Maharashtra Breaking News 23 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
23rd July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 23 जुलै याच दिवशी प्रसिद्ध भारतीय जहाल मतवादी नेते भारतीय राजकारणी, समाजसुधारक, भगवद्गीतेचे भाष्यकार आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते केशव गंगाधर टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 23 जुलैचे दिनविशेष.
1856 : भारतीय राजकारणी, समाजसुधारक, भगवद्गीतेचे भाष्यकार आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन.
लोकमान्य बाळ गंगाधर थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. बाळ गंगाधर टिळक केशव गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
1856 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म.
1986 : जैवअभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.
1999 : केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
2016 : पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एस. एच. रजा यांचा यांचे निधन.
1982 : साली ‘आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशन’ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर 1985-86 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
2012 : साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकार, भारतीय राष्ट्रीय लष्करा अधिकारी आणि आझाद हिंद सरकारमधील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन.
Maharashtra News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात, 13 जखमी
Maharashtra News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अच्छाड येथे भीषण अपघात घडला आहेइको कारला फॉर्च्युनर कारने धडक दिल्याने 13 जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला सेलवास येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये आले हलविण्यात . तर काही जखमींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले, कंपनीतून कामगार महिला घरी परतत असताना झाला इको कारला अपघात झाला आहे.
सरकार दीड महीन्यांच्या वर टिकणार नाही.. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचे भाकीत
सरकार दीड महीन्यांच्या वर टिकणार नाही.. राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांचे भाकीत.. जर मध्यावर्ती निवडणुका जर लागल्या राष्ट्रवादी महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष असेल.. अमोल मिटकरी हे बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या वाढदिवसा निम्मीत कार्यक्रमात बोलत होते..
गडचिरोली:- पर्लाकोटा नदीला पूर आलापल्ली भामरागड मार्ग परत बंद
गडचिरोली:- भामरागडच्या पर्लाकोटा नदीला पूर आलापल्ली भामरागड मार्ग परत बंद करण्यात आलाय. काही दिवसांच्या विश्रांती नंतर जिल्हा सह शेजारच्या राज्य छत्तीसगढ मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मनसे नेते अमित ठाकरे व आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना ,काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
मनसे नेते अमित ठाकरे आज कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या त्यानंतर मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. डोंबिवली पूर्व येथील सर्वेश हॉल मध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे , आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना ,काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला . यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकारी शिवसेनेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला .
सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे , पर्यावरण विभाग प्रदेश सचिव सच्चीदानंद बुगडे , एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे , तसेच विभागीय सचिव संदीप कोठावळे , किरण गावडे , वैभव सुतार , अवी गावंड आदी पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .