Maharashtra Breaking News LIVE Updates : कॉंग्रेस आमदारांची मुख्यमंत्र्याकडे नाराजी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बेळगाव जिल्ह्यातील काग वाड तालुक्यातील उगार येथील साखर कारखान्यात आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. कारखान्यात ऊस गाळप सुरू असताना त्यावेळी अचानक ठिणगी पडून कन्व्हेअर बेल्टला आग लागली. कन्व्हेअर बेल्टला आग लागल्यावर ही आग आजूबाजूला पसरली. ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
Maharashtra News : भाजप विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका न घेता नरमाईची भूमिका घेत असल्याची नाराजी कॉंग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली आहे. आज विधनभवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अशोक चव्हाण आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.
Buldana News : शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात खेळायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांनी रात्री जेसीबीच्या साहाय्याने नदीत खड्डा खोदून ठेवल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय मुलांचे शव ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईक आणि गावकऱ्यांची भूमिका आहे.
नवसाला पावणारी देवी अशी श्रद्धा असणाऱ्या करंजेश्वरी देवीचा शिमगोत्सव आजपासून सुरू झाला. दुपारी 3 वाजता श्री देव सोमेशवर आणि श्री देवी करंजेश्वरीच्या चांदीच्या पालख्या ढोल ताशांच्या गजरात आज मंदिरातून निघाल्या.
गोंदिया जिल्ह्यात वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क गुटखा आणि कचरा, धूळ, सिमेंट असं सारं आढळलं आहे. गोंदिया जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान माजी अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल सेवक, सर्व सेवा संघाचे सार्वजनिक सेवक, नशाबंदी मंडळाचे माजी उपाध्यक्ष जयवंत गंगाराम मठकर यांचे काल 14 मार्च रोजी रात्री 9 वाजता निधन झाले. ज्यानंतर आज 15 मार्च रोजी त्यांना अंतिम निरोप वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे येथे देण्यात आला.
Narayan Rane : नारायण राणे आणि नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर उद्या फैसला होणार. दिंडोशी सत्र न्यायालयातील सुनावणी पूर्ण न्यायाधीश एस. यू. बघेल बुधवारी आपला निकाल जाहीर करणार आहेत. दिशा सॅलियनबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्याबद्दल मालवणी पोलीस स्थानकांत राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनी राजकिय दबावामुळे गुन्हा दाखल करत या प्रकरणात गोवल्याचा राणेंनी आरोप केला आहे
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Amravati News : अमरावतीच्या किरण नगर परिसरात एका तरुणीचा मृतदेह नाल्यात आढळला आहे. या तरुणीचे वय अंदाजे 25 ते 26 वर्ष असून ही तरुणी परिसरात घरकाम करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. अद्याप या तरुणीची पूर्ण ओळख पटलेली नसून पोलिसांनी नाल्यातून एक मोबाईल जप्त केला आहे. त्या मोबाईलवरून पोलीस ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अक्करपट्टी या गावातील प्रकल्पग्रस्त अपंग असलेल्या बापाला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी धडपड करावी लागत आहे. रेल्वे अपघातात अपंग झालेल्या येथील एका प्रकल्पग्रस्तांची आर्थिक स्थिती दयनीय असल्याने तारापुर येथील शाळेत शिकत असलेल्या आपल्या मुलीची शाळेय शुल्क भरता आले नाही. यातच बुधवार पासून परीक्षा सुरू होत असताना देखील शाळेने परीक्षा प्रवेश पत्र देण्यासाठी नकार दिला आहे.
पुण्यातल्या टीईटी परीक्षा 2019-20 प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हे 3955 पाणी दोषारोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तुकाराम सुपे , सुखदेव ढेरेसह 15
आरोपी अटकेत आहेत. मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी अजून 12 आरोपी फरार आहेत.
Maharashtra News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी केंद्रीय समितीची बैठक आहे. गोव्यात मुख्यमंत्री पदाच्या निवडीसाठी बैठक आहे. गोव्याचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित असतील
- कोकणात आज देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा, संपूर्ण कोकणासाठी आॅरेंज अलर्ट, भारतीय हवामान विभागाकडून इशारा जारी
- उत्तर कोकणातील पालघर, रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, अनेक भागातील तापमान 40 अंश सेल्सिअस पार
- मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमान40 अंश सेल्सिअसवर
मुंबई पोलिसांनी मालवणी पोलीस स्थानकात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राणे पिता पुत्रांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दिशा सॅलियन आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी दाखल गुन्हा राजकीय सूडबुद्धीनं केल्याचा राणेंचा दावा आहे.
मुंबई बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा मलिक यांचा दावा चुकीचा असल्याचं हायकोर्टाने म्हटलं. हायकोर्टाने ईडीच्या कारवाईविरोधातील मलिक यांची याचिका फेटाळली. केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई कायद्याला अनुसरुनच असल्याचं हायकोर्टाने नमूद केलं. दरम्यान नवाब मलिक यांच्यासमोर रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
Coronavirus : कोरोनाच्या नव्या रुपाने जगाचं टेन्शन वाढवलंय. डेल्टा आणि ओमायक्रानचा मिळून डेल्टाक्रॉन हा नवा व्हेरियंट समोर आल्याचं सांगत WHOनं इशारा दिलाय. डेन्मार्क, फ्रान्स, नेदरलँड, ब्रिटनमध्ये या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झालीय. अमेरिकेतही या नवीन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती समोर येतेय.
मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका देशाला बसताना दिसतोय. सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. जानेवारीमध्ये हा दर 6.01 टक्के होता, त्यात वाढ झाली असून, किरकोळ महागाई दर 6.07 टक्के झाला आहे.
बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे दोघेजण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
पुण्यातील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाडच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. गणेश हा टोळीचा प्रमुख असून वडील नानासाहेब शंकर गायकवाडसह सहा जणांचा टोळीत सहभाग आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, अपहरण करुन मारहाण, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, खंडणीसाठी मारहाण, दरोडा घालणे असे एकूण 14 गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दाखल आहेत.
जलयुक्त शिवार घोटाळ्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह दोन कर्मचार्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांपैकी शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे दोघेजण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत. तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णी इथल्या रहिवाशी उषाबाई दत्तराव सवंडकर यांनी वयाच्या 42 व्या वर्षी तिळ्यांना बाळांना जन्म दिला. यामध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. उषाबाई दत्तराव सवंडकर यांचं लग्न 2003 साली लग्न झालं. त्यानंतर 19 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वयाच्या 42 व्या वर्षी उषाबाई यांनी हिंगोली शहरातील एका खासगी रुग्णालयात तिळ्यांना जन्म दिला. प्रसुतीनंतर बाळांची आणि आईची तब्येत स्थिर आहे.
दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट देण्यासाठी बहि:स्थ विद्यार्थ्याकडे 30 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. या 30 हजारांपैकी 10 हजार रुपये घेताना पकडलं. कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिक्षण संस्थाचालक 64 वर्षीय एस पी जवळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. शाळेतील महिला लिपिक सविता खामगावकर या देखील या लाचखोरीत सहभागी असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एस पी जवळकर यांच्या शहरात शिक्षण संस्था आहेत. त्यांच्या शाळेतून एका 24 वर्षीय व्यक्तीने दहावीच्या परीक्षेसाठी पी डी जवळकर शाळेतून 16 नंबरचा फॉर्म भरला होता. या परीक्षेचे हॉलतिकीट देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली होती.
Hijab Row : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच राज्यात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आज सकाळी हिजाबच्या मुद्द्याबाबत निकाल देणार आहे.
न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवले होते. उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता. त्यानंतर विरोध सुरु केला होता. हा विरोध इतर जिल्ह्यांमध्ये पसरला आणि मोठा वाद निर्माण झाला. काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून येऊ लागल्याने तणाव निर्माण झाला होता.
- 15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
- 16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
- 19 मार्च : इंग्रजी
- 21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
- 22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
- 24 मार्च : गणित भाग - 1
- 26 मार्च : गणित भाग 2
- 28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
- 30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
- 1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
- 4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2
Maharashtra SSC Exams 2022 : राज्यात आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Board) सुरू होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटं तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम (Samruddhi Mahamarg) अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली आहे. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं पहिल्या टप्यातील नागपूर शिर्डी महामार्ग सुरू होऊ शकणार नसल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. त्यामुळे आता सरकार काय अजून डेडलाईन देणार का? वारंवार तारखा देऊनही का सुरू होऊ शकत नाही समृद्धी महामार्ग?
नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान पृष्ठभागाची रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी हा महामार्ग पूर्ण सुरू होण्याची प्रस्तावित तारीख ही ऑक्टोबर 2021 अशी ठरविण्यात आली होती. पण मध्यंतरी जमीन अधिग्रहण, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा अनेक अडचणींना सामोरं जात सरकारनं हा महामार्ग जवळपास पूर्णत्वाला नेला आहे. मात्र समृद्धी महामार्ग सुरू करण्यासंबंधी सरकारनं अनेकदा तारीख घोषित केली, गेल्या वर्षी 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी कामं अपूर्ण असल्यानं 31 मार्च 2022 पर्यंत नागपूर शिर्डी हा पहिला टप्पा सुरू करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम हे नागपूर जिल्ह्यातील पेकेज 1 चं काम उशिरा सुरू झाल्यानं तर, बुलढाणा जिल्ह्यातील पेकेज 7 मध्ये खडकपूर्णा नदीवरील पुलाचं काम अपूर्ण असल्यानं आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पेकेज 9 मधील काही ठिकाणी घाट सेक्शनचं काम अपूर्ण असल्यानं अजूनही 31 मार्चपर्यंत हा महामार्ग सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे वारंवार सरकारकडून तारखा जाहीर झाल्यावरही समृद्धी महमार्ग का सुरू होऊ शकत नाही? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. याबाबत मात्र अधिकारी सरकार स्तरावरून यासंबंधी तारीख जाहीर होईल, असं सांगत असले तरी मात्र महामार्गाचं अजूनही राहिलेलं काम बघता नागपूर-शिर्डी या टप्प्याला पुढील तीन महिने सुरू करण्यास लागतील असं चित्र आहे.
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 31 मार्च 2022 पर्यंत नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्यातील मार्ग सुरू न होऊ शकण्याची काय कारणं?
- महामार्गाच्या सुरुवातीलाच नागपूर शहराजवळील पेकेज 1 चं काम सुरुवातीलाच उशिरा सुरू झालंय
- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काम बंद पडलं होत
- बुलढाणा जिल्ह्यातील पॅकेज 7 मधील खडकपूर्णा नदीवरील पूलाचं काम अजूनही अपूर्णच
- औरंगाबाद जिल्ह्यातील पेकेज 9 मधील काही ठिकाणी घाट सेक्शनमधील काम अपूर्ण
Maharashtra SSC Exams 2022 : राज्यात आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Board) सुरू होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटं तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education) वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल 2022 दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहावी परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर दहावी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. आज पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -