Maharashtra Breaking News LIVE Updates : भारतात येऊन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियनला अटक
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
त्याचबरोबर कोविड लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश मिळेल. याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. हा आदेश आल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या नजीकच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बेळगावची बाजारपेठ महाराष्ट्रातील तालुक्यांवर अवलंबून आहे. यामुळे व्यापारी वर्गाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन ही विनंती केली होती. याचबरोबरीने कर्नाटकाच्या विविध सीमाभागात लागून असलेल्या राज्यातून विशेषता केरळ मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तेथूनही या संदर्भात मागणी होती. दरम्यान सध्या महाराष्ट्र संदर्भात हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे दिलासा मिळाला आहे.
कपडे विक्री व्यवसायाच्या नावाने भारतात येऊन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियनला अटक करण्यात आली आहे. कोट्यवधीच्या कोकेन या अमली पदार्थांसह अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या बांद्रा युनिटने अंधेरीमधून केली आहे. या नायजेरियन अमली पदार्थ तस्कराचे नाव पॉल इबे एन्जोकु असे असून तो नायजेरियाच्या लागोसचा रहिवासी आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे बांद्रा युनिटचे अधिकारी सहारगाव अंधेरी या परिसरात गस्त घालत होते. या वेळी त्यांना पॉल हा संशयितरित्या या भागात फिरताना आढळला. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 407 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ आढळून आला. याची किंमत तब्बल 1 कोटी 22 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. पॉल हा मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकत होता. कपडे विक्री व्यवसायाच्या नावाखाली तो भारतात आला आणि इथे अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय करू लागला. त्याच्या बरोबर त्याने आणखी सहा ते आठ आफ्रिकन नागरिकांची अमली पदार्थ विक्रीसाठी टोळी देखील तयार केली आहे. पॉलला अटक झाल्याने एक मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात सोमवारपासून पहिलीपासून शाळा सुरू होणार. मागच्या काही दिवसांपूर्वी वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील केवळ दहावी बारावी आणि नंतर काही दिवसांनी आठवी नववीच्या वर्गाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, आता कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली असून पहिली पासून शाळा भरवण्यास दिनांक 14 फेब्रुवारी म्हणजेच सोमवार पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधातील आहे. किरीट सोमय्या यांचे नाव किरीट नाहीतर स्पिरिट आहे. भाजपने शहराच्या इतिहासात सर्वाधिक चांगलं काम केले आहे. असे गिरीश बापट म्हणाले.
शिवाजी पार्कवर (Shivaji Park) लता मंगेशकरांचे (Lata Mangeshkar) स्मृतिस्थळं बनवण्यास विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदानच राहावं हीच याचिकेतील प्रमुख मागणी आहे. शिवाजी पार्कचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ता प्रकाश बेलवडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे
कोविड कंपनी बोगस असल्याचं पुणे आयुक्तांनी मान्य केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. आता या कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही ते म्हणाले.
Pune Latest News : कोविड कंपनी बोगस असल्याचे आयुक्तांनी मान्य केलं, किरीट सोमय्या यांचा पुण्यात दावा
नांदेडमध्ये एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शनकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर प्रत्येकाने काय कपडे परिधान करायचे याचे स्वातंत्र्य आहे , त्यामुळे हिजाबला विरोध कशासाठी असा सवाल करत हे आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान हिजाब आमचे कवचकुंडल असून ते आमचे बुलेट प्रूफ जॅकेट असल्याचे मुस्लिम महिलांनी म्हटलंय.
नांदेडमध्ये एमआयएम पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी निदर्शनकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर प्रत्येकाला कुठले कपडे परिधान करायचे याचे स्वातंत्र्य आहे ,त्यामुळे हिजाब ला विरोध कशासाठी असा सवाल करत हे आंदोलन करण्यात आलंय.
विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार आहेत. शक्ती कायदा आणि 12 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून राज्यपालांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय. राज्यपालांच्या भेटीनंतर सात वाजता या संबंधी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
Gondia News : गोंदिया शहरातील हॉटेल एवरग्रिनमध्ये गुरुवारी रात्री एका प्रेमी युगुलाने विष प्राशन करत आत्महतेचा प्रयत्न केला. पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. रोहीणी पवार (21 वर्षीय) आणि आकाश छेतिया (22 वर्षीय) असं या दोघांची नावं आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
किरिट सोमय्यांचा पुणे महापालिकेच्या पायर्यांवर सत्कार करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. त्याचबरोबर महापालिकेत फक्त नगरसेवकांना सोडणार . भाजपच्या नगरसेवकांव्यतिक्त इतर कार्यकर्त्यांना महापालिकेत सोडणार नाहीत. सोमय्यांचा सत्कार पायर्यांवर न करता बंदिस्त सभागृहात किंवा ईमारतीत करावा अशी पोलीसांची भुमिका. पुणे महापालिकेसमोर पचलीसांचा मोठा बंदोबस्त
राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड सुनावन्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडूंना पडले महागात पडले आहे. चांदूरबाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये केली होती तक्रार.
Amaravati Bachhu Kadu : राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाचा सुनावला निर्णय. लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अनवये गुन्हा सिद्ध.
रविना टंडनचे वडील दिग्दर्शक रवी टंडन यांचं निधन. ते ८६ वर्षांचे होते. अमिताभचा खुद्दार, राजेश खन्नाचा नजराणा, शशी कपूरचा एक मैं और एक तू अशा अनेक सिनेमाचं दिग्दर्शन.
राज्यातील सर्वात मोठी मिरची बाजार समिती आसलेल्या नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या भावात पुन्हा तेजी आली आहे. बाजार समितीतील मिरची हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत बाजार समितीने 1 लाख 65 क्विंटल मिरची खरेदीचा टप्पा पार केला आहे. बाजार समितीत मिरचीची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली आहे. ओली लाल मिरचीला 7 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर कोरडी लाल मिरचीने 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. बाजार समितीत अजून एक महिना हंगाम सुरू राहील. यावर्षी बाजार समिती मिरची खरेदीचा 2 लाखांचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.
श्रीगोंदा, अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकीचे तापमान वाढून फुटल्याने जवळपास 4 हजार टन मळी वाहून गेल्याची घटना घडली... टाकीचा झालेला स्फोट एवढा भीषण होता, की टाकीच्या शेजारची संरक्षक भिंत पडली...सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही...या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.कारखान्याशेजारील शेतात ही मळी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्यात.
नांदेड :दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील काही रेल्वे ट्रफिक ब्लॉकमुळे अंशतः रद्द
अंकाई ते अंकाई किला दरम्यान यार्ड नवीनीकरण कार्य पूर्ण करण्याकरिता ट्रफिक ब्लॉक घेण्यात आला आहे, या ब्लॉक मुळे काही रेल्वे रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे ---
1. रद्द करण्यात आलेल्या गाड्या :-
अनु क्र. गाडी संख्या कुठून –कुठे गाडी सुटण्याचा दिनांक
1 11409 पुणे-निझामाबाद 11.02.2022 to 13.02.2022
2 11410 निझामाबाद - पुणे 11.02.2022 to 13.02.2022
3 12071 मुंबई सी.एस.टी. –जालना 12.02.2022 & 13.02.2022
4 12072 जालना-मुंबई सी.एस.टी. 13.02.2022 & 14.02.2022
2. अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :-
अनु क्र. गाडी संख्या कुठून –कुठे गाडी सुटण्याचा दिनांक स्टेशन दरम्यान रद्द
1 17064 सिकंदराबाद-मनमाड 12.02.2022 आणि 13.02.2022 नगरसोल-मनमाड
2 17063 मनमाड-सिकंदराबाद 13.02.2022 आणि 14.02.2022 मनमाड-नगरसोल
3 07777 हुजूर साहिब नांदेड-मनमाड 10.02.2022 ते 13.02.2022 औरंगाबाद-मनमाड
4 07778 मनमाड-हुजूर साहिब नांदेड 11.02.2022 ते 14.02.2022 मनमाड-औरंगाबाद
Pune Kirit Somaiya Tour Update : मागील आठवड्यात किरीट सोमय्या यांच्यासोबत पुणे महानगरपालिका धक्काबुक्की झाली होती.. त्यानंतर यावरून मोठे राजकारण रंगलं होतं.. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना अटक केली होती.. दरम्यान किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यावर रोखण्यात आलं होतं. त्याच पायऱ्यावर आज त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने सत्कार केला जाणार आहे.. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे.. आज सायंकाळी चार वाजता जरी हा कार्यक्रम होणार असला तरी सकाळपासूनच पुणे महानगरपालिकेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय.. पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारामधून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच त्याला आत प्रवेश दिला जातो
Maharashtra Nashik Yeola News : येवला तालुक्यातील चिंचोडी बुद्रुक येथील जवान नारायण निवृत्ती मढवई हे कामावरून परत येत असताना अपघात झाल्याने त्यांना वीरमरण आले,ते42 अरमौर्ड रेजिमेंट,हिस्सार हरियाणा येथे कार्यरत होते,काल रात्रीच्या वेळी त्याच्या अपघात झाला होता,त्याच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे
Pandharpur : माघी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या हजारो भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करता येणार आहे.. कारण चंद्रभागा पात्रातील खराब पाणी सोडून देण्यास सुरुवात करण्यात आलीय.. चंद्रभागेच्या पाण्यात स्नान केल्यानंतर त्वचेचे विकार होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या होत्या. ABP माझाने यासंदर्भात बातमी दाखवली होती. माझाच्या बातमीनंतर आता प्रशासनाला जाग आलीय. सध्या गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी चंद्रभागेत सोडलं जात असल्याने भाविकांना आता स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे.
Shaktimaan Movie : सुपरमॅन, बॅटमॅन, अॅव्हेंजर्स यासारख्या हीरोंनी आपल्या टीव्हीवर प्रवेश केला नव्हता त्या काळी एकाच हिरोचा भारतात बोलबाला होता. तो म्हणजे शक्तीमान... भारताचा हा सूपरहीरो शक्तीमान आता परत येतोय...आणि हो छोट्या पडद्यावर नव्हे तर मोठ्या पडद्यावरून तो आपल्या आठवणी ताज्या करणार आहे. सोनी पिक्चर्स आणि मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंडरनॅशनल यांनी एकत्र येत शक्तिमान हा चित्रपट बनवण्याची घोषणा केलेय.
कर्नाटक पासून सुरुवात झालेल्या हिजाब वादाचे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पडसाद बघायला मिळत असून नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लिम महिला काल आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं. दुपारी अजीज कल्लू मैदानावर हजारोंच्या संख्येने महिला एकवटल्या होत्या. आणि याच प्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात आयोजक असलेल्या जमयते उलेमा-ए-हिंद संघटनेशी संबंधीत 4 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनापरवानगी मेळावा आयोजन करणे गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच या महिलांना मेळाव्यात मार्गदर्शन करणारे मालेगाव मध्यचे एममायएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना नोटीसही बजावण्यात आलीय. मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर मालेगावात अतिरिक्त आणि चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी इथे तळ ठोकून आहेत. न्यायालयाचा मान ठेवत शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून मालेगावकरांना करण्यात येतंय
Kolhapur News Update : कोल्हापूरच्या उत्तूर- आजरा मार्गावर बर्निंग कारचा थरार, आजरा तालुक्यातील मसोली जवळील घटना, एस यु व्ही गाडीने घेतला अचानक पेट, गाडी जालना जिल्ह्यातील, चौघे जण बचावले
Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 14 फेब्रुवारीला सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , शरद पवार, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत. पुतळ्याच्या अनावरणाचा हा कार्यक्रम 3 जानेवारीला सावित्रीबाईंच्या जयंतीला होणार होता. परंतू राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी वेळ न दिल्याने तो पुढे ढकलण्यात आला होता. सावित्रीबाईंचा हा पुतळा पुण्याचे शिल्पकार संजय परदेशी यांनी तयार केला आहे. कोविडमुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल.
अहमदनगरच्या पाथर्डीजवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला गुरुवारी सायंकाळी आग लागून सुमारे 30 एकर ऊस जळून नुकसान झाला आहे. तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. मजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठी असल्याने त्यांनी देखील शेताबाहेर पळ काढला. या आगीने तनपुरेवाडी येथील शेजारी शेजारी असलेल्या 10 शेतातील उसाने पेट घेतला आणि मोठं नुकसान झालं आहे. काही वेळातच पाथर्डी नगर परिषदच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या त्यांना देखील आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे तीन तास लागले. तोपर्यंत जवळपास 30 एकर वरील ऊस जळाला आहे. या आगीत 10 शेतकऱ्यांच्या उसाचं मोठं नुकसान झालं असून सरकारने पंचनामे करून मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Malegaon Nashik News Breaking : मालेगावमधील हिजाब समर्थनार्थ महिला एकवटल्याचे प्रकरण; पवारवाडी पोलिस ठाण्यात आयोजक असलेल्या जमाते उलेमा-ए-हिंद संघटनेशी संबंधित 4 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, विनापरवानगी मेळावा आयोजन, गर्दी जमावल्याचा आरोप , आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना बजावली नोटीस, पोलिसांकडून शांततेचं आवाहन
आज सकाळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी वाहनाचे सारथ्य आदित्य ठाकरेंनी केलं.
Hijab Row : शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक पोशाख नको, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयानं केली असली तरी हिजाब प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. त्याआधी काल मालेगावातल्या मैदानात हजारो महिलांनी एकत्र येऊन हिजाबचं समर्थन केलं. या मेळाव्यात मौलानांनी महिलांना मार्गदर्शन केलं. आज हिजाब दिनानिमित्त हिजाब परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय या महिलांनी जाहीर केलाय. दुसरीकडे जालन्यातही काल मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. या मोर्चात शेकडो मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या.
Buldana News : बुलढाणा शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. कर्नाटकात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लीम मुलींच्या हिजाबवर बंदी घालण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात आज मोर्चा, निदर्शने आणि आंदोलनाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत.
Ahmednagar News : अहमदनगरच्या पाथर्डी जवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला गुरुवारी सायंकाळी आग लागून सुमारे 30 एकर ऊस जळून नुकसान झाला आहे. तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठी असल्याने त्यांनी देखील शेताबाहेर पळ काढला. या आगीने तनपुरेवाडी येथील शेजारी शेजारी असलेल्या 10 शेतातील उसाने पेट घेतला आणि मोठं नुकसान झालं आहे. काही वेळातच पाथर्डी नगर परिषदच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या त्यांना देखील आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे तीन तास लागले. तो पर्यंत जवळपास 30 एकर वरील ऊस जळाला आहे. या आगीत 10 शेतकऱ्यांच्या उसाच मोठं नुकसान झालं असून सरकारने पंचनामे करून मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Petrol-Diesel Price Today 11th February 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आजच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसून तब्बल तीन महिन्यांपासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या तीन महिन्यांपासून मात्र पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तसेच निवडणुकांनंतर मात्र पुन्हा एकदा देशात पेट्ररोल-डिझेलचा भडका उडणार असल्याचंही बोललं जात आहे.
देशातील चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.
Paper Leak : शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळासमोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काहींना अटक केली होती. त्यानंतर आता आरोग्य विभाग गट 'ड' परीक्षा पेपरफुटीच्या तपासाला आणखी वेग आला आहे. पुणे पोलिसांनी या पेपरफुटीसंदर्भात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अर्जुन भरत राजपूत असे असून त्याला औरंगाबादमधून अटकत करण्यात आली. आरोपी अर्जुन राजपूत हा औरंगाबाद येथे म्हाडा परीक्षेसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अर्जुन राजपूत याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
रामदास आठवलेंनी घेतला शशी थरुर यांचा इंग्रजीचा क्लास, मजेदार ट्वीट्स व्हायरल
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांची इंग्रजीतील चूक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पकडली. रामदास आठवले यांनी लक्षात आणून दिलेली चूक शशी थरूर यांनी मान्य केली. मात्र, त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही चिमटा काढला आहे. शशी थरूर आणि रामदास आठवले यांच्यात झालेल्या संवादाचे ट्वीटस व्हायरल झाले आहेत.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्वीट करताना फोटो पोस्ट केला होता. या फोटोत अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना दिसत आहे. त्याच वेळेस त्यांच्या मागे बसलेले रामदास आठवले यांनी भावमुद्रा ही निर्मला सीतारमण आश्चर्यजनक सांगत असल्यासारखी होती. त्यावर शशी थरूर यांनी ट्वीट केले आहे. शशी थरूर यांनी म्हटले की, अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर केंद्रीय मंत्र्यांनादेखील विश्वास वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगून जात असल्याचे थरूर यांनी म्हटले.
TET घोटाळ्यानंतर आरोग्य पेपरफुटी प्रकरणाला वेग; आणखी एका आरोपीला अटक
Paper Leak : शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळासमोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काहींना अटक केली होती. त्यानंतर आता आरोग्य विभाग गट 'ड' परीक्षा पेपरफुटीच्या तपासाला आणखी वेग आला आहे. पुणे पोलिसांनी या पेपरफुटीसंदर्भात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अर्जुन भरत राजपूत असे असून त्याला औरंगाबादमधून अटकत करण्यात आली. आरोपी अर्जुन राजपूत हा औरंगाबाद येथे म्हाडा परीक्षेसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अर्जुन राजपूत याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पेपरफुटीच्या म्होरक्याला अटक
आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या सायबर पोलीसांच्या हाती लागला. अतुल प्रभाकर राख असे गुरुवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल राख हा याआधीच अटकेत असलेला आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याची पेपरफुटी प्रकरणातील संबंधित सर्व कामे अतुल राख करायचा. अतुल राखला पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. या पेपरफुटीमुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत काही आरोपींना अटक केली असून काहींचा शोध सुरू आहे. आरोग्य भरतीच्या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. या प्रकरणात केवळ संजय शाहुराव सानप याला पोलिसांनी गजाआड केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -