Maharashtra Breaking News 12 June 2022 : शिवसेना आमदार सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात धाव
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी शहरालगत झालेल्या अपघातात २ तरुणांचा मृत्यू झालाय. वडसा मार्गावर असलेल्या विद्या निकेतन कॉन्व्हेंट जवळ वेगवान कार ने झाडाला धडक दिली. या अपघातात गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील २ युवक जागीच ठार झाले तर ३ युवक गंभीर जखमी झाले आहेत. सन्नी संजय वाधवानी (२४) व शुभम कापगते (२८) दोन्ही राहणार वडसा हे युवक जागीच ठार झाले असून सुमित मोटवानी (२७) व इतर दोन युवक गंभीर जखमी झाले. मृतक व इतर मित्र आपल्या होंडा सिटी गाडीने ब्रम्हपुरीकडे येत होते. दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व गाडीने झाडाला जोरदार धडक दिली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
पुण्यातील भवानी पेठेत आज संध्याकाळी एका सोसायटीमध्ये स्फोट झाला आहे. या भागात असणाऱ्या विशाल सोसायटी मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅट धारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेरींगचे काम करतो. पोलिसांनी शेख यांना ताब्यात घेतले असून फ्लॅटमधून काही सिम कार्ड आणि पासपोर्ट देखील जप्त केल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचे समजत आहे.
RajyaSabha Election : शिवसेना आमदार सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत सुहास कांदे यांचे मत बाद झाले होते. मत बाद करण्यावर कांदे यांनी आक्षेप घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये पोलिसांनी शहरातील 3500 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चार जिवंत काडतुसांसह 79 खराब काडतुसे जप्त केली. तर बेकायदा तलवार, कोयते बाळगल्याप्रकरणी 29 जणांना अटक करुन त्यांच्याकडून दोन तलवारी, 21 कोयते जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने देखील चंदनगर भागात बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे.
उल्हासनगर मधील एका चायनीज विक्रेत्यावर आठ ते दहा जणांच्या टोळीने तीक्ष्ण हत्यारं आणि बियरच्या बाटल्यानी जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात चायनीज विक्रेता दर्शन राय आणि त्याच्या जावई गंभीर जखमी झाला आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या गर्भलिंगनिदान प्रकरणात गर्भलिंगनिदान करणार्या एका शिकाऊ डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सतीश बाळू सोनवणे असं संशयीत आरोपीचं नाव असून तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या जाधववाडी गावचा रहिवासी आहे. सतीश सोनवणे हा तमिळनाडू येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मात्र नापास झाल्याने तो जालना येथे एका डॉक्टरांकडे काम करू लागला आणि आता त्यांना गर्भलिंगनिदान करण्यासाठी एक पोर्टेबल मशीन विकत घेतली आणि बीडच्या गर्भलिंगनिदान प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा सानप हीच्या सोबत तो काम करत होता. एका तपासणीसाठी तो दहा हजार रुपये द्यायचा आणि गेल्या चार महिन्यांपासून मनीषा सानप हिच्या गेवराई येथील घरी हे दोघे मिळून गर्भलिंग चाचणी करत होते.
गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांची चार पथके त्याच्या मागावर होती. त्याने मोबाईल बंद केल्याने त्याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. मात्र काही तांत्रिक तपास करुन बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अहमदनगर येथून अटक केली आहे. यानंतर आणखी काही धागेदोरे या प्रकरणात आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.
एमआयडीसीच्या माध्यमातून नवी मुंबईतील महापे येथे रस्ता रूंदीकरण करण्यासाठी ३ हजार झाडे काढण्यात येणार असल्याने याला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. यासाठी एमआयडीसी प्रशासना विरोधात आंदोलनही सुरू आहे. रस्त्याच्या रूंदीकरणात न येणाऱ्या झाडांवरही कुर्हाड चालवली जात असल्याने याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र यावर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसी प्रशासनाची बाजू घेतली आहे. एमआयडीसी कोणतेही काम चुकीचे करीत नसून झाडे तोडण्याबाबत नियम पाळले जातील, असे सांगितले आहे. त्यामुळे आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे.
एका पराभवाने शिवसेनेची नाचक्की झाली असं नारायण राणे म्हणत असतील तर नारायण राणे दोन वेळा पराभूत झाले आहे. त्यांनी यांचा विचार करावा, असे गुलाबराव पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले. नारायण राणे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांची नाचक्की झाली असा टोला लागावला होता या टीकेला पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे शिवसेनेच्या एका पराभवाने नाचक्की अस ते म्हणतात मात्र नारायण राणे यांचा दोन वेळा पराभव झाला याचा त्यांनी विचार करावा असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना लगावला आहे
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते. एचटीबीटिची बियाणे लागवडीला अजून कृषी विद्यापीठाने परवानगी दिली नाही. राळेगाव तालुक्यात शेतकरी संघटनेने एचटीबीटिची लागवड करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. बीजी-टू बियाणे येऊन 14 वर्षांचा कालावधी झाला आहे. सुधारीत बियाणे न आल्याने कपाशीवर गेल्या काही वर्षांपासून बोंडअळी आक्रमण करीत आहे. शेतकर्यांकडून एचटीबीटी वानाची मागणी करण्यात येत असताना त्याला मान्यता देण्यात येत नाही. शेतकर्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे, या मागणीसाठी राळेगाव तालुक्यातील खडकी येथे राजेंद्र झोटींग यांच्या शेतात एचटीबीटी बियाण्याची लागवड करून अनोख्या पद्घतीने आंदोलन करण्यात आले.
'धर्मवीर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. 13 मे रोजी हा सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ब्लॉकबस्टर 'धर्मवीर' ओटीटीप्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
बीड शहरातील धांडे नगर जवळ पंकजा मुंडे समर्थकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी पंकजा मुंडे यांच्या नावांनी घोषणा देण्यात आल्या.
Pune News : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केलाय. गडावरील कल्याण दरवाजा भागात मधमाशांनी पर्यटकांवर हा हल्ला केलाय. मधमाशा चावल्याने दहा ते बारा पर्यटक जखमी झाले आहेत
खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला मुंबईत दाखल
दुपारी साडे चार वाजता सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट होणार
संजय राऊत यांनी केलेले आरोप भुयार यांनी फेटाळले
संजय राऊत यांची तक्रार देवेंद्र भुयार शरद पवारांकडे करणार
कोकणातील रिफायनरी विरोध आंदोलनातील आतापर्यंतची मोठी बातमी! रिफायनरी विरोधक नेत्यांची थेट ATS चौकशी!, जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2021 या काळात 3 वेळा चौकशी, रिफायनरीविरोधी आंदोलनाला पैसा कुठून येतोय? या अनुषंगानं चौकशी
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा टी20 सामना कटकच्या बाराबती मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. तर या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.
गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आज पालखी वाशिम मध्ये असणार आहे.
भाजपचे निवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे आज अमरावतीत येणार आहेत. यावेळी त्याचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे, संध्याकाळी 5 वाजता. त्यापुर्वी नागपुरात अनिल बोंडे संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.
राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत केले जाणार आहे. ताराराणी चौकातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक अंबाबाई मंदिर जाऊन थांबवली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 तारखेला देहूत येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर देहूचे मंदिर तीन दिवस भाविकांसाठी बंद रहाणार आहे.
महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाच्या घोषणेनंतर राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. पुढील 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोरं आली होती. आज पहाटे रखुमाईच्या पायावर लेपन होणार आहे. ही प्रक्रिया साधारण 3 तास चालणार आहे. त्यामुळे देवीचे दर्शन भक्तांना काही दिवस दुरून घ्यावे लागणार आहे. पुरातत्व विभागाची टीम पंढरपुरात दाखल झालीये.विठ्ठलाच्या पायाची देखील थोडी झीज झाल्याने गरजेनुसार लेपन केलं जाणार आहे.
आज तिथीनुसार आज 349 वा शिवराजाभिषेक सोहळा रायगडावर होणार आहे. दुर्गराज संस्थेकडून आयोजित या सोहळ्यात विधीनुसार राज्याभिषेक पार पडेल. यावेळी हजारोच्या संख्येने शिवभक्त सोहळ्याला उपस्थित रहण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
आज तिथीनुसार शिवराज्यभिषेक
आज तिथीनुसार आज 349 वा शिवराजाभिषेक सोहळा रायगडावर होणार आहे. दुर्गराज संस्थेकडून आयोजित या सोहळ्यात विधीनुसार राज्याभिषेक पार पडेल. यावेळी हजारोच्या संख्येने शिवभक्त सोहळ्याला उपस्थित रहण्याची शक्यता आहे.
रखुमाईच्या पायावर आज लेपन होणार.
विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोरं आली होती. आज पहाटे रखुमाईच्या पायावर लेपन होणार आहे. ही प्रक्रिया साधारण 3 तास चालणार आहे. त्यामुळे देवीचे दर्शन भक्तांना काही दिवस दुरून घ्यावे लागणार आहे. पुरातत्व विभागाची टिम पंढरपुरात दाखल झालीये.
विठ्ठलाच्या पायाची देखील थोडी झीज झाल्याने गरजेनुसार लेपन केलं जाणार आहे.
आज चांगल्या पावसाची शक्यता
महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाच्या घोषणेनंतर राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. पुढील 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उद्यापासून देहूचे मंदिर तीन दिवस भाविकांसाठी बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 तारखेला देहूत येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर देहूचे मंदिर तीन दिवस भाविकांसाठी बंद रहाणार आहे.
राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत
राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत केले जाणार आहे. ताराराणी चौकातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक अंबाबाई मंदिर जाऊन थांबवली जाणार आहे.
भाजपचे निवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे आज अमरावतीत येणार
भाजपचे निवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे आज अमरावतीत येणार आहेत. यावेळी त्याचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे, संध्याकाळी 5 वाजता. त्यापुर्वी नागपुरात अनिल बोंडे संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.
गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाशिमला
गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आज पालखी वाशिम मध्ये असणार आहे.
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतला दुसरा टी- 20 सामना
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा टी20 सामना कटकच्या बाराबती मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. तर या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -