Maharashtra Breaking News Live 21 September 2022 : आता अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंना गटप्रमुखांची आठवण आली; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Sep 2022 09:25 PM
Eknath Shinde : आता अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंना गटप्रमुखांची आठवण आली; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला

अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना गट प्रमुखांची आठवण आली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. आम्ही आमच्या कामातून त्यांना उत्तर देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

Eknath Shinde : राज्यप्रमुखांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आलो आहे - एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून ते त्याठिकाणी राज्यप्रमुखांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेबाबत बोलताना चूकीचा निर्णय असल्याचं सांगितलं.

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दौरा

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे उद्या, गुरुवारी सकाळी 11.10 वाजता  नागपूर विमानतळ येथे आगमन होईल. दुपारी 1 वाजता विधान भवन, नागपूर येथे महाराष्ट्र विधानमंडळाचे (हिवाळी) अधिवेशन-2022 च्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेषत आढावा बैठकीस उपस्थित राहतील. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता स्मृति मंदिर परिसर, रेशिमबाग येथे भारत रक्षा मंच नागपूरचे तृतीय अखिल भारतीय अधिवेशनास उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता नागपूर विमानतळाकडे प्रयाण व दुपारी 3.30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Shivsena : दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेचा निर्णय आजच होणार

दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेचा निर्णय आजच होणार आहे. उद्या कोर्टात या विषयावरच्या तातडीच्या सुनावणीत महापालिकेला आपली बाजू स्पष्ट करावी लागेल. कोर्टात शिवसेनेकडून आज दाखल झालेल्या याचिकेनंतर महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. दसरा मेळाव्याबाबत कोणत्याच (शिवसेनेच्या ठाकरे किंवा शिंदे) गटाच्या अर्जाला परवानगी न मिळण्याची शक्यता आहे. 

Ajit Pawar : कॅबिनेट बैठक लांबल्याने अजित पवार तीन तास मंत्रालयात वेटिंगवरच

Ajit Pawar : फिफाच्या लोगो अनावरण सोहळ्यासाठी अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कॅबिनेट बैठक सुरु होती आणि ती लांबली. अजित पवार तीन तास वाट पाहत थांबले होते. मात्र, तीन तास झाले तरी कार्यक्रम सुरु झाला नसल्याने अजित पवार मंत्रालयातून निघून गेले. 

Maharashtra News : विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण निलंबीत


Maharashtra News :  विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.  प्रविण यांच्याकडे एकूण 19 प्रकरणे आहेत. प्रविण चव्हाणांचे स्टिंग ॲापरेशन देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सादर केले होते. राज्य सरकारने प्रवीण चव्हाण यांच्या सुरेश जैन यांच्या घरकुल घोटाळा, भाईचंद हिरांचद रायसोनी आणि रवींद्र बराटे यांच्या केस काढून घेतल्या. गिरीष महाजन आणि तेजस मोरे यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला मार्च महिन्यात तक्रार दिली होती .

बेरोजगार तरुणांना दिलासादायक बातमी, दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारचं पोलिसांना गिफ्ट

दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारचे पोलिसांना गिफ्ट; पोलिसांच्या सुट्ट्या वाढल्या 


पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षकांच्या सुट्ट्या वाढल्या


12 वरून आता मिळणार 20 सुट्ट्या


वर्ग 3 लिपिक पदाची भरती आता एमपीएससी मार्फत होणार


 

Dasara Melava Row : दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेचा निर्णय आजच होणार

Dasara Melava Row : दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेचा निर्णय आजच होणार


उद्या कोर्टात या विषयावरच्या तातडीच्या सुनावणीत महापालिकेला आपली बाजू स्पष्ट करावी लागेल 


कोर्टात शिवसेनेकडून आज दाखल झालेल्या याचिकेनंतर महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरु


दसरा मेळाव्याबाबत कोणत्याच (शिवसेनेच्या ठाकरे किंवा शिंदे) गटाच्या अर्जाला परवानगी न मिळण्याची शक्यता

Sanjay Raut Bail Plea : संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी

Sanjay Raut Bail Plea will be Heard on September 27 : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.


पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊतच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊतच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

Nanded News: नांदेड: खड्डे चुकवण्याच्या नादात मुखेड येथे भीषण अपघात, अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी.

Nanded News: नांदेड: मुखेड तालुक्यातील राजवाडी गावाजवळ आठवडी बाजारासाठी हिमायतनगरकडे जात असणारा टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन व्यवसायिकांचा जागीच मृत्यू झाला. सात जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्ध्याच्या तळेगावमध्ये दाखल

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्ध्याच्या तळेगाव मध्ये दाखल..


राज ठाकरे वर्धाच्या आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे राजस्थान रॉयल क्रिकेट ॲकॅडमीला भेट देण्यासाठी आलेत...


या ॲकॅडमीत सध्याच्या परिस्थितीत वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील जवळजवळ साडेसातशे खेळाडू आहेत..


ही एक हाय परफॉर्मन्स अकॅडमी असून 2010 मध्ये ऑस्ट्रेलियातून टीम आली होती आणि इंग्लंड मधून देखील या ठिकाणी टीम आली होती..


याठिकाणी स्थानिक खेळाडूकडून कोणतीही फीज घेतल्या जात नाही अशी ही माहिती आहे..

Amravti News : अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण; मुख्य फरार आरोपी शाहीम अहमद आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टासमोर शरण येण्याची शक्यता

Amravti News : अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण


मुख्य फरार आरोपी शाहीम अहमद आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टासमोर शरण येण्याची शक्यता


एनआयएनं शाहीमवर 2 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केलेलं आहे


या प्रकरणात एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी कालच मंगळवारीच न्यायालयानं 90 दिवसाची मुदत वाढवून दिली आहे


एनआयएनं आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत


नुपूर शर्माचं समर्थन करणाऱ्या पोस्टनंतर अमरावतीत केमिस्ट उमेश कोल्हेची हत्या करण्यात आली होती

सुप्रीम कोर्टातल्या महत्त्वाच्या केसेस नागरिकांना ऑनलाईन ऐकायला मिळणार, कामकाजात पारदर्शकत आणण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल

Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टातल्या महत्त्वाच्या केसेस नागरिकांना ऑनलाईन ऐकायला मिळणार


27 सप्टेंबरपासून घटनापीठाच्या कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार


27 सप्टेंबरपासूनच महाराष्ट्राच्या प्रकरणाची घटनापीठासमोर सुनावणी आहे


महाराष्ट्राच्या दृष्टीने संवेदनशील प्रकरणाची सुनावणी देखील थेट ऑनलाईन प्रक्षेपित होणार का याची उत्सुकता


सुप्रीम कोर्टातल्या कामकाजात पारदर्शकतेच्या दृष्टीने कोर्टाचे ऐतिहासिक पाऊल

Hingoli News : सरकारी मदतीपासून वंचित राहिलेले सेनगाव तालुक्यातील 40 ते 45 शेतकरी सहा दिवसांपासून संपावर, दखल न घेतल्याने दूध रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध

Hingoli News : जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु या मदतीपासून सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना वंचित राहावं लागत आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसापासून गोरेगाव येथे सर्व शेतकरी संपावर गेले आहेत. राज्य शासन या संपाची दखल घेत नसल्याने आज शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दूध रस्त्यावर फेकत राज्य शासनाचा या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तात्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांच्या यादीत समावेश करा आणि तत्काळ मदत द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विषयांवर शिवसेनेचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार

Mumbai News : राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था आदी विषयांवर शिवसेनेचं शिष्टमंडळ आज सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन इथे भेट घेणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधीमंडळ गटनेते अजय चौधरी, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री अनिल परब यावेळी उपस्थित राहणार आहेत.

बीडच्या बिंदुसरा धरणावर सांडव्याच्या भिंतीवर चढून सेल्फी काढण्याचं जीवघेण धाडस
Beed News : बीड शहराजवळ असलेलं बिंदूसरा धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलं असून या धरणाच्या छोट्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने अनेक पर्यटक हे धरणाच्या पाण्यात उतरण्याचं धाडस करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही तरुण चक्क सांडव्याच्या भिंतीवर चढून सेल्फी काढत आहेत. गेल्या वर्षी याच धरणात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता आणि यावर्षी देखील आता पाणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक या धरणावर येत आहेत. मात्र काही जण धरणाच्या पाण्यात उतरत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालघरमधील जव्हारमधून दोन अल्पवयीन मुलींची अहमदनगरमधील मेंढळापाकडून पाचशे रुपयांत खरेदी

Palghar News : पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये खरेदी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे आठ वर्षीय मुलगी तीन वर्षांपासून तर सहा वर्षीय मुलगी एक वर्षापासून बालमजुरी करत होती. श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतल्यानंतर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळाविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात कलम 3(1) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी आठ वर्षीय मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे तर सहा वर्षीय मुलीचा जव्हार पोलिसांकडून शोध सुरु आहे. या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Hingoli News : संपावर असलेले शेतकरी आक्रमक; दूध रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध

Hingoli News : जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु या मदतीपासून सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना वंचित रहावे लागत आहे. या भागांमध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसापासून गोरेगाव येथे सर्व शेतकरी संपावर गेले आहेत राज्य शासन या संपाची दखल घेत नसल्याने आज शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दूध रस्त्यावर फेकत राज्य शासनाचा या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तत्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांच्या यादीत समावेश करा आणि तत्काळ मदत द्या, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Beed News : बीडच्या बिंदुसरा धरणावर सांडव्याच्या भिंतीवर चढून सेल्फी काढण्याच जीवघेण धाडस

Beed News : बीड शहराजवळ असलेल बिंदूसरा धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरल असून या धरणाच्या छोट्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक पर्यटक हे धरणाच्या पाण्यात उतरण्याच धाडस करत असल्याच पाहायला मिळतय. तर काही तरुण चक्क सांडव्याच्या भिंतीवर चढून सेल्फी काढत आहेत.


गेल्या वर्षी याच धरणात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता आणि यावर्षी देखील आता पाणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक या धरणावर येत आहेत मात्र काही उलटवास करून धरणाच्या पाण्यात उतरत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगोलीतील वसमत बाजार समितीवरील शासकीय प्रशासक मंडळ बरखास्त, सहाय्यक निबंधकांकडे पदभार
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. प्रशासक मंडळांना फक्त सहाच महिन्याची नियुक्ती असते. शासनाच्या वतीने वाढीव मुदत करुन अशासकीय प्रशासक मंडळ पूर्ववत ठेवलं होतं. मागील एका वर्षापासून हे अशासकीय प्रशासक मंडळ वसमत बाजार समितीचा कारभार बघत होतं. बाराही महिने या बाजार समितीमध्ये विक्री केली जाते, हिच बाजार समितीची वेगळी ओळख आहे. 

आता या बाजार समितीचा पदभार सहाय्यक निबंधक यांच्याकडे देण्यात आला आहे.
बुलढाण्यात नैसर्गिक आपत्तीने सव्वासहा हजार हेक्टर शेतजमिनीचं नुकसान, 9 जणांचा वीज पडून तर एकाचा वाहून गेल्याने मृत्यू, 56 लहान-मोठी जनावरंही दगावली

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी पडत असलेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे. जून ते आजपर्यंत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील 12 हजार 184 शेतकऱ्यांच्या सव्वासहा हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झालं आहे. तर या नैसर्गिक आपत्तीमध्ये 10 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यामध्ये नऊ जणांचा अंगावर वीज पडल्याने तर एकाचा पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शिवाय या नैसर्गिक आपत्तीमध्ये 56 लहान-मोठी जनावरे देखील दगावली आहे, असा अहवाल बुलडाणा नैसर्गिक आपत्ती विभागाने शासनाला पाठवला आहे.

हसन मुश्रीफ तुम्ही टीका केली की आम्हाला शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळतो, भाजपचे समरजितसिंह घाटगे यांची खोचक टीका

Kolhapur News : हसन मुश्रीफ तुम्ही टीका केली की आम्हाला शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळतो, अशी खोचक टीका भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर केली. ते म्हणाले की, "ज्या ज्या वेळी मुश्रीफ यांनी कारखान्यावर टीका केली त्या त्या वेळी पुरस्कार मिळाला. शाहू सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वोत्तम कारखाना म्हणून गौरव करण्यात आला आहे. सलग तीन वर्षे साखर कारखान्याला पुरस्कार मिळाला.



कोल्हापुरात गिरोली घाटात तरुणीचा खून तर आरोपीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Kolhapur News : कोल्हापुरातील गिरोली घाटात तरुणीचा खून, आरोपीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न 


रात्री उशीरा चारचाकी गाडीतच गळा आवळला 


ऋतुजा चोपडे असं मृत तरुणीचं नाव, खून करुन कैलास पाटील विष प्राशन केलं 


संशयित कैलास पाटील याला घेतले पोलिसांनी ताब्यात 


प्रेम प्रकरणातून खून केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती

Kolhapur News : भाविकांना आज अंबाबाईचा दर्शन घेता येणार नाही, गाभाऱ्याच्या स्वच्छतेसाठी आज देवीचं दर्शन बंद

भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना

भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज  दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय महिलांनी 7 विकेट्सनी जिंकल्यामुळे आजचा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. सामना सेंट लॉरेन्स ग्राऊंड, येथे खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5.30 ला सुरु होईल.


राज्यमंत्री शंतनु ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर

बंदरे आणि जलमार्ग मंत्री केंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहे.  लोकसभा प्रवास कार्यक्रमानिमित्त ठाकूर हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या तीन दिवसीय दौरा करणार आहे. ज्यात ते उमरखेड विधानसभा क्षेत्राचा आढावा घेणार आहेत. 

Patra Chawl Scam Case : प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

Patra Chawl Scam Case : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टापुढे हजर करणार आहेत. ईडीनं याप्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दोन्ही आरोपींविरोधात मनी लाँड्रींग केल्याचा आरोप आहे. 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा कार्यकर्त्यांकडून ते आढावा घेणार आहेत. 

Dasara Melava 2022 : मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका?

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याआधीच  उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे.  कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे.  उद्धव ठाकरे संध्याकाळी 7.30 वाजता नेस्कोच्या मैदानात भाषण करणार आहेत.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका?


दसरा मेळाव्याआधीच  उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे.  कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे.  उद्धव ठाकरे संध्याकाळी 7.30 वाजता नेस्कोच्या मैदानात भाषण करणार आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा कार्यकर्त्यांकडून ते आढावा घेणार आहेत. 


प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी


पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टापुढे हजर करणार आहेत. ईडीनं याप्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दोन्ही आरोपींविरोधात मनी लाँड्रींग केल्याचा आरोप आहे.


राज्यमंत्री शंतनु ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर 


 बंदरे व जलमार्ग मंत्री केंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहे.  लोकसभा प्रवास कार्यक्रमानिमित्त ठाकूर हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या तीन दिवसीय दौरा करणार आहे. ज्यात ते उमरखेड विधानसभा क्षेत्राचा आढावा घेणार आहेत.


भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज  दुसरा एकदिवसीय सामना


भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज  दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय महिलांनी 7 विकेट्सनी जिंकल्यामुळे आजचा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. सामना सेंट लॉरेन्स ग्राऊंड, येथे खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5.30 ला सुरु होईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.