Maharashtra Breaking News 18 June 2022 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jun 2022 08:00 PM
चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटा गुन्हा दाखल केला ; आत्याचाराचा गुन्हा दाखल केल्या तरूणीचा सुलासा  

महाराष्ट्राला हादरवणारी मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या तरुणीने नवीन खुलासा केला असून भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. एवढंच नाही तर याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. या एफआयरमध्ये सुरेश धस, चित्रा वाघ आणि मालेगाव येथील माजी नगरसेवक नदमोद्दीन शेख यांचे नाव आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये एकाची गळा चिरून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलाने तरूणाची गळा चिरून हत्या केलीय. दीपक गोपाळ वाघमारे असं 30 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. भोसरी परिसरात ही घटना आज दुपारी घडली आहे. दीपक आणि अल्पवयीन मुलाच्या आईचे पाच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. हे अल्पवयीन मुलाने अनेक वेळा पाहिलं होत. वडील कामासाठी बाहेर गेले की दीपक आईला भेटायला यायचा. हे थांबत नसल्यामुळे अखेर अल्पवयीन मुलाने दीपकच्या हत्येचा कट रचला. यासाठी नारळ सोलण्याचा कोयता एका ठिकाणाहून चोरला. एकाकडे पैसे आणायला जायचे आहेत, असा बहाणा करत दीपकला निर्जणस्थळी घेऊन आला आणि तिथं कोयत्याने दोन वार केले. दीपक जमिनीवर कोसळल्यावर त्याचा गळा चिरला. मद्यधुंद अवस्थेत या अल्पवयीन मुलाने हे कृत्य केलं. हत्या करणारा मुलगा किराणा मालाच्या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो, तर मयत दीपक नोकरीच्या शोधात होता. अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली.

Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पैठण तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस होतोय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड  तालुक्यात जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन जणांचा वीज कोसळून मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील नरखेड  तालुक्यात जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.  आज अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस झाला. यावेळी जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  योगेश पाटे, ज्ञानेश्वर कांबडी, बाबाराव इंगळे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर काटोल तालुक्यात मौजा कोहळा लाखोळी  येथे सुखराम बिसादरे यांची गाय वीज पडून मरण पावली. तर नरखेड तालुक्यात एक बैलजोडीचा मृत्यू

पुण्यात भाजप कार्यलयासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन

पुण्यात भाजप कार्यलयासमोर युवक काँग्रेसने आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारने सैन्य दलातील भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेचा विरोध तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील 'ईडी' कारवाईचा निषेध  करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन  करण्यात आलय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यलयासमोर येऊन घोषणाबाजी केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले.  त्यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. 20 जून पासून होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या असून या परीक्षा आता 14 जुलैपासून सुरू होणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरली : अजित पवार 

विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरली आहे. मतं बाद होणरा नाहीत याची देखील पूर्ण खबरदारी घेतली आहे. आज सर्व आमदारांना मतदानाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

Nagpur : रामण विज्ञान केंद्रात 'डिजिटल प्लॅनेटेरियम शो'चे लाँचिंग



नागपूरः खगोलशास्त्र प्रेमींसाठी 'द सन : अवर लिव्हिंग स्टार' (सुर्य : आपला जिवंत तारा) हा नवीन डिजिटल प्लॅनेटेरियम शो सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरच्या क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र (मध्य) इसरो, नागपुर (सेंट्रल) इस्रोचे उपमहाव्यवस्थापक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. श्रीनिवासन यांच्या हस्ते केले गेले. नवीन फुलडोम प्लॅनेटेरियम शोमध्ये या तप्त महाकाय गोल्याची रहस्ये उघड करतो. अब्जावधी वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती कशी झाली होती आणि अजूनही ती आपल्यावर अविरत ऊर्जा कशा प्रकारे ओतत आहे, हे या शोमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या पदार्थाचे त्याच्या गाभ्यात ऊर्जेत रूपांतर कसे होते आणि एक दिवस हा प्रचंड तारा पृथ्वीवरील जीवनाचा शेवट कसाकरेल. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा शो दररोज दुपारी 1 वाजता, दुपारी 2, दुपारी 3, 4 आणि संध्याकाळी 5 वाजता सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.


 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवणाऱ्या कार चालकाची मलबार हिल पोलिसांकडू चौकशी
Mumbai News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात गाडी घुसवणाऱ्या चालकाची मलबार हिल पोलीस चौकशी करत आहेत.पोलिसांना तपासादरम्यान असे आढळून आले की, कार चालक गेल्या सात वर्षांपासून एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या मलबार हिल इथील रहिवाशाकडे काम करतो. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांना कोणताही हेतू आढळलेला नाही. तसंच ड्रायव्हरचा दावा आहे की त्याने वाहनांमध्ये अंतर पाहिल्यानंतर तो बंगल्यातून बाहेर आला आणि गाडी बाहेर काढली. तसंच सायरन ऐकला नाही, नाहीतर तो थांबला असता. जागरुक नागरिक असल्याने आपला कोणताही हेतू नव्हता. मलबार हिल पोलिसांनी काल सायंकाळी वाहन आणून तपास केला आहे. दरम्यान, आज पुन्हा चालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या प्रकरणात कोणताही हेतू दिसत नसल्याने गुन्हा दाखल केला जाणार नसल्याचे मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर : नाना पटोले

MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या आमदारांना फोन करुन दबाव टाकत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं.

भाजपच्या आमदारांचा हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये मुक्काम, दुपारी चारनंतर आमदार हॉटेलमध्ये दाखल होणार

MLC Election 2022 : भाजपचे सर्वच आमदार आज हॉटेल ताज प्रेसिडेन्सीला संध्याकाळी चारच्या नंतर दाखल होतील. संध्याकाळी सहाच्या दरम्यान अनौपचारिक गाठीभेटी असणार आहेत. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर उपस्थित असतील. उद्या 19 तारखेला हॉटेलमध्येच संध्याकाळी चार ते सहा सशक्त बूथ अभियानासंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्ष जय पांडा उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत बूथ रचनेचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी स्थानिक तसेच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ सशक्त करण्यावर भाजपचा भर आहे. उद्या संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान विधानपरिषद निवडणूक संदर्भात मार्गदर्शन आणि मतदान करण्याचे प्रशिक्षण आमदारांना दिले जाणार आहे.

Agnipath Scheme : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण, वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाची घोषणा, शिवाय अग्निवीरांना या भरतीमध्ये तीन वर्षांची वयोमर्यादा सवलत वाढवून दिली जाणार.



उस्मानाबादमधील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार, बिक्कड थोडक्यात बचावले

Osmanabad News : राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. बिक्कड यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यातील एक गोळी ही गाडीच्या समोरच्या काचेवर मध्यभागी लागली. या जीवघेण्या हल्ल्यात बिक्कड थोडक्यात बचावले असून ते सुखरुप आहेत. नितीन बिक्कड हे त्यांच्या गावी जात असताना पारा-फक्राबाद रोडवर गोळीबार झाला. वाशी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु होती. हल्ला करण्याचे कारण अस्पष्ट असून आरोपींचा शोध सुरु आहे.

उस्मानाबादमधील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार, बिक्कड थोडक्यात बचावले

Osmanabad News : राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. बिक्कड यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यातील एक गोळी ही गाडीच्या समोरच्या काचेवर मध्यभागी लागली. या जीवघेण्या हल्ल्यात बिक्कड थोडक्यात बचावले असून ते सुखरुप आहेत. नितीन बिक्कड हे त्यांच्या गावी जात असताना पारा-फक्राबाद रोडवर गोळीबार झाला. वाशी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु होती. हल्ला करण्याचे कारण अस्पष्ट असून आरोपींचा शोध सुरु आहे.

सांगलीत कृष्णा नदी काठच्या पूर पट्ट्यात नागरिकांसाठी प्रबोधन आणि सुरक्षा उपाययोजनाबाबत प्रात्यक्षिक

Sangli News : संभाव्य पावसाळा लक्षात घेता सांगली, मिरजेच्या कृष्णा नदी काठच्या पूर पट्ट्यात अग्निशमन विभागाकडून सुरक्षा उपाययोजनाबाबत नागरिकांसाठी प्रबोधन आणि प्रात्यक्षिकास सुरुवात झाली. संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पूर परिस्थितीत नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती केली जात आहे. मिरज कृष्णा घाट परिसरात नागरिकांमध्ये खबरदारीच्या उपायांची माहिती आणि आपत्ती काळात आपला आणि दुसऱ्याचाही बचाव कसा करावा याचे प्रशिक्षणही देण्यात आले. सांगलीत गणपती मंदिरासमोर अग्निशमन विभागाने पूर पट्ट्यातील नागरिकांसाठी प्रबोधन मोहीम घेतली. यावेळी आपत्ती काळात घ्यावयाच्या दक्षता याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीमकडून प्रबोधन सुरु करण्यात आले आहे. पुढील आठ दिवस पूर भागात अशा पद्धतीने प्रात्यक्षिके सादर केली जातील असे अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी सांगितले. 

नगर-पुणे रोडवर 1.21 कोटी रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Ahmednagar News : अहमदनगर-पुणे रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात प्रतिबंधित असलेला गोवा राज्यातील एक कोटी 21 लाख रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई पारनेर तालुक्यात पुणे रोडवर करण्यात आली असून पुणे आणि अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील बापू भोसले आणि निखिल कोकाटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. विदेशी मद्य आणि भरलेला कंटेनर पुण्याला जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यानंतर पुणे आणि अहमदनगर इथल्या पथकाने पारनेरच्या पळवे या ठिकाणी हा कंटेनर अडवला आणि यावर कारवाई केली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात अपघात, टेम्पो चालकाचा मृत्यू

Raigad News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात अपघात झाला. यामध्ये टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने पुढे जाणाऱ्या वाहनाला धडक दिली. तर खोपोलीनजीक कंटेनर ट्रेलर पलटी झाला असून कंटेनर ट्रेलर बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


आदित्य ठाकरे रात्री साडेबारा वाजता आमदारांच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये


MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना हॉटेल वेस्टिन या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. या आमदारांना भेटण्यासाठी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे हे रात्री साडे बारा वाजता दाखल झाले. यावेळी अदित्य ठाकरे यांनी हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी घेत छोटी बैठक घेतली. या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई, कृषीमंत्री दादा भुसे आणि काही आमदार उपस्थित होते. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आणि इतर काही विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तासभर चर्चा झाल्यानंतर अदित्य ठाकरे हॉटेलमध्येच मुक्कामाला थांबले.


PM Modi in Gujarat : 100व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आईच्या भेटीला, हटकेश्वर मंदिरात पूजा करणार


PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदी आईची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले. आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती. आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पुजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. 


Bihar Bandh : अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहार बंद, डाव्यांच्या संघटनांचा पाठिंबा


Bihar Bandh on Agneepath Scheme : केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली असून या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन जोरदार निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत  आहेत. यामध्ये आता काही विद्यार्थी संघटनांनी आज बिहार बंदची हाक दिली आहे. या बंदला डाव्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीनं या बंदला समर्थन दिलं आहे.


SSC Result : मुंबई महापालिकेच्या शाळांचा रेकॉर्डब्रेक निकाल, बीएमसी शाळांचे 97.10 टक्के विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण


ज्यातील दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या परीक्षेमध्ये राज्यात 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र घवघवीत यश मिळवले असून यावर्षी मुंबई महापालिकेच्या शाळांचे 97.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल जाहीर झाल्याने मुंबई महापालिका शिक्षण विभाग पालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा आणि  तितकाच उत्साहाचे वातावरण आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.