Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Feb 2022 09:16 AM
Gondiya News : दहा लाखाच्या खंडणीसाठी 17 वर्षीय मुलाची हत्या

Gondiya News :  गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील बंगावातील 17 वर्षीय चेतन खोब्राग याची दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. 

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्याही बदलाविना सिनेमा प्रदर्शित करण्यास संजय लीला भंसाली यांना हायकोर्टाने परवानगी दिली आहे. येत्या शुक्रवारी आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. कामाठिपुरातील स्थानिकांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. या सिनेमात आलेल्या 'काठियावाडी', 'कामाठीपुरा' आणि 'चायना' या उल्लेखांवर आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली होती. 

महेश मांजरेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अखेर दाखल केला गुन्हा

महेश मांजरेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'नाय वरन भात लोन्चा, कोण नाय कोणचा' या चित्रपटातील लहान मुलांच्या आक्षेपार्ह चित्रीकरणाप्रकरणी माहिम पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आयपीसी कलम 292, 34 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 14 आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि 67-ब या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो कोर्टानं चौकशी करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे माहिम पोलिसांनी चौकशीअंती आज एफआयआर दाखल केला आहे. 

Nawab Malik ED Inquiry : नवाब मलिक ईडीच्या रडारवर, चौकशीसाठी कार्यालयात आणल्याची सूत्रांची माहिती

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

Nawab Malik Detained by ED : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक रडारवर!

Nawab Malik Detained by ED : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Shivaji Park : खडीवरुन खडाजंगी; शिवाजी पार्कात सुशोभीकरणावरुन मनसे-शिवसेना आमनेसामने

Shivaji Park : मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात महापालिकेनं खडी टाकल्यानं मनसेनं तिथं धरणं आंदोलन सुरु केलंय. माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरु केलंय. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याचा आक्षेप मनसे आणि शिवाजी पार्क जवळच्या रहिवाशांनी घेतला आहे. यावरून शिवसेना आणि मनसेत शीत युद्ध सुरु आहे. 

पार्श्वभूमी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक रडारवर! चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेल्याची माहिती

Nawab Malik Detained by ED : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. 

प्रकरण काय?

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

Shivaji Park : सुशोभीकरणावरुन मनसे-शिवसेना आमनेसामने; शिवाजी पार्कमध्ये मनसेचं धरणं आंदोलन

Shivaji Park : मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात महापालिकेनं खडी टाकल्यानं मनसेनं तिथं धरणं आंदोलन सुरु केलंय. माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरु केलंय. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याचा आक्षेप मनसे आणि शिवाजी पार्क जवळच्या रहिवाशांनी घेतला आहे. यावरून शिवसेना आणि मनसेत शीत युद्ध सुरु आहे. 

मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात महापालिकेनं खडी टाकल्यानं मनसेनं तिथं धरणं आंदोलन सुरु केलं आहे. माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरु केलं. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याचा आक्षेप मनसे आणि शिवाजी पार्क जवळच्या रहिवाशांनी घेतला आहे. यावरून शिवसेना आणि मनसेत शीत युद्ध सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये कोणताही रस्ता होणार नाही, असं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे. प्रत्यक्षात या खडीवर माती टाकण्यात येणार आहे. त्याखाली पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी ग्रव्हल्स टाकण्यात येत असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलंय. पण मनसेनं त्याला आक्षेप घेतला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.