Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यभरातील ताज्या अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जेष्ठ साहित्यिक एम. जे. भगत हे गुरुवारी रात्री पंढरपूरमध्ये भीक मागताना निराधार आणि दयनीय अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रात्री सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
विधानसभेत भाजप आमदारांनी आक्रमक होत वेलमध्ये उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहाचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
एसटी विलीकरणाचा प्रश्न अजुनही रखडणारच का असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, 'आज परिवहन मंत्री अनिल परब एसटी प्रश्नावर विधानपरिषदेत निवेदन करणार आहेत. सातवा वेतन आयोग, आणि विलिनीकरणसदृश्य फायदे एसटी कर्मचाऱ्यांना मिळावेत अशी मागणी काल विधानपरिषद सभापतींच्या बैठकीत केली गेली. मात्र, अर्थखाते परिवहन विभागाला निधी देण्याबाबत अनुकुल नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या अर्थखात्यानं मदतीचा हात दिल्याशिवाय एसटी प्रश्नाचा तिढा सुटणार नसल्याचं चित्र आहे. विलिनीकरणाचा लढा न्यायालयात सुरुच राहील'
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गी लाव्हरोव्ह आणि युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांची तुर्कीत बैठक सुरु आहे. रशिया-यूक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरु झाल्यापासून दोन्ही देशांदरम्यानची पहिली उच्च स्तरीय बैठक असून दोन्ही देशांमधील चौथी बैठक आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची बदली करण्यात आली आहे. सुरज मांढरे यांची शिक्षण आयुक्त पदावर बदली करण्यात आली असून उपसचिव पदावर कार्यरत असणारे गंगाधरण यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
MPSC : अंजनडोहमधील अश्विनी बाळासाहेब धापसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत राज्यातून एनटी क मुलींमधून राज्यात प्रथम क्रमांकाने यश मिळविले आहे. या यशामुळे तिचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे.
आई वडील निरक्षर, शिक्षण देऊन मुलीला नोकरी लावायची एवढे स्वप्न. काहीही करून मुलीला स्वतःच्या पायावर उभा करायचे स्वप्न मेंढपाळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या आई वडिलानी बघितले होते. आता ते स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळतंय.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Election Result 2022 : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत.
देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं.
पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, एक्झिट पोलमधून उत्तराखंड आणि गोव्यात चुरशीच्या शर्यत पाहायला मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बहुतेकांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि यूपी आणि मणिपूरमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्हीवर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.
'संजय राऊत किती बोलतात, काय बोलतात, सगळ्याची एक अॅक्शन असते. चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय' अशी संजय राऊतांची खिल्ली मनसे प्रमुख राज ठाकरे उडवली आहे. मनसे आज आपला 16 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यावेळी ते बोलत होते. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पु्ण्यामध्ये वर्धापनदिन साजरा करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे."
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे आपलं यश आहे. या 16 वर्षात लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, ही 16 वर्षे आपली कमाई आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -