ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार


1) उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु, 15, लाख विद्यार्थी परीक्षा देणार, शिक्षणमंत्री दादा भुसेंकडून शुभेच्छा, 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी होणार https://tinyurl.com/yvrknmxh बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार https://tinyurl.com/mc7jk2h6 पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त https://tinyurl.com/ycxpktbd


2) एकनाथ शिंदेंच्या 3 योजना बंद होण्याची शक्यता, तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं मोफत योजना थांबवण्याचा विचार, महत्वाच्या समितीतूनही त्यांना वगळलं https://tinyurl.com/52h75pcw उद्योग विभागाचे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर घेतल्यानं मंत्री उदय सामंत नाराज, उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओंना लिहलं पत्र https://tinyurl.com/4454wrrc खासदार श्रीकांत शिंदेंकडून नवनिर्वाचीत आमदारांना दिल्लीत डिनरचं निमंत्रण, शिवसेना ठाकरे गटाचे कोणतेही आमदार जाणार नाहीत https://tinyurl.com/mft3xy7p एकनाथ शिंदेंच्या वाढदिनी राज्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा; मंगेश चिवटेंकडे जबाबदारी https://tinyurl.com/y8xfhs48


3) जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत काम करणार, लोक गरज नाही म्हणतील त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेन, पंकजा मुंडेंचं वक्तव्य https://tinyurl.com/3k2yh5e9 मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड, पंकजा मुंडे आक्रमक, म्हणाल्या, परळी राष्ट्रवादीला गेला, त्यामुळं आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल https://tinyurl.com/sk9s6nn4


4) मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कोणतीही राजकीय चर्चा नाही, केवळ मैत्रीकरता मी घरी गेलो, फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4pd24cxn अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण https://tinyurl.com/yntrxdpr फडणवीस-ठाकरे भेट! येणाऱ्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत देखील ही भेट असू शकते, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य https://tinyurl.com/bdf4hhb3 राज ठाकरे स्वतः च्या मुलापेक्षा सहकाऱ्यांचा आधी विचार करतील; फडणवीस-ठाकरे यांच्या भेटीवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3yztdn79


5) मिलिंद नार्वेकरांसह  सुभाष देसाई, अंबादास दानवे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, बाळासाहेब ठाकरे स्मारकासंदर्भात बैठक असल्याची माहिती https://tinyurl.com/yray63jx पंतप्रधानांनी कुंभमेळ्यात डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना विसर्जन करू देत नाहीत; ठाकरेंचा मोदींना टोला https://tinyurl.com/ykrs49zx 


6) सुरेश धसांविरोधात भीम आर्मी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी, धसांच्या वक्तव्यामुळं राजकारण तापलं https://tinyurl.com/yfpu89cm सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करतायत, हा माणूस दुटप्पी, परभणी प्रकरणावरुन विजय वडेट्टीवारांचा संताप https://tinyurl.com/3458fjpw दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला सवाल https://tinyurl.com/msuwxfn4


7) हॉटेलमध्ये जे पनीर मिळते ते दुधापासून नव्हे तर व्हेजिटेबल ऑईलपासून बनतं, दूधपासून बनलेले पनीर खरेदी करा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं आवाहन https://tinyurl.com/y9authyd


8) निवडणुकीपूर्वी योजनांची घोषणा म्हणजे सरकारने मतदारांना दिलेली लाच, सर्वांवर गुन्हे दाखल करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींची मागणी https://tinyurl.com/2s4ae7en मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद,  वाहनचालकांसह प्रवाशांना बसणार फटका https://tinyurl.com/kwmaxss2 


9) बस आणि ट्रकच्या धडकेत बसला भीषण आग, तब्बल 41 जणांचा मृत्यू, मेक्सिकोच्या ताबास्को राज्यात घडली घटना https://tinyurl.com/mr2u5eck सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू तर 15 जण जखमी https://tinyurl.com/5xk4rumm 


10) घराची दारं मीच नीट बंद केली नव्हती, त्यामुळं माझ्यावरील जीवघेण्या चाकूहल्ल्याला मीच जबाबदार, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची हल्ल्यानंतर प्रथमच सविस्तर मुलाखत https://tinyurl.com/22xzd22t रणवीर अलाहबादियाच्या अडचणी वाढल्या, मानवी हक्क आयोगाने घेतली 'त्या' अक्षेपार्ह विधानाची दखल; थेट यूट्यूबला दिला महत्त्वाचा आदेश! https://tinyurl.com/56pn6kc2 मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई होणार, रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा https://tinyurl.com/3jumkzt4



एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w