष, नवे निर्बंध! ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटाच्या राज्यात पुन्हा बंधनं; आज नवी नियमावली


महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल.


राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले आहे. 


काल झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी  लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या होत्या.



पंतप्रधान मोदींनी राज्यांना दिले निर्देश


ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहून केंद्राकडून राज्यांना काही आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांशी सवांद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.


Rajnath Singh : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आज धुळे दौऱ्यावर; विविध कामांचं उद्घाटन करणार 


Union Minister Rajnath Singh Dhule Dondaicha Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. राज्यात 8 दिवसात दुसरा मोठा केंद्रीय मंत्री येणार असल्यानं हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह धुळे जिल्हातील दोंडाईचामध्ये येणार आहेत.  इथे राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या स्मारकाचे  उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सभा होणार असल्याची माहिती आहे. 


राजनाथ सिंह दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी हेलिकॉप्टरने दोंडाईचा येथे येथील. त्यांच्या हस्ते जनरल बिपिन रावत या रोडचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ते आमदार जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. दुपारी दीड वाजता महाराणा प्रताप चौक येथे उभारण्यात आलेल्या महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण होणार आहेत. तसेच श्रीमंत राजे दौलतसिंह रावल यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.