Maharashtra Breaking News 13 June 2022 : राज्यसभेनंतर विधानपरिषेदची रंगत वाढणार, विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा सावध पवित्रा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्यात आणलं पाहिजे. कोल्हापूर शहर जिल्हा हे फक्त त्यांच कार्यक्षेत्र नाही तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांना काम करावं लागणार आहे. आवाडे आणि कोरे यांच्यावर प्रचंड दबाव होता तरीही ते आमच्या सोबत राहिले . महाडिक म्हणून असलेली ताकद, कोरे, आवाडे आणि भाजप असे एकत्र येऊन सर्व निवडणुका लढवू आणि जिंकू. या पूर्वी आम्ही घाबरलो नव्हतो. परंतु, या पुढे कार्यकर्त्यांना त्रास दिला तर सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.
VidhanParishad Election : राज्यसभेनंतर विधानपरिषेदची रंगत वाढणार आहे. अयोध्या दौ-यावर सेनेचे आमदार जाणार नाहीत. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फक्त अयोध्या दौ-यावर जाणार आहेत. 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौ-यावर आणि 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार आहे.
Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन अर्जाला सीबीआयने विरोध केला आहे. तपासयंत्रणेनं दाखल केलेलं आरोपपत्र अपूर्ण असल्याचा दावा अयोग्य आहे. मुंबई सत्र न्यायालयात उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
बुलढाणाः राज्यभरातील 216 नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात आले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 13 पैकी 11 परिषदांच्या प्रभाग नुसार सदस्यपदाचे आरक्षण काढण्यात आले. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषदांच्या प्रभाग द्वी सदस्यीय पद्धतीनुसार निवडणूक होणार आहे. यासाठी आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली. जिल्ह्यात 11 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायती आहेत. यापैकी नगर पंचायतीच्या निवडणुका आताच झाल्याने येत्या काळात फक्त 11 नगर पालिकांच्या निवडणूक होणार आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात आली.
आपल्या देशात कायदा आणि संविधान सर्वांसाठी एकसमान आहे. राहुल गांधींना ईडीची नोटीस आली तर त्यांनी जाऊन उत्तर दिले पाहिजे. कुठलीही यंत्रणा सबळ पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही, असे मत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. आपल्याला जर नोटीस आली तर आपणही सामान्य माणसाप्रमाणे तिथं जाऊन उत्तर देऊ, त्यात कुणालाही हरकत नसावी आणि त्यासाठी आंदोलन करणेही योग्य नाही. असा टोलाही खासदार राणा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला लगावला.
Vidhan Parishad News Update : राष्ट्रवादीचे डमी उमेदवार शिवाजीराव गर्जे यांचाही उमेदवारी अर्ज मागे
Vidhan Parishad News Update : सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, भाजपकडून आता 5 उमेदवार विधानपरिषदेच्या रिंगणात
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी चर्चाही केली. "पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,"अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत चर्चा झाली. अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.
मंदिर समितीच्यावतीने श्री. औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मुर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कारही केला.
राज्यसभेवर संजय राऊत यांची निवड रद्द करण्यात यावी, भाजप नेते किरीट सोमय्या यांची दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी
संजय राऊत यांनी मतदानाबद्दल केलेल्या जाहीर वक्तव्यातून त्यांनी भ्रष्ट पद्धतीने मत मिळवल्याचं सिद्ध होतं, किरीट सोमय्या यांचा दावा
Vidhan Parishad News Update : काॅंग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची 18 मिनिटे बाकी
Ashadhi Wari 2022 : यंदा दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्याला प्रथमच तुळशी वृंदावनामधील 8 प्रकारच्या तुळशीचा हार विठुरायाच्या गळ्यात घालण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.
फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून वनविभागानं 8 कोटी रुपये खर्चून वारकरी भाविकांसाठी अफलातून तुळशी वृंदावन साकारले होते. येथे वारकरी संतांच्या मूर्ती आणि त्याचा इतिहास रेखाटला असून देशात आढळणाऱ्या तुळशीच्या सर्व प्रकारची झाडं जोपासण्याचा प्रयत्न वन विभागानं केला आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांचं हे आकर्षणाचं केंद्र असून दरवर्षी हजारो भाविक येथे भेट देत असतात.
बी बाग वन विभागानं मंदिर समितीला हस्तांतरित करावी अशी मागणी समितीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती . यावेळी आषाढी महापूजेसाठी आल्यावर पुन्हा एकदा ही मागणी केली जाणार असून आदित्य ठाकरे हे तुळशी वृंदावन लाखो भाविकांसाठी मंदिर समितीस देतील असा विश्वास औसेकर यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची राऊतांच्या विरोधात पवारांकडे तक्रार, राष्ट्रवादीच्या अपक्ष आमदारांवर अविश्वास व्यक्त केल्यानं नाराजी , सकाळी सिल्व्हर ओकच्या बैठकीत राऊतांच्या विरोधात व्यक्त केली नाराजी , राऊतांमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली भावना
Palghar News : ज्या दाभोलकरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी उभे आयुष्य दिलं त्यांना आपण न्याय कधी देणार असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे पालघरमधील आयोजित महिला संमेलनाला आल्या असता बोलत होत्या. आजही समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. सर्व पुरुष सारखे असतात असं मी म्हणत नाही पण 10 ते 15 टक्के पुरुषांची मानसिकता आहे आजही बदलण्याची गरज असल्याचं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा असू नये असं त्यांनी सांगितलं. पालघरमधील वाडा येथे लग्नसमारंभात एका महिलेला चेटकीण म्हणून दिलेल्या वागणुकीची बातमी पाहून दुःख झालं आणि संताप ही आला असं सांगत पुरोगामी महाराष्ट्रात हे न शोभणार असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
Rajya Sabha Election 2022 : शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मतदान रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिलं आव्हान
"निवडणूक आयोगाने माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला आहे तो मला मान्य नाही" : सुहास कांदे
माझी बाजू एकुन घेतली पाहिजे होती, माझी प्रतिमा मलिन झाली आहे
या याचिकेवर 15 जून रोजी हायकोर्टात सुनावणी
शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मतदान रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिलं आव्हान
"निवडणूक आयोगाने माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला आहे तो मला मान्य नाही" - कांदे
माझी बाजू एकुन घेतली पाहिजे होती, माझी प्रतिमा मलिन झाली आहे
या याचिकेवर 15 जून रोजी हायकोर्टात सुनावणी
Maharashtra News : एनसीपी बैठकीत शरद पवार यांची नाराजी.
पवार यांनी महाविकास आघाडी मत फुटल्यावरून नाराजी व्यक्त केली.
राज्यातील एनसीपी नेत्यावर नाराजी व्यक्त करत विधान परिषद आणि राष्ट्रपती निवडणूक काळजी घ्या, अशा सूचना शरद पवार यांनी केल्यात.
Konkan Refinery : कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत आता दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी आणि मागण्या पुढे येत आहेत. आज (सोमवारी) दुपारी चार वाजता प्रकल्पाच्या सर्व्हेला झालेला विरोध पाहता जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसी अधिकारी, गावचे सरपंच, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य यांच्यात चर्चा होणार आहे. पण, त्यानंतर आता नाणारचा प्रकल्प (Nanar Project) रद्द झालेला असला तरी नाणार, पाळेकरवाडी आणि दत्तवाडी ही तीन गावं वगळून आसपासच्या गावांमध्ये अर्थात राजापूर तालुक्यातील विल्ये दशक्रोशीत रिफायनरी प्रकल्पासाठी तब्बल आठ ते साडेआठ हजार एकर जागेची संमती आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन मालक देखील जागा देण्यास तयार आहेत.
प्रवीण दरेकर हे काल बीड जिल्हा दौऱ्यावर होते, दरेकर यांनी माजी आमदार विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान कार्यक्रम आटपून जात असताना, बार्शी रोडवरील शिवाजी धांडे नगरच्या समोर काही मुंडे समर्थकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 12 मुंडे समर्थकावर गैर कायद्याची मंडळी जमवून प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवल्याच्या आरोपावरून कलम 341, 143, 110, 117, 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News : पुण्यातील हडपसर परिसरात मैदानावर क्रिकेट खेळत असताना दम लागल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली. श्रीतेज सचिन घुले (22) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील एका मैदानावर ही घटना घडली.रविवारी श्रीतेज हा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यानंतर क्रिकेट खेळत असताना अचानक दम लागल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान श्रीतेजच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळतात परिसरात शोककळा पसरली. श्रीतेजला मोठा मित्र परिवार होता. त्याचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते.
गड किल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या विविध संघटनाच्या बळावर किल्ले नव रूप धारण करू पाहतायत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत. किल्ले आपलं नव रूप धारण करू पाहतायत, गडदुर्ग संवर्धन ही जर लोकचळवळ झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट पुन्हा त्या वैभवात निश्चित उभे राहतील, असं शिववाख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितलं.
कल्याणजवळ असलेल्या मोहने येथे राजा शिवबा प्रतिष्ठान यांच्या वतीनं तिथीनुसार, शिवराज्यभिषेक दीन साजरा करण्यात आला. शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत आज राजा शिवबा प्रतिष्ठान यांच्या वतीनं शिववाख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बानगुडे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी शेकडो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी बानगुडे पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शिवचरीत्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमांचक किस्से उलगडून सांगितले, रायगडावर रंगलेला शिवराज्यभिषेक सांगितला.
Vat Purnima 2022 : मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आणि सावली देणाऱ्या वडाच्या झाडांचे वाटप वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं. करोना काळात मोठ्या प्रमाणावर भेडसावलेली ऑक्सिजनचे कमतरता लक्षात घेता ऑक्सिजनचे महत्त्व पटू लागले आहे. निसर्गात असलेले वडाचे झाड मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजन पुरवठा करत असल्याने या वृक्षाला ऑक्सीजन वृक्ष म्हणूनही ओळखले जाते. मात्र काँक्रिटच्या जंगलात वडाची झाडे नामशेष होत आहेत. यामुळेच कल्याणातील शिव आदेश प्रतिष्ठानने वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षांच्या लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. स्वखर्चाने शंभर वडाच्या रोपांची खरेदी करत ही रोपे बारावे गोदरेज हिल परिसरातील सोसायट्यांना त्यांच्याकडून वाटण्यात आली सोसायटी मधील महिला भगिनींनी या वृक्षांचे रोपण करत वटपौर्णिमेचा सण या वृक्षाची पूजा करून साजरा करणार असल्याचे आश्वासन दिले. यामुळे वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडांची होणारी तोडमोड मोठ्या प्रमाणावर रोखता येणार असून निसर्गाचे संरक्षण करण्यास हातभार लागणार आहे.
बुलढाणाः समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच आता समृद्धी महामार्गावरून वाहतूक सुरू असल्याने अपघात होण्यास सुरुवात झाली आहे. काल मेहकर येथील काही व्यावसायिक औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाने मेहकर कडे येताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तांदुळवाडी शिवारात भरधाव कारवरील चालकाच नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील डिव्हाईडर च्या खड्ड्यात पलटून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार ने तीन ते चार वेळा पलटी घेऊन खड्डयात अडकली. या अपघातात मेहकर येथील व्यावसायिक बळीराम खोकले हे जागीच ठार झाले. तर, इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा चुराडा झाला असून समृद्धी महामार्गाचे काम अजूनही सुरू असून यावरून वाहतूक सुरू कशी...? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषदेसाठी भाजप आक्रमक
विधान परिषदेसाठी सहावी जागा लढवण्याचाही भाजपचा एक मतप्रवाह
विधान परिषदेबद्दल आज दुपारी साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बैठक
सहाव्या जागेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत मैदानात आहेत
विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
भाजप नेते प्रसाद लाड आज दुपारी बाराच्या सुमारास राज ठाकरे यांची भेट घेणार
विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रसाद लाड रिंगणात आहेत
राज्यसभेसाठी मनसेने भाजपला मदत केली होती आता विधान परिषदेसाठी भेटीगाठींचं सत्र सुरू
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले मात्र महाविकास आघाडीच्या संजय पवार यांचा पराभव झाला... याच पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी आज राष्ट्रवादीची बैठक होणार आहे.. शरद पवार यांच्या सिल्वर ओक यां निवासस्थानी हे मंथन होईल... या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर पोहोचण्यास सुरुवात झालीय. येत्या २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे.. त्यावेळी राज्यसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय करता येईल यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे...
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला अजित पवार, सुनिल तटकरे, जयंत पाटील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला रवाना होणार आहे. सकाळी 10 वाजता निवृत्ती नाथांच्या समाधी मंदिरापासून पालखीने मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. त्रंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन गाव प्रदिक्षणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात होणार आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आलेल्या ईडीच्या समन्स विरोधात कॉग्रेस आज ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर महत्वाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. कोरोनामुळे सोनिया गांधी ईडी समोर हजर राहु शकणार नाही. राहुल गांधी आज हजर रहाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाताना मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
राहुल गांधी आज ईडी समोर हजर राहणार
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. कोरोनामुळे सोनिया गांधी ईडी समोर हजर राहु शकणार नाही. राहुल गांधी आज हजर रहाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाताना मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचा ईडीवर हल्लाबोल
सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आलेल्या ईडीच्या समन्स विरोधात कॉग्रेस आज ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. या मोर्चात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर महत्वाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला रवाना
निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला रवाना होणार आहे. सकाळी 10 वाजता निवृत्ती नाथांच्या समाधी मंदिरापासून पालखीने मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. त्रंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन गाव प्रदिक्षणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात होणार आहे.
1969 : विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.
1967 : विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन.
विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर हे प्रसिद्ध शिल्पकार होते. मुंबईच्या ‘सर जे. जी. कला विद्यालय’ येथे ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने करमरकरांना 1962 साली ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन गौरवले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -