Maharashtra Breaking News 17 June 2022 : जाणून घ्या राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली गावांमध्ये एका लग्नात नवर्या मुलाकडील लोकांनी दारू पिऊन गोंधळ घातल्यामुळे चिडलेल्या वधूकडील मंडळींनी नवरदेवाकडील मुंबईच्या वऱ्हाडाची धुलाई केल्याचा प्रकार समोर आलाय. 15 तारखेला झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ समोर आला असून यात मुलीकडील लोकांनी नवरा मुलाकडच्या लोकांवर तसेच वऱ्हाडाच्या गाडीवर दगडफेक केल्याच पाहायला मिळतेय.
कोरोनामुळं दोन वर्षे पायी वारीत खंड पडला. मात्र यंदा पायी वारी निघणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळतोय. परंतु या उत्साहावर पाऊस पाणी फेरताना दिसतोय. वारकरी अर्थात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्याने प्रस्थानाला वारकरी मुकण्याची शक्यता आहे. याबाबत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चोपदारांशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.
पूर्व विदर्भातील चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे रेल्वे प्रवासादरम्यान दोन मोबईल चोरीला गेले आहेत. पंचायतराजचा दौरा आटोपून पंढरपूरवरून मुंबईला परत येत असताना त्यांचे दोन महागडे मोबईल चोरीला गेले. त्यांनी मुंबईत पोहोचल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून रेल्वेमंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे.
आमदार जोरगेवार पंचायत राजच्या दोऱ्यावर सोलापूरला गेले होते. त्यांच्या दौऱ्यातील शेवटचे गाव पंढरपूर होते. तेथील काम आटोपून ते कुर्डुवाडी स्थानकावरून मुंबईसाठीला येण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये बसले. रात्री त्यांनी फोन चार्जिंगला लावले. पहाटे त्यांना जाग आली असता, दोन्ही फोन चोरीला गेले होते. त्यांनी लगेच सहप्रवाशांच्या फोनवरून स्वतःचे नंबर डायल केले. परंतु, दोन्ही मोबाईल बंद होते.
महाविकास आघाडीची चिंता वाढली, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा परवानगी नाहीच; हायकोर्टाचा निकाल
Congress Protest : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी पाठवलेली नोटीस आणि दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पोलिसांनी शिरून कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीच्याविरोधात हिंगोलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. निदर्शने करत असताना अनेक वेळा आंदोलकांची पोलिसांबरोबर झटापट झाली. आंदोलन चिघळल्याने आंदोलकांनी काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे
Aurangabad : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची ईडीकडून करण्यात येत असलेल्या चौकशीच्या विरोधात औरंगाबादमध्ये आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान आंदोलनास सुरवात झाली. यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.
Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयात भर कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न, तुषार शिंदे नावाच्या 55 वर्षीय माजी सैनिकाकडून आत्महत्येचा प्रयत्न, संपत्तीच्या वादाचं प्रकरण हायकोर्टात प्रलंबित, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रसंग टळला, तुषार शिंदे यांना हायकोर्टातील पोलिसांनी ताब्यात घेतलं
Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयात भर कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न, तुषार शिंदे नावाच्या 55 वर्षीय माजी सैनिकाकडून आत्महत्येचा प्रयत्न, संपत्तीच्या वादाचं प्रकरण हायकोर्टात प्रलंबित, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रसंग टळला, तुषार शिंदे यांना हायकोर्टातील पोलिसांनी ताब्यात घेतलं
MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून हालचालींना वेग आला आहे. अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीत विधानपरिषद निवडणुकीबाबत रजकीय खलबत होणार आहे. काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कशी करायची याबाबात बैठकीत चर्चा होणार आहे.
Ahmednagar News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अहमदनगर जिल्ह्यात येत आहेत. भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहे. अकोले येथील विठ्ठल लॉन्स मध्ये दुपारी तीन वाजता हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे , राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
Nashik News : नाशिकच्या सातपूर MIDC परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास यश एन्टरप्रायजेस कंपनीच्या आवारात कुत्रे अचानक भुंकायला लागल्याने कंपनीच्या कामगारांनी खाली डोकावून बघताच कंपनीच्या गेटजवळच बिबट्या दिसला. बिबट्याचा हा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस आणि वनविभागाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Solapur News : सोलापूरमध्ये रिक्षावर 'नुपूर शर्मा समर्थक' पोस्टर चिटकवणाऱ्या दोन रिक्षा चालकावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शेळगी भागातील रिक्षावर 'नुपूर शर्मा समर्थक' बॅनर लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत नोटीस दिली. रामचंद्र राजमाने आणि श्रीकांत सुरवसे असे पोस्टर लावणाऱ्या रिक्षाचालकांची नावे आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आज ईडी चौकशीला गैरहजर राहण्याची विनंती केली आहे. आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबण्यासाठी त्यांनी ही परवानगी मागितली होती. राहुल यांची सोमवारी चौकशी होण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त..
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आज दहावीचा निकाल, दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार
दहावीच्या परीक्षेला 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506 मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458 एवढी आहे. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना जलद निकाल पाहता येणार आहे.
नुपूर शर्मा, जिंदालविरोधात वंचितचा अमन मोर्चा स्थगित
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मदनपुरा ते आझाद मैदान असा अमन मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, रात्री वंचितची गृहमंत्री वळसे पाटलांसोबत बैठक झाली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय झालाय. मोहम्मद पैगंबर आणि इतर धर्मगुरूंचा अनादर करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा पारित करावा आणि या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरांनी केली. पोलिसांकडून आंबेडकरांना अटकेचं आश्वासन दिलंय. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलंय.
आज देशभर काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
राहुल गांधी यांची ईडी चौकशी आणि काँग्रेस मुख्यालयात दिल्ली पोलिसांनी शिरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीविरोधात आज देशभर जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे कोल्हापूर, औरंगाबाद , नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली येथे काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबाबत काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे
देशमुख आणि मलिकांच्या मतदानाचा निर्णय आज येणार
आगामी विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या दोन मतांचं भवितव्य आजच्या निकालावर अवलंबून आहे. कोणत्याही कैद्याला मतदानाचा अधिकार नाही, असा दावा करत ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी देशमुख आणि मलिकांच्या मागणीला जोरदार विरोध केला आहे. आज दुपारी 2.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयात निकाल येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -