Maharashtra Breaking News Live 21 September 2022 : आता अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंना गटप्रमुखांची आठवण आली; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका?
दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे. कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे. उद्धव ठाकरे संध्याकाळी 7.30 वाजता नेस्कोच्या मैदानात भाषण करणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा कार्यकर्त्यांकडून ते आढावा घेणार आहेत.
प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टापुढे हजर करणार आहेत. ईडीनं याप्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दोन्ही आरोपींविरोधात मनी लाँड्रींग केल्याचा आरोप आहे.
राज्यमंत्री शंतनु ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर
बंदरे व जलमार्ग मंत्री केंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहे. लोकसभा प्रवास कार्यक्रमानिमित्त ठाकूर हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या तीन दिवसीय दौरा करणार आहे. ज्यात ते उमरखेड विधानसभा क्षेत्राचा आढावा घेणार आहेत.
भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना
भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय महिलांनी 7 विकेट्सनी जिंकल्यामुळे आजचा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. सामना सेंट लॉरेन्स ग्राऊंड, येथे खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5.30 ला सुरु होईल.
Eknath Shinde : आता अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंना गटप्रमुखांची आठवण आली; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना गट प्रमुखांची आठवण आली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. आम्ही आमच्या कामातून त्यांना उत्तर देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Eknath Shinde : राज्यप्रमुखांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आलो आहे - एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून ते त्याठिकाणी राज्यप्रमुखांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेबाबत बोलताना चूकीचा निर्णय असल्याचं सांगितलं.
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दौरा
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे उद्या, गुरुवारी सकाळी 11.10 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन होईल. दुपारी 1 वाजता विधान भवन, नागपूर येथे महाराष्ट्र विधानमंडळाचे (हिवाळी) अधिवेशन-2022 च्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेषत आढावा बैठकीस उपस्थित राहतील. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता स्मृति मंदिर परिसर, रेशिमबाग येथे भारत रक्षा मंच नागपूरचे तृतीय अखिल भारतीय अधिवेशनास उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता नागपूर विमानतळाकडे प्रयाण व दुपारी 3.30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
Shivsena : दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेचा निर्णय आजच होणार
दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेचा निर्णय आजच होणार आहे. उद्या कोर्टात या विषयावरच्या तातडीच्या सुनावणीत महापालिकेला आपली बाजू स्पष्ट करावी लागेल. कोर्टात शिवसेनेकडून आज दाखल झालेल्या याचिकेनंतर महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. दसरा मेळाव्याबाबत कोणत्याच (शिवसेनेच्या ठाकरे किंवा शिंदे) गटाच्या अर्जाला परवानगी न मिळण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar : कॅबिनेट बैठक लांबल्याने अजित पवार तीन तास मंत्रालयात वेटिंगवरच
Ajit Pawar : फिफाच्या लोगो अनावरण सोहळ्यासाठी अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कॅबिनेट बैठक सुरु होती आणि ती लांबली. अजित पवार तीन तास वाट पाहत थांबले होते. मात्र, तीन तास झाले तरी कार्यक्रम सुरु झाला नसल्याने अजित पवार मंत्रालयातून निघून गेले.