Maharashtra Breaking News 18 April 2022 :  डॉ. जयश्री पाटील यांना दिलासा, 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Apr 2022 05:12 PM
Jayashree Patil : डॉ. जयश्री पाटील यांना दिलासा, 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश

Jayashree Patil : डॉ. जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहे.

 ST Protest :  सिल्व्हर ओक आंदोलनातील 115 एसटी कर्मचा-यांची जामीनासाठी याचिका दाखल

 ST Protest :  सिल्व्हर ओक आंदोलनातील 115 एसटी कर्मचा-यांची जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.  20 एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयात होणार सुनावणी होणार आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 115 आंदोलकांमध्ये 24 महिलांचा समावेश आहे

Gunratna Sadawarte :  सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांची अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव

Gunratna Sadawarte :  सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांची अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अॅड. अद्वैत शुक्ल यांनी जयश्री पाटील यांच्यावतीनं याचिका  दाखल केली आहे. राज्य सरकारतर्फे अॅड. अभिजीत गोंधवल  युक्तिवाद करणार आहे. 

Gunratna Sadawarte :  सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांची अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव

Gunratna Sadawarte :  सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांची अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अॅड. अद्वैत शुक्ल यांनी जयश्री पाटील यांच्यावतीनं याचिका  दाखल केली आहे. राज्य सरकारतर्फे अॅड. अभिजीत गोंधवल  युक्तिवाद करणार आहे. 

Raju Shetti : शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं : राजू शेट्टी   

Raju Shetti : शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा आळशी नाही. उसासाठी काय काय करावे लागते हे सर्वांना माहित आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे 18 महिने ऊस सांभाळावा लागतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. 

Beed News Update : बीडमधील ज्योतिबा यात्रेमध्ये उपळी आणि गावंदऱ्या गावच्या तरुणांमध्ये दगडफेक  

Beed News Update : बीडमधील ज्योतिबा यात्रेमध्ये उपळी आणि गावंदऱ्या गावच्या तरुणांमध्ये दगडफेक झाली आहे. दोन्ही गावातील तरुणांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. 


डवणी तालुक्यातील उपळीमध्ये ज्योतिबाची मोठी यात्रा भरते. मागच्या दोन वर्षापासूनच्या कोविड काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात यात्रेत गर्दी झाली आहे. मात्र, यात्रेमध्ये उपळी आणि गावंदरा गावातील तरुणांमध्ये अचानक मारामारीला सुरुवात झाली. यावेळी या तरुणांनी जोरदार दगडफेक केली.  अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ या यात्रेमध्ये तणाव निर्माण झाला होता. 

Kirit Somaiya News Updates : चौकशीनंतर किरीट सोमय्या म्हणाले, मी पोलिसांना सहकार्य केलंय. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे

Kirit Somaiya News Updates : चौकशीनंतर किरीट सोमय्या म्हणाले, मी पोलिसांना सहकार्य केलंय. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सत्याचा विजय होईल. तीन तास जबाब घेतला.

एबीपी माझावर सदावर्ते कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबत डॉ. प्रियांका शेट्टी यांनी मुलाखत दिल्यानंतर आता सदावर्ते यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

एबीपी माझावर सदावर्ते कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाबाबत डॉ. प्रियांका शेट्टी यांनी मुलाखत दिल्या नंतर आता सदावर्ते यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार


सामाजिक कार्यकर्त्या डॉ. कांचन पाटील यांची महिला आयोगाकडे तक्रार करून सदावर्ते कुटुंबियांवर कारवाई करण्याची मागणी


महिला आयोगाकडून तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाला संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश

सांगली महापालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ, भाजपच्या महिला नगरसेविकांनी महापौरांसमोरील राजदंड पळवला

सांगली महापालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ झाला. भाजपच्या महिला नगरसेविकांनी महापौरांसमोरील राजदंड पळवत स्वतःच्या ताब्यात घेतला. दफनभूमीच्या पॉईंट ऑफ ऑर्डरच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांनी गदारोळ घातला. यानंतर महापौरांनी सभागृह सोडले. फेब्रुवारीमध्ये कोरम नसतानाही महापौरांनी कामकाज पूर्ण केले. या विरोधात काँग्रेस आणि भाजपने मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. पण, ही याचिका फेटाळल्यामुळे आज भाजप-कॉंग्रेसच्या नगरसेवकांना सभा चालू द्यायची नव्हती असा आरोप महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी गदारोळ घालणाऱ्या नगरसेवकांवर केला.

MLA MHADA Houses : आमदारांना घर देण्याच्या जागेसाठी दोन तीन पर्यायांचा म्हाडाकडून विचार सूरू

आमदारांना घर देण्याच्या जागेसाठी दोन तीन पर्यायांचा म्हाडाकडून विचार सूरू


गोराईच्या प्राईम जागेचा म्हाडाकडून विचार सूरू असल्याची सूत्रांची माहिती


आतापर्यंत घरासाठी सुमारे 65 ते 70 आमदारांनी घेतली गृहनिर्माण मंत्र्यांची भेट, सूत्रांची माहिती


-- हे आमदार मराठवाडा, विदर्भातील आहेत


-- सुमारे 1 कोटी रुपये इतकी किंमत या घरांची असेल


--300 आमदारांना घरं देऊन बाकी घरं ही सोडतीत सामान्य नागरिकांसाठी दिली जातील


-- गृहनिर्माण मंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हाडातर्फे 300 आमदारांना म्हाडातर्फे घर देण्याची केली होती घोषणा

मागील दीड तासापासून सुरु असणारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक संपली, राज्यातील प्रार्थनस्थळावरील भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना नेमक्या कशाप्रकारे असतील याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती

मागील दीड तासापासून सुरु असणारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक संपली


बैठकीत राज्यांतील प्रार्थनस्थळावरील भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना नेमक्या कशाप्रकारे असतील याबाबत चर्चा झाल्याची माहिती


मुंबईत ज्या 4 धार्मिक वादाच्या घटना घडल्या याबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सद्यस्थितीबाबत गृहमंत्र्यांनी माहिती दिली


'एबीपी माझा'ला सूत्रांची माहिती

Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जाण्याची वेळ बदलली , चार नंतर न्यायालयात घेऊन जाणार 

Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जाण्याची वेळ बदलली , चार नंतर न्यायालयात घेऊन जाणार 


वरिष्ठांच्या झालेल्या चर्चेनंतर सातारा पोलिसांकडून माहिती

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या शिवतीर्थावर वर पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि मुंबई विभाग अध्यक्षांची बोलवली बैठक

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या शिवतीर्थावर वर पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि मुंबई विभाग अध्यक्षांची बोलवली बैठक, सकाळी 10.30 वाजता ही बैठक होणार

Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात येऊनच केली, तब्येत उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती

Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात येऊनच केली, तब्येत उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती

महागाईच्या भडक्याचे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान, घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर 14.55 टक्क्यांवर झेपावला 

महागाईच्या भडक्याचे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान, घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर 14.55 टक्क्यांवर झेपावला 


फेब्रुवारीत हाच घाऊक किंमत निर्देशांक 13.11 टक्क्यांवर होता 


मार्च 2021 सालात घाऊक किंमत निर्देशांक 7.89 टक्क्यांवर होता 


किरकोळ महागाई दर गेल्या महिन्यात 6.95 टक्क्यांवर, महागाई दर 17 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय

Amravati News : अमरावतीच्या अचलपूर शहरात जाणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवलं

अमरावतीच्या अचलपूर शहरात जाणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवलं. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात झेंडा लावण्यावरून दोन गटात काल रात्री तुफान राडा झाला.


या प्रकरणी सध्या शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आता भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना अचलपूर शहरात जाण्यास पोलिसांनी बंदी घातली असून पोलिसांनी त्यांना चांदूरबाजार नाक्यावर अडवून ठेवलेलं आहे.


दरम्यान पोलिसांकडून मुस्कटदाबी होत असून राज्य सरकारच्या दबाव असल्याचा आरोप भाजप पदाधिकऱ्यांनी केला आहे..

Nawab Malik News : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 दिवसांची वाढ, मलिक यांची न्यायालयीन कोठडी 22 एप्रिलपर्यंत वाढवली 

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 दिवसांची वाढ


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांना हजर केलं होतं


मलिक यांची न्यायालयीन कोठडी 22 एप्रिल पर्यंत वाढवली 


सर्वोच्च न्यायालयात प्रकरणावर सुनावणी अपेक्षित असल्यानं तारीख वाढवून दिली


मनी लँडरिंग प्रकरणात मलिक यांना ईडीने केली होती अटक 


सध्या मलिक हे आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत

Maharashtra News : जळकोट तालुक्यातील 47 गावांपैकी 25 गावात चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित, ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित

Maharashtra News : मागील चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात असलेल्या 47 गावांपैकी 25 गावात विद्युत पुरवठा खंडित आहे. या गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला आहे. यामुळे हा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. कोळनूर येथील 33 केव्ही केंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला आहे. याबाबत वीज नसलेल्या गावातील नागरिकांनी महावितरणकडे विचारणा केली असता, लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र आश्वासन देऊनही तीन दिवस झाले आहेत. अद्याप वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. उद्यापर्यंत वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर महावितरणच्या लातूर कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा भाजपाचे नेते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी दिला आहे. 

पुण्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची पत्रकार परिषद

पुण्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची पत्रकार परिषद, राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीत दिलेल्या चेतावणीनंतर मुस्लिम समाज काय भुमिका घेणार याकडे लक्ष, पत्रकार परिषदेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त

Amravati Achalpur News : अचलपूरमध्ये संचारबंदी लागू...
Amravati Achalpur News :  अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात दुल्ला गेट परिसरात रात्री झेंडा काढल्याच्या वादावरून दोन गट पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी दगडफेक ही झाली.. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.. याप्रकरणी अचलपूर पोलीसांनी तीन गुन्हे दाखल केले असून 16 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अचलपूरचे ठाणेदार गरुड यांनी दिली.. काही अनुचित प्रकार अचलपूर मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून परतवाडा शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधील पोलीसांचा मोठा बंदोबस्त अचलपूर मध्ये लावण्यात आला आहे. सध्या अचलपूर शहरात परिस्थिती नियंत्रणात आहे.. या प्रकारामुळे मात्र अचलपूर शहरातील 1 ते 9 वी पर्यंतचे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत...
pune news : पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीचा आज बस डे 

pune news : पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीचा आज बस डे 


आज पाच मार्गावर लेनद्वारे पुरविण्यात येणार बस सेवा 


1800 बसेस आज वाहतूकीसाठी रस्त्यावर उतरवल्या जाणार आहेत 


महिलांना आज दिवसभर मोफत प्रवास मिळणार आहे 


तर किमान तिकीट दर हा 5 रुपये असणार आहे ....


आज रस्त्यावर धावणार 250 जादा बसेस...


बस डे निमित्ताने पुण्यात आठ दिवस विविध उपक्रमांच आयोजन...

Kolhapur News : कोल्हापूरच्या कागलमध्ये समरजित घाटगेंच्या विरोधात मुश्रीफ समर्थकांचा मोर्चा

Kolhapur News : कोल्हापूरच्या कागलमध्ये समरजित घाटगेंच्या विरोधात मुश्रीफ समर्थकांचा मोर्चा


श्री राम मंदिराचा राजकीय फायद्यासाठी वापर करून तेढ निर्माण करत असल्याचा आरोप


समरजित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा म्हणून समर्थकांचा मोर्चा

Pimpari chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून

पिंपरी-चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री समोर आली. लक्ष्मण देवासी वय- 8 अस खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह घराच्या शंभर मीटर अंतरावर मिळून आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मण देवासी हा आठ वर्षीय मुलगा रविवारी दुपार पासून बेपत्ता झाला. त्याचा आई वडिलांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर चिखली पोलीस ठाणे गाठून रात्री सात च्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. तेव्हा, त्याच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मण चा मृतदेह आढळला. त्याचा अज्ञात व्यक्तीने सिमेंट चा गट्टू घालून खून केला असल्याचं समोर आलं आहे. हा खून कोणी आणि का? केला याचा शोध चिखली पोलीस घेत आहेत.

Latur News : जळकोट तालुक्यातील 47 गावांपैकी 25 गावात चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित

Latur News :  
मागील चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात असलेल्या 47 गावांपैकी 25 गावात विद्युत पुरवठा खंडित आहे ..या गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे.यामुळे हा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.कोळनूर येथील 33 केव्ही केंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे ...या बाबत वीज नसलेल्या गावातील नागरिकांनी महावितरणकडे विचारणा केली असता लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात येत आहे मात्र आश्वासनाला तीन दिवस झाले आहेत ..अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही ...उद्यापर्यंत वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर महावितरणच्या लातूर कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा भाजपाचे नेते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी दिला आहे

Nagpur Accident News : नागपुरात बोलेरो आणि बाईकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत बाईकवर बसलेल्या तिघांचा मृत्यू

नागपुरात अपघातात तिघांचा मृत्यू, बोलेरो आणि बाईकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत बाईकवर बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.. 


नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात जुनोना फुके गावाजवळ काल रात्री अपघात झाला असून त्यात तीन बाइकस्वारांचा मृत्यू झाला आहे....


लग्नाचा वऱ्हाड घेऊन निघालेल्या बोलेरो ने समोरून येणाऱ्या बाईकला धडक दिली...


बाईकवरील तिघे मध्यप्रदेशातून नातेवाईकांच्या घरून नागपूर जिल्ह्यातील आपल्या गावाकडे परत येत होते...

बुलढाण्यात दोन कुटुंबात राडा, तलवारीने हल्ला; चार जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

बुलढाणा : मलकापूर तालुक्यातील वाघूड गावात काल (17 एप्रिल) रात्री क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यात एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांवर तलवारीने हल्ला केला. यात चार जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुरुवातीला या दोन कुटुंबातील गटात शाब्दिक वाद झाला, मात्र गावकऱ्यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. पण दुसऱ्या गटाने राग मनात धरुन काही वेळातच तलवारी, काठ्या घेऊन दुसऱ्या गटावर हल्ला केला. पण नेमका हा वाद का झाला याच कारण मात्र अद्याप कळू शकल नाही. पोलिसांनी गावात तगडा बंदोबस्त लावला असून पुढील चौकशी मलकापूर पोलीस करत आहेत.

Lakhimpur Kheri Case : आशिष मिश्रांचा जामीन रद्द होणार?

Lakhimpur Kheri Case : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणी आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. यापूर्वी 4 एप्रिल रोजी सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता. यापूर्वी ते चार महिने कोठडीत होते. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Gunratna Sadavarte : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार

Gunratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची पोलिस कोठडी आज संपत आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण होणार की इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये त्यांना वर्ग केलं जाणार हे आज समजणार आहे. दुपारी दोन नंतर त्यांना न्यायालयात घेऊन जाण्यासाठी सातारा पोलीस लॉकअपमधून बाहेर काढतील.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


अॕड.गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार


अॕड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण होणार की इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये त्यांना वर्ग केलं जाणार हे आज समणार आहे. दुपारी दोन नंतर त्यांना न्यायालयात घेऊन जाण्यासाठी सातारा पोलीस लॉकअपमधून बाहेर काढतील.


किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार


भाजप नेते किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. विक्रांत घोटाळ्याबाबत सलग चार दिवस त्यांची चौकशी होणार आहे. याबरोबरच किरीट सोमय्या  मुंबई मनपा कोरोना केस संदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाणार आहेत.


कुलगुरुंच्या निवडीसाठी शोध समिती सदस्य नेमणूक करण्यासाठी बैठक  


कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेच्या पेचात आजपासून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबई विद्यापीठांचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा 9 सप्टेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होत आहे. 


महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे कुलगुरूंची निवड नेमकी कशी करायची? असा पेचप्रसंग निर्माण झाला असतानाच आज कुलगुरुंच्या निवडीसाठी शोध समिती सदस्य नेमणूक करण्यासाठी विद्यापीठात बैठकीचे आयोजन राज्यपालांच्या सूचनेनंतर करण्यात आले आहे. 


काँग्रेसच्या मच्छिमार संघटनांचे चार वाजता आंदोलन


राजभवनच्या रस्त्यावर काँग्रेसच्या मच्छिमार संघटनांचे चार वाजता आंदोलन होणार आहे. केंद्र सरकारच्या मच्छिमारांच्या विरोधातील निर्णय, सिआरझेड कायदा यांविरोधात हे आंदोलन केले जाईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अस्लम शेखही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. 


700 वर्षीची परंपरा असणाऱ्या बागड यात्रेला सुरवात


अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांवर लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी विरभद्र महाराज आणि मायंबा महाराजांची दोन दिवसीय यात्रा भरते. देवाला नवस केलेले हजारो भाविक लाकडापासून बनवलेल्या गळवंती रथावर गळी लागतात. कोरोना संकटामुळे दोन वर्षे यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. मात्र यावर्षी शासनाने परवानगी दिल्याने मोठ्या जल्लोषात राहाता येथील विरभद्र महाराज आणि मायंबा यात्रेला सुरुवात झाली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 एप्रिलपासून गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 तारखेपर्यंत गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान बनासकाठामध्ये तीन लाख महिलांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान 18 एप्रिलला  सायंकाळी साडपाच वाजता गुजरातमध्ये पोहोचतील. त्यानंतर ते सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान कमांड आणि कंट्रोल सेंटरला भेट देतील. 19 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी बनासकाठामधील गांधीनगर हेलिपॅड ते बनासदेरी या वेगळ्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करतील. तसेच तिथे ते महिला, शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 


डब्ल्यूएचओ प्रमुख उद्या गुजरातला येणार 


कोरोना व्हायरस महामारीच्या सुरुवातीला चीनवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसियस उद्यापासून तीन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये झालेल्या कोरोना बळींच्या चुकीच्या मोजणी पद्धतीवरून वाद उद्भवलेला असतानाच ते भारत दोऱ्यावर येत आहेत.


ऑटो, कॅब चालकांचा संप


सीएनजी दरवाढ झाल्यामुळे दिल्लीतील ऑटो, कॅब चालक आजपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत. 


लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामीनावर सुनावणी 


लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिषला जामीन मंजूर केला होता. आंदोलनादरम्यान आशिष मिश्रा याच्या कारखाली चिरडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी याविरोधात याचिका दाखल केली आहे.


उत्तर प्रदेशच्या मौलाना मोहम्मद अली जौहर ट्रस्टच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याशी संबंधित असलेल्या या ट्रस्टने विद्यापीठ बांधण्यासाठी अधिग्रहित केलेली जमीन सरकारला परत करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.


आर्मी कमांडर्सची परिषद


आजपासून 22 एप्रिलपर्यंत नवी दिल्ली येथे आर्मी कमांडर्सची परिषद होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा भारताच्या संरक्षण-सुरक्षा व्यवस्थेवर काय परिणाम होईल, यावर लष्कर कमांडर्सच्या परिषदेत चर्चा होणार आहे. 


काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज बैठक 


काँग्रेसमधील असंतोष थोपवण्यासाठी आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.   


श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन आमनेसामने 


राजस्थान रॉयल्स आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मुंबईतील ब्रेबॉन मैदानावर सांयकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानचा संघ विजयाची लय कामय राखण्यासाठी मैदानात उतरेल. तर श्रेयस अय्यर नेतृत्वातील कोलकाता संघ विजयाच्या पठरीवर परतण्यासाठी जिवाची बाजी लावेल. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.