IPO Update : ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल आता सर्वांच्या नजरा Unimech Aerospace IPO कडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेस लिमिटेडनं 500 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. कंपनीनं काही नव्यानं शेअर जारी केले तर या आयपीओत ऑफर फॉर सेलद्वारे शेअरची विक्री करण्यात येत आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 23 डिसेंबरला खुला झाला होता. 26 डिसेंबरपर्यंत हा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी खुला होता. हा आयपीओ 174.93 पट सबस्क्राइब करण्यात आला.
आज शेअर बाजारात पाच मेनबोर्ड आणि एक एसएमई आयपीओ लिस्ट झाला. पाच मेनबोर्ड आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. लिस्टींगनंतर देखील शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. ममता मशिनरीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना जवळपास 387 रुपयांचा प्रतिशेअर मागं परतावा दिला आहे.
यूनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओचा जीएमपी 84 टक्क्यांवर पोहोचला आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 785 रुपये असून सध्या जीएमपी 666 रुपयांपवर आहे. या नुसार आयपीओ लिस्ट झाल्यास शेअर 1451 रुपयांवर जाऊ शकतो.
यूनिमेक एअरोस्पेस आयपीओ 175 पट सबस्क्राइब झाला असून संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 317.63 पट, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 263.78 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांनी आयपीओ 56.74 पट आणि कर्मचाऱ्यांननी 97.81 पट आयपीओ सबस्क्राइब केला आहे. हा आयपीओ 31 डिसेंबरला लिस्ट होणार आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)