Maharashtra Breaking News 16 May 2022 : बालगंधर्व नाट्यगृहात राडा, राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 May 2022 09:05 PM
Pune : स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून कृत्य

पुण्यातील बालगंधर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या गाडीच्या ताफ्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या महिला विभागातील कार्यकर्त्यांनी अंडी फेकण्याचा प्रयत्न केला आहे.

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून निषेध 

पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला.


खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून, या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या घटनेचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

Smriti Irani : काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून स्मृती इराणींचा ताफा अडवण्याच प्रयत्न  

स्मृती इराणी बालगंधर्वमध्ये येत असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Ajit Pawar : राज्य सरकार केंद्रीय मंत्र्यांना सुरक्षा देणार : अजित पवार

आंदोलन अहिंसेच्या मार्गाने असावे, आंदोलनात मर्यादा रहावी, शारीरिक हिंसा नसावी, केंद्रीय मंत्र्यांना सुरक्षा देण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकार केंद्रीय मंत्र्यांना सुरक्षा देणार, असे मत उमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. 

Raigad : खोपोली नगरपरिषदेच्या मुख्य पाण्याच्या लाईनमधून हजारो लिटर पाणी वाया

Raigad : खोपोली नगरपरिषदेच्या मुख्य पाण्याच्या लाईनमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. खोपोलीजवळील विहारी पुलावरून जाणाऱ्या पाईपलाईनमधून पाण्याची गळती झाल्याने पाणी वाया जात आहे. 

Pune : बालगंधर्व नाट्यगृहात राडा, राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी बालगंधर्वमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले असून भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. 

Palghar News : पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं बास्केटबॉल कोर्ट

पालघर डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनने (PDBA) पालघरमध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं बास्केटबॉल कोर्ट उभारलं आहे. 14 मे रोजी एका ग्रँड फंक्शनमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते या कोर्टचं उद्घाटन करण्यात आलं. 

Sinhagad Fort : सिंहगडावरील इलेक्ट्रिक बस सेवा स्थगित

सिंहगड किल्ल्यावर 1 मे पासून सुरु करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बस सेवेला मिनी बस येईपर्यंत आणि रस्त्याचे रुंदीकरण होईपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. सिंहगडावर जाण्यासाठी 1 मे पासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु करण्यात आली होती आणि खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र, शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर गर्दी झाल्यानंतर या बसेस अपुऱ्या पडत होत्या.  या बस चार्ज करण्यासाठी फक्त दोन चार्जिंग पॉइंट असल्यामुळे रविवारी गडावर पर्यटक अडकून पडत होते. त्याचबरोबर सिंहगडाच्या सर्वात वरच्या बाजूस रस्ते अरुंद असल्याने मोठ्या बसला घाटात वळन घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घाटातील हे अरुंद रस्ते रुंद करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आल्यात. त्याचबरोबर सिंहगडावर जाण्यासाठी आता मोठ्या बस ऐवजी लहान बसचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ते रुंद होईपर्यंत आणि मिनी बस उपलब्ध होईपर्यंत सिंहगडावरील इलेक्ट्रिक बस सेवा स्थगित करण्यात येणार आहे.

Narayan Rane :  उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते : नारायण राणे

Narayan Rane :  उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते. मुख्यमंत्र्यांना जाहिराती देऊन सभा घ्यावी लागते : नारायण राणे

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 41 टक्के पाणी साठा

बदलापूर जवळील बारवी धरणात सध्या 41 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.  तीन ते साडेतीन महिने पुरेल एवढा हा पाणी साठा आहे.

Nashik News Update : अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठमध्ये अपहार झाल्याचा आरोप

Nashik News Update :  अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठमध्ये अपहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. गुरुमाऊली अण्णा साहेब मोरे यांच्यासह विश्वस्तांवर हे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत नाशिक येथील त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


गुरुपीठमध्ये 50 कोटींचा अपहार झाल्याची सेवेकऱ्यांनी तक्रार केली आहे. धर्मदायक आयुक्तांचे नियम डावलून टेंडरशिवाय कोट्यवधींची कामे केल्याचा विश्वस्तांवर आरोप करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी धर्मदायक आयुक्तांकडून याबाबतचा अहवाल मागवल्याची माहिती मिळत आहे. अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील. परंतु, स्वामी समर्थ गुरू पीठाने सर्व आरोप फेटाळले असून आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे.  

Smriti Irani : केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, आंदोलनस्थळी पोलीस दाखल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या पुण्यातील मॅरियट हॉटेल मधे आहेत. महागाईच्या मुद्द्यावरून त्यांचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून मॅरियट हॉटेल समोर घोषणाबाजी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस व्हॅन आणण्यात आल्या असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाजूला करुन स्मृती इराणी यांच्या वाहनाला वाट करून देण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गळा आणि पोटावर चाकूने वार करत केली हत्या

घाटंजी तालुक्यातील पारवा भागात राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक  कार्यकर्ता अनिल अवचेवार यांच्यावर अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने गळा आणि पोटावर चाकूने वार करत हत्या केली आहे. 

वर्धा नगर परिषदेच्या वतीने आयोजित भिंती चित्र स्पर्धेला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिसर सुशोभीकरणाच्या उद्देशाने नगर परिषदेच्या वतीने आयोजित भिंती चित्र स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे. जलप्रदूषण ,पाणीटंचाई, प्लास्टिक वापर अशा विविध विषयांवर चित्र रेखाटण्यात आले आहे. 

Smriti Irani : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखवणार काळे झेंडे  

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आहेत. दुपारी साडे वाजता पुण्यात पोहचणार त्यानंतर त्या साडे पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवानंद द्विवेदी लिखित अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थितीत  राहणार आहेत. स्मृती इराणी पुण्यातील ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत, त्या हॉटेल बाहेर साडे चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. शिवाय  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून स्मृती इराणी यांना काळे झेंडे देखील दाखवले जाणार आहेत.

Sushant Shelar : अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक

Sushant Shelar :  अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक आणि गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात सुशांत शेलार तक्रार दाखल करणार आहे. गाडीची तोडफोड का आणि कोणी केली याबद्दल काहीच माहिती नसल्याची सुशांत शेलारने  माहिती दिली आहे. घटनेची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे, 

Maharashtra News : शरद पवार आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेच्या विरोधात नंदुरबारमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल

शरद पवार आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळे  विरोधात नंदुरबारमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळे आणि अॅड नितीन भावे यांच्या विरोधात भादवि 500, 501,505 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला.  राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन जगतापांनी तक्रारी अर्ज  दिला होता

Maharashtra News Ketaki Chitale: केतकीची ती वादग्रस्त पोस्ट 2020 सालची, पोलिसांचा तपास सुरू 

केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली ती पोस्ट ही 2020 सालची असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी ही पोस्ट तितकी व्हायरल झाली नव्हती, मग आता ती रीपोस्ट करून व्हायरल करण्यामागे काही षडयंत्र आहे का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत. 

Sadabhau Khot :  सदाभाऊ खोतांविरोधात कार्यकर्ते आक्रमक

Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्याविरोधात कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केलं.



 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर, महिला काँग्रेसकडून जाहीर निषेध, स्मृती इराणींच्या विरोधात घोषणाबाजी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आले असताना महिला काँग्रेसने त्यांचा जाहीर निषेध केला 


स्मृती इराणी हॉटेल वर पोहचण्याच्या आधी  त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली


स्मृती इराणी यांनी भेटण्यासाठी आणि त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिला काँग्रेस यांनी केला


मात्र यावेळी बीजेपी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून त्याना रोखलं आणि त्यांच्यात झटापट झाली


यानंतर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला नेलेला


वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणी यांचा निषेध होत आहे

ऑर्थर रोड जेलमध्ये बंद असणाऱ्या कैद्यासोबत अनैसर्गिक संभोग केल्याचा धक्कादायक प्रकार

ऑर्थर रोड जेलमध्ये बंद असणाऱ्या कैद्यासोबत अनैसर्गिक संभोग केल्याचा धक्कादायक प्रकार.


ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..


मोहम्मद इर्शाद शेख असे 19 वर्षीय आरोपीचे नाव..


पुरुष कैद्यानेच केला दुसऱ्या कैद्यावर अनैसर्गिक संभोगाचा प्रकार..

Mumbai Fire : मुंबई सेशन कोर्टाच्या जवळील इमारतीला लागली आग 

मुंबई  सेशन कोर्टाच्या जवळील इमारतीला लागली आग 

रायगड : श्रीवर्धन कोलमांडला एसटी बसला अपघात, श्रीवर्धन हरिहरेश्वर रोडवरील साखरोने फाट्याजवळ बसला अपघात

रायगड : श्रीवर्धन कोलमांडला एसटी बसला अपघात, श्रीवर्धन हरिहरेश्वर रोडवरील साखरोने फाट्याजवळ बसला अपघात.....


एसटी बसमधील प्रवासी किरकोळ जखमी...

चहा शौकिनांना सावध करणारी बातमी! चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या गँगचा पोलिसांकडून पर्दाफाश

Palghar News : पब्जी खेळताना तरुण इमारतीवरून खाली कोसळला,पालघरमधील घटना





पब्जी खेळ पालघरमधील शिरगाव येथील एका 16 वर्षीय युवकाला चांगलच महागात पडल आहे . शादान शेख असं या युवकाचं नाव असून तो आपल्या मित्रांसोबत शिरगाव येथील एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवर पब्जी खेळत होता . मात्र तो या पब्जी खेळात इतका गुंतला की तो दुसऱ्या माळ्यावर आहे याचा त्याला विसर पडला . खेळता खेळता अचानक हा युवक दुसऱ्या माळ्यावरून खाली पडला असून यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे . जखमी शादान वर सध्या पालघर मधील रिलीफ रुग्णालयात उपचार सुरू आहेत .


 

 



 


Mumbai Traffic Updates :जेव्हीएलआर जंक्शनवरचा फ्लायओव्हर दुरूस्तीच्या कामानिमित्त बंद, मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी





Mumbai Traffic Updates : पूर्व द्रुतगती महामार्गावरील जेव्हीएलआर जंक्शनवरचा फ्लायओव्हर दुरूस्तीच्या कामानिमित्त बंद असल्यानं मुंबईहून ठाण्याकडे जाणा-या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. येत्या 24 मे पर्यंत हे काम चालणार असल्यानं तोपर्यंत हे चित्र असंच कायम राहणार आहे. कारण सरळ रेषेत परलेल्या मुंबई आणि ठाण्यात येजा करण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्ग किंवा एलबीएस रोड यांचाच मुखत्वे वापर होतो. त्यामुळे आठवडाभर प्रवाश्यांना हा त्रास सहन करावाच लागणार आहे.


 

 



 


Parbhani News : परभणीत लग्नाच्या जेवणातून विषबाधा, जिल्हा रूग्णालयात 100 हून अधिक जणांवर उपचार

परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील मेहबुब फंक्शन हॉल येथे काल रात्री एका लग्नातील जेवणातून 100 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून लग्नात जेवण केल्यानंतर अनेकांना मळमळ,उलटी,चक्कर येऊ लागल्याने त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे..

संत तुकाराम महाराज संस्थानच्या तक्रारीनुसार केतकीवर गुन्हा दाखल

केतकी चितळेच्या अडचणी काही कमी होताना दिसेनात. संत तुकाराम महाराज संस्थानच्या तक्रारीनुसार केतकीवर गुन्हा दाखल झालाय. अजामिनपत्रसह विविध कलमांचा समावेश. तसेच निखिल भामरे वर ही स्वतंत्र गुन्हा दाखल झालाय. दोन्ही गुन्हे देहू रोड पोलिसांनी नोंदवले आहेत.

Mumbai News - शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची फसवणूक करणाच्या प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अटक
शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची फसवणूक करणाच्या प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अटक

 

बनावट स्वाक्षरी करून चेकच्या माध्यमातून बँकेतून 78 लाख रुपये काढण्याचा केला होता प्रयत्न

 

बँकेच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली

 

या मध्ये पोलिसांनी सुकेतू दवे आणि जयेश शहा या दोन्ही आरोपींना काळा चौकी पोलिसांनी केली अटक

 

या मधील एक आरोपी हा अहमदाबादचा दुसरा कांदिवली येथील रहिवासी आहे

 

- या विषयी अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे

 

अजय चौधरी यांची स्वाक्षरी असलेला धनादेश मंगळवारी बँकेला मिळाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अजय चौधरी यांना संपर्क साधला

 

संपर्क साधल्यानंतर अशाप्रकारचा कुठलाही धनादेश चौधरी यांनी पाठवले नसल्याचं समोर आल्यानंतर यादे धनादेशाबाबत ची पुढची प्रक्रिया थांबविण्यात आली आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं

 
शहाळे महोत्सवात 5 हजार शहाळ्यांमध्ये 'दगडूशेठ' गणपती बाप्पा विराजमान

शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये 'दगडूशेठ' गणपती बाप्पा विराजमान


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; पुष्टिपती विनायक जयंती (गणेशजन्म) निमित्त शहाळ्यांची आरास ; ससून रुग्णालयात होणार प्रसाद वाटप


पुणे : वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. सोमवारी  वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा  व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील झाला. गाभा-यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. पहाटे पं. सुरेश तळवळकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम पार पडला.


श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला असतो. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात.


वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो.  तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

pune news : भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर मारहाण प्रकरणात पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर मारहाण प्रकरणात पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल 


भारतीय दंड संहिता1860 अन्वये कलम ५०४, ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल


अद्याप यात कोणाला ही अटक केलेली नाही


आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता


फेसबुकवर शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शनिवारी मारहाण केली होती

IPL 2022 : प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी एकमेकांशी भिडणार पंजाब-दिल्लीचा संघ

IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 64 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. प्लऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या हंगामात पंजाबच्या संघानं 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर, सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडं दिल्लीच्या संघानंही 12 सामने खेळून सहा सामने जिंकले आहेत. तर, सहा सामन्यात पराभव पत्कारला आहे.





 


Narayan Rane : आज नारायण राणे यांची पत्रकार परिषद

Narayan Rane : नारायण राणे उद्धव ठाकरेंवर काय बोलणार?  केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे  सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Maharashtra News : उद्धव ठाकरेंचा पुढचा प्लॅन काय?

बीकेसीतल्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. या सभा सर्व विभागवार घेणार असल्याची माहिती आहे. या सभा कुठे आणि कुठल्या मुद्द्यांवर होणार. या सभांचा फायदा सेनेला किती होणार? हे पाहावं लागेल.

Maharashtra News : राज ठाकरेंच्या हिंदू कार्डनंतर, देवेंद्र फडणवीसांचा ‘जागो हिंदुचा नारा

Maharashtra News : लंका का दहन होगा, सब वानरसेना मेरी साथ तयार आहे. बीएमसीवर भाजपचा झेंडा फडकणार तुम्ही तयार व्हा, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या उत्तरसभेत ते असे म्हणाले आहेत. बीकेसी येथील सभेत बाबरी मशिदीवरील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ''अयोध्याच्या आंदोलनात तुमचा (उद्धव ठाकरे यांना उद्देशून)  एकही नेता नव्हता, हे म्हंटल्यावर राग आला.'' अभिनेता गोविंदा याच्या चित्रपटातील गाण्याच्या अंदाजात उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावत ते म्हणाले, ''मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो मस्जिद गिरा रहा था, तुझ को मिर्ची लगी तो में क्या करू.'' ते म्हणाले, ''हो मी गेलो होतो बाबरी पाडायला, याचा मला अभिमान आहे. 1992 साली मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये मी अयोध्येला मशीद पाडायला गेलो होतो. तुम्ही गेले होते, सहलीला. आम्ही नाही.''  यावेळी त्यांनी जागो हिंदुचा नारा दिला आहे. 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


राज ठाकरेंच्या हिंदू कार्डनंतर, देवेंद्र फडणवीसांचा 'जागो हिंदुचा नारा'


लंका का दहन होगा, सब वानरसेना मेरी साथ तयार आहे. बीएमसीवर भाजपचा झेंडा फडकणार तुम्ही तयार व्हा, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या उत्तरसभेत ते असे म्हणाले आहेत. बीकेसी येथील सभेत बाबरी मशिदीवरील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ''अयोध्याच्या आंदोलनात तुमचा (उद्धव ठाकरे यांना उद्देशून)  एकही नेता नव्हता, हे म्हंटल्यावर राग आला.'' अभिनेता गोविंदा याच्या चित्रपटातील गाण्याच्या अंदाजात उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावत ते म्हणाले, ''मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो मस्जिद गिरा रहा था, तुझ को मिर्ची लगी तो में क्या करू.'' ते म्हणाले, ''हो मी गेलो होतो बाबरी पाडायला, याचा मला अभिमान आहे. 1992 साली मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये मी अयोध्येला मशीद पाडायला गेलो होतो. तुम्ही गेले होते, सहलीला. आम्ही नाही.''  यावेळी त्यांनी जागो हिंदुचा नारा दिला आहे. 


उद्धव ठाकरेंचा पुढचा प्लॅन काय? 


बीकेसीतल्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. या सभा सर्व विभागवार घेणार असल्याची माहिती आहे. या सभा कुठे आणि कुठल्या मुद्द्यांवर होणार. या सभांचा फायदा सेनेला किती होणार? हे पाहावं लागेल.


आज नारायण राणे यांची पत्रकार परिषद  


नारायण राणे उद्धव ठाकरेंवर काय बोलणार?  केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे  सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 


प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी एकमेकांशी भिडणार पंजाब-दिल्लीचा संघ


आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 64 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. प्लऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या हंगामात पंजाबच्या संघानं 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर, सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडं दिल्लीच्या संघानंही 12 सामने खेळून सहा सामने जिंकले आहेत. तर, सहा सामन्यात पराभव पत्कारला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.