Maharashtra Breaking News 19 May 2022 : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 May 2022 09:00 PM
Pandharpur: वादळी वारे आणि पावसामुळे पंढरपुरात बेदाणा आणि शेवग्याचे मोठ नुकसान

अचानक आलेल्या पावसामुळे बेदाणा, डाळिंब, शेवगा , केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील शेतकरी शिवाजी हळणवर यांच्या बेदाणा शेडवरील पत्रे व कागद उडाल्याने सहा लाख रुपयांचा तीन टन बेदाण्याचे नुकसान झाले आहे.
तर पळशी‌ येथील शेतकरी शेवाळे यांची दोन‌ एकरावरील शेवग्याची बाग‌ जमिनदोस्त झाली आहे. यामध्ये त्यांचे तीन लाख‌ रूपयांचे नुकसान झाले आहे.

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेची नालेसफाई अडकली निविदा प्रक्रियेत

उल्हासनगर महापालिकेत पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईला अजून सुरुवातच झालेली नाही. कारण पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईची महापालिकेकडून निविदा प्रक्रियाच अजून पूर्ण झालेले नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईला अजून सुरुवातच नाही

Buldhana : कंपनीने थकवले अडत्यांचे 15 कोटी ,व्यापाऱ्यांची कंपनीवर धडक 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील काही अडते व व्यापाऱ्यांचे सोयाबीनचे खरेदीदार दुर्गाशक्ती फुड प्रायव्हेट लिमिटेड, खामगाव यांनी सोयाबीन, सूर्यफूल व भूईशेंग खरेदी करून सदर अडत्यांना महिन्याभरापासून पेमेंट केले नाही. मागणी करूनही पैसे मिळत नसल्यामुळे आज जवळपास बाजार समितीच्या 100 च्या वर अडते व व्यापारी हे तलाव रोडवरील दुर्गाशक्ती फुडस् प्रॉडक्ट प्रा. लि. वर धडकले. यावेळी त्यांनी अडकलेल्या कोट्यवधी रूपयांची मागणी केली. दरम्यान कंपनीचे चालक सुरेका व अडते व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. अखेर दोन्ही पक्षात बोलणी होऊन उद्या बैठक बोलावण्यात आली आहे. तर उद्या खामगाव बाजार समिती बंद ठेवण्यात येईल असे अडते- व्यापाऱ्यांनी  घोषित केले आहे.

Sangli: सांगलीत सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी

सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मागील दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाला होता. ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम असताना आज सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान सांगली शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

Share Market : शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांचे 6.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारात आज मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल 6.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मार्च 2020 नंतर इन्ट्रा-डे मध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 430 अंकानी घसरला आहे.

भंडारा जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक; काँग्रेस-भाजपच्या फुटीर गटाने मारली

भंडारा जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीपदाची निवडणूकीत काँग्रेस व भाजपच्या फुटीर गटाने मारली पुन्हा बाजी जि.प परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीनंतर चारही सभापती पदावर कांग्रेस व भाजपच्या फुटिर गटाने ताबा मिळवला आहे. विषय समितीचे नवनिर्वाचित सभापती रमेश पारधी (काँग्रेस), मदन रामटेके (काँग्रेस), स्वाती वाघाये (काँग्रेस), राजेश सेलोकर (भाजप फुटिर गट) यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली  आहे. सभापतीचा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा मुळ गट सभापतीचा पदापासून पुन्हा राहिला दूर राहिला आहे. 

Obc Reservation Maharashtra: ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून रास्ता रोको; परभणी-गंगाखेड महामार्गावरील पोखर्णी फाट्यावर आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश मधील ओबीसी आरक्षण कायम ठेवले, परंतु महाराष्ट्रात या महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींना आरक्षण मिळत नसल्याचा आरोप करत राज्यात ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजेत यासाठी आज भाजपकडून गंगाखेड-परभणी महामार्ग अडवण्यात आला आहे. पोखर्णी फाट्यावर भाजपकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपच्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीप्रकरणी तुम्ही सुनावणी नका करू, सर्वोच्च न्यायालयाचे वाराणसी सत्र न्यायालयाला निर्देश 

ज्ञानवापी मशिदीप्रकरणी कोणतीही सुनावणी करु नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने वाराणासी सत्र न्यायालयाला दिला आहे. या प्रकरणी उद्या दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Buldhana: शुक्रवारी खामगाव बाजार समिती बंदची घोषणा, अडत्यांसह शेकडो शेतकरी अडचणीत

जिल्ह्यातील खामगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही अडते व व्यापाऱ्यांचे सोयाबीनचे खरीददार (दुर्गाशक्ती फुड प्रायव्हेट लिमिटेड, खामगाव) यांनी सोयाबीन, सूर्यफूल व भूईशेंग खरेदी करून सदर अडत्यांना महिन्याभरापासून पेमेंट केले नाही. मागणी करूनही पैसे मिळत नसल्यामुळे आज जवळपास बाजार समितीच्या 100 च्या वर अडते व व्यापारी हे तलाव रोडवरील दुर्गाशक्ती फुडस् प्रॉडक्ट प्रा. लि. वर धडकले. यावेळी त्यांनी अडकलेल्या कोट्यावधी रूपयांची मागणी केली. दरम्यान कंपनीचे चालक सुरेका व अडते व्यापाऱ्यांमध्ये वाद होऊन जोरजोरात बोलणे सुरू होते. हा वाद जवळपास एक तास सुरू होता व याबाबत गावात सर्वत्र चर्चेला ऊत आला होता. त्यामुळे अखेर दोन्ही पक्षात बोलणी होऊन उद्या बैठकीला बोलाविण्यात आली आहे. या बैठकीमधे निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. तर उद्या खामगाव बाजार समिती बंद ठेवण्यात येईल, असे अडते आणि व्यापाऱ्यांनी घोषित केले आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

Sheena Bora Murders Case :  पीटर मुखर्जीच्या जामीनाच्या अटी आणि शर्ती इंद्राणी मुखर्जीवरही लागू राहणार

Sheena Bora Murders Case : शीना बोरा हत्याकांड प्रकरणात पीटर मुखर्जीच्या जामीनाच्या अटी आणि शर्ती इंद्राणी मुखर्जीवर ही लागू राहणार आहेत. दोन लाखांची अनामत रक्कम जमा करण्याचे इंद्राणी मुखर्जी यांना निर्देश दिले आहे. सदर रक्कम भरण्यास आजपासून दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय दिला आहे. 

Washim: मालेगाव वाशिममध्ये पावसाची हजेरी

वाशिम हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव वाशिमच्या काही भागात जोरदार मान्सून पूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने काही प्रमाणात तापमानाचा पारा घसरला होता. अशात पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Sheena Bora Murder Case : इंद्राणी मुखर्जीच्या जामीनाच्या अटी आणि शर्ती मुंबई सत्र न्यायालय विशेष सीबीआय कोर्ट निश्चित करणार

इंद्राणी मुखर्जीची वकील सना खान मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात पोहोचल्या. सुप्रीम कोर्टानं इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केला आहे.  मात्र जामीनाच्या अटी आणि शर्ती मुंबई सत्र न्यायालय विशेष सीबीआय कोर्ट निश्चित करणार. त्यासाठी कोर्टात इंद्राणीच्यावतीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. वकील सना खान कडून रक्कम कमी करण्याची विनंती केली आहे. सदर रक्कम 1 लाख करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच रक्कम भरण्यास 2 महिन्यांचा वेळ मिळावा अशीही मागणी करण्यात आली आहे.साडे सहा वर्षांपासून इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये आहेत.त्यामुळे रक्कम भरण्यास वेळ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

Maharashtra Palghar News :  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अमोनिया भरलेल्या टॅंकरचा मोठा अपघात, पालघरची घटना,अमोनिया वायूची मोठी गळती

Maharashtra Palghar News :  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अमोनिया भरलेल्या टॅंकरचा मोठा अपघात झाला आहे. टँकरमधून अमोनिया वायूची मोठी गळती होत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरजवळ अपघातग्रस्त वळणावर अमोनिया  टँकर उलटला.  अमोनिया वायूची सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहेत. टँकर व टेम्पो यांच्या अपघातामध्ये ड्रायव्हर किरकोळ जखमी जरी झाले असले तरी याच ठिकाणी अनेक अपघातांमध्ये अनेक प्रवासी पूर्वी मृत्युमुखी पडले आहेत.  सदरचा भरलेला टँकर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना मेंढवण येथील वळणावर पुढे असलेल्या टेम्पोने अचानक ब्रेक घेतल्यामुळे सदरचा टँकर टेम्पोला धडक देत मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या लाईनवर पलटी झाला.  

सायरस मिस्त्री यांना झटका, टाटांबरोबरच्या वादात याचिका फेटाळली, सायरस मिस्त्री यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,

सायरस मिस्त्री यांना झटका, टाटांबरोबरच्या वादात याचिका फेटाळली, सायरस मिस्त्री यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून हटवण्याच्या निर्णयाला दिलं होतं आव्हान,  टाटांच्या बाजूनं दिलेल्या निकालानंतर केली होती
पुनर्विचार याचिका

Pune :  पुणे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

Pune :  पुणे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल. पुणे महानगरपालिकेत केलेलं आंदोलन भोवलं. 17 मार्च रोजी महापालिकेत पाण्यावरून आंदोलन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हजर राहण्याचा आदेश काढला आहे.  दोघे ही पोलिस स्टेशन मध्ये हजर होणार आहेत. 

Yavatmal Maharashtra News : उमरखेड महागाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी 

Yavatmal Maharashtra News :  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव तालुक्यात सकाळी 7 वाजता पासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. काल दिवसभरापासून या भागात ढगाळ वातावरण होते. आज सकाळी अचानक पावसाची सुरुवात झाली. या पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले.   उमरखेड,महागाव तालुक्याला पावसाने झोडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यवतमाळ जिल्ह्यात वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका मिळाली आहे.

Maharashtra Nanded News : नांदेड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण.

नांदेड जिल्ह्यात भरात ढगाळ वातावरण असून हदगाव तालुक्यात आज सकाळ  पासूनच पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केलीय. ज्यात नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका परिसरात सकाळी पासूनच धुव्वाधार पावसाला सुरुवात झालीय.या वर्षी नांदेड जिल्ह्यात उष्णतेचा पारा 44 अंशावर पोहचला होता,त्यामुळे जीवाची काहिली होत होती. दरम्यान पावसाळ्याच्या तोंडावरच पावसाने जोरदार आगमन केल्याने शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण असून वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने ,तूर्तास तरी उष्णतेपासून थोडीफार उसंत मिळालीय.

Maharashtra  Malegaon News : ज्ञानवापी मशिद प्रकरणाचे पडसाद मालेगांवमध्ये, न्यायालयाच्या निकालाआधीच शहरात मोर्चा काढून आंदोलनाचा प्रयत्न

Maharashtra  Malegaon News : ज्ञानवापी मशिद प्रकरणाचे पडसाद मालेगांवमध्ये, न्यायालयाच्या निकालाआधीच शहरात मोर्चा काढून आंदोलनाचा प्रयत्न, विनापरवानगी आंदोलन करणारे 15 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करणे, पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल, दुपारी न्यायालयात हजर केले जाणार, पोलिसांचे शांतता राखण्याचे आवाहन

बुलढाण्यात लग्नात नाचताना धक्का लागला म्हणून आदिवासी तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, गावात तणाव, पोलिसांचा फौजफाटा तैनात

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील हाडियामहाल गावात एका 20 वर्षीय तरुणाला लग्नात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरुन गावातीलच चार ते पाच जणांना मारहाण केली होतीय यात रवी वारकेला हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला अकोला इथल्या सर्वोपचार केंद्रात उपचार सुरु होते. दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून हाडियामहाल या आदिवासी गावात सोनळा पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून सोनळा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

नाशिकच्या पंचवटीत बाप लेकाची आत्महत्या 

Nashik Crime : नाशिक शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील पंचवटी परिसरात बाप लेकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

धुळे-चाळीसगाव मार्गावर मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरु करण्याची प्रवाशांची मागणी
Dhule News : मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी धुळे-चाळीसगाव पॅसेंजरला मुंबई-पुण्यासाठी स्वतंत्र बोगी लावण्यात येत होत्या. मात्र मेमू सुरू झाल्यापासून या बोगी लावता येत नसल्याने धुळ्याहून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. धुळे-चाळीसगाव हा मध्य रेल्वे मार्गावर महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर सन 1900 मध्ये धुळे चाळीसगाव पॅसेंजर सुरु करण्यात आली होती. मात्र इथून मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी रेल्वेची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने सायंकाळी सात वाजता सुटणाऱ्या चाळीसगाव पॅसेंजरला मुंबई बोगी लावण्यात येत होती. या बोगीला प्रवाशांचा प्रतिसाद देखील उत्तम मिळत होता. यानंतर 2014 पासून धुळे-चाळीसगाव पॅसेंजरला धुळे-पुणे बोगी लावण्यात येऊ लागली. मात्र धुळे-चाळीसगाव रेल्वे मार्गावर 13 डिसेंबर 2019 पासून सुरु करण्यात आली. या मेमूला पूर्वीची रेल्वे बोगी जोडण्याची सुविधा नसल्याने मुंबई आणि पुणे इथे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन मुंबई आणि पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरु करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हिंगोलीतील वसमतमध्ये कौटुंबिक वादातून पती आणि पत्नीची आत्महत्या
Hingoli Suicide : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील विरेगाव इथल्या पती-पत्नीचे कौटुंबिक वाद झाले आणि या वादातून सुरुवातीला पत्नीने कालव्यात उडी घेत आत्महत्या केली आणि त्यानंतर तिच्यापाठोपाठ पतीने सुद्धा झाडाला गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपवले. हिंगोली जिल्ह्यातील या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. वसमत तालुक्यातील वीरेगाव येथील वंदना गुलाब लोखंडे असे आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव असून काल सायंकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आत्महत्येची नोंद  करण्यात आली आहे
नांदेड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण

Nanded Rain : नांदेड जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण असून हदगाव तालुक्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. ज्यात नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका परिसरात सकाळीपासूनच धुव्वांधार पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षी नांदेड जिल्ह्यात उष्णतेचा पारा 44 अंशावर पोहोचला होता. त्यामुळे जीवाची काहिली होत होती. दरम्यान पावसाळ्याच्या तोंडावरच पावसाने जोरदार आगमन केल्याने शेतकरी वर्गही आनंदात असून वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने तूर्तास तरी उष्णतेपासून थोडीफार उसंत मिळाली आहे.

ED on Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात एफआयआर नोंदवला

ED on Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. 

Pune News : बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध, आज आंदोलन

Pune News : पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. यावेळी त्यासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. दोन वर्षांपूर्वी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा डाव पुणेकरांच्या विरोधामुळे उधळला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून देखील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध करण्यात आला होता. मात्र आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासाचे प्रेझेंटेशन देण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. याच मुद्द्यावर, बालगंधर्व रंगमंदीर पाडण्यास विरोध करण्यासाठी  सकाळी 10 वाजता कलाकार आंदोलन करणार आहेत.

MNS Leader Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

MNS Leader Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला होणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीनाला मुंबई पोलिसांनी जोरदार विरोध केला असून हे दोघेही अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या कामात अडथळा, ताब्यात घेत असताना एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. त्या गाडीचा चालक आणि गाडीत बसलेल्या मनसे शाखाध्यक्षांच्या जामीनावरही कोर्ट आज निर्णय देणार आहे. 

Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि वाराणसी कोर्टात आज सुनावणी

Gyanvapi Mosque Case : वाराणसी जिल्हा कोर्टात ज्ञानवापी सर्व्हे संदर्भात अॅडव्होकेट कमिश्नर विशाल सिंह आज दुपारी 2 वाजता आपला रिपोर्ट सादर करणार आहेत. तसेच अन्य दोन याचिकांवर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. एका याचिकेत प्रतिवादी महिलांनी नंदीच्या समोरची भिंत तोडून तपास करण्याची मागणी केली आहे. दुसरी याचिका सरकारी वकिलांकडून दाखल करण्यात आली आहे. यामध्ये तीन मुद्यांवर भर देण्यात आला. मात्र वकिलांच्या संपामुळे बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही.


सर्वोच्च न्यायालयात वाराणसीचे अंजुमन इंतजामिया मशिदीने याचिका केली आहे. ज्यात खालच्या कोर्टाने दिलेले सर्व आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्या परिसरात सापडलेले शिवलिंग सुरक्षित करायला सांगितले होते आणि मुस्लिमांना नमाजासाठी परवानगी दिली होती. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे.

OBC Reservation : मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण, महाराष्ट्रात काय होणार?

OBC Reservation : मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर आता ठाकरे सरकार कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसतंय. चारच दिवसापूर्वी कोर्टाने महाराष्ट्राला ज्या सूचना केल्या होत्या त्याच सूचना मध्य प्रदेश सरकारलाही केल्या होत्या. मग चार दिवसात असा काय चमत्कार झाला. असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या मुद्द्यावर आज दिवसभर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण, महाराष्ट्रात काय होणार? 
मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर आता ठाकरे सरकार कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसतंय. चारच दिवसापूर्वी कोर्टाने महाराष्ट्राला ज्या सूचना केल्या होत्या त्याच सूचना मध्य प्रदेश सरकारलाही केल्या होत्या. मग चार दिवसात असा काय चमत्कार झाला. असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या मुद्द्यावर आज दिवसभर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.


ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि वाराणसी कोर्टात आज सुनावणी
वाराणसी जिल्हा कोर्टात ज्ञानवापी सर्व्हे संदर्भात अॅडव्होकेट कमिश्नर विशाल सिंह आज दुपारी 2 वाजता आपला रिपोर्ट सादर करणार आहेत. तसेच अन्य दोन याचिकांवर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. एका याचिकेत प्रतिवादी महिलांनी नंदीच्या समोरची भिंत तोडून तपास करण्याची मागणी केली आहे. दुसरी याचिका सरकारी वकिलांकडून दाखल करण्यात आली आहे. यामध्ये तीन मुद्यांवर भर देण्यात आला. मात्र वकिलांच्या संपामुळे बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही.


सर्वोच्च न्यायालयात वाराणसीचे अंजुमन इंतजामिया मशिदीने याचिका केली आहे. ज्यात खालच्या कोर्टाने दिलेले सर्व आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्या परिसरात सापडलेले शिवलिंग सुरक्षित करायला सांगितले होते आणि मुस्लिमांना नमाजासाठी परवानगी दिली होती. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे.


संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी 
संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला होणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीनाला मुंबई पोलिसांनी जोरदार विरोध केला असून हे दोघेही अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या कामात अडथळा, ताब्यात घेत असताना एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. त्या गाडीचा चालक आणि गाडीत बसलेल्या मनसे शाखाध्यक्षांच्या जामीनावरही कोर्ट आज निर्णय देणार आहे. 


 बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध, आज आंदोलन
पु ल देशपांडे यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. यावेळी त्यासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. दोन वर्षांपूर्वी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा डाव पुणेकरांच्या विरोधामुळे उधळला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून देखील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध करण्यात आला होता. मात्र आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासाचे प्रेझेंटेशन देण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. याच मुद्द्यावर, बालगंधर्व रंगमंदीर पाडण्यास विरोध करण्यासाठी  सकाळी 10 वाजता कलाकार आंदोलन करणार आहेत.


हवामान बदलासंबंधी जागतिक संघटनेकडून अहवाल प्रसिद्ध
हवामान बदलासंदर्भातले जबाबदार घटनांमध्ये अनेक उच्चांक बघायला मिळतायत. 2021 सालात यातील 4 प्रमुख घट असलेल्या ग्रीनहाऊस गॅसेसची पातळी, महासागराचे तापमान, त्याचे ॲसिडिफिकेशन आणि समुद्राच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ यांनी नवा उच्चांक गाठलाय. जागतिक हवामान संघटनेकडून क्लायमेट चेंजसंदर्भातला महत्त्वपूर्ण रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलाय. भारतसोबतच इतर देशांना हा अहवाल धोक्याचा इशारा आहे. 
 
श्रीकृष्ण जन्मभूमीसंबंधी आज सुनावणी
श्रीकृष्ण जन्मभूमी मथूरा येथील शाही ईदगाह संदर्भात वकील रंजना अग्निहोत्री आणि इतर कृष्ण भक्तांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. यात 1969 साली श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा समिती आणि शाही ईदगाह व्यवस्था समिती मध्ये झालेला करार अवैध असल्याचा दावा केला आहे. कारण या दोन्ही समितीला असा करार करण्याचे काही अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. यावर आज ही याचिका सुनावणी योग्य आहे की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्री. स्वामीनारायण मंदिराकडून आयोजित करण्यात आलेल्या युवा शिबिराला  सकाळी 10.30 वाजता संबोधित करणार आहेत.
 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून कार्यक्रम
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून आयोजित 'वंशवादी राजनीतिक दलो से लोकतांत्रिक शासन को खतरा' या विषयावर एक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.