Maharashtra Breaking News LIVE Updates : अखेर राजापेठ उड्डाणपुलावर पुतळ्याला मनपाच्या आमसभेत मंजुरी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Feb 2022 07:35 PM
दुचाकीच्या अपघातात मारेगाव येथील दोन युवकांचा मृत्यू

दुचाकीच्या अपघातात मारेगाव येथील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डा गावाजवळ ही घटना घडली.  जिवन बुधाराम गेडाम (27), नितीन सुरेश रायपुरे (38) रा. मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.  

अखेर राजापेठ उड्डाणपुलावर पुतळ्याला मनपाच्या आमसभेत मंजुरी
आमदार रवी राणा यांनी शिवाजी महाराजांचा राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला पुतळा मनपाने काही दिवसांपूर्वी हटवला होता. यावेळी मोठा वाद होऊन मनपा आयुक्तांवर शाई देखील फेकण्यात आली होती. या सर्व घडामोडीनंतर आज मनपाच्या आमसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे बसविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मुंबईतील अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या धर्तीवर अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात एक भव्य स्मारक तयार करण्यात येईल तसेच राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचा पुतळा उभारण्यात येईल अशी माहिती महापौर चेतन गावंडे यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील अवैद्य गर्भपाताची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयाचे मिळणार बक्षीस

बीड जिल्ह्यातील अवैद्य गर्भपाताची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयाचे मिळणार बक्षीस -  जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे

चंद्रपूर - सहा नगरपंचायतींपैकी ५ ठिकाणी महाविकास आघाडी तर एका ठिकाणी भाजपचा अध्यक्ष
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने सहापैकी 5 ठिकाणी यश मिळविले आहे तर पोंभुर्णा येथे भाजपने पुन्हा वाईट हाऊसचा ताबा घेतलाय. जिल्ह्यात महाविकास आघाडी नगरपंचायत निवडणूक एकत्रितपणे लढली नसली तरी अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मात्र तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

 
मुंबईतील कामाठीपुरा येथे भीषण आग

मुंबईतील कामाठीपुरा येथे आग लागली आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 4 ते 5 गाड्या रवाना केल्या आहेत. 

Wardha Corona : वर्धा जिल्ह्यातही 19 नवे कोरोनाबाधित

Wardha Corona : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासांत आढळले 19 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. सध्या जिल्ह्यात 112 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत 1348 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज होम आयसोलेशनमध्ये 87 रुग्ण आहेत तर 2 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona Update : अकोल्यात आढळले 19 नवे कोरोनाबाधित

Akola Corona Update : आज दिवसभरात अकोल्यात 19 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. सध्या जिल्ह्यात 189 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1164 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज 22 जण कोरोनामुक्तही झाले आहेत.

Indian Railway IRCTC : या मार्गांवरील 6 गाड्या झाल्या रद्द, प्रवास करण्यापूर्वी ही यादी पहा

दक्षिण रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


4 मार्च 2022
 
गाडी क्रमांक 16515 यशवंतपूर - कारवार एक्स्प्रेस


5 मार्च 2022


गाडी क्रमांक  16516 कारवार - यशवंतपूर एक्सप्रेस
गाडी क्रमांक  11097  पुणे जंक्शन - एर्नाकुलम जंक्शन एक्सप्रेस 


6 मार्च 2022 


गाडी क्रमांक  56641 (06601) मडगाव जंक्शन - मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेस
गाडी क्रमांक  56640 (06602) मंगळुरु सेंट्रल - मडगाव जंक्शन एक्सप्रेस 


7 मार्च 2022


गाडी क्रमांक 11097 एर्नाकुलम जंक्शन - पुणे जंक्शन एक्सप्रेस 

Nashik News Update : मालेगावच्या  उर्दू घराला कर्नाटक ' हिजाब गर्ल  ' मुस्कान खानचे नाव 

Nashik News Update : नाशिकमधील मालेगाव येथील उर्दू घराला कर्नाटक' मधील हिजाब गर्ल' मुस्कान खान हिचे नाव देण्यात आले आहे. मालेगावच्या महासभेत याबाबत निर्णय घेण्यात आाला आहे. परंतु, मुस्कान खानचे नाव देण्यास जनता दल आणि भाजपने विरोध केला असून शिवसेना तटस्थ राहिली आहे. 'मुस्कान खान'चे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. महापौर ताहेरा शेख यांनी हा ठराव मांडला होता. 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन  झाले आहे. 

Amravati : राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविन्याचा प्रस्ताव

Amravati News : राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविन्याचा प्रस्ताव मनपाच्या आमसभेत ठेवण्यात आला आहे. बसपा नगरसेवक चेतन पवार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. छत्री तलाव परिसरात महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यालाही आमसभेने मंजूरी दिली आहे.

एकनाथ शिंदे विरूध्द जितेंद्र आव्हाड शितयुध्द सुरूच.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महानगर पालिका निवडणूका येत्या एप्रिल मध्ये होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे या निवडणूकीत महाविकास आघाडी व्हावी अशी इच्छा राष्ट्रवादीची असली तरी शिवसेना मात्र याला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. सेनेने अहंकारपणा न सोडल्यास ठाणे जिल्ह्या हातातून जाईल असे सांगत एकनाथ शिंदे यांना डिवचले होते. आव्हाड यांच्या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर देत शिवसेना फायदा - तोट्याचा विचार करीत नसल्याचा पलटवार केला आहे.  नेत्यांनी बोलताना महाविकास आघाडी मधील कुणाची मने दुखावणार नाहीत याचा विचार करावा असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलाय….

Bhiwandi News : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; अपघातात नऊ जण जखमी

Bhiwandi News : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; अपघातात नऊ जण जखमी


वडपा परिसरात घडली घटना


कार चालकाचा कारवरील संतुलन बिघडल्याने घडला अपघात 


कार थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी व रिक्षाला जोरदार कारची धडक


दुचाकीवरील दोन व रिक्षामधील सात असे नऊ जण जखमी


 

Maharashtra Hingoli Updates :  औंढा नागनाथ आणि सेनगाव दोन्ही नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात 

 Maharashtra Hingoli Updates :  औंढा नागनाथ आणि सेनगाव दोन्ही नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात 


आज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि सेनगाव नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये औंढा नागनाथ नगरपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. या जागेवर राजू खंदारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सेनगाव नगरपंचायत सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होती. त्यामुळे सेनगाव नगरपंचायत वर शिवसेनेच्याच ज्योती देशमुख यांची 12 मतांनी नगराध्यक्षापदी निवड झाली आहे. एकंदरीत या दोन्हीही नगरपंचायत शिवसेनेच्याच ताब्यात आल्या आहेत.

Jalna Crime : जालना रिझर्व्ह बँकेकडून मंठा अर्बन बँकेचा परवाना रद्द

Jalna Crime : 2020 साली बँकेवर आर्थिक निर्बंध लादून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील मंठा अर्बन बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द करण्यात आला आहे. 2020 साली आर्थिक डगबगाईला आलेल्या बँकेवर आर्थिक निर्बंध  घालण्यात आले होते. यानंतर या बँकेवर प्रशासकाची नेमनुक देखील करण्यात आली होती. आता या बँकेचा RBI कडून परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेवर आर्थिक निर्बध घातल्यानंतर केंद्र सरकारनं कायद्याप्रमाणे 29 हजार सभासदांना पाच लाखांच्या मर्यादेपर्यंत 39 कोटी रुपयांच्या ठेवी आजवर वितरित करण्यात आल्या आहेत. 

Sanjay Raut : खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

Pune : कबुतर चोरीचा आरोप करत अल्पवयीन मुलाला बॅट व पट्ट्या ने मारहाण

Pune : पुण्यातील येरवडा परिसरात एक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाला बॅट व पट्ट्या ने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कबुतर चोरीचा आरोप करत शाळेच्या मैदानात केली मारहाण करण्यात आली.  पीडित मुलाचे आई वडीलानी घेतली पोलिसांकडे तक्रार केली.

Maharashtra Ahmednagar News : अहमदनगर शहरातील एमआयडीसी परिसरातील तोफखाना हद्दीत एक कोटी सहा लाख रुपयांचा तीन ट्रक गुटखा जप्त

Maharashtra Ahmednagar News अहमदनगर : अहमदनगर शहरातील एमआयडीसी परिसरातील तोफखाना हद्दीत तीन ट्रक गुटखा कोतवाली पोलिसांनी जप्त केलाय. तब्बल एक कोटी सहा लाख रुपयांचा हा प्रतिबंधीत गुटखा असून आतापर्यंतची गुटखा विरोधी ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय. कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे.. मुद्देमालाची मोठी व्याप्ती असल्याने कारवाई ही राञी उशिरापर्यंत सुरु होती...कोतवाली पोलिसांना नगर शहरातील एमआयडीसी भागात लाखो रुपयांचा गुटखा लपून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती... कोतवाली पोलिसांनी एमआयडीसी भागातील तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या एका गोडावूनवर छापा टाकून गुटखा जप्त केला आहे... या प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपीसह दहा आरोपींना ताब्यात घेतलंय...

Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांच्यावर पवनहंस स्मशानभूमित अंत्यस्कार होणार आहेत

Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांच्यावर पवनहंस स्मशानभूमित अंत्यस्कार होणार आहेत ; यावेळी  शक्ति कपूर, इला अरुण, अलका याग्निक, निखिल द्विवेदी रुपाली गांगुली, मिका सिंह, बिंदु दारा सिंह हे कलाकार उपस्थित आहेत. 

Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचे पार्थिव पवनहंस स्मशानभूमित दाखल; काही वेळेत होणार अंत्यसंस्कार

Bappi Lahiri : बप्पी लाहिरी यांचे पार्थिव पवनहंस स्मशानभूमित दाखल; काही वेळेत होणार अंत्यसंस्कार





Maharashtra Beed News :  अपघातात बापलेकाच्या दुर्दैवी मृत्यू 

Maharashtra Beed News :  अपघातात बापलेकाच्या दुर्दैवी मृत्यू 


गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर ट्रॅक्टर आणि पिकपच्या भीषण अपघातांमध्ये बापलेकाच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे रात्री साडे अकराच्या दरम्यान हा अपघात झाला असून उसाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने पिकपला जोराची धडक दिली आणि यामध्येच चंद्रशेखर पाठक व त्यांचा 12 वर्षाचा मुलगा आर्यन पाठक याचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये पाठक यांची मुलगी मंजिरी पाठक ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे तिघेही पिकपमधून प्रवास करत होते

Maharashtra News Pune Updates : शिवसेना उपनेता रघुनाथ कुचिक  यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Maharashtra News Pune Updates :  पुणे :  शिवसेनेचा उपनेता रघुनाथ कुचिक  यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, 24 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल

Maharashtra News Pandharpur Updates : वेळापूर येथे पैशाच्या कारणावरून शेतमजुराची हत्या, चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल 

Maharashtra News Pandharpur Updates : वेळापूर, येथे पैशासाठी शेत मजुराची निर्घृण हत्या करण्यात आल्या असून या बाबतीत वेळापूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भालचंद्र पोपट वाघ या शेतमजुरांची हत्या झाली असून याला सावकारीचा अँगल आहे का याचीही पोलीस तपासणी करीत आहेत. वेळापूर पोलिसांत मयताचे वडील पोपट काशिनाथ वाघ यांनी फिर्याद दिली आहे .  

Share Market : सेन्सेक्स 285 अंकांनी वधारला तर निफ्टीतही तेजी, 101 अंकांनी निर्देशांक वर

Beed Crime : बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक

Water Taxi : मुंबई ते नवी मुंबई प्रवास आजपासून वॉटर टॅक्सीतून, देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं आज उद्घाटन

Water Taxi : मुंबई ते नवी मुंबई प्रवास आजपासून वॉटर टॅक्सीतून करता येणार आहे. देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन आज दुपारी 12 वाजता होणार आहे. मुंबई ते बेलापूर दरम्यानची ही जलवाहतूक गेले काही महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. अखेर आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचं उद्गाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  ऑनलाईन उपस्थित असतील. या प्रकल्पावरून राजकारणही रंगलंय. या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून महापालिका निवडणुकीचा नारळ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असताना आणखी प्रतीक्षा का करायची अशी भूमिका घेत आघाडी सरकारनं या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आयोजित केलाय. 

Air Bus : लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन

Air Bus : रस्ते निर्मितीमुळं रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील असं आश्वासन नितीन गडकरींनी दिलंय. एवढच नव्हे तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही गडकरींनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीन गडकरींनी प्रयागराजमधल्या सभेत उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सी-प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक प्रकल्पांचं आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलंय.

Traffic Rules Rule For Children : 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर बसवायचं असेल, तर त्यांना हेल्मेट, हार्नेस बेल्ट वापरणं अनिवार्य

Traffic Rules Rule For Children : तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना दुचाकीवरुन फिरवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे... कारण आता ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर बसवायचं असेल तर त्यांना हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणं अनिवार्य करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं यासंदर्भात अधीसूचना जारी केली आहे.तर, मुलं दुचाकीवर बसल्यानंतर दुचाकीचा वेग फक्त 40 किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवावा लागणार आहे. या नव्या वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर, चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Kushinagar Well Incident : लग्नसोहळ्यात मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू, लहान मुलांसह महिलांचाही समावेश


People Died In Kushinagar's Wedding Program : उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नसमा लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरझण पडलं असून त्याचं रुपांतर शोकात झालं. जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिरीत पडून 11 लहान मुलं आणि महिलांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. लग्नासोहळ्याचे विधी पार पडत असताना हा अपघात झाला. यावेळी विहिरीच्या स्लॅबवर लहान मुलं आणि महिला बसल्या होत्या, विहिरीच्या स्लॅबवर जास्त भार पडल्यामुळं तो कोसळला आणि त्यावर बसलेले सर्वजण विहिरीत पडले. या अपघातामुळं लग्नाच्या आनंदाचं रूपांतर शोकात झालं आहे. सध्या प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. विहिरीतून मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत.


कुशीनगरचे जिल्हा दंडाधिकारी एस. राजलिंगम यांनी या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितलं की, "अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल." ते म्हणाले, "नौरंगिया टोला गावात एक जुनी विहीर होती, जिच्यावर स्लॅब होता. त्या स्लॅबवर लग्नसोहळ्या दरम्यान लहान मुलं आणि महिला बसल्या होत्या, त्या दरम्यान स्लॅब कोसळला आणि मलबा त्यांच्यावर पडला.  बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.


Petrol-Diesel Price : मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील महानगरांतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या किमती


Petrol-Diesel Price Today 17 February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी (Oil Companies) पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) चे आजचे दर जारी करण्यात आले आहेत. आजही इंधनांच्या किमतींमध्ये कोणताही खास बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षात 3 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. 


निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडणार? 


सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Price Today) असल्याचं बोललं जात आहे. अशातच निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कडाडणार असल्याचं बोललं जात आहे.  कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.