Walmik Karad Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad), सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) आणि प्रतीक घुले (Pratik Ghule) यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. 


केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं बोललं जात आहे. 


जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?


वाल्मिक कराडचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धनंजय मुंडेंवर (Dhnanjay Munde) निशाणा साधला आहे. वाल्मिक कराडचं खरा गुन्हेगार आहे. पोलिसांसोबत हातमिळवणी करुन खंडणी वसुली या सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाली आहे. तसेच ती खंडणी नव्हती, तो इलेक्शन फंडसाठी मागितलेला पैसा होता, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 


वाल्मिक कराड छोटा आका- जितेंद्र आव्हाड


वाल्मिक कराड छोटा आका आहे. धनंजय मुंडेंनी उघडपणे वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे, असं सांगितलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या...अजून किती पुरावे द्यायचे?, धनंजय मुंडे यांनी उघडपणे वाल्मिक कराड निलंबित राजेश पाटीलला अजून अटक का नाही?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस कोणाता मुहुर्त शोधतायत? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 


सुषमा अंधारे काय म्हणाल्या?


सदर माहिती अतिशय धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. हे सर्व पुरावे असतील तर निश्चितपणे आरोपी कोणीही असो, त्याची गय केली जाणार आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय दिला जावा...पुरावा नाही..पुरावा नाही, असं म्हटलं जात होतं. आता पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे या पुराव्यासोबत छेडछाड केली जाऊ नये,  याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. तसेच आवादा कंपनीमध्ये वाद होतो. यावेळी गावातील अनेक लोक देखील त्याठिकाणी असतात. मग त्यावेळी हे लोक देखील त्यावेळी उपस्थित होती, असं गावातील लोक आतापर्यंत बोलली का नाही?, लोकांवर कोणाचा दबाव होता?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.  




संबंधित बातमी:


Walmik Karad: वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले