Maharashtra Breaking News 18 August 2022 : हार्बर लाईनवरील लोकल सेवा पुन्हा सुरू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Aug 2022 09:28 PM
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या आरसीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मागासवर्गीय जातीची असल्यामुळे सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चेंबूर येथे घडली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिस ठाण्यात मुलीच्या पतीसह सासरा, सासू व नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Maharashtra News : अविनाश साबळेच्या कुटुंबियांचा सन्मान
कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये अविनाश साबळे याने मोठे यश मिळवल्यानंतर बीडचे  जिल्हाधिकारी राधाविरोध शर्मा यांनी अविनाश याच्या मांडवा या गावी जाऊन त्याच्या आई वडिलांचा सत्कार केला आहे. जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर अविनाश साबळेचे कुटुंबिय भारावून गेले होते त्यामुळे आम्हालाही सन्मान मिळाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विमला आर पुण्याच्या महिला व बालविकास विभागाच्या नव्या आयुक्त

Pune News:  महिला व बालविकास विभागाचे आयुक्त राहुल महिवाल यांची पीएमआरडीएला बदली करण्यात आली आहे. तर नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.  नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी नेमणूक करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे सहआयुक्त राहुल कर्डिले यांची बदली वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांची महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी सदिच्छा भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज बिग बी अमिताभ बच्चन यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.



Palghar Accident : रानशेत वानगाव रोडवर साखरे घाटात बोईसर भुसावळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात

 Palghar Accident : रानशेत वानगाव रोडवर साखरे घाटात बोईसर भुसावळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 16 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 11 जखमींना वानगाव आणि पाच जखमींना ऐना येथील शासकीय रुग्णालयात केलं दाखल करण्यात आले आहे. वानगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 



मोठी बातमी: शिवसेनेला औरंगाबादमध्ये आणखी एक धक्का; जिल्हाध्यक्ष नरेंद्र कुमार त्रिवेदी शिंदे गटात सहभागी

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र कुमार त्रिवेदी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सहभागी झाले आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट आणि आमदार रमेश बोरणारे उपस्थित होते.

दहीहंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केलीय.  

विपीन इटनकर नागपूरचे नवे जिल्हाधिकारी

नागपूरः नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ते नागपूरच्या विद्यमान जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडून पदभार स्विकारतील.

Mumbai Local Updates : हार्बर लाईनवरील लोकल सेवा पुन्हा सुरू

गेल्या 20 मिनीटांपासून ठप्प असलेली मुंबईची लाईफ लाईन मुंबई लोकल पुन्हा सुरू झाली आहे. हार्बर लाईनवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने सर्व लोकल ठप्प झाल्या होत्या. आता ती पुन्हा सुरू झाली आहे.  

Mumbai Local Update : हार्बर लाईनवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने लोकल ठप्प

मुंबईची लाईफ लाईन असलेली मुंबई लोकल गेल्या 20 मिनीटांपासून ठप्प आहे. हार्बर लाईनवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने सर्व लोकल ठप्प झाल्या आहेत. 

महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न, श्रीवर्धनला एका बोटीत 2 ते 3 एके 47 सापडल्या, महाराष्ट्र पोलिसांना अर्लट जारी

श्रीवर्धनमध्ये एका बोटीत दोन ते तीन AK47 रायफल सापडल्या, महाराष्ट्र पोलिसांना अलर्ट

Raigad News : महाराष्ट्रात घातपाताचा प्रयत्न केला जाणार होता का असा प्रश्न उपस्थित होत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये एका बोटीत 2 ते 3 AK47 रायफल सापडल्या. यानंतर महाराष्ट्र पोलिसांना अर्लट जारी करण्यात आला आहे. पोलिसाचं पथकं ठिकठिकाणी शोध घेत आहेत.

Nagpur News : नागपूरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Nagpur News : नागपुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेचे उपशहर प्रमुख लॉरेन्स ग्रेगरी यांना एका निनावी पत्राच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लॉरेन्सनं 9 ऑगस्ट रोजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यसंदर्भात फेसबुक वर पोस्ट टाकली होती. त्यात लॉरेन्सनं नुपूर शर्मा प्रकरणानंतर उदयपूर येथे झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडाचा उल्लेख केला होता. त्यानंतर अज्ञात आरोपीनं लॉरेन्स ग्रेगरीच्या घरात दगडावर गुंडाळलेला एक धमकीचा पत्र टाकला. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करत लॉरेन्स ग्रेगरीला सुरक्षा पुरवली आहे. 


 
Dahi Handi 2022 : ठाण्यातील दहीहंडी आयोजक उद्यासाठी सज्ज

Dahi Handi 2022 : ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी ही विविध जागतिक विक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. इथे बक्षिसांसोबत दहीहंडी पथकाला प्रचंड प्रसिद्धी देखील मिळते. यावर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात दहा हजार लावणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच प्रत्येक थरासाठी वेगवेगळे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक आणि नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून प्रो गोविंदा हा दहीहंडीचा खेळ देखील आयोजित केला जातो. या खेळात देखील पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गोविंदा पथकाला लाखोंची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. सोबतच दिवसभर अनेक मराठी आणि हिंदी सेलिब्रिटींची उपस्थिती या मैदानात असणार आहे. X1X हा प्रसिद्ध ग्रुप देखील इथे परफॉर्म करणार आहे. 

वर्षाशेजारचा 'तोरणा' उपेक्षित! पोलिसांची गैरसोय; मुख्यमंत्री शिंदेंकडून अधिकाऱ्यांना थेट आदेश

Mumbai Latest News : मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्याच्या शेजारी (CM House Varsha bunglaw) असलेल्या तोरणा बंगल्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. वर्षा बंगल्यात जाताना तोरणा बंगल्यातून आत जावं लागतं, वर्षा आणि तोरणा हा शेजारीशेजारी बंगला आहे.  तोरणा बंगल्यात ड्युटीला असणाऱ्या पोलिसांनी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तोरणा बंगल्यात अपुऱ्या सुविधा आणि ड्युटीवरील पोलिसांना पडझड झालेल्या खोलीत राहण्याची वेळ आली होती. याबाबत तोरणा बंगल्यात ड्युटीला असणाऱ्या पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदेंकडे (Shrikant Shinde) तक्रार केली होती. 

Buldhana News : बुलढाण्यातून उपोषणकर्ता चक्क 3 दिवसांपासून गायब, पोलिसांचा शोध सुरू

Buldhana News : जनतेच्या समस्यांसाठी किंवा प्रशासनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते लोकशाही मार्गानं उपोषण करून आपली मागणी प्रशासनासमोर ठेवत असतात. पण आता तर सामाजिक कार्यकर्ते ही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चक्क उपोषणकर्ताच उपोषण स्थळावरून गायब झाल्याचा प्रकार समोर आल्यानं आता या उपोषणकर्त्याला शोधून काढण्याचं आव्हान बुलढाणा (Buldhana) जिल्हा प्रशासनासमोर उभं राहिलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दारुबंदीसाठी अहमदनगरमधील माळी बाभूळगाव इथल्या महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Ahmednagar News : अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगाव येथील अवैध दारु धंदा कायमस्वरुपी बंद करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी गावातील महिलांनी घोषणाबाजी करत अवैध दारु धंदा बंद करण्याची मागणी केली. तर अवैध दारु धंदा बंद करण्यासाठी पाथर्डी पोलrस निरिक्षक यांना अर्ज केला होता. मात्र तरी सुद्धा अवैध दारु धंदा बंद झाला नाही. या अवैध दारु धंदा चालकांना कोणत्याही कायद्याचा धाक नसून तो पोलीस आणि इतर अधिकारी माझ्या खिशात आहेत, अशी अरेरावीची भाषा करत असल्याचा आरोप महिलांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या महिलांनी केली आहे.

'पालिका आयुक्त हटाओ', मागणीसाठी सोलापूर महापालिकेच्या कामगारांचा जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा

Solapur News : सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने पालिका आयुक्त हटाव या मागणीसाठी सोलापूरच्या जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठा संख्येने कामगार उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासक तथा आयुक्त पी शिवशंकर यांच्या मनमानी कारभारामुळे कामगार त्रस्त झाले आहेत. गुगल कॅलेंडर, जिओ टेक, वाय टेक प्रणाली कर्मचाऱ्यांना लागू करुन कर्मचाऱ्यांना छळवाद सुरु ठेवल्याने अधिकाऱ्यापासून चतुर्थ श्रेणीतील सर्व कामगार त्रस्त झाले आहेत, असा आरोप कामगार संघटनाचा आहे. त्याने आयुक्त हटाव मोहीम म्हणून आज एक दिवसासाठी लाक्षणिक संप करुन मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली. 

Sanjay Raut ED Enquiry : पत्रा चाळ घोटाळा प्रकरण : काल छापेमारीनंतर कागदपत्रं आणि डिजिटल पुरावे ईडीकडून जप्त

Sanjay Raut ED Enquiry : ED च्या अटकेत असल्यामुळे तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी काल ED ने मुंबईत मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी या परिसरात छापे टाकले होते. ईडीनं या ठिकाणी झडती घेतल्यानंतर तपासणीसाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणूका (Jammu Kashmir Assembly Election) होण्याची दाट शक्यता आहे. या आधी निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणारे बिगर काश्मिरी नागरिकदेखील आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. यासाठी त्यांना अधिवासाचा पुरावा देण्याची गरज नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर निवडणूक आयोगाचे (Jammu Kashmir Election Commission) मुख्य अधिकारी हृदेश कुमार यांनी ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवानदेखील मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करू शकतील. निवडणूक आयोगाचा हा निर्णय भाजपला निवडणुकीत मदत करण्यासाठी घेण्यात आला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Coronavirus Case : कोरोना पुन्हा वाढतोय; गेल्या 24 तासांत 12 हजारांहून अधिक रुग्ण

India Coronavirus Case : देशातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांची (Corona Patients) संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 608 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 16 हजार 251 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Nagpur : खापरखेडा वीज केंद्रात अपघात, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

 


नागपूरः खापरखेडा वीज केंद्राच्या 500 मेगावॉट संचात गुरुवारी पहाटे 1.45 च्या दरम्यान कोल स्टेकर अचानक पलटला. या घटनेत चनकापुर वॉर्ड नंबर एक येथील रहिवासी प्रविण शेंडे या कंत्राटी कर्मचाऱ्याचे आणि कोराडी निवासी संतोष मेश्राम या महानिर्मिती कर्मचारी दोघांचा अपघाती मृत्यू झाला.

पुणे मंडळ म्हाडाच्या 5211 घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज शुभारंभ

पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज शुभारंभ करण्यात आला.विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास  गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव  मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांसाठी  म्हाडा ही सोडत काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतौल २७८ सदनिका,  प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.

Ahmednagar News : दारूबंदीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथील अवैध दारु धंदा कायमस्वरुपी बंद करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी गावातील महिलांनी घोषणाबाजी करत अवैध दारु धंदा बंद करण्याची मागणी केली. तर अवैध दारु धंदा बंद करण्यासाठी पाथर्डी पोलिस निरीक्षक यांना अर्ज केला होता. मात्र तरी सुद्धा अवैध दारु धंदा बंद झाला नाही. या अवैध दारु धंदा चालकांना कोणत्याही कायद्याचा धाक नसून तो पोलिस आणि इतर अधिकारी माझ्या खिशात आहेत अशी अरेरावीची भाषा करत असल्याचा आरोप महिलांनी निवेदनात केलाय. त्यामुळे लवकर यावर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या महिलांनी केलीये.

नाना पटोलेंनी काय म्हटलं...

नाना पटोलेंनी म्हटलं आहे की, रश्मी शुक्ला गृहमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या. कायद्यापेक्षा कोणी मोठं नसतं. प्रकरण कोर्टात आहे. आता बोलणं उचित नाही. मोहित कंबोज पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते भेटायला गेले असतील, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोलेंनी काय म्हटलं...

नाना पटोलेंनी म्हटलं आहे की, रश्मी शुक्ला गृहमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या. कायद्यापेक्षा कोणी मोठं नसतं. प्रकरण कोर्टात आहे. आता बोलणं उचित नाही. मोहित कंबोज पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते भेटायला गेले असतील, असं नाना पटोले म्हणाले.

तातडीने तोरणा बंगल्यात पोलिसांना राहण्याची व्यवस्था करा खासदार श्रीकांत शिंदेंनी दिले आदेश 

तोरणा बंगल्यात ड्युटीला असणाऱ्या पोलिसांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेकडे तक्रार 


तोरणा बंगल्यात मागील अडीच वर्षांपासून राहण्याची नीट नसल्याने मरणयातना सोसत असल्याची केली तक्रार 


एका खोलीत अनेक पोलीस कर्मचारी ड्युटी करुन राहत होते, पडझड झालेल्या खोलीत राहण्याची व्यवस्था असल्याने पोलीस होते नाराज 


खासदार श्रीकांत शिंदेंनी तातडीने तोरणा बंगल्यााची पाहणी करत, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला 


तातडीने तोरणा बंगल्यात पोलिसांना राहण्याची व्यवस्था करा खासदार श्रीकांत शिंदेंनी दिले आदेश 


सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत आजपासून पोलिसांना राहण्याची सोय करणार

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात काल मध्यरात्रीनंतर अपघात, दोन कामगारांचा मृत्यू

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात काल मध्यरात्रीनंतर अपघात होऊन दोन कामगारांचा मृत्यू झालाय... रात्री 1:45 च्या सुमारास कोल स्टॅकर अचानक पलटला आणि त्यामध्ये दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे...मृतकांमध्ये एक महानिर्मितीचा कर्मचारी आहे.... तर दुसरा कंत्राटी कामगार असल्याची माहिती आहे....

भारत वि.  झिम्बाब्वे  पहिला क्रिकेट सामना

भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून आजपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. केएल राहुलने दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेय. झिम्बाब्वेविरोधात राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. राहुलने याआधी एका कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे. पण अद्याप राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा विजय झालेला नाही. राहुल कर्णधार म्हणून पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. 

आज  जागतिक हेलियम दिवस'

18 ऑगस्ट हा 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून साजरा केला जातो. 1868 मध्ये या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून हेलियम हे नाव पडले. सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या प्लॅटफॉर्मवरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो.


 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे.  त्यावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

आज मुंबईतल्या पहिल्या एसी डबल डेकर बसचं लोकार्पण

बेस्टच्या पहिल्या डबलडेकर एसी बसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.


 

आज गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्णाचा जन्मदिवस

 


आज गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्णाचा जन्मदिवस.  श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या

पार्श्वभूमी

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस 


 विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव असणार आहे. त्यामुळे विरोधक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कायदा व सुव्यवस्था, शिंदे सरकारची स्थापना या मुद्यावर आक्रमक होतील. हीच आक्रमकता सभागृहाच्या बाहेरही पाहायला मिळेल. सकाळी दहाच्या आधी विरोधकांचं पाय-यांवर ही आंदोलन होणार आहे. 


आज गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्णाचा जन्मदिवस


आज गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्णाचा जन्मदिवस.  श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
 


आज मुंबईतल्या पहिल्या एसी डबल डेकर बसचं लोकार्पण


बेस्टच्या पहिल्या डबलडेकर एसी बसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे.  त्यावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 


आज  जागतिक हेलियम दिवस'


18 ऑगस्ट हा 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून साजरा केला जातो. 1868 मध्ये या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून हेलियम हे नाव पडले. सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या प्लॅटफॉर्मवरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो.


भारत वि.  झिम्बाब्वे  पहिला क्रिकेट सामना


भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून आजपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. केएल राहुलने दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेय. झिम्बाब्वेविरोधात राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. राहुलने याआधी एका कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे. पण अद्याप राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा विजय झालेला नाही. राहुल कर्णधार म्हणून पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.