Maharashtra Breaking News Live 20 September 2022 : शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुंबई महापालिकेत दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Sep 2022 07:26 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीत दाखल

अमरावती शहरातील वेलकम पॉईन्टवर मनसे पदाधिकाऱ्याकडून राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांचं पुष्पवृष्टी आणि ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं.

Jayant Patil: अतुल भातखळकर भाजप मधील तंत्र सोडलेले नेते: जयंत पाटील

भायखळकर हे भाजपातील तंत्र सोडलेले नेते असून ते काहीही मागणी करतात. ज्यांच कशाशी काही देणं नाही, घेणं नाही. कोणत्याही पारिस्थतीत कशाही मागण्या करणे चालू आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत.

शिवसेनेचं शिष्टमंडळ पालिकेच्या जी-उत्तर कार्यालयात

शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य लाईव्ह


 


Shivsena : शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुंबई महापालिकेत दाखल

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ महापालिकेच्या जी उत्तर कार्यालयामध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी शिवसैनिक आता मोठ्या प्रमाणात जमायला सुरू झाले आहेत. परिस्थिती पाहता या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. 

Shivsena : शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुंबई महापालिकेत दाखल

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ महापालिकेच्या जी उत्तर कार्यालयामध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी शिवसैनिक आता मोठ्या प्रमाणात जमायला सुरू झाले आहेत. परिस्थिती पाहता या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. 

JP Nadda In Maharashtra : जे पी नड्डांचं मिशन महाराष्ट्र, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी  मुंबई दौरा

JP Nadda In Maharashtra : जे पी नड्डांचं मिशन महाराष्ट्र, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी  मुंबई दौरा



मुंबई महापालिकासह इतर महापालिका निवडणुक तयारीचा घेणार आढावा



लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मिशन 45 चा ही घेणार आढावा



प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नियुक्ती नंतर प्रथमच राष्ट्रीय अध्यक्षांचा दौरा

Dasara melava Update: दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क कुणाचं याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार 

दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क कुणाचं याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार 


२२ तारखेपर्यंत पालिका दोन्ही गटांच्या अर्जांना उत्तर देऊ शकेल- सूत्रांची माहिती 


या मुद्द्यावरुन होणारं राजकारण  आणि वाढता दबाव पहाता महापालिका निर्णयाकरता आणखी २ दिवस घेणार


शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्यानं कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिका-यांच्या चर्चेत मांडले जात आहे

Kolhapur News: शिवसेनेचा धडक मोर्चा कोल्हापुरात सुरू, महागाईसह रेशन बचावच्या मुद्द्यावरुन मोर्चा  

Maharashtra News: शिवसेनेचा धडक मोर्चा कोल्हापुरात सुरू, महागाईसह रेशन बचावच्या मुद्द्यावरुन मोर्चा , अन्न धान्य यावरील जीएसटी बंद करा, गॅस 500 रुपये करा अशा विविध मागण्या घेऊन शिवसैनिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहेत

Maratha Reservation:  चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Maratha Reservation:  मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.


 या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. 


ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

Pune News Updates: परीक्षा शुल्क माफ करा म्हणत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा शुल्क माफ करावे यासाठी एकाचवेळी युवक क्रांती दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन.  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर अॅम्ब्युलन्स आणून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध.  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी

CM Eknath Shinde Live: विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी 

CM Eknath Shinde Live: विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौ-यावर, महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट, वेदांत प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार फ्रंट फूटवर 


आश्विणी वैष्णव आणि नितिन गडकरींची घेणार भेट

Maharashtra Jalgaon News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जळगावात जय्यत तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जळगावात जय्यत तयारी करण्यात आली असल्याचं पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे हे ज्या मार्गावरून जातील त्या मार्गावरील सर्व चौक हे भगवेमय करण्यात आले असून स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले असल्याचे पाहायला मिळत आहे...भव्य दुचाकी तसेच चारचाकी रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे. पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात तर  मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदार संघात आणि एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांची भव्य सभा होणार आहेत. या सभेसाठी 25 हजाराहून अधिक नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील केळी, रस्ते यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत..

 

एकनाथ शिंदे यांच्या सभेची उत्सुकता सर्व नागरिकांमध्ये लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत लम्पी स्कीन रोगाचा शिरकाव

Lumpy skin : मुंबईत लम्पी स्कीन रोगाचा शिरकाव झाला आहे. मुंबईत दोन जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. यामध्ये एक गाय आणि एका बैलाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. 

Pune News: पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याची आत्महत्या

पुणे-सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्याची आत्महत्या, मुंबईला बदली हवी म्हणून पैसे देण्यासाठी  सावकाराकडून कर्ज, 20 टक्क्यांनी तब्बल 84 लाखांचं कर्ज, तगाद्यानंतर आत्महत्या 

Lumpy Skin Disease in Mumbai : मुंबईत लम्पीचा धोका वाढला, एक गाय आणि एक बैल पॉझिटिव्ह

Lumpy Skin Disease in Mumbai : मुंबईत लम्पीचा धोका वाढला. एक गाय आणि एक बैल पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईतील पशु वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रातील दोन जनावरे पॉझिटिव्ह आहेत. संशयित नमुना पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठवला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका 'अलर्ट'वर आहे. लम्पी विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने जनावरांच्या लसीकरणावर भर दिला आहे. मुंबईत आतापर्यंत 1,908 गायींचें लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत 3,226 गोजातीय, तर 24,388 म्हैस-वर्गीय जनावरे असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील गोशाळा, तबेले आणि जनावरांची तपासणी सुरु केली आहे.

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावण्यात येणार

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावण्यात येणार आहे. जागा निश्चिती करण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ मंत्रालयात  

आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार, जानेवारी महिन्यानंतर उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर
Ratnagiri News : कार्यकर्ते आणि पक्ष बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. जानेवारी महिन्यानंतर उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात विभागवार तर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यानुसार त्यांचा दौरा असेल. 

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्याचे काम सुरु आहे.
आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार, जानेवारी महिन्यानंतर उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर
Ratnagiri News : कार्यकर्ते आणि पक्ष बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. जानेवारी महिन्यानंतर उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात विभागवार तर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यानुसार त्यांचा दौरा असेल. 

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्याचे काम सुरु आहे.
Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका; आदिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश, 10 लाखांचा दंड ठोठावला

Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका; आदिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश, 10 लाखांचा दंड ठोठावला

एसटी कष्टकरी जनसंघाची पहिली राज्यस्तरीय बैठक मुंबईत पार पडणार

एसटी कष्टकरी जनसंघाची पहिली राज्यस्तरीय बैठक मुंबईत पार पडणार


शुक्रवारी 23 तारखेला बैठकीचं हज हाऊस येथे आयोजन


बैठकीला राज्यांतील 1000 प्रतिनीधी उपस्थित राहणार असल्याची वकील गुणरत्न सदावर्ते यांची 'एबीपी माझा'ला माहिती 


एसटी कष्टकरी जनसंघाची नुकतीच कामगार आयुक्त कार्यालय मुंबई येथे संघटना म्हणून नोंद

कोंबड्यांच्या झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल

कोंबड्यांच्या झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे... यासाठी याचिकाकर्त्याने दिलेला तर्क अफलातून आहे... कोंबड्यांचा आधीच खाण्यासाठी वापर होतो, त्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या होते.. त्यामुळे कोंबड्यांची झुंज लावली तर ती कोंबड्यांवर क्रूरता आहे असं म्हणता येत नाही असा तर्क याचिकाकर्त्याने न्यायालयापुढे ठेवला आहे... नागपुरातील गजेंद्र चाचरकर या शेतकऱ्याने ही याचिका दाखल केली आहे... कायद्याने कोंबड्याच्या झुंजीवर बंदी आहे. यावर न्यायालयाने याचिका स्वीकारत महाराष्ट्र सरकार आणि राज्याचे पशुसंवर्धन विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त यांना प्रतिवादी केले आहे... बुधवारी या याचिकेवर पहिली सुनावणी होणार असून याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे कोंबड्यांचा आहारासाठी उपयोग करून त्यांची क्रूरतेने हत्या केली जाते, क्रिकेटवरही सट्टा लावला जातो पण त्याच्यावर बंदी नाही. त्यामुळे कोंबडा झुंजीवर बंदी लागू करणे तर्कहीन असल्याचा दावा ही केला गेला आहे..

Jalna News: तत्कालीन डीवायएसपीवर एलएलबी परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल





Jalna News: तत्कालीन डीवायएसपीवर एलएलबी परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 

 

जालना येथे तत्कालीन  डीवायएसपी  आणि लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्रचार्यावर एलएलबी परीक्षेत डमी उमेदवार बसवल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय, फेब्रुवारी 2020 साली झालेल्या एलएलबी परीक्षेत तात्कालिक डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी डमी उमेदवार म्हणून पोलीस शिपायास बसवल्याची तक्रार होती, या तक्रारी वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चौकशी समिती ने तात्कालिक डीवायएसपी आणि डमी उमेदवार पोलीस शिपायास दोषी ठरवलं होतं, दरम्यान विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख गणेश मांझा यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादी  वरून तालुका जालना पोलीस ठाण्यात डीवायएसपी खिरडकर आणि एका पोलीस शिपाया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


 

 



 


जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गासाठी   15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गासाठी   15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली. त्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने उमेदवारांची नुकसान होऊ नये त्या दृष्टिकोनातून ही परीक्षा पूर्ण करण्यात आली आहे. या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 16 सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेत येणाऱ्या आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गट क मध्ये आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे. मागील दोन वर्षापासून या परीक्षेला मुहूर्त लागेना

कामोठ्यात भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दुकान लुटले

कामोठे वसाहतीमध्ये मध्यरात्री भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफाचे दुकान लुटले. सेक्टर 11 येथील वसंतबहार सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपीने लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानातील तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून 15 किलो चांदीचे दागिने लुटले. भिंतीला भले मोठे भगदाड पाडत दुकाना प्रवेश करण्यात आला. भिंतीला भगदाड पाडल्यावर तिथे मद्याचे सेवन करत गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी कापली. या घटनेनंतर कामोठ्यातील व्यावसायिक धास्तावले आहेत. ज्वेलर्सप्रमाणे काही दिवसांपूर्वी येथील आईमाता मंदिरातही चोरी करत दानपेटी लंपास करण्यात आली होती. त्यामुळे कामोठे येथे वारंवार चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांच्या सुरक्षेवर आणि रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गासाठी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गासाठी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने उमेदवारांचं नुकसान होऊ नये त्या दृष्टिकोनातून ही परीक्षा पुढे ढकलली आहे. या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 16 ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेत येणाऱ्या आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करुन भरती केली जाणार आहे. मागील दोन वर्षापासून या परीक्षेला मुहूर्त लागेना.
काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध?

Congress President : काँग्रेस अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड करण्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे. खरंतर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा ठराव महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत संमत झाला होता. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठेवला होता, ज्याला बैठकीत उपस्थित सगळ्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला होता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी हात वर केला नव्हता. पृथ्वीराज चव्हाण हे G-23 गटातील नेत्यांपैकी एक आहेत. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी या गटाची प्रमुख मागणी आहे. 

पार्श्वभूमी


Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


Todays Headline 20th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 








मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर







मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर येत असून त्यांचा चंद्रपूर जिल्ह्याचा दोन दिवसीय दौऱ्यावर आहे.  पदाधिकाऱ्यांच्या  कामाचा आढावा घेतला जाणार आहे. 


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हिंगोली दौऱ्यावर


माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्ष बांधणीसाठी व त्याचबरोबर आढावा घेण्याकरता हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत  


 अंबादास दानवे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व शेतीचे झालेले नुकसान या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज रात्री 11 वाजता यवतमाळ पोहचत आहे. 


गुजरातमध्ये भाजपची राष्ट्रीय महापौर परिषद 


भाजपच्या देशभरातील सर्व महापौर- उपमहापौरांची परिषद या दोन दिवसीय महापौर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीसही मार्गदर्शन करण्यासाठी जाणार आहेत. 18 राज्यातील 125 हून अधिक महापौर उपस्थित राहतील. महाराष्ट्रातून धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप कर्पे हे महाराष्ट्रातील एकमेव महापौर उपस्थित राहणार आहेत.


भारत आणि ऑस्ट्रेलिया  ट्वेन्टी-20  मालिकेला आजपासून सुरुवात


भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)  यांच्यातील ट्वेन्टी-20  मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे.  पहिला T20 सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 ला सुरू होणार आहे. 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.