17 March 2022 Breaking News LIVE Updates : सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 41 अंशावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Mar 2022 05:56 PM
साईबाबांची गुरूवारची पालखी तसेच रंगपंचमीला निघणारी साईंच्या‌ रथाची मिरवणूक स्थगित

साईबाबांची गुरूवारची पालखी तसेच रंगपंचमीला निघणारी साईंच्या‌ रथाची मिरवणूक स्थगित, जिल्हाधिकारी यांच्या‌ आदेशाने १७ मार्च ते २२ मार्च पर्यंत निर्बंध...

मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदाची जबाबदारी दोन नेत्यांकडे

मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदाची जबाबदारी राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांच्यावर सोपण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर हा पदभार राष्ट्रवादीने या दोन नेत्यांकडे सोपवला आहे. 

महाभ्रष्ट आघाडी सरकारची होळी; भाजपाचे उस्मानाबादेत अनोखे आंदोलन
सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आलेल्या सेना-खांग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सर्वसामान्य जनता, विद्यार्थी आणि शेतकरीविरोधी आहे. अश्या आघाडी सरकारची कारभाराची होळी करुन भारतीय जनता पार्टीच्या आज होळी आंदोलन केले.  आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. कमिशन एजंट महाविकास आघाडीच्या नावानं बोऽ बोऽऽ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी आज महाराष्ट्रावर महाविकास आघाडी सरकारचे संकट दूर व्हावे म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतो. हे सरकार भ्रष्टाचार्‍यांना आणि देशद्रोह्यांना पाठीशी घालत आहे. परकीय शक्तीला येथे सहारा देण्याचे काम शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार करत आहे. सर्वसामाान्यांवर अन्याय करणार्‍या, शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या महावसुली सरकारच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केले आहे 
Solapur Temperature  : सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 41 अंशावर

Solapur Temperature  : सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 41 अंशावर गेले आहे. आज सोलापुरात उच्चतम 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काल देखील पारा 41 अंशावर होता.  केवळ एका आठवड्यात पारा 28 अंशावरून 41 अंशावर पोहोचला आहे,

IPL : आयपीएल बस तोडफोड प्रकरण; मनसेच्या पाच जणांना जामीन मंजूर

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयपीएल बस फोडल्याची घटना बुधवारी घडली होती. त्या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. आता या पाच जणांना जामीन मंजूर झाला आहे. 

राज्यात होळी आणि धुळवड दणक्यात साजरी होणार, निर्बंध मागे

राज्यात होळी आणि धुळवड धुमधडाक्यात साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या परिपत्रकानुसार राज्य सरकारकडून होळी आणि धुळवडीवर कोणतेही निर्बंध नाहीत.  

मुंबईतील स्वायत्त शिक्षण संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही, मनसेचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
मुंबईतील स्वायत्त शिक्षण संस्था महाविद्यालय पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्वायत्त शिक्षण संस्थांनी सुद्धा या परीक्षा ऑनलाईनच घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांना समान न्याय द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेतली. आता या मागणी संदर्भातील आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठिंबा देऊन ऑनलाईन परीक्षा या महाविद्यालयाने घ्याव्यात, विद्यार्थ्यांना समान न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन मनसे पदाधिकारी स्वायत्त शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनाला देत आहेत. शिवाय या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत आहेत.

आमच्या पराभवासाठी विरोधक देव पाण्यात घालून बसले होते, फडणवीस यांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis: पाच राज्यांच्या निवडणुकीत आपचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. ते म्हणत होते आता भाजपची चलती आहे. मात्र 10 तारखेला एकदा मतमोजणी होऊद्या हळूहळू भाजपचा प्रभाव कमी होईल. मात्र निकाल लागला आणि त्याचं उत्तर प्रदेश गेलं, याचं गोवा गेलं आणि याचं स्वप्न, स्वप्नच राहील, असं म्हणत विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 

Share Market : बाजार उघडताच सेन्सेक्स ८५० हून अधिक अंकांनी वधारला, तर निफ्टीत देखील तेजी, २४७ अंकांची उसळी

Share Market : बाजार उघडताच सेन्सेक्स ८५० हून अधिक अंकांनी वधारला, तर निफ्टीत देखील तेजी, २४७ अंकांची उसळी. 

नांदेड : हिमायतनगर-भोकर मार्गावरील सरसम गावाजवळ कार-दुचाकीची जबर धडक, दोघांचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी

नांदेड : हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर रहदारी वाढळी असून त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. अशाच भरधाव वेगात भोकरकडून हिमायतनगरकडे येणाऱ्या कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने, दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सरसम गावाजवळ हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावर काल (16 मार्च) सायंकाळी घडली. ज्यात वाळकेवाडी येथील युवक आपली दुचाकीवरुन भोकर-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावरुन गावाकडे जात होते. दरम्यान भोकरकडून हिमायतनगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी उडून दूरवर पडल्याने दुचाकीवरील युवक केरोजी वामन हुरदुके वय 24 वर्षे आणि गंगाधर परसराम माजळकर वय 30 वर्ष या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गणपत प्रल्हाद वागतकर आणि दिगंबर प्रल्हाद वागतकर हे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आलं आहे.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी, जाणून घ्या

IOCL, Petrol-Diesel Price Today 17 March 2022 : रशिया-युक्रेन (Russia Ukrain war) यांच्यातील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही. दोन देशांतील तणावानं जगाची धाकधूक वाढवली आहे. जगभरातील अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच देशातील तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज म्हणजेच, 17 मार्च 2022 रोजी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

देशातील महानगरंपेट्रोलची किंमत (प्रति लिटर)डिझेलची किंमत (प्रति लिटर)
मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
दिल्ली95.41 रुपये 
चेन्नई101.40 रुपये91.43 रुपये
कोलकाता104.67 रुपये89.79 रुपये

Maharashtra Heat Wave : राज्यातील अनेक शहरांचा पारा 40 अंश सेल्सियस पार

MHADA Lottery : मुंबईलगत घरं घेण्याची सुवर्णसंधी, पुढच्या महिन्यात 1200 घरांची लॉटरी

Japan Earthquake : जपानला 7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा

Japan Earthquake : उत्तर जपानमधील फुकुशिमा शहराच्या किनारपट्टीला 7.1 मॅग्निट्यूडच्या भूकंपाचा धक्का बसला असून त्यामुळे या परिसरात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. हा भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या 60 किमी खोलावर असल्याचं जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने स्पष्ट केलं आहे. 

जपानमधील फुकुशिमा आणि मियागी या ठिकाणी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. राजधानी टोकियोला देखील भूकंपाचा धक्का बसला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जपानमध्ये हा भूकंपाचा धक्का बसला आहे. जपानच्या भूकंपानंतर सुमारे 20 लाख घरांची वीज गायब झाली आहे. 

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Ahmednagar Hospital Fire : राज्यपालांकडून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी निलंबित करण्यात आलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून रद्द करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांना पुणे जिल्ह्यातील शिरुर इथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर 2021 रोजी आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी या विभागात कोरोनाचे 17 रुग्ण उपचार घेत होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 9 नोव्हेंबर 2021 रोजी या अग्निकांड प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आलं होतं. अग्निकांड प्रकरणी ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Navi Mumbai Fire : खारघर परिसरातील डोंगरात वणवा, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर काल रात्री वणवा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते. हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. खारघरच्या डोंगरावर लागलेली आग विझलेली आहे. रात्री 3 च्या दरम्यान आग नियंत्रणात आली होती. खारघर अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आग नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. 

खारघरच्या डोंगराला लागूनच अनेक रहिवाशी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे आहेत. दरम्यान, काल अशाचप्रकारे माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. आणि आज खारघरचा डोंगर वणव्याचा वेढा पडलाय. त्यामुळं ही आग लागली की लावण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे. 

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Assembly Session : राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर कशी होणार? अजित पवारांनी सांगितले

Maharashtra Assembly Session : कोरोना संकटासह नैसर्गिक आपत्तीवर मात करुन राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात सांगितले. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

राज्याच्या अर्थसंकल्पावर विधानसभेत झालेल्या चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर दिले. राज्यातील जनतेवर करवाढीचा कोणताही बोजा न देता कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योगक्षेत्राच्या विकासाच्या पंचसुत्रीमुळे राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात घेतलेल्या, प्रत्येक निर्णय आणि केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सर्वशक्तीनिशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Navi Mumbai Fire : खारघर परिसरातील डोंगरात वणवा, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात, कारण मात्र अस्पष्ट

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर काल रात्री वणवा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते. हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. खारघरच्या डोंगरावर लागलेली आग विझलेली आहे. रात्री 3 च्या दरम्यान आग नियंत्रणात आली होती. खारघर अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आग नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. 

खारघरच्या डोंगराला लागूनच अनेक रहिवाशी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे आहेत. दरम्यान, काल अशाचप्रकारे माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. आणि आज खारघरचा डोंगर वणव्याचा वेढा पडलाय. त्यामुळं ही आग लागली की लावण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे. 

नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर वणवा पेटला होता. सुका कचरा आणि गवतामुळं ही आग पसरत गेली. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते. हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. डोंगराला लागूनच अनेक रहिवासी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे देखील आहेत. 

Ahmednagar Hospital Fire : राज्यपालांकडून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी निलंबित करण्यात आलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून रद्द करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांना पुणे जिल्ह्यातील शिरुर इथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर 2021 रोजी आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी या विभागात कोरोनाचे 17 रुग्ण उपचार घेत होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 9 नोव्हेंबर 2021 रोजी या अग्निकांड प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आलं होतं. अग्निकांड प्रकरणी ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.