Maharashtra Breaking News 16 June 2022 : वंचित आघाडीचा उद्याचा शांती मोर्चा स्थगित - प्रकाश आंबेडकर यांची माहिती

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jun 2022 10:06 PM
वंचित आघाडीचा उद्याचा शांती मोर्चा स्थगित - प्रकाश आंबेडकर यांची माहिती

वंचित आघाडीचा उद्याचा शांती मोर्चा स्थगित - प्रकाश आंबेडकर यांची माहिती

काही मिनटाच्या पावसात कल्याण शहाड पुलालगतच्या  रस्त्यावर पुन्हा पाणी साचलं 

आठवडाभरापूर्वी कल्याण मध्ये दोन तासाच्या पावसात कल्याण पौर्णिमा टॉकीज हून शहाड स्टेशन कडे जाणारा शहाड पुला लगतचा रस्ता पाण्याखाली गेला होता  .त्यामुळे केडिएम्सीच्या नालेसफाईची पोलखोल झाली होती . आज सायंकाळच्या सुमारास आवघ्या काही मिनटाकरता पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या या काही मिनटाच्या पावसात पुन्हा  शहाड पुल परिसरात पुन्हा साचल्याचे दिसून आले .अवघ्या काही मिनिटाच्या पावसात जर ही परिस्थिती निर्माण होत असेल तर पावसाळ्यात काय होईल असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातोय

विधानपरीषद निवडणुकीसंदर्भात आज रात्री बैठक

विधानपरीषद निवडणुकासंदर्भात आज रात्री 9 वाजता सागर बंगला येथे बैठक झाली आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कोअर टिमची बैठक होणार आहे. विधानपरीषद संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोअर टिमची होणारी ही दुसरी बैठक आहे

Congress : काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसारच राज्यपालांसोबतची भेट रद्द, राजभवनाचे स्पष्टीकरण

Congress : काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, एच के पाटील आदींच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाला  16 जूनला दुपारी 4.30 वाजता राजभवन येथे भेटीची वेळ दिली होती.  परंतु आज  बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून आलेल्या नव्या विनंतीनुसारच ही भेट रद्द करण्यात आली. राज्यपाल कोश्यारी राजभवन मुंबई येथे असून शिष्टमंडळाची भेट राजभवनाकडून रद्द केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 

१८ जूननंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता 

१८ जूननंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

Dhule : तब्बल 27 वर्षानंतर मिळाला चोरीला गेलेला ऐवज

भगवान के घर देर है, अंधेर नहीं असं म्हटलं जातं. मात्र याची प्रचिती धुळे शहरातील 69 वर्षीय निळकंठ माळी यांना आली. त्यांच्या घरी सन 1995 मध्ये जबरी चोरी होवून तब्बल 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले होते. याप्रकरणी त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली होती. पोलिसांनी चोरट्यांकडून ऐवज हस्तगत करत तब्बल 27 वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशाने हे दागिने त्यांना सुपूर्द केले. तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कौतुक केले. शिवाय दागिणे परत मिळाल्याने निळकंठ माळी हे देखील भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले. या नंतर माळी यांनीही पोलिसांचे आभार मानत कौतुक केले.

Devendra Fadnavis : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं 'मिशन 45'

Devendra Fadnavis :  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 45 आहे.  लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवा, असे देखील फडणवीस या वेळी म्हणाले. 

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर

AShish Shelar :  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर दिली आहे.  शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ रिक्त. भाजपकडून या मतदारसंघात तयारीसाठी आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ मुंबईत आज काँग्रेस नेत्यांचा आक्रमक पवित्रा

Congress :  राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ मुंबईत आज काँग्रेस नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत राजभवनावर धडक दिली. काँग्रेस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजभवनाला छावणीचे स्वरुप आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.  दरम्यान आंदोलनदरम्यान पोलिसांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, अशोक चव्हाण, अतुल लोंढे, वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

ईडीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुंबईत काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात

congress : ईडीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा हा मोर्चा काढण्यात येत आहे. 

उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

Maharashtra Board Result 2022 : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वर पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करा. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. 

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्ये भेटीसाठी सागर बंगल्यावर

Ravi Rana and Navneet Rana : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला इथे भेट घेतली. तर राणा दाम्पत्य दुपारी दोन वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी बविआची मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी उमेदवारांच्या विरारला चकरा वाढल्या

Vidhan Parishad Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी उमेदवारांच्या विरारला चकरा वाढल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर हे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. आतापर्यंत काँग्रेसचे भाई जगताप, भाजपच्या मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहेत. बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील अशी तीन मते आहेत.

बांठिया आयोग ओबीसींची संख्या कमी दाखवत असल्याचा ओबीसी मंत्र्यांचा आरोप : सूत्र

OBC Reservation : ओबीसी समर्पित आयोगाच्या कामकाजावर ओबीसी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बांठिया आयोग ओबीसींची संख्या कमी दाखवत असल्याचा आरोप मंत्र्यांनी केला आहे.  ग्रामीण भागात 40 टक्के तर शहरी भागात 30 ते 35 टक्के ओबीसींची संख्या दाखवत असल्याचा आरोप मंत्र्यांचा आहे. या आकडेवारीवरुन ओबीसींच्या हक्कांवर दूरगामी परिणाम होईळ, असा दावा मंत्र्यांनी केला आहे. आडनावावरुन माहिती गोळा करत असल्याचाही आरोप ओबीसी मंत्र्यांनी केला आहे. समर्पित आयोगाच्या या भूमिकेमुळे ओबीसींची योग्य ती माहिती समोर येणार नसल्याचं ओबीसी मंत्र्यांचं म्हणणं आहे. अनेक ओबीसी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह ओबीसींचं प्रतिनिधित्व करणारे ओबीसी मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

नंदुरबारच्या कुंडलचा मालपाडामध्ये नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यू

Nandurbar News : नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडामध्ये नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तिन्ही मुलं देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावरील किराणा दुकानात जात होते. परंतु खोल खड्ड्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. निलेश दीलवर पाडवी (वय 4 वर्षे), मेहेर दिलवर पाडवी (वय 5 वर्ष) आणि पार्वती अशोक पाडवी (वय 5 वर्षे) अशी मृत मुलांची नावं आहे. काल (15 जून) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी रात्री उशिरा फिर्याद दाखल झाली.

Shivsena : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन सोहळा ऑनलाइन होणार; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय

Shivsena : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन सोहळा ऑनलाइन होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी सर्व आमदार मुंबईत असणार आहे. 

सावंतवाडीतील चराठा येथे गोवा बनावटीची 6 लाख 67 हजारांची दारु जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sindhudurg News : गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक राजरोसपणे केली जाते. कारमधून 6 लाख 67 हजार 370 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर विनापरवाना बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याने अवैध दारु वाहतूक दारांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी कार आणि गोवा बनावटीची दारु दोन्ही जप्त करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून दूध संकलन बंद ठेवण्याचे आदेश
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात दूध संकलन आजपासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय योजना दुग्ध व्यवस्थापकांनी हे आदेश दिले आहे. या आदेशाने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दूध संकलनाचा वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे आजपासून दूध संकलन बंद करण्याबाबत शासकीय योजना व्यवस्थापकांनी सर्व संघांना कळवलं आहे. रत्नागिरीत प्रतिदिन 2 लाख 55 हजार 342 लिटर दुग्धोत्पादन होतं.

 

 
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या हालचाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं

Vidhan Parishad Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या हालचाली सुरु झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. 18 तारखेला मुंबईतल्या पवईमधील रेडियन्स हॉटेलमध्ये शिवसेना आमदार उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात, सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक पलटी

Raigad News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर रायगडमध्ये अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ट्रक पलटी झाला. सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकला तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात ट्रकमधील चालक आणि क्लिनर आत अडकले. जखमींना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

लोकार्पणापूर्वीच समृद्धी महामार्गावरुन वाहनं सुसाट, अपघातानंतरही महामार्गावर वाहनांची वर्दळ

Buldhana News : समृद्धी महामार्ग हा अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे त्याच कारणही तसंच आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंत हा महामार्ग काही ठिकाणी पुलाचं काम सोडलं तर जवळपास पूर्णत्वास आलेला असताना आणि याची वाहतुकीसाठी कोणतीही तांत्रिक चाचणी झालेली नसताना मात्र या महामार्गावरुन खाजगी प्रवासी वाहने, ट्रक्स सुसाट वेगाने धावताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील मेहकर इथल्या व्यापाऱ्यांच्या कारला गंभीर अपघात होऊन एक व्यापाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. यावर समृद्धी महामार्ग प्रशासनाने या मार्गावरुन वाहतूक करु नये, असं आवाहन देखील केलं होतं. पण तरीही आज सकाळी या महामार्गावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ट्रक्स सुसाट जाताना दिसत आहेत.

उद्योजक गौतम अदानी आज बारामतीत, दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावणार

Baramati News : देशातील बहुचर्चित उद्योगपती गौतम अदानी आज बारामतीत असणार आहेत. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे आज उद्घाटन होणार आहे. त्यानंतर बारामतीतील कृषी महाविद्यालयातील अटल इन्क्युबेशन सेंटरमध्ये शरद पवार यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या फेलोशिप सर्टिफिकेटचे वाटप होणार आहे. गौतम अदानी या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विमानतळावर गौतम अदानी यांचं स्वागत करणार आहेत तर दोन्ही कार्यक्रम आटोपल्यानंतर पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी गौतम अदानींसाठी लंचचे आयोजन करण्यात आलं आहे.

गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल, हिंगोलीत पालखीचं जोरदार स्वागत
Hingoli News : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. ही पालखी आज विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आल. शेकडो वारकरी, टाळ-मृदुंगाचा गजर आणि भक्तीमय वातावरणात पालखी आज हिंगोली जिल्ह्याच्या वेशीवर दाखल झाली. भाजप आमदार तानाजी मुटकुळे त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आलं. साडे सातशे किलोमीटरचे अंतर पायी चालत ही पालखी दरवर्षी पंढरपूर पोहोचते. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणारी श्री गजानन महाराजांची पालखी गेली दोन वर्ष खंडित झाली होती. त्यानंतर यावर्षी पालखी आता हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होत पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


Federal Reserve : अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याज दरात वाढ; भारतावर काय होणार परिणाम?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. फेडरल रिझर्व्हने 0.75 टक्के वाढ केली आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही व्याज वाढ केली असल्याचे फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे. अमेरिकेतील या निर्णयाचा परिणाम भारतावरही होणार आहे. शेअर बाजारात आणखी पडझड होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 


Cervical Cancer Vaccine : सीरम इन्स्टिट्यूटकडून सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस तयार, DCGI समितीने केली शिफारस
DCGI च्या विषय तज्ज्ञ समितीने 9 ते 26 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या (Cervical Cancer Vaccine) रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या स्वदेशी विकसित क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (qHPV) लसीची शिफारस केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) द्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध प्रथम स्वदेशी लस क्वाड्रिव्हॅलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लसीवर बुधवारी विषय तज्ञ समितीने चर्चा केली.


Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील झाडांच्या फांद्या तोडणं पडलं महागात; 2 जणांविरूद्ध थेट गुन्हा दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं झाडांवर किती प्रेम आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे. झाडांवरील प्रेम अजित पवारांनी अनेकदा भाषणात बोलून देखील दाखवले आहे. अजित पवार यांचा ज्या ठिकाणी त्यांच्या संस्था आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा त्यांचा आग्रह असतो. परंतु याचाच विसर काहींना पडला आणि थेट त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर आलेल्या फांद्या तोडल्या कारणावरून 2 जणांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


रेल्वे स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रात्री बंद, दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार का?
रेल्वे स्थानकात सकाळपासून रात्री-अपरात्री अनेक दुर्घटना घडत असतात त्यामुळे रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने 26 मार्च 2009 रोजी रेल्वेला दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाने ही देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, मध्य आणि पश्चिम रेल्वेने या आदेशाचे पालन करत रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु केले होते. मात्र मुंबईत स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रात्री बंदच असतात तसेच ही केंद्रे वाईट स्थितीत असल्याचं समोर येत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.