Maharashtra Breaking News 22 May 2022 : संभाजीराजेंना शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी निमंत्रण, उद्या बांधणार शिवबंधन?
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सांगोला तालुक्यातील चिकमहूद ते दिघंची मार्गावरील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला . अपघातातील मयत तरुण वरकुटे-मलवडी(ता.माण, जि.सातारा) येथील आहेत .
आज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चिकमहूद ते दिघंची मार्गावर चिकमहूद शिवारातील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात सुशांत शांताराम जाधव (वय 28,रा.वरकुटे-मलवडी ता. माण, जि.सातारा) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबत असणारा मंगेश शिवाजी पिसे (वय 28,रा.वरकुटे-मलवडी,ता. माण,जि.सातारा) याचा उपचारासाठी नेते असताना वाटेत मृत्यू झाला.
संभाजीराजे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी देण्याची संभाजीराजे यांची मागणी असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर जवळील माळी पाटी नजीक दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मोहोळ येथील रहिवाशी असलेल्या खान कुटुंबातील सदस्यांचा मृतामध्ये समावेश आहे. अपघातातील दोन जखमी व्यक्तींना उपचारासाठी सोलापूरला हलवल्याची माहिती आहे.
उस्मानाबाद शहरालगत निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या श्री हातलाई देवीच्या डोंगरावर सातवाहन कालीन वसाहत सापडली आहे. इतिहास आणि पुरातत्व अभ्यासक संशोधक जयराज खोचरे हे या भागाचे अनेक दिवसांपासून संशोधन करत होते. त्यांना या भागात सातवाहन कालीन खापरे, विटा सापडल्या असून आज सातवाहन कालीन नाणे सापडले आहे. या धार्मिक आणि निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या डोंगरावर प्राचीन वसाहत ही इथे येणाऱ्या पर्यटकांना पर्वणीच असणार आहे. याचे संरक्षण तसेच उत्खनन होणे गरजेचे आहे, असे मत खोचरे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच इथे सापडलेल्या वस्तूसाठी साईट म्युझियम देखील इथे उभारलं जावं, अशी आशा खोचरे यांनी बोलून दाखविली.
गाईच्या दुधाला राज्य सरकारने किमान पन्नास रुपये लिटरला दर द्यावा अशी मागणी राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घडामोडींचा वेग आला आहे. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना पक्षप्रेवशासाठी निमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना सोमवारी दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. संभाजीराजे शिवसेनेचे निमंत्रण स्वीकारत शिवबंधन बांधणार का? यावर अद्याप संभाजीराजेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एवढे दिवस सभा घेताना काय पाऊस वाटत होतं का? शिवाजी पार्कात सभा घेतली तेव्हा काय छत्री घेऊन उभे होते का? असा सवाल राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना केला आहे. राज ठाकरेंच्या भाषणालाच काही अर्थ उरलेला नाही, त्यात काही मटेरियल नाही आहे. बोलायचं म्हणून बोलतात, लोक ऐकायला जातात कॉमेडी शो प्रत्येकालाच आवडतो असंही ते म्हणाले.
राज्यसभा निवडणूक; संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरस्कृत उमेदवार, सूत्रांची माहिती, संभाजीराजेंसमोर मुख्यमंत्र्यांनी ऑफर ठेवली असल्याची माहिती
Raj Thackeray : देशात हिंदू धर्माला मानणारे, हिंदू धर्माला मजबूत करणारे अनेक हिंदू जननायक आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे काय एकटे हिंदू जननायक नाहीत. ज्यांनी त्यांना हिंदू जननायक अशी उपाधी दिली असेल तर दिली असेल पण ते काय खरे हिंदू जननायक नाहीत, असे वक्तव्य नांदेड येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
Quad Summit 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 22 मे रोजी रात्री जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 23 आणि 24 मे रोजी जपानची राजधानी टोकियोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. या दौऱ्यात मोदी क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. सुमारे 36 तासांच्या या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही ते भेटणार आहेत.
Clean Air for All : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तरुणांनी सक्रीय व्हावं. तसेच शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करावा. समाजात बदल घडवून आणण्यासाठी योग्य वागणूक व दृष्टीकोन बाळगत समाजातल्या परिवर्तनाचे दूत व्हावं असे आवाहन केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी केलं. 'स्वच्छ हवा सर्वांसाठी' (Clean air for all ) या अभियानात लोकांना सहभागी करुन घेण्याची वेळ आली असल्याचे भूपेंद्र यादव म्हणाले.
चेन्नईमध्ये 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम' आणि 'एक्सव्ही एफ.सी. मिलिअन प्लस सिटीज् चॅलेंज' अर्थात 15 व्या वित्त आयोगाच्या शहरांतील आव्हानांसंदर्भात असलेल्या विशेष निधी योजनेंतर्गत आढावा कार्यशाळेच्या उद्घाटन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. दक्षिण भारतासाठीच्या या विशेष निधी योजनेत तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, केरळ, अंदमान व निकोबार, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, दमण व दीव आणि दादरा व नगर हवेली यांचा समावेश आहे.
Pandharpur Ashadhi Wari 2022 : दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा (Ashadhi Yatra) विक्रमी होण्याचे अंदाज असताना पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल 40 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे यांनी सांगितले. आळंदी ते पंढरपूर पालखी (Alanadi Pandharpur Palkhi)मार्गावरील मुक्काम, भोजन, विश्रांती, रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे , प्रमुख विश्वस्त योगेश देसाई , विश्वस्त अभय टिळक , बाळासाहेब चोपदार , आरफळकर मालक संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी माऊलींच्या पालखी मार्गाची पाहणी केली.
Sugarcane News : यंदाचा उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. राज्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आमचा ऊस कारखान्याला जाणार की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. दरम्यान, राहिलेल्या या उसाचे गाळप या महिन्याच्या अखेरीस पूर्ण केले जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.
Raj Thackeray : मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आता राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार आहे.. थोड्याच वेळात राज ठाकरेंची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सभा सुरु होईल. राज ठाकरे या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक पुण्यात दाखल झालेत.. तसंच राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी आणि त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. ज्या अयोध्या दौऱ्याचा एवढा दिवस गाजावाजा सुरु होता, तो दौरा राज ठाकरेंनी एकाएकी रद्द का केला...? मशिदींवरच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची पुढची दिशा काय असणार? राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर सडकून टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसेप्रमुख प्रत्युत्तर देणार का? उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण यांचं थेट आव्हान राज ठाकरे स्वीकारणार का? यासह अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बारामतीत असतील. सकाळी विविध विकास कामांची पाहणी करून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान याठिकाणी जनता दरबार घेणार आहेत. त्यानंतर कोऱ्हाळे येथे अजित पवारांची सभा होणार आहे. त्यानंतर बारामतीतील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मालेगावला सामुदायिक विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थिती लावतील.
Maharashtra News : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 वाजता ते नागपुरात दाखल होतील. विमानतळावरच काही संरक्षण अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वर्धा रोड स्थित निवासस्थानी भेट देणार आहेत.
Monsoon Updates : मान्सून अपडेट- मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. काल नैऋत्य मौसमी वाऱ्याची कोणतीही प्रगती बघायला मिळाली नाही. मात्र येत्या 27 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्याआधी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Petrol Diesel Price : वाढत्या महागाईत केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. अबकारी कर कमी केल्यानं पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपये घट झाली आहे. केंद्राकडून पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 8 रुपये प्रति लीटर कमी होणार तर डिझेलवरील एक्साईज ड्युटी 6 रुपये प्रति लीटर कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपये घट होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीटद्वारे ही घोषणा केली आहे.
तसेच, पहिल्या 12 गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे सिलेंडरच्या किमतीही 200 रुपयांनी कमी होणार आहेत.
Raj Thackeray Pune Rally News Updates : आज सकाळी 10 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेला पोलीसांनी 13 अटींसह परवानगी दिली आहे. 'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित..सविस्तर बोलू' असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे आज या विषयावर राज ठाकरे बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पार्श्वभूमी
आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज राज ठाकरेंची पुण्यात सभा, राज ठाकरेंच्या रडारवर कोण, बृजभूषण की मविआ सरकार?
आज सकाळी 10 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेला पोलीसांनी 13 अटींसह परवानगी दिली आहे. 'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित..सविस्तर बोलू' असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे आज या विषयावर राज ठाकरे बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी
वाढत्या महागाईत केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. अबकारी कर कमी केल्यानं पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपये घट झाली आहे. केंद्राकडून पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 8 रुपये प्रति लीटर कमी होणार तर डिझेलवरील एक्साईज ड्युटी 6 रुपये प्रति लीटर कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपये घट होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीटद्वारे ही घोषणा केली आहे.
तसेच, पहिल्या 12 गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे सिलेंडरच्या किमतीही 200 रुपयांनी कमी होणार आहेत.
मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ
मान्सून अपडेट- मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. काल नैऋत्य मौसमी वाऱ्याची कोणतीही प्रगती बघायला मिळाली नाही. मात्र येत्या 27 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्याआधी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बारामतीत असतील. सकाळी विविध विकास कामांची पाहणी करून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान याठिकाणी जनता दरबार घेणार आहेत. त्यानंतर कोऱ्हाळे येथे अजित पवारांची सभा होणार आहे. त्यानंतर बारामतीतील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मालेगावला सामुदायिक विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थिती लावतील.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नागपूर दौऱ्यावर
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 वाजता ते नागपुरात दाखल होतील. विमानतळावरच काही संरक्षण अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वर्धा रोड स्थित निवासस्थानी भेट देणार आहेत.
अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याचा दुसरा दिवस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज अमित शाह दुपारी 1.30 वाजता चीन- भारत सीमेवरील जवानांशी संवाद साधणार आहेत.
आसाममध्ये मदतकार्य सुरू
पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झालंय. आतापर्यंत सुमारे 7 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या ठिकाणी एनडीआरएफ, वायुसेनेकडून मदतकार्य सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -