Maharashtra Breaking News LIVE Updates : संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या सावंत कणकवली न्यायालयात शरण

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 14 Feb 2022 07:14 AM
आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना, भाजप, काँगेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
कुडाळ नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान नगरपंचायत कार्यालय जवळ शिवसेना, काँग्रेस तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमवून, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह सेना, भाजप, काँग्रेस च्या ४० ते ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  


 

Akola News Update : आकोल्यात घराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू 

Akola News Update : अकोला शहरातील सराफा गल्लीतील एका घराला आग लागली. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने सहकारी बॅंक, पतपेढी बाबत घेतलेले निर्णय चिंताजनक - शरद पवार

रिझर्व्ह बॅंक चे सहकारी संस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन चत्मकारीक झाला आहे. गेल्या काही दिवसात त्यांचे सहकार क्षेत्राला सहकार्य मिळत नाही. रिझर्व्ह बॅंकेने सहकार बाबत घेतलेले  निर्णय चिंताजनक आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी बॅंका, पतपेढ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आपण स्वता लक्ष घालणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शिवकृपा पतपेढीकडून उभारण्यात आलेल्या ऐरोली येथील इमारतीचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. देशातील राज्यापैकी महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये  सहकार चळवळ चांगली रूजू झाली आहे.  यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील सहकार चळवळीला वेगळा आयाम दिला होता.
सातारा जिल्हा बॅंक ही देशात एक नंबरची बॅंक म्हणून ओळखली जात होती असे शरद पवार म्हणाले.

Mumbai News Update : घाटकोपर येथील कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा विसर

Mumbai News Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते घाटकोपर येथील मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. परंतु, या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.   

Nanded News : नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत दोन ठिकाणी काँग्रेसची सत्ता तर एका ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींपैकी नायगांव आणि अर्धापुरमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्धापुरमध्ये छत्रपती कानोडे यांची नगराध्यक्षपदी तर यास्मिन सुलताना यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर नायगांवमध्ये नगराध्यक्ष पदी गीता जाधव आणि उपनगराध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड झाली आहे. तर माहुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आली असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फेरोज दोसानी तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या नाना लाड यांचा विजय झाला आहे.

नांदेड : नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत दोन ठिकाणी काँग्रेसची सत्ता तर एका ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता

नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींपैकी नायगांव आणि अर्धापुरमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदांची बिनविरोध निवड झालीय. अर्धापुर मध्ये छत्रपती कानोडे यांची नगराध्यक्षपदी तर यास्मिन सुलताना यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. तर नायगांवमध्ये नगराध्यक्ष पदी गीता जाधव आणि उपनगराध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड झालीय. तर माहुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आली असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे फेरोज दोसानी तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या नाना लाड यांचा विजय झालाय. माहूर मध्ये राष्ट्रवादी सेना एकत्र आल्याने काँग्रेसला मोठा झटका बसलाय.

मॅच तो होने दो, अभी तो टॉस हुआ है.. - आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

 मॅच तो होने दो, अभी तो टॉस हुआ है.. राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्या शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदे संदर्भात अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Nagarpanchayat Elections : सिंधुदुर्गात 4 नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धक्का, 2 नगरपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Nagarpanchayat Elections : सिंधुदुर्गात चार नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. चार पैकी दोन नगरपंचायत भाजपकडून महाविकास आघाडीने खेचून घेतल्या. प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष निवडीत काँग्रेसच्या आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाठ यांची निवड झाले आहे. दोडामार्ग नगरपंचायत मध्ये एकहाती भाजपचे वर्चस्व निर्माण झाले असून चेतन चव्हाण नगराध्यक्ष तर भाजपचेच देवीदास गवस नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. देवगड नगरपंचायत मध्ये शिवसेनेच्या साक्षी प्रभू नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या  मिताली सावंत उपनगराध्यक्षपदी विराजमान. तर वैभववाडी मध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी भाजपचेच संजय सावंत यांची निवड झालीय.

संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या सावंत कणकवली न्यायालयात शरण

शिवसैनिक संतोष परब प्रकरणात संशयित आरोपी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज कणकवली न्यायालयात हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वकील राजेंद्र रावराणे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत उपस्थित आहेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर गोट्या सावंत यांना न्यायालयीन कोठडी की पोलीस कोठडी? याबाबत कणकवली न्यायालय कोणता निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या सावंत कणकवली न्यायालयात शरण

शिवसैनिक संतोष परब प्रकरणात संशयित आरोपी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज कणकवली न्यायालयात हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वकील राजेंद्र रावराणे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत उपस्थित आहेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर गोट्या सावंत यांना न्यायालयीन कोठडी की पोलीस कोठडी? याबाबत कणकवली न्यायालय कोणता निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात आज कडकडीत बंद 

देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात आज कडकडीत बंद पाळण्यात येत आगे गोरख बच्छावच्या हत्येच्या निषधार्थ गावकऱ्यांनी पाळला बंद गावात चोख पोलिस बंदोबस्त तैनात झाला आहे. प्रेमप्रकरणातून गोरखला प्रेयसीने तिच्या कुटुंबासह मारहाण करत जिवंत जाळले होतेउपचारादरम्यान गोरखचा मृत्यू झाला होता.

Belgaum News : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयावर दगडफेक, खिडक्यांची मोडतोड

Belgaum News : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयावर दगडफेक करून आणि लाकडी टोण्याने मोडतोड केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. मध्यरात्री झालेल्या दगडफेक आणि काचा फुटल्याच्या आवाजानं आजूबाजूच्या नागरिकांना जाग आली. त्यांनी बाहेर येवून पाहिले असता आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक करून मोडतोड केल्याचे समजले. दगडफेक करून मोडतोड करणारी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांना ही घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. आमदार बेनके यांचे कार्यालय चवाट गल्लीत असून हा परिसर संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पोलिसांनी बेनके यांच्या कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आमदारांनी अद्याप या प्रकरणी पोलिसात तक्रार केली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

Ahmednagar : अहमदनगरमध्ये रंगला पॅराग्लायडिंग महोत्सव

Ahmednagar News : नगर पॅराग्लायडिंग फ्लायर्स आणि आर्मी पायलट्स यांच्या संयुक्तविद्यमाने शहराजवळील मिरावली पहाड येथे पॅराग्लायडिंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पॅराग्लायडिंग फ्लायर्स आणि आर्मी पायलट्स यांच्यात सराव तसेच मैत्रीपूर्ण स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेचं परीक्षण निवृत्त कर्नल एस. आर. निकम केलं. पॅराग्लायडिंग महोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण व्हावी आणि अहमदनगर जिल्ह्याला पॅराग्लायडिंगच्या दृष्टीने खेळाचे ठिकाण बनवून नकाशावर आणावे जेणे करून पॅराग्लायडिंग करणार्‍या स्थानिक युवकांना रोजगार मिळेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल हा यामागचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितले. दरम्यान अहमदनगर शहरातील लहानग्यांपासून जेष्ठांनी पॅराग्लायडिंग पाहण्याचा आनंद लुटला.

Beed News : चालत्या कारने घेतला पेट, केजजवळील थरार

Beed News : धूर निघताच कारमधील पाच जण खाली उतरले आणि गाडीने पेट घेतला. क्षणार्धात गाडीचा अक्षरशहा कोळसा झाला. लातूरहून केजला निघालेल्या कारने केज जवळ कुंबेफळ आल्यानंतर अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


लातूर येथील गणेश महापुरकर आणि त्यांचे अन्य चार सहकारी हे सकाळी केजकडे निघाले होते. दरम्यान सकाळी कुंबेफळ जवळ आली असता कारच्या समोरील भागातून धूर निघत असल्याचे महापुरकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ गाडी बाजूला घेऊन सर्वजण खाली उतरले. मात्र कांही मिनिटात गाडीने पेट घेतल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.
Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 1 हजार अंकांनी खाली

प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स 1 हजार 432अंकांनी गडगडला

Kudal Nagarpanchayat Election : तळकोकणात नारायण राणेंना शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र, कुडाळ नगरपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी सज्ज

Kudal Nagarpanchayat Election : तळकोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येत प्रतिष्ठेची असलेली कुडाळ नगरपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी तयार असून राणेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेसला शिवसेनेने नगराध्यक्षपद देत कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीकडे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेना काँगेस अंतर्गत मतप्रवाह राणेंच्या पथ्यावर पडणार का पहावं लागेल. कारण भाजप कुडाळ नगरपंचायत आपल्या ताब्यात येणार असा दावा करत आहे. तर दोडामार्गात भाजपमध्ये दोन गट पडल्याने भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी 2 भाजप तर दोन महाविकास आघाडीकडे आहेत.

5G Internet : येत्या मे महिन्यात 5जी लिलावाची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता, मार्चपर्यंत लिलाव प्रक्रियेसंबंधीच्या नियमांबाबत शिफारशी दिल्यास मे उजाडणार

येत्या मे महिन्यात 5जी लिलावाची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता, मार्चपर्यंत लिलाव प्रक्रियेसंबंधीच्या नियमांबाबत शिफारशी दिल्यास मे उजाडणार


लिलाव प्रक्रियेसंदर्भातल्या नियमांबाबतच्या शिफारशी दिल्यानंतर निवेदा निघतील आणि यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार


5जी संदर्भात ट्रायकडून विविध घटकांसोबत बैठक,  एका आठवड्याआधी ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बैठक संपन्न 


बैठकीत 5जी लिलाव, स्पेक्ट्रम आणि आधारभूत किंमतींवर चर्चा, आधारभूत किंमती कमी करण्याची टेलिकाॅम कंपन्यांची मागणी 


मोठ्या आधारभूत किंमतींचा ग्राहकांना देखील फटका बसण्याची शक्यता, ५जी सेवा महाग राहणार, आधारभूत किंमत कमी केल्यास ग्राहकांसोबतच सरकारला देखील फायदा होणार, दीर्घकाळाचा विचार व्हावा असं टेलिकाॅम कंपन्यांचं मत


4जी सेवेच्या तुलनेत 5जीचा वेग 8 ते 10 पटीनं अधिक असणार


चालू वर्षात 5जी सेवा नागरिकांना उपलब्ध होणार, ट्रायची माहिती

Dhule News : कोरोना बनावट लसीकरण प्रकरणी राष्ट्रवादीचा नगरसेवक वसीम बारीला अटक

Dhule News : कोरोना बनावट लसीकरण प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक वसीम बारी याला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता आहे. बनावट लसीकरण प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांना अटक केली असून अजून काही जण रडारवर आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचा नगरसेवक वसीम बारी याला अटक करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. नगरसेवक वसीम बारी यांच्या चौकशीतून या प्रकरणाची अजून सत्य माहिती समोर येणार आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहा फक्त एबीपी माझा लाईव्ह

ISRO C-52 : इस्रोकडून PSLV-C52 चे प्रक्षेपण

ISRO PSLV C-52 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) या वर्षीच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने (PSLV)-C52 चे प्रक्षेपण केले. या उपग्रहासह इतर दोन लहान उपग्रहदेखील होते. सकाळी 5.59 वाजता पीएसएलव्हीचे प्रक्षेपण करण्यात आले. 


इस्रोने सांगितले की पीएसएलव्ही C52 ची रचना 1,710 किलो EOS-04 उपग्रह 529 किमीच्या सूर्य समकालिक ध्रुवीय कक्षेत ठेवण्यासाठी केली आहे.  PSLV C52 मिशनमध्ये आणखी दोन छोटे उपग्रह स्थापित केले आहेत. EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Elections 2022 : गोवा, उत्तराखंडमध्ये आज मतदान, तर, उत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी ५८६ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये होणार बंद

Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्य दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 55 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 


दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे. ते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Nashik Crime : प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील 'त्या' तरुणाची मृत्यूची झुंज संपली

Nashik Breaking : प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या नाशिकमधील देवळा तालुक्यातील लोहणेरच्या तरूणाचा अखेर मृत्यू झाला आहे. गोरख बच्छाव असं या तरुणाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीनेच आपल्या कुटुंबियाच्या मदतीनं तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवलं होतं. या घटनेत संबंधित तरूण 55 टक्के भाजला होता.


गोरखवर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाने गोरखला मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या गोरखला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 


या प्रकरणात पोलिसांनी मुलीसह आई वडील आणि दोन भाऊ यांना अटक केली आहे.  देवळा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केलं आहे. 


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

पार्श्वभूमी

Elections 2022 : यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांसाठी मतदान, तर गोवा आणि उत्तराखंडमध्येही आज होणार मतदान  


Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर उत्तर प्रदेशबरोबरच गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्य दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 55 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 


दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे. ते भाजप सोडून सपामध्ये गेले आहेत.


प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळलं! नाशिकमधील 'त्या' तरुणाची मृत्यूची झुंज संपली; मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल


Nashik Breaking : प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या नाशिकमधील देवळा तालुक्यातील लोहणेरच्या तरूणाचा अखेर मृत्यू झाला आहे. गोरख बच्छाव असं या तरुणाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीनेच आपल्या कुटुंबियाच्या मदतीनं तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवलं होतं. या घटनेत संबंधित तरूण 55 टक्के भाजला होता.


गोरखवर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाने गोरखला मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या गोरखला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 


या प्रकरणात पोलिसांनी मुलीसह आई वडील आणि दोन भाऊ यांना अटक केली आहे.  देवळा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केलं आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाची तीन वर्षांपूर्वी एका मुलीशी ओळख झाली होती. दरम्यान, त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांच्या लग्नास दोघांच्या नातेवाईकांनी विरोध दर्शवला. यातून वाद सुरु झाला. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचे दुसऱ्यासोबत लग्नही ठरले होते. मात्र त्यास गोरख हा अडथळा आणत होता अशी प्राथमिक माहिती आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.