Maharashtra Breaking News 12 September 2022 : पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक 13 आणि 14 सप्टेंबर या दोन दिवशी बंद राहणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Sep 2022 08:49 PM
वैभववाडीत विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे मेहबूबनगर मध्ये विजेचा धक्का लागून 15 वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. शाहीदरजा फरास हा आपल्या मामाच्या घरी आला होता.  त्यावेळी ही घटना घडली. 

Pune News : पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक 13 आणि 14 सप्टेंबर या दोन दिवशी बंद राहणार

Pune News : डेक्कन भागातील मेट्रो स्टेशन पर्यंत जाणाऱ्या पादचारी मार्गाचे काम करण्यासाठी भिडे पुलावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार.  भिडे पुला एवजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सुचना पोलिसांकडून करण्यात आलीय.  पुण्यातील डेक्कन भागातुन पेठांमधे जाण्यासाठी मुठा नदीवर बांधण्यात आलेल्या भिडे पुलाचा पुणेकर वापर करतात.

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा

यवतमाळ : यवतमाळच्या दारव्हात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैलबंडी मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून निघाल्या, खरीप हंगाम वाया गेला तरीदेखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, गॅस सिलेंडर, इंधन दरवाढ त्वरीत कमी करण्यात यावी, घरकुल योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्या, दारव्हा शहरातील प्रलंबित नळपाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

Eknath Shinde : मुंबईत मराठी माणसे किती उरली? याची माहिती रोखठोकमधून द्यावी, एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज

Eknath Shinde :  मुंबईत मराठी माणसे किती राहिली?  याची माहिती रोखठोकमध्ये द्यावी, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज दिले आहेत. निवडणूक आली की, मराठीचा मुद्दा पुढे करणे हे त्यांचे काम आहे. 

Mumbai Pune Expressway Accident :  मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात नऊ वाहनांचा विचित्र अपघात

Mumbai Pune Expressway Accident :  मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात नऊ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.   ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली आहे.   मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून एसटी बस , ट्रक, आणि 7  कारचा अपघात झाला आहे. दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाली असून सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी नाही.

CM Eknath Shinde Live :  50 आमदार महाविकासआघाडीला पुरून उरलो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde Live :  लढाई सोपी नव्हती पण 50 आमदार महाविकासआघाडीला पुरून उरलो. अडीच वर्षे नुसते बसले होते, सगळीकडे नैराश्य पसरले होते.  लोक सरकारसाठी नाही तर सरकार लोकांसाठी असले पाहिजे, त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलंय. प्रत्येकाला मी आपला मुख्यमंत्री वाटतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

CM Eknath Shine :  पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shine :  आजची सभा ही विराट  सभा आहे. ही पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही. आमच्या निर्णयांना पसंदी देणाऱ्यांची ही गर्दी आहे.  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंबरनाथमधील हत्या प्रकरणात दीड महिन्यांनी दोघांना बेड्या

अंबरनाथमधील हत्या प्रकरणात दीड महिन्यांनी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 29 जुलै रोजी तुषार गुंजाळ याची दिवसाढवळ्या भरचौकात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबार करणारा शंकर शिंदे आणि सचिन चिकणे यांना पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. 

 औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडले 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री आज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडण्यात आले आहे. रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे अनोखे आंदोलन करण्यात आलंय. औरंगाबादमधील बिडकीन येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडलंय. यावेळी शिंदे गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने येत एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. 

Mumbai News : सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचं सीसीटीव्हीत कैद नाही

Mumbai News : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्या आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.  परंतु ज्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला ती घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद करण्यात आलेली नाही.   घटनेवेळी अंधार असल्यानं सीसीटीव्हीत फक्त गर्दीच कैद झाली आहे. 

यवतमाळमध्ये बैलबंडी, ट्रॅक्टरसह काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा, ओळा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  

यवतमाळमध्ये बैलबंडी, ट्रॅक्टरसह काँग्रेसने तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय. ओळा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी  यवतमाळ येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने बैलबंडी आणि ट्रॅक्टरचा भव्य धडक मोर्चा तहसीलवर कार्यालवर धडकला. यवतमाळ विधानसभा प्रमुख बाळासाहेब मांगगुळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. 

यवतमाळमध्ये विविध संघटना आणि नागरिकांचा पालिका मुख्याधिकार्‍यांच्या समर्थनार्थ  मोर्चा

यवतमाळमध्ये विविध संघटना आणि नागरिकांनी पालिका मुख्याधिकार्‍यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढलाय. बदली चर्चेच्या निषेधार्थ नागरिकांनी यावेळी मुंडण केलंय. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात एका नागरिकाने अंगावर पेट्रोल घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांची बदली करण्यात आल्याची चर्चा समाजमाध्यमावर जोरात सुरु आहे. मडावी यांच्या बदलीमागे राजकीय कारण असल्याचेही बोलले जात आहे. पालिका मुख्याधिकार्‍यांची बदली करू नये, या मागणीसाठी यवतमाळकर आदिवासी बांधव, विविध संघटना, नागरिकांनी बसस्थानक चौकात एकत्र येत आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांना माधुरी मडावी यांची बदली करू नये यासाठी निवेदन देण्यात आले.  

Amravati News: अमरावतीत भीम आर्मी संघटनेचा खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आणि पोलिसांच्या समर्थनात मोर्चा

Amravati News:  अमरावतीत भीम आर्मी संघटनेचा खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आणि पोलिसांच्या समर्थनात मोर्चा...खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी..हा मोर्चा इर्विन चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे...

ज्ञानव्यापी प्रकरणी मोठा निर्णय, या प्रकरणाची सुनावणी होणार, 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी, वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय 

ज्ञानव्यापी प्रकरणी मोठा निर्णय, या प्रकरणाची सुनावणी होणार, 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी, वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय 

राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना 31 डिसेबरपर्यंत  मुदतवाढ

राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना 31 डिसेबरपर्यंत  मुदतवाढ देण्यात आली. कॅबिनेटमध्ये मुदतवाढीबाबत चर्चा होऊन निर्णय झाला

Maharashtra Rain Update: उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता 

तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सकाळी 8.30 वाजता कमकुवत झाले असले तरी महाराष्ट्रावर प्रभाव कायम 


उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता 


विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधारेचा अंदाज 


मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता तर कोकणात पुढील पाच दिवस पावसाचं धुमशान 


वाऱ्यांचा वेग अधिक असल्यानं समुद्र खवळलेला आहे, अशात मच्छिमारांना पुढील २ दिवस अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा

Parbhani Crime News: परभणी मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील हत्या प्रकरणातील आरोपी विजय जाधवला अटक, आरोपीला फाशी देण्याची पाटील कुटुंबाची मागणी 

Parbhani Crime News:  मनसेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या खुनाला 7  दिवस उलटूनही आरोपी अटक नसल्याने आज मनसे च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चा दारात पोचताच पोलिसांनी आरोपी विजय जाधव याला अटक केली. परभणी शहरातील शिवराम नगर 5 सप्टेंबर रोजी रम्मी खेळताना मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील आणि विजय जाधव यांच्यात वाद झाला होता आणि याच वादातून विजय जाधव याने सचिन पाटील यांचा धारदार शस्त्राने वार करून खुन केला होता. या घटनेला आज 7 दिवस होऊन गेले तरी आरोपी विजय जाधव हा फरार होता.त्यामुळे विजय जाधव याला अटक करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मयत सचिन पाटील यांची आई, पत्नी, 2 वर्षाचा मुलगा,भाऊ सर्व कुटुंब सहभागी झाले होते.हे आंदोलन झाल्यावर सर्व पधाधिकाऱ्यानी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला आणि पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची भेट घेतली असताना त्याचेवेळी आरोपी विजय जाधव यास सेलूत पोलीस अटक केल्याची माहिती मीना यांनी दिली.यावेळी आरोपी विजय जाधव याला जरी उशिरा अटक केली असली तरी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयत सचिन पाटील यांच्या आईने केलीय  

Maharashtra News : राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’

Maharashtra News : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Beed News : बीडमध्ये खराब रस्त्याच्या निषेधार्थ झेंडू बाम वाटप आंदोलन

Beed News : बीड शहरातून जाणाऱ्या बीड अहमदनगर या रस्त्याची दुरावस्था झाली असून त्याच्या निषेधार्थ बीडच्या तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी झेंडू बाम वाटप आंदोलन केलं. 


गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडले असून अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राट दारावर कारवाई करण्यात यावी व या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी हे अनोखा आंदोलन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं. 

Nagpur Rain : मुसळधार पावसामुळं नागपूरच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप

Nagpur Rain : फक्त सव्वा तास झालेल्या दमदार पावसानं नागपूरच्या काही रस्त्यांनाच नदीचे स्वरूप दिले नाही. तर अनेक कार्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यामुळे कार्यालयांच्या आत तलाव सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनला मॉडेल पोलीस स्टेशन म्हणून विकसित करण्यात आले होते, त्या सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर तर अक्षरशः झरा वाहतो अशा स्वरूपात पाणी वाहत आहे.


पोलिसांची वायरलेस रूम असो किंवा पोलीस निरीक्षकांची केबिन सर्वत्र पाणी शिरल्यामुळे वाहतूक शाखेचे कर्मचारी आपल्या कार्यालयाच्या बाहेर बसून काम करण्यास मजबूर झाले आहे. 

Nagpur Rain : मुसळधार पावसामुळं नागपूरच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप,

Nagpur Rain : फक्त सव्वा तास झालेल्या दमदार पावसानं नागपूरच्या काही रस्त्यांनाच नदीचे स्वरूप दिले नाही. तर अनेक कार्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यामुळे कार्यालयांच्या आत तलाव सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनला मॉडेल पोलीस स्टेशन म्हणून विकसित करण्यात आले होते, त्या सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर तर अक्षरशः झरा वाहतो अशा स्वरूपात पाणी वाहत आहे.


पोलिसांची वायरलेस रूम असो किंवा पोलीस निरीक्षकांची केबिन सर्वत्र पाणी शिरल्यामुळे वाहतूक शाखेचे कर्मचारी आपल्या कार्यालयाच्या बाहेर बसून काम करण्यास मजबूर झाले आहे. 

Maharashtra Politics : हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांची माहिती 

Maharashtra Politics : हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांची माहिती 


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा जो निर्माण झाला आहे तो आता तीव्र झाला आहे 


मॉन्सून सक्रिय राहील असे इशारे विभागाकडून देण्यात आले आहे 


कमी दाबाचे क्षेत्र तीव्रता कमी होईल 


मराठवाडा, विदर्भात 2 दिवस पाऊस राहील  दुसऱ्या बाजूला कोकण विभागात मुसळधार पाऊस राहील 


हा परतीचा पाऊस नाही तो राजस्थान मधून सुरू झालेला नाही


पुण्यात दुपारनंतर पाऊस सुरू झाला तो रात्री पर्यंत चालू राहिला 


घाट भागात अती मुसळधार पावसाची शक्यता आहे


पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात आज ही काल सारखा मुसळधार पावसाची परिस्थिती राहील


पुढचे 2 दिवस पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


आरबी समुद्रात मच्छीमार यांनी जाऊ नये कारण. 

MCA Update : एमसीएच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक, बैठकीला आशिष शेलारही उपस्थित राहणार

एमसीएच्या निवडणुकी संदर्भात शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक , दुपारी तीन वाजता सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठकीचं आयोजन , 28 सप्टेंबरला एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक, बैठकीला आशिष शेलारही उपस्थित राहणार

Navi Mumbai News:  शाळकरी मुलांना शाळेत सोडताना स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली 

नवी मुंबई - शाळकरी मुलांना शाळेत सोडताना स्कूल बसला आग


खारघरमध्ये घरकुल सेक्टर 15 समोर घडली घटना 


विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली 


अचानक आग लागल्याने स्कूल बसचे मोठे नुकसान 


पीपल एज्युकेशन संस्थेची होती स्कूल बस


अग्निशामक दल घटनास्थळी पोचताच आगीवर मिळवले नियंत्रण

Amravati News: शिवाजी शिक्षण संस्थेत पुन्हा हर्षवर्धन देशमुखांची 'प्रगती'; पॅनलचे 9 पैकी 8 उमेदवार भरघोस मतांनी विजय

Amravati News: राज्यात दुसऱ्या आणि विदर्भात पहिल्या क्रमांकांची शिक्षण संस्था असलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेत पुन्हा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचीच सत्ता विराजमान झाली.. कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे 9 पैकी 8 उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले .. माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या विकास पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. रात्री एक वाजता निकाल जाहीर झाला. पंचवर्षिक निवडणुकीसाठी रविवारी दिवसभर मतदान झाले. त्यानंतर लगेच मतमोजणी सुरू झाली. रात्री एक वाजता संपूर्ण निकाल हाती आला.


हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रगती पॅनलचे नऊ पैकी आठ उमेदवार विजयी झाले. विकास पॅनलला फक्त एक जागा मिळाली. अध्यक्ष पदाची माळ पुन्हा एकदा माजीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या गळ्यात पडली. त्यांना 389 मते मिळाली. माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला.. उपाध्यक्ष पदाच्या तीन जागेवर दोन प्रगती पॅनलचे तर एक जागी विकास पॅनलचा उमेदवार विजयी झाले.. कोशाध्यक्ष पदासाठी प्रगती पॅनलचे उमेदवार विजयी झाले.. तर सदस्य पदाच्या चार ही जागेवर प्रगती पॅनलचे उमेदवार विजयी झाले...

अंबरनाथ तालुक्यात 'लम्पी'ने दोन जनावरांचा बळी, उसाटणे गावात दोन जनावरांचा झाला मृत्यू

जनावरांमध्ये वेगानं पसरणाऱ्या 'लम्पी' रोगानं ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात २ गुरांचा मृत्यू झालाय. उसाटणे गावातील दोन बैलांचा या आजारानं बळी घेतलाय. लम्पी रोगाचा ठाणे जिल्ह्यात शिरकाव झाला असून रविवारीच बदलापूर आणि अंबरनाथच्या २ गुरांचा लम्पी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता उसाटणे गावातील अक्षय मढवी आणि विश्वास मढवी या दोघांच्या बैलांचा याच रोगानं मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या दोन्ही बैलांच्या अंगावर मोठमोठे फोड आले होते. मात्र ग्रामीण भागात लम्पी आजाराची माहितीच नसल्यानं या बैलांना योग्य वेळेत योग्य उपचार मिळू शकले नाहीत, आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. लम्पी हा त्वचारोग असून तो गाय आणि बैल यांनाच होतो. या आजाराला रोखण्यासाठी लसीकरण आणि स्वच्छता हेच उपाय असून त्यामुळं आता पशुसंवर्धन विभागानं ग्रामीण भागात लसीकरण वाढवण्याची आवश्यकता आहे.

Dhule News Updates: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं धुळे शहरात बाईक रॅली काढून स्वागत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांचे धुळे शहरात बाईक रॅली काढून स्वागत करण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते 

कोविड काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा

गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे.  यामध्ये वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य  कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. अशी कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी जेणे करून भरतीच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी असेही ठरले

Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय थोडक्यात

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय थोडक्यात


• अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार
नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण


(आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग)



• नाशिक जिल्हयातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारीत प्रशासकीय मान्यता. 


(जलसंपदा विभाग)


• नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यास मान्यता.


(विधि व न्याय विभाग)


•  महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ. 


(वित्त विभाग)


•केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार. 


(सहकार विभाग)


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर २०२२ पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार


(ग्रामविकास विभाग)


-------------------


इतर विषय


१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबविणार. नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी हा उपक्रम.


कोविड काळातील कंत्राटी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुणांकन करणार. 
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


कोविड प्रतिबंधक लसीची बूस्टर मात्रा देण्याची मोहीम अधिक वेगाने राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.. रुग्ण संख्या कमी होत असली तरी गाफील न राहता लसीकरण वाढवा

Indapur News: नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी इंदापूर- बारामती राज्य मार्ग अडवून धरला

नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी इंदापूर- बारामती राज्य मार्ग अडवून धरला होता.. सध्या सुरू असलेले नीरा डावा कालव्याचे अस्तरिकरण व्हावं या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील 22 गावांतील शेतकरी मात्र आक्रमक झालेत. आमच्या जनावरांना चारा पाणी मिळावे या साठी हे अस्तरिकरण करावे.  त्यास स्थगिती देऊ नये ह्या मागण्यासाठी  शेतकऱ्यांनी इंदापूर तालुक्यातील 54 फाटा येथे रास्ता रोको केला. रास्तारोको करताना शेतकऱ्यांनी जनावरे देखील सोबत आणली होती. शेतकऱ्यांनी भजन गात  कालव्याचे कॉंक्रिटीकरणाचे  अस्तरिकरण झाले पाहिजे  अशी मागणी करत इंदापूर बारामती राज्य महामार्गांवर  54 फाटा येथे जनावरासंह  रास्ता रोको केलाय ..निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला स्थगिती देऊ नये अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे. अस्तरीकरण होऊ नये यासाठी राजू शेट्टींनी पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शेतकरी मेळावा घेतला होता...

Beed News : परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणी जमीनदोस्त

Beed News : कोळशापासून विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणी आता जमीनदोस्त करण्यात आली आहे.. मागच्या काही दिवसापासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार व पाच हे बंद करण्यात आलेले आहेत.


210 मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारे सगळी सामग्री सुद्धा आता भंगरात काढण्याचं काम सध्या सुरू आहे.. याचाच एक भाग म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणीच्या चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर काढला जायचा आणि खरंतर परळी शहराची ओळख अगदी या चिमणी वरून ओळखली जायची ती चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली आहे.


इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती जी आज इतिहास जमा होणार आहे. 

Shivaji park Dasara melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? पालिका येत्या काही दिवसात निर्णय घेणार

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? पालिका येत्या काही दिवसात निर्णय घेणार. गणेशोत्सव संपल्यावर आता पालिका दोन्ही बाजूच्या अर्जाची छाननी आजपासून सुरु करणार 


मागील दसरा मेळावा बाबतचा इतिहास आणि मागील अर्ज याबाबत तपासणी केली जाईल. मग हा अहवाल आयुक्तांना पाठवला जाईल आयुक्त याबाबत निर्णय घेणार

गुन्हे नोंद असलेल्या खासदार-आमदारांना पगार घेण्यापासून रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली

गुन्हे नोंद असलेल्या खासदार-आमदारांना पगार घेण्यापासून रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. अशा उमेदवारांना निवडणूक लढवण्यापासून रोखता येत नसेल, तर किमान पगार घेण्यास परवानगी देऊ नये, असे याचिकाकर्त्याने म्हटले होते. मात्र CJI यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं म्हटलं की कायदे करणे हे न्यायालयाचे काम नाही.

सध्या महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यात पसरलेला हा रोग 36 जिल्ह्यात पसरायला वेळ नाही लागणार, राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सरकारला गंभीर इशारा 

लम्पी त्वचा रोगावर तातडीने नियंत्रण आवश्यक, सध्या महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यात पसरलेला हा रोग 36 जिल्ह्यात पसरायला वेळ नाही लागणार, राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सरकारला गंभीर इशारा 

Ajit Pawar Press: दिल्लीत रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर आज विरोधीपक्षनेते अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार

दिल्लीत रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर आज विरोधीपक्षनेते अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार


राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलू न दिल्याने अजित पवार नाराज असल्याची माध्यमांमध्ये चर्चा


नाराजी नाट्याबाबात अजित पवार काय बोलणारं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष


दुपारी 12 वाजता विधानभवन येथे अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार

Yavatmal News Updates: एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे रास्ता रोको आंदोलन





Yavatmal News Updates:  यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव गाव येथे शाळेकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एसटी बस थांबविण्यासाठी फाळेगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. विध्यार्थीच्या या आंदोलनामुळे यवतमाळ धामणगाव मार्गवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.  बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव येथून शिक्षणाकरिता या भागातील जवळपास 70 ते 80 विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे रोज सकाळी येतात. मात्र, सकाळच्या वेळी यवतमाळ वरून जाणाऱ्या एसटी बसेस या फाट्यावर थांबत नाहीत. तसेच बस उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होतो. मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी या रोजच्या त्रासामुळे त्रासून गेले होते. त्यामुळे आज या विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी बस थांबत नसल्याने एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे यवतमाळ धामणगाव या ठिकाणी वाहनांच्या  रांगा लागल्या होत्या. 


 

 



 


Yavatmal News: 19 वर्षीय विवाहित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Yavatmal News: 19 वर्षीय विवाहित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, महागाव तालुक्यातील घटना,  माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत ऐका 19 वर्षीय तरुणीला सासरच्या लोकांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत खान इथ घडली. 

गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, 25 ते 30 प्रवासी जखमी, दोन्ही बसच्या चालकांना गंभीर दुखापत
Ratnagiri News : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या. या धडकेत दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना RGPPL च्या रुग्णालयात दाखल केलं

आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहे. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.
Nashik News updates: नाशिकमधील बेपत्ता उद्योजकाचा मृतदेह मालेगावात आढळला

नाशकातले फर्निचर व्यापारी शिरीष सोनवणेंचा घात झाला की त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.. कारण बेपत्ता झालेले व्यावसायिक शिरीष सोनवणे यांचा मालेगावातल्या सायतरपाडे शिवारातील कालव्यात मृतदेह आढळलाय..
सोनावणे यांच्या मृतदेहावर गंभीर जखमा आढळून आल्याने प्रकरणाचं गूढ वाढलंय.  शिरीष सोनवणे यांचा शाळेतील बाकं बनवण्याचा कारखाना आहे... ते शनिवारपासून बेपत्ता होते.. मात्र त्यांचा अचानक मृतदेह आढळून आल्यानं व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे...

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या आणखी एका लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आणखी एक समर्थकांच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा जिंकण्याच्या इराद्यानं भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव इथून तीव्र इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंना सोडणार होते. म्हणूनच आढळरावांनी शिंदे गटाशी घरोबा केला. अशा परिस्थितीत भाजपनं शिरूर लोकसभा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रेणुका सिंग शिरूर लोकसभेचा तीन दिवसीय दौरा करणार आहेत. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान या मतदारसंघात संघटनात्मक आणि सार्वजनिक कार्यक्रम घेणार आहेत. शिरूर लोकसभेच्या निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळांनी पत्रकार परिषद घेत, 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार इथं निवडून येईल. असं जाहिर केलं. ही घोषणा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात वितुष्ट निर्माण करणारी ठरू शकते. आता शिंदे गटाचे समर्थक शिवाजी आढळराव यावर काय भूमिका घेतात हे पाहणं ही महत्वाचं राहील.

Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात तेजी, सेन्सेक्स 240 अंकांनी वधारला तर निफ्टी 74 अंकांनी वर, निफ्टी बॅंक निर्देशांकातही 155 अंकांची उसळी 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात तेजी, सेन्सेक्स 240 अंकांनी वधारला तर निफ्टी 74 अंकांनी वर, निफ्टी बॅंक निर्देशांकातही 155 अंकांची उसळी 


डाॅलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी कमकुवत, रुपया ७९.६३ प्रति डाॅलरवर उघडला 


मेटल आणि आयटी क्षेत्रातील समभागात चांगली तेजी 


हिंदाल्को, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस आणि रिलायन्सच्या समभाग उसळी 


कच्च्या तेलाचे भाव ९३ डाॅलर प्रति बॅरलवर, तेलाच्या किंमती खाली आल्यानंतर पुन्हा ४ टक्क्यांनी वधारल्या

Beed News : माजलगाव चा ऐतिहासिक आणि मानाच्या टेंभे गणपतीचे उत्साहात विसर्जन

Beed News : बीड जिल्ह्यातल्या माजलगाव येथील निजामकालीन परंपरा असलेल्या प्रसिद्ध टेंभे गणपतीचं रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आलं. पेटत्या टेभ्यंच्या साक्षीनं वाजत गाजत गणरायाच्या जयघोशात टेम्भे गणपतीची माजलगाव शहरातून  मिरवणूक काढण्यात आली होती. 


नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या या गणपतीच्या मिरवणुकीत पेठ ते टेंभी हातात घेऊन शेकडो भाविक मिरवणुकीच्या पुढे चालत होते तर या लाडक्याकडे राहिला निरोप देण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरासमोर रांगोळी काढल्या होत्या. 

Maharashtra Politics : मनसे नेते आणि सरचिटणीस यांची आज राज ठाकरेंसोबत बैठक

Maharashtra Politics :  मनसे नेते आणि सरचिटणीस यांची आज राज ठाकरेंसोबत  बैठक होणार आहे


 सकाळी 11 वाजता बांद्रा एमआयजी क्लब येथे ही बैठक होणार आहे


 आगामी निवडणूका आणि दौऱ्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार.

CM Eknath Shinde and Devendra Fadanvis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री वर्षा निवासस्थानी पावणे दोन तास बैठक

CM Eknath Shinde and Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री वर्षा निवासस्थानी पावणे दोन तास एक बैठक


काल प्रभादेवी येथील शिंदे ठाकरे गटात राडा पाहायला मिळाला. तसेच आर्म अॅक्टनुसार शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्यात आली देखील चर्चा झाल्याची माहिती


तसेच कायदा आणि सुव्यवस्था यावर देखील चर्चा झाली


गृहविभागतील पोलीस अधिकारी यांच्या बद्दल्या रखडलेल्या आहेत, त्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री वर्षा निवासस्थानी पावणे दोन तास एक बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री वर्षा निवासस्थानी पावणे दोन तास एक बैठक, काल प्रभादेवी येथील शिंदे ठाकरे गटात राडा पाहायला मिळाला तसेच आर्म ऍक्ट नुसार शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्यात आली देखील चर्चा झाल्याची माहिती. तसेच कायदा व सुव्यवस्था यावर देखील चर्चा झाली. गृहविभागतील पोलीस अधिकारी यांच्या बद्दल्या रखडलेल्या आहेत, त्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

Pune Rain Updates : पुणे जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस

Pune Rain Updates : आळंदी (Alandi) रस्त्यावरील दिघी येथे ढग फुटी झाल्याने रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाण आले. पाण्याचा प्रवाह एवढा होता की, पूर आल्याचे दृश्य दिसत होते. रस्त्याच्या कडेला पार्कींग केलेले वाहने वाहून गेले.यात अनेक वाहनांची फार नुकसान झाल्याचे लोकांनी सांगितलं. 

Nitin Gadkari On Potholes : राष्ट्रीय महामार्गावर खड्डे दाखवा, तीन दिवसांत भरणार : नितीन गडकरी ABP Majha Exclusive

Nitin Gadkari On Potholes : राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तरी ते तीन दिवसांत बुजवले जातील, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलीय. त्यासाठी नवं अॅप तयार करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर महत्त्वाची माहिती दिली. 

CM Eknath Shinde In Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर

Eknath Shinde In Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. आज (सोमवारी) दुपारी साडेबारा वाजता ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ते पैठणच्या (Paithan) सभेसाठी रवाना होतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दुसऱ्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभा सुद्धा घेणार आहेत.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आज (12 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. बीसीसीआयनं त्यांच्या घटनेत दुरूस्ती करावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या निकालावर विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढणार की त्यांना पायउतार व्हावं लागणार? याबाबत निर्णय होईल

Arvind Kejriwal Gujarat Visit : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर

Arvind Kejriwal Gujarat Visit : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सत्ता काबिज केल्यानंतर आता आपला मोर्चा अन्य राज्यांकडे वळवला आहे. दुसऱ्या राज्यात पक्षाचे स्थान बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.  

Swami Swaroopanand Passed Away : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Swami Swaroopanand Passed Away : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं निधन झालंय. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात  गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देश-विदेशात भक्त आहेत. शंकाराचार्य यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Maharashtra Rain Updates : आज कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates : दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळं पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा  इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह आज आणि उद्या  सर्वत्र पाऊस होणार आहे. मराठवाड्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

Maharashtra Cabinet Meeting : सणासुदीच्या सुट्ट्यांनंतर बऱ्याच दिवसांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; या महत्वाच्या निर्णयाची शक्यता

Maharashtra Cabinet Meeting : शिंदे फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची (Shinde Fadnavis) आज बैठक होणार आहे. सणासुदीच्या उत्सवात गेल्या काही दिवसात ही मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet News) होऊ शकली नव्हती. अखेर आज ही बैठक सकाळच्या सत्रात पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीला भेगा पडणं,भूस्खलन होणं, दरड कोसळणं यासारख्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी राज्याचं नवीन पुनर्वसन धोरण येणार आहे.


गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. गोविंदांना मदतीच्या निर्णयासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवासाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत... हे खरं असलं तरी... पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक


राज्य मंत्रिमंडळाची आज अकरा वाजता मंत्रालयात बैठक आहे. गणेशोत्सवामुळे तब्बल दोन आठवडे मंत्रिमंडळ बैठक होऊ शकली नव्हती.  द्याच्या बैठकीमध्ये राज्य पुनर्वसन धोरणाला मंजुरी मिळणार आहे. तळेगाव दुर्घटना, माळीन दुर्घटना, तीवरे धरण फुटल्यानंतर मदत कशी करायची हा प्रश्न प्रशासनासमोर पडला होता.  त्यानंतर समिती गठीत करून पुनर्वसन धोरण राज्याचे नवीन निश्चित केल आहे. त्याला उद्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळणार आहे


आज कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा


दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळं पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा  इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह आज आणि उद्या  सर्वत्र पाऊस होणार आहे. मराठवाड्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.


शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्यावर आज अंत्यसंस्कार 


शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं निधन झालंय. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात  गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देश-विदेशात भक्त आहेत. शंकाराचार्य यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसीय  गुजरात दौऱ्यावर


 पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सत्ता काबिज केल्यानंतर आता आपला मोर्चा अन्य राज्यांकडे वळवला आहे. दुसऱ्या राज्यात पक्षाचे स्थान बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसीय  गुजरात दौऱ्यावर आहेत.  


बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आज (12 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. बीसीसीआयनं त्यांच्या घटनेत दुरूस्ती करावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या निकालावर विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढणार की त्यांना पायउतार व्हावं लागणार? याबाबत निर्णय होईल

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.