Maharashtra Breaking News 11 May 2022 : महापालिका निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्या; सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 May 2022 10:02 PM
Election Breaking : महापालिका निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्या; सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर

राज्यातल्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जात महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यास परवानगीची विनंती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. लवकरच या अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आहे. 

बारामतीत पावसाने लावली हजेरी

बारामती शहर आणि परिसरात आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.  वाऱ्याचा वेग इतका जोरात होता की बारामती शहर आणि परिसरात अनेक  ठिकाणीची झाडे ही जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडली आहेत. बारामती- भिगवण, बारामती- इंदापूर रस्त्यावर ही झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. झाडे पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु अनेक दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. बारामती भिगवण रस्त्यावर जास्त प्रमाणात झाडे पडल्याने काही काळ वाहतुक मंदावली होती.

अयोध्येचे लोक राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांना पाहतात - प्रकाश महाजन

राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या टीका आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणारा विरोध यावर मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याबद्दल काही नवीन खुलासे केले आहेत. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले आहेत की, आयोध्ये मधील लोकांना राज ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण आहे. राज ठाकरे यांच्यामध्ये अयोध्येचे लोक बाळासाहेबांना पाहतात. त्यामुळे असली कोण आणि नकली कोण हे लोकांना कळलं आहे.

Mumbai Police : व्यापाराचे 6 कोटी रुपये लुटल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील 10 कर्मचारी निलंबित

मुंब्रा पोलिसांनी खेळणी व्यापाऱ्याचे 6 कोटी लुटल्याच्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील 3 अधिकारी आणि 7 कर्मचार्यांना निलंबित करण्यात आलं आहे.या प्रकरणी एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. सर्व निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी होणार आहे. परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त चौकशी करणार आहेत. 


 

Maharashtra News : मंत्रिमंडळ बैठकीत बत्तीगुल, मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत

Maharashtra News : मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने सर्वांचीच अडचण निर्माण झाली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित न राहू शकल्याने तसेच वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्याने चर्चा पूर्ण होऊ शकली नाही.  तरी हा वीज पुरवठा नेमका कशामुळे खंडीत झाला याचे कारण अजूनही कळू शकले नाही. 

Load Shedding : मंत्रिमंडळ बैठकीत बत्तीगुल, मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत

मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याची घटना घडली. त्यामुळे मुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना ही गोष्ट घडली. 

Akkalkot News: टेम्पोची पान शॉपला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

अक्कलकोट येथील लोकसेवा पान शॉपला एका टेम्पोने अचानक धडक दिली. चालकाच नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट पान शॉपच्या दारावर येऊन आदळल्याची माहिती आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत पान शॉप समोर थांबलेल्या एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे. अचानक आलेल्या या टेम्पो मुळे सारेच घाबरून गेले होते. सुदैवाने यात कोणतीही मोठी हानी झाली नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Maharashtra Wardha News : वर्ध्यात तीन हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Wardha News : वर्ध्यातील देवळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर बाबुराव मेंढे यांना तीन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार 324 कलमानुसार आरोपीवर अटकेची कारवाई न करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मेंढे यांनी पाच हजारांची लाच मागितली होती. अखेर तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास आरोपी सहायक पोलिस उपनिरीक्षक तयार झाले आणि पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांनी लाच स्वीकारलीही. लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा टीमने त्यांना ताब्यात घेतले.जिल्ह्यात कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
Maharashtra Nagpur News: नागपूरात 48 तासात दोघांची हत्या

नागपूरात एकाच दिवसात दोन व्यक्तींची हत्या झाल्याची घटना घडली आहे. एका घटनेत दारू पिताना रागाने का पाहिले या कारणावरून, तर दुसऱ्या घटनेत अनैतिक संबंधाच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून हत्या जाहल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही घटनेत मरणारे आणि मारणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. दुसऱ्या हत्या प्रकरणात तर तडीपार गुंडच मुख्य आरोपी आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

देखभाल दुरुस्तीचे काम करताना दोन वीज कर्मचारी जखमी, सोलापूर शहरातील अपघात ; एकाची प्रकृती गंभीर

सोलापूर -  शहरातील महावितरणच्या ‘क’ उपविभागामध्ये आज (दि. ११ मे) मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे करत असताना दोन वीज कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यामध्ये महावितरणच्या वीज कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.  
सोलापुरात वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे कामे बुधवारी केली जातात. रामलाल चौक शाखे अंतर्गत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमद (वय अंदाजे ३७ वर्षे) व कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी (वय अंदाजे २२ वर्षे) हे दोघे सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते. याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती. तरीही काम करताना अचानक लागलेल्या शॉकमुळे ते जखमी झाले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने अश्विनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दोघांपैकी शेख रब्बानी अहमद यांची प्रकृती गंभीर आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, वीज पुरवठा बंद केल्याची खातरमजा या दोघांनी केली होती की नाही याची माहिती समजली नाही. विद्युत निरीक्षकाच्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर. अकोला जिल्हा न्यायालयानं मंजूर केला जामीन.

राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर. अकोला जिल्हा न्यायालयानं मंजूर केला जामीन. राज्यमंत्री बच्चू कडूंना मोठा दिलासा. वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर अकोला न्यायालयाच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलिसांना कडूंवर केले होते गुन्हे दाखल. तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा होता आरोप...

भाजप आमदार जयकुमार गोरेंना तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, मायणी इथलं जमीनीच्या वादाचं प्रकरण

 भाजप आमदार जयकुमार गोरेंना तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार


गोरे हे माण - खटाव इथून विद्यमान आमदार तसेच भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष


मायणी इथलं जमीनीच्या वादाचं प्रकरण


दहिवडी पोलीस स्थानकांत 14 एप्रिल रोजी दाखल गुन्ह्याचं प्रकरण


जयकुमार गोरेंसह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा, एक तलाठीही आरोपी


वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारलाय


गोरेंच्या जामीनाला राज्य सरकारचाही विरोध

 मनसेचे दादर शाखाप्रमुख संतोष साळी आणि संदीप देशपांडे यांच्या गाडीचे चालक रोहित वैश्य यांचा जामीनासाठी अर्ज

 मनसेचे दादर शाखाप्रमुख संतोष साळी आणि संदीप देशपांडे यांच्या इनोव्हा गाडीचे चालक रोहित वैश्य यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे


या जामीन अर्जावर आज प्राथमिक सुनावणी झाली


13 मे रोजी पोलिसांना यावर उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे निर्देश


भोईवाडा कोर्टानं या दोघांचेही जामीन फेटाळलेत


सध्या दोघेही आहेत न्यायालयीन कोठडीत

शरद पवार यांचे बेळगावात भव्य स्वागत, जेसीबीमधून फुलांची उधळण

बेळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भला मोठा हार घालून आणि जेसीबी मधून फुलांची उधळण करून स्वागत केले. खासदार शरद पवार यांच्या स्वागतासाठी बेळगावातील राणी कित्तुर चन्नमा चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.शरद पवार यांचे आगमन होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.त्यानंतर दोनशे किलो वजनाचा बंगलोर येथून खास ऑर्डर देवून मागवण्यात आलेला भला मोठा हार क्रेनाने घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी जेसीबी मधून महिला कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण शरद पवार यांच्या वाहनावर केली.हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेवून जमलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

Pandit Shivkumar Sharma Updates : पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंतिम विधीची तयारी सुरु, काही वेळात शासकीय मानवंदना दिली जाणार 
 पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंतिम दर्शनासाठी शायर, गीतकार आणि लेखक जावेद अख्तर पोहोचले

 पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंतिम दर्शनासाठी शायर, गीतकार आणि लेखक जावेद अख्तर पोहोचले

Maharashtra News : हरियाणात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस ताबा घेणार

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी होणार, शासकीय मानवंदना देण्यासाठी मुंबई पोलिसाचं दल पोहोचलं 

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी होणार, शासकीय मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देण्यासाठी मुंबई पोलिसाचं दल पोहोचलं 

औरंगाबाद : लेबर कॉलनीमध्ये घर पाडलेल्या ज्या लोकांना खरंच घरे नाहीत त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न-  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची माहिती

औरंगाबाद : लेबर कॉलनीमध्ये घर पाडलेल्या ज्या लोकांना खरंच घरे नाहीत, त्यांना दुसरा पर्याय नाही, त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न, पुर्नवसन करणाऱ्या लोकांची यादी तयार करण्याचे आदेश, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची माहिती

Amravati News : अमरावती पोलीस आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Amravati News : पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, अमरावती पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी विजय अडोकार यांनी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या मागच्या बाजूला झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. 


विजय अडोकार हे वलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.


आज सकाळी अडोकार हे घराबाहेर पडले आणि त्यानंतर थोड्याच वेळात आडोकार यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. 


अडोकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही..

 गायक हरिहरण, अभिनेत्री ईला अरुण आणि उस्ताद अमजद अली खान यांचे पुत्र अयान अली बंगश यांनीही पंडित शिवकुमार शर्मा यांचं अंत्यदर्शन घेतलं

 गायक हरिहरण, अभिनेत्री ईला अरुण आणि उस्ताद अमजद अली खान यांचे पुत्र अयान अली बंगश यांनीही पंडित शिवकुमार शर्मा यांचं अंत्यदर्शन घेतलं

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यदर्शनासाठी अमिताभ बच्चन पोहोचले

दिवंगत संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी जुहूमधील 'अभिजित अपार्टमेंट्स' परिसरात ठेवलं आहे. अमिताभ बच्चन अंतिम दर्शनासाठी पोहोचले, मुख्यमंत्री अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता

Sedition Law Case : राजद्रोहासंदर्भात नियमावलीचा आराखडा तयार : केंद्र सरकार

शिल्पकार प्रमोद कांबळे यांना नेपाळचा लुंबिनी वर्ल्ड पीस सन्मान जाहीर





अहमदनगर : अहमदनगर येथील सुप्रसिद्ध चित्र- शिल्पकार प्रमोद कांबळे यांना नेपाळचा लुंबिनी वर्ल्ड पीस सन्मान जाहीर झाला आहे. येत्या बुद्ध जयंतीदिनी गौतम बुद्ध यांचे जन्मस्थानी असलेल्या नेपाळ येथील लुंबिनी येथे हा पुरस्कार प्रमोद कांबळे यांना प्रदान केला जाणार आहे. वर्ल्ड पीस फोरमचे बासू गौतम यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्यासह बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार. प्रमोद कांबळे हे दरवर्षी इको फ्रेंडली गणेशाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश मूर्तींबाबत जनजागृती करतात, सोबतच नगर शहरात दरवर्षी ते कार्यशाळा देखील घेतात... मातीपासून स्वत:च्या हाताने मूर्ती घडवून तिची स्थापना करून मनोभावे पूजा करायची हीच आपली खरी परंपरा आहे. अशा पर्यावरण पुरक मूर्तीमुळे पर्यावरण तर सुरक्षित राहतेच शिवाय आपल्या मूळ परंपरेचे योग्य अर्थाने वहन होते असा संदेश प्रमोद कांबळे देत असतात.पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेल्या त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.त्यांना हा सन्मान जाहीर झाल्याने नगर जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे.


 

 



 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ.उद्धवराव गाडेकर यांचं निधन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे आजीवन प्रचारक डॉ.उद्धवराव गाडेकर यांचं निधन. अकोला जिल्ह्यातील पाटसुल येथे निधन झालं. मृत्यूसमयी ते 62 वर्षांचे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचा त्यांनी महाराष्ट्रभर प्रचार आणि प्रसार केला. पाटसुल येथे गुरूदेव सेवाश्रमाची केली होती स्थापना. सातत्याने समाजसेवा , वंचितांना मानसिक सामाजिक आधार देण्याच काम त्यांनी केलंय. गेल्या 30 वर्षांपासून पाटसुल येथे संस्कार शिबीरातून राष्ट्रभक्त पिढी घडविण्याचं काम अव्याहतपणे केलं. आज सायंकाळी चार वाजता पाटसुल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Nashik Accident : कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघात, चौघे मित्र जागीच ठार

Nashik Accident : कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघात, चौघे मित्र जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झालाय.  नाशिकच्या मनमाड - येवला रस्त्यावरील अनकाई शिवारात  मध्यरात्रीच्या सुमारास ही घडली.. येवला येथे एका खाजगी कार्यक्रमाला हे पाचही मित्र गेलेले होते. तेथून परतत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जावून आदळली. .या भीषण अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे..त्याचेवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

28 आणि 29 मे च्या दरम्यान भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार

28 आणि 29 मे च्या दरम्यान भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार


महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपाची प्रदेश कार्यकारिणी बैठक


भाजपाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक यंदा औरंगाबाद येथे होईल


स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबईसह इतर प्रमुख महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची बैठक


येणाऱ्या निवडणुकांची रणनीती, संघटनात्मक आढावा यासाठी प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार


प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपावेळी औरंगाबादमध्ये भव्य सभा घेण्याचंही भाजपचं नियोजन

रत्नागिरीत सोने व्यापाऱ्याला त्याच्या चुलत भावांनी लुटलं, रेल्वेतून चोरलेली 28 लाखांची रोकड 10 दिवसांनी पोलिसांनी परत मिळवली

Ratnagiri News : सोने व्यापाऱ्याला त्याच्याच चुलत भावांनी लुटल्याची घटना रत्नागिरीत उघड झाली आहे. केरळमध्ये सोन्याचा व्यापार करण्यासाठी 28 लाखांची रोकड घेऊन प्रशांत माने हे कोकण रेल्वेने निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांची 28 लाखांची रोकड असलेली बॅग चोरीला गेली. त्यांनी या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. प्रशांत माने यांचा चुलत भाऊ सुरज माने याने याबाबतचा प्लॅन आखला. सूरजला आपले चुलत भाऊ कसे, कुठे रोकड घेऊन जाणार हे माहित होते. त्यानुसार रेल्वेत चोरीला प्लॅन आखला गेला. रत्नागिरी शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध घेत सूरज मानेसह सहा लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सहा जण सांगली जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे रेल्वेतून चोरीला गेलेली सर्वच्या सर्व म्हणजे 28 लाख रुपये तब्बल 10 दिवसानंतर पोलिसांनी परत मिळवले आहेत.

Mumbai Covid-19 News : मुंबईकरांनो सावध व्हा, काळजी घ्या! 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ

Maharashtra Mumbai Covid-19 News : एकीकडे देशात कोरोनाची चौथी लाट (Coronavirus 4th wave) जूनमध्ये धडकणार असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तर, दुसरीकडे देशात सध्या सर्व कोविड (Covid-19) नियम मागे घेण्यात आले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत मंगळवारी 1 हजार 118 रुग्णांची नोंद झाली आहे. अशातच दिल्लीपाठोपाठ आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना दिलासा, सात जणांच्या हद्दपारीला स्थगिती

Nashik News : मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयाने दिलासा दिलासा आहे. 7 कार्यकर्त्यांच्या हद्दपारीला स्थगिती देण्यात आली आहे. 4 मे रोजी मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करतील या संशयावरुन सरकारवाडा पोलिसांनी 15 दिवसांसाठी या मनसे कार्यकर्त्यांना हद्दपार केलं होतं. त्यांना नाशिक शहराच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या नोटीसला न्यायालयात आव्हान दिल्याने कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी 8 दिवसातच काही जणांची घरवापसी झाली आहे. 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट,


गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला,


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रानंतर भेटीला महत्त्व


साडे अकरा वाजता बाळा नादगांवकर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधणार

कोकणातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण; आंबा, काजूसह मासेमारीवर परिणाम

Ratnagiri News : कोकण किनारपट्टीला असनी चक्रीवादळाचा कोणताही धोका नसला तरी सध्या वातावरणात मात्र बदल दिसून येत आहेत. कोकण असेल किंवा गोवा या ठिकाणी सध्या वातावरण ढगाळ आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी देखील कोसळल्या. मागील दोन दिवसांपासून हा बदल दिसत आहे. यावेळी मच्छिमार नौका देखील सुरक्षितरित्या किनाऱ्यार उभ्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम हा मच्छीच्या दरांवर झालेला दिसून येत आहे. असनीमुळे कोणताही धोका कोकणाला नसला तरी वातावरणात झालेल्या बदलामुळे मात्र आंबा, काजू आणि मच्छिमारीवर परिणाम होत आहे. सध्या मच्छीच्या दरांमध्ये देखील वाढ झाल्याचं चित्र स्थानिक बाजारपेठेत दिसत आहे. 

Special Report : 97 वर्षीय आजींचा लढा यशस्वी, न्यायालयाच्या आदेशामुळे हक्काच्या घरात प्रवेश करणार

Aurangabad : औरंगाबादच्या लेबर कॉलनीत 338 घरं पाडण्याचं काम सुरु, 50 जेसीबी दाखल

Aurangabad Labor Colony News  : औरंगाबादच्या लेबर कॉलनी परिसरात मोडकळीस आलेली घरं जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी साडेसहापासून ही पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाई सुरु झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी 338 घरं पाडण्यात येणार आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाचशे पोलीस आणि दीडशे अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या पाडकाम कारवाईसाठी 50 जेसीबीसह अनेक कामगारांना पाचारण करण्यात आलं आहे. 


कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना इथं येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. इथल्या बहुतांशी नागरिकांनी घराचा ताबा सोडला आबे. तर काही जण सोडण्याच्या तयारीत आहेत. मात्र तरीही काही नागरिक इथं राहत असून त्यांनी या पाडकामाला विरोध केला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Sanjay Raut On Kirit Somaiya : संजय राऊतांकडून 'किरीट का कमाल' म्हणत सोमय्यांवर हल्लाबोल

Sanjay Raut On Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू केली आहे. 'किरीट का कमाल' म्हणत संजय राऊत यांनी मागील दोन-तीन दिवसांपासून सोमय्यांच्या भ्रष्टाचारविरोधी प्रतिमेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला एनएसईएल घोटाळा प्रकरणात चौकशी झालेल्या एका कंपनीकडून देणगी मिळाली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. 


संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये सोमय्यांवर आरोप करताना म्हटले की, एनएसईएलमध्ये 5600 कोटींचा घोटाळ्या प्रकरणी सोमय्यांनी चौकशीची मागणी केली होती. मोतीलाल ओस्वाल या कंपनीच्या शिपयाच्या घरी जात सोमय्या यांनी तमाशा केला. या प्रकरणाची  ईडीनेदेखील चौकशी केली.  मात्र, त्यानंतर 2018-19 मध्ये किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओस्वाल कंपनीकडून लाखोंची देणगी मिळाली असल्याचा आरोप राऊत यांनी केला. 


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 11th May 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) नव्या किमती जाहीर केल्या आहेत. बुधवार, 11 मे 2022 रोजी सकाळी 6 वाजता जारी करण्यात आलेल्या इंधानांच्या नव्या दरांनुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात आज सलग 35व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. अशातच इंधनांच्या वाढलेल्या दरांमुळे महागाईनं बेजार केलं आहे. वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. दरम्यान, यापूर्वी 6 एप्रिल रोजी देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलचे दर 80 पैशांनी आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढवण्यात आले होते. 


आजच्या नव्या दरांनुसार, देशाची राजधानी दिल्लीत रविवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचा आजचा 32 वा दिवस आहे. रविवारी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे. तसेच, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. 

Former Union Minister Pandit Sukh Ram Passes Away : माजी केंद्रीय मंत्री पंडीत सुखराम यांचं निधन

Former Union Minister Pandit Sukh Ram Passes Away : माजी केंद्रीय केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासूनच त्यांची तब्येत नाजूक होती. अशा परिस्थितीत त्यांना दिल्लीतील एम्समधील व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. गेल्या शनिवारी प्रकृती खालावल्यानं त्यांना हेलिकॉप्टरनं दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. 



Corona Vaccination : 12-14 वर्षे वयोगटातील 3 कोटीहून अधिक मुलांना मिळाला लसीचा पहिला डोस

Corona Vaccination : देशातील कोरोना लसीकरणाचे आकडे रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत सांगितले की, आतापर्यंत 12-14 वयोगटातील तीन कोटीहून अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. माहितीनुसार, या वयोगटातील मुलांचे लसीकरण 16 मार्च 2022 पासून सुरू झाले. त्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. या लसीचा दुसरा डोस 28 दिवसांच्या अंतराने द्यावा लागतो.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

IPL 2022 : दिल्लीसमोर राजस्थानचे आव्हान

IPL 2022 : आज नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात आयपीएलमधील (IPL 2022) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC)  हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना दोन्ही संघाना पुढील फेरीचं तिकीट मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.

Maharashtra News : सयाजी शिंदे यांच्याकडून परभणीत 90 मोठ्या वृक्षांचे पुन:रोपण

Maharashtra News : सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त उपक्रमातून परभणीतील देवगाव फाटा ते जिंतुर महामार्गावर 90 मोठ्या वृक्षांचे पुन:रोपण केलं जाणार आहे. राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष पुन:रोपण करण्याची ही पहिलीच वेळ असावी. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता होणार आहे. 

Sri Lanka Crisis : हिंसाचार करणाऱ्यांना थेट गोळ्या घाला, श्रीलंकेच्या लष्कराला आदेश

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत राष्ट्रव्यापी कर्फ्युनंतरही जोरदार आंदोलन सुरुच आहे. दंगलग्रस्तांना रोखण्यासाठी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आलेत. दुसरीकडे महिंद्रा राजपक्षे यांच्या अटकेची मागणी तीव्र होत आहे. आतापर्यंत श्रीलंकेतील हिंसेमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय. तर 200 हून अधिक नागरिक जखमी झालेत. श्रीलंकेमध्ये परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली असून या देशाचा यादवीकडे प्रवास सुरू आहे. श्रीलंकेमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिला आहे. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा जे नागरिक हिंसाचारामध्ये भाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिला आहे.

NIA Raids in Mumbai : एनआयए चौकशी अपडेट

NIA Raids in Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील 29 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे मारलेत. मुंबईतील नागपाडा, भेंडीबाजार, सांताक्रुझ, गोरेगाव, बोरीवली आणि मुंब्रा परिसरात सकाळपासून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येतेय. डी कंपनीशी संबधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत. एनआयएने फेब्रुवारीत दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएकडून सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरु आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल चौकशीसाठी बोलवलेल्यांपैकी काही लोकांना आज पुन्हा सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवलं आहे. मंगळवारी सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून चौकशी करण्यात आली. शिवाय यातल्या प्रत्येकाचे दाऊद कनेक्शन तपासले जात आहेत. साधारणपणे 10 तासांच्या चौकशी नंतर गुड्डू पठाण, अजय गोसालिया, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यांना सोडण्यात आलं.

राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदार बृजभूषण सिंह यांची आज सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्याविरोधात भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची सभा आजही होणार आहे. खासदार बृजभूषण सिंह बहराईच येथे सकाळी 11 वाजता एका जनसभेला संबोधित करणार आहेत. तसेच काही नेते आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

Maharashtra News : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

Maharashtra News : आज दुपारी 4 वाजता मंत्रालयात कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत ओबीसीच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकारला कोर्टाने फटकारल्यानंतर आणि येत्या काही दिवसात कोर्टात सादर करायचे उत्तर यावर आज चर्चा होऊ शकते. येत्या काही दिवसात राज्य निवडणुक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

Maharashtra News : राज्यात लवकरच वाजणार महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल

Maharashtra News : ओबीसी प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन टप्प्यात महानगर पालिका निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

राजद्रोहाचे खटले स्थगित करता येतील का? यावर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात मत मांडणार

राजद्रोहाच्या कायद्यावर म्हणजे कलम 124 अ वर पुनर्विचार करेपर्यंत या संबंधिच्या प्रलंबित सर्व खटल्यावरील कारवाई स्थगित करणार का हे स्पष्ट करा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार आज न्यायालयात आपलं मत मांडणार आहे. या संबंधित आज सकाळी 10.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर करुन निरपराधांना त्रास दिला जातो अशी अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. केंद्रांने आता या कायद्यावर पुनर्विचार करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. पण हा कायदा सुमारे शंभर वर्षांपासूनचा म्हणजे ब्रिटिशकालीन असल्याने यावर पुनर्विचार करण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला वेळ द्यावा अशी विनंती सॉलिसिटर जनरल यांनी केली आहे. 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राजद्रोहाचे खटले स्थगित करता येतील का यावर केंद्र न्यायालयात मत मांडणार
राजद्रोहाच्या कायद्यावर म्हणजे कलम 124 अ वर पुनर्विचार करेपर्यंत या संबंधिच्या प्रलंबित सर्व खटल्यावरील कारवाई स्थगित करणार का हे स्पष्ट करा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार आज न्यायालयात आपलं मत मांडणार आहे. या संबंधित आज सकाळी 10.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर करुन निरपराधांना त्रास दिला जातो अशी अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. केंद्रांने आता या कायद्यावर पुनर्विचार करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. पण हा कायदा सुमारे शंभर वर्षांपासूनचा म्हणजे ब्रिटिशकालीन असल्याने यावर पुनर्विचार करण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला वेळ द्यावा अशी विनंती सॉलिसिटर जनरल यांनी केली आहे. 


राज्यात लवकरच वाजणार महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल
ओबीसी प्रश्नावर सुप्रिम कोर्टाने दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन टप्प्यात महानगर पालिका निवडणुका घेतल्या जाणार आहेत.


राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक 
आज दुपारी 4 वाजता मंत्रालयात कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत ओबीसीच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकारला कोर्टाने फटकारल्यानंतर आणि येत्या काही दिवसात कोर्टात सादर करायचे उत्तर यावर आज चर्चा होऊ शकते. येत्या काही दिवसात राज्य निवडणुक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.


राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदार बृजभूषण सिंह यांची आज सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्याविरोधात भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची सभा आजही होणार आहे. खासदार बृजभूषण सिंह बहराईच येथे सकाळी 11 वाजता एका जनसभेला संबोधित करणार आहेत. तसेच काही नेते आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
 
एनआयए चौकशी अपडेट
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील 29  ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे मारलेत. मुंबईतील नागपाडा, भेंडीबाजार, सांताक्रुझ, गोरेगाव, बोरीवली आणि मुंब्रा परिसरात सकाळपासून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येतेय. डी कंपनीशी संबधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत. एनआयएने फेब्रुवारीत दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएकडून सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरु आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल चौकशीसाठी बोलवलेल्यांपैकी काही लोकांना आज पुन्हा सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवलं आहे. मंगळवारी सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून चौकशी करण्यात आली. शिवाय यातल्या प्रत्येकाचे दाऊद कनेक्शन तपासले जात आहेत. साधारणपणे 10 तासांच्या चौकशी नंतर गुड्डू पठाण, अजय गोसालिया, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यांना सोडण्यात आलं.
 
हिंसाचार करणाऱ्यांना थेट गोळ्या घाला, श्रीलंकेच्या लष्कराला आदेश 
श्रीलंकेत राष्ट्रव्यापी कर्फ्युनंतरही जोरदार आंदोलन सुरुच आहे. दंगलग्रस्तांना रोखण्यासाठी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आलेत. दुसरीकडे महिंद्रा राजपक्षे यांच्या अटकेची मागणी तीव्र होत आहे. आतापर्यंत श्रीलंकेतील हिंसेमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय. तर 200 हून अधिक नागरिक जखमी झालेत. श्रीलंकेमध्ये परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली असून या देशाचा यादवीकडे प्रवास सुरू आहे. श्रीलंकेमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिला आहे. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा जे नागरिक हिंसाचारामध्ये भाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिला आहे.


सयाजी शिंदे यांच्याकडून परभणीत 90 मोठ्या वृक्षांचे पुन:रोपण 
सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त उपक्रमातून परभणीतील देवगाव फाटा ते जिंतुर महामार्गावर 90 मोठ्या वृक्षांचे पुन:रोपण केलं जाणार आहे. राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष पुन:रोपण करण्याची ही पहिलीच वेळ असावी. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता होणार आहे. 


दिल्लीसमोर राजस्थानचे आव्हान
आज नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात आयपीएलमधील (IPL 2022) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC)  हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना दोन्ही संघाना पुढील फेरीचं तिकीट मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.