Akrosh Morcha Latur : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh murder case) निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लातूर जिल्ह्यातील रेणापूर (Renapur) येथील आक्रोश मोर्चात करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रेणापुरात आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी 50 पेक्षा जास्त गावातून लोक दाखल झाले होते. यावेळी सात मागण्यांचे निवेदन रेणापूरच्या तहसीलदारांना देण्यात आलं आहे. 


वडिलांच्या हत्येत सहभागी असलेल्या लोकांना अटक करुन कारवाई करा : वैभवी देशमुख


संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रेणापूर येथील आक्रोश मोर्चातील निवेदनात करण्यात आली आहे. या आक्रोश मोर्चात 50 पेक्षा जास्त गावातून लोक दाखल झाले होते. तसेच संतोष देशमुख यांची कन्या आणि लहान मुलगा देखील मोर्चामध्ये सहभागी झाले होते. माझ्या वडिलांच्या हत्येत सहभागी असलेले जे लोक आहेत त्यांना तात्काळ अटक करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मृत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी संतोष देशमुख यांनी केली. 


मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग 


मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील दोषी लोकांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी. जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. या मागणीसाठी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चा सहभागी झाले आहेत. संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा या मोर्चात सहभागी झाले आहेत. रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना यांनी या मोर्चात सहभाग घेतला आहे. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणातून निघालेला हा मोर्चा रेणापूरच्या तहसील कार्यालयापर्यंत अतिशय शांततेत दाखल झाला. मोर्चेकरांच्या हातात विविध फलक होते. फास्टट्रॅक कोर्टात प्रकरणाचा तात्काळ निकाल लावावा. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी. मुंडे बहिण भावांना मंत्रीपदावरुन काढण्यात यावे. मृत सरपंच संतोष देशमुख यांना तात्काळ न्याय द्यावा अशा मागण्यांचे फलक घेतलेले लोक मोर्चात सहभागी झाले होते.


रेणापूर तहसीलदारांना सात मागण्यांचे निवेदन


मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी 


सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी 


सरपंच संतोष देशमुख यांच्या पिढीत कुटुंबीयांना आणि मसाजोग येथील ग्रामस्थांना पोलीस संरक्षण देण्यात यावे 


मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे 


सदरील खून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मुंडे कुटुंबाकडे असलेले दोन्ही मंत्र्यांचे राजीनामा घेण्यात यावा 


सदरील घटनेत गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करून विलंब करणाऱ्या आणि आरोपीला मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांनाही खुनात आरोपी करावं 


परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी...


या सात मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहील. लातूर जिल्ह्यात 1 जानेवारीपासून विविध आंदोलन करण्यात येतील. रस्ता रोको, चक्काजाम यासारख्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येतील. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.