Maharashtra Breaking News LIVE Updates : 1 मार्च पासून साईबाबांच्या पहाटच्या काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीत बदल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Feb 2022 06:17 PM
Shegaon News : संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला शेगावात भक्तांचा उत्साह शिगेला

Shegaon : शेगावच्या संत गजानन महाराज यांचा उद्या 144 वा प्रकट दिन उत्सव आहे.  शासनाचे निर्बंध अजूनही कायम असले तरी भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. उद्या सकाळी सात वाजता मंदिरात आरती होऊन या उत्सवाला सुरुवात होईल. यानिमित्त राज्यभरातून जवळपास 150 दिंड्या शेगावात दर्शनासाठी आणि उत्सवासाठी भेट देत आहेत.  

1 मार्च पासून साईबाबांच्या पहाटच्या काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीत बदल

1 मार्च पासून साईबाबांच्या पहाटच्या काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीत बदल करण्यात आलाय. पहाटे 4 वाजेची काकड आरती पहाटे 5.15 वा. तर शेजारती रात्री 10.30 ऐवजी रात्री 10 वाजता होणार.

Satara: वाईमधीव विहिरीत शिवकालीन शस्त्रे सापडली

सातारा जिल्ह्यातील वाईमधे एका विहिरीत शिवकालीन शस्त्रे सापडली आहेत. ही शस्त्रे 16 व्या ते 17 व्या शतकातील असल्याचा पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांचं मत आहे. या शस्त्रांमधे सात कट्यार आणि एका खंजिराचा समावेश आहे. वाईमधील काशी विश्वेश्वराच्या मंदिराशेजारील विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना ही शस्त्र सापडली आहेत. ही विहीर सोळाव्या शतकातील आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही शस्त्रे ताब्यात घेतली असून ही शस्त्रे सातारमधील श्री छत्रपती शिवाजी संग्रहालयात नेण्यात येणार आहेत.

Ulhasnagar News : उल्हासनगरात स्मशानभूमीबाहेर दोन भावांवर जीवघेणा हल्ला

उल्हासनगरात स्मशानभूमीबाहेर दोन भावांवर जीवघेणा हल्ला झाला असून हल्ल्यात दोघेही भाऊ जखमी झाले आहेत. यात एकाची प्रकृती गंभीर असून हल्लेखोर आणि जखमी दोघेही अंबरनाथ गावात राहणारे असून एकाच परिवारातले आहेत. हल्ल्यानंतर 4 पैकी 3 हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकाला पकडलं आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Sangamner News : धांदरफळ खुर्द येथे बिबटयाचा मुक्त संचार

संगमनेर तालुक्यातीलच धांदरफळ खुर्द येथे बिबटयाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पठार भाग असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. 21 फेब्रुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तर 16 फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. 



Bhima Koregaon Case : शरद पवार उद्या चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर होणार नाहीत

Maharashtra Bhima Koregaon Case : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांचा अर्ज जे. एन. पटेल समितीनं स्वीकारला आहे.  शरद पवार उद्या चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर होणार नाहीत 

Maharashtra News : राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा नाही

Maharashtra News : राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा नाही. राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी संघटनांची बैठक पार पडली. यावर तोडगा काढण्यासाठी आज  पुन्हा बैठक होणार आहे.  बैठकीला अजित पवार, मुख्य सचिव आणि कर्मचारी आणि अधिकारी संघटना उपस्थित राहणार  आहे. 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार, चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातो.  यावेळी देशातल्या 11 खासदारांचा समावेश आहे.महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश.  शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित. कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना "संसद विशिष्ट रत्न' पुरस्कार असणार आहे..

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

Parbhani : परभणी शहरातील श्रीहरी साडी डेपोला भीषण आग ; आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान 

Parbhani : परभणी शहरातील वसमत रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध श्रीहरी साडी डेपोला आज सकाळी अचानक भीषण आग लागली या आगीत साडी डेपोचे मोठे नुकसान झाले आहे.ही आग एवढी भीषण होती की अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी 6 बंब लागले शिवाय या भागात सर्वत्र आगीच्या धुराचे लोट दिसत होते.दरम्यान नेमकी आग कशी लागली हे मात्र समजू शकले नाही.

कोरोना शेवटाची सुरुवात? मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा शंभरीच्या आत

Maharashtra Coronavirus Update : सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशासह राज्यावरही कोरोनाचं सावट आहे. अशातच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमयाक्रॉननं सर्वांची धाकधूक वाढवली होती. तसेच, त्यापूर्वी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून देशासह राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. अशातच कोरोना असाच नियंत्रणात राहिल्यास मार्चनंतर 100 टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Russia-Ukraine conflict : युद्ध पेटणार? पुतिन यांच्याकडून युक्रेनवर 'सर्जिकल स्ट्राइक'; दोन प्रांतांना देश म्हणून मान्यता


Russia Ukraine Tension : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर रशिया आणि युक्रेनमधील तणावात आणखीच भर पडली आहे. पुतीन यांनी केलेल्या एका घोषणेमुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत. पुतीन यांनी युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यातील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर रशिया युक्रेनवर हल्ला करणार असल्याची शक्यता बळावली आहे. 


पुतीन यांनी युक्रेनच्या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता रशियाच्या दृष्टीने लुहांस्क आणि डोनेस्त्क हे दोन स्वतंत्र देश आहे. पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेनला राष्ट्र म्हणून मान्य नकार दिला. युक्रेन लवकरच अण्वस्त्र निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


पुतीन यांनी म्हटले की, युक्रेनच्या दोन वेगवेगळ्या प्रांतांना मान्यता देणार आहे. रशिया आता स्वघोषित प्रजासत्ताक डोनेत्स्क आणि लुगंस्क यांना देश म्हणून मान्यता देणार आहे. पुतीन यांच्या या घोषणेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. बंडखोरांच्या पाठिंब्यासाठी रशिया आपले सैन्य युक्रेनमध्ये दाखल करू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 


कोरोना शेवटाची सुरुवात? मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा शंभरीच्या आत, तर राज्यातील आकडा 1000च्या आत


Maharashtra Coronavirus Update : सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशासह राज्यावरही कोरोनाचं सावट आहे. अशातच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमयाक्रॉननं सर्वांची धाकधूक वाढवली होती. तसेच, त्यापूर्वी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून देशासह राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. अशातच कोरोना असाच नियंत्रणात राहिल्यास मार्चनंतर 100 टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 


संपूर्ण देशासह राज्यात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 806 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 696  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल (सोमवारी) राज्यातील नऊ महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही तर 32 महानगपालिकांमध्ये कोरोनाबाधितांच्या एकेरी संख्येची नोंद झाली आहे.  तर 58 महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.