Maharashtra Breaking News 10 August 2022 : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता थेट 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Aug 2022 11:24 PM
बीडी पिण्याच्या सवईने घेतला,माय लेकरांसह बापाचा जीव

कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या  सवईमुळे पूर्ण कुटुंबच संपल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय,ज्यात बीडी पितांना, आग पेटीची काडी पीक  फवारणीच्या पेट्रोल टॅंक मध्ये पडून एकाच घरातील तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय.दरम्यान या घटनेत पेट्रोलचा भडका उडाल्याने एकाच घरातील आई, वडील व मुलगा यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना सात ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडलीय. उपचारा दरम्यान या तिघांचाही नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात आज मृत्यू झालाय.याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

कल्याण डोंबिवलीत दोन महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे ४८ रुग्ण ,दोन जणांचा मृत्यू ..

ल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढत आहेत .तर स्वाईन फ्ल्यूची रूग्नसंख्या वाढत असून जूनपासून आजमितीला स्वाईन फ्ल्यूचे ४८ रुग्ण आढळले असून ८५ वर्षीय पुरुष व ५२ वर्षीय महिला या २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण सहव्याधिग्रत होते. ४८ मधील २४ रुग्ण बरे होवून घरी परतले असून २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने जनजागृती मोहीम हाती घेतली असून सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास स्वतःला आयसोलेट करावे, गर्दीत जाऊ नये तसेच मास्कचा वापर करावा व ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला...बावनथडी नदी ओवर फ्लो झाल्याने महाराष्ट्र - मध्यप्रदेश यांच्या बपेरा जवळ संपर्क तुटला.

महाराष्ट्र -मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला.अखेर तुमसर तालुक्यातुन वाहनारी बावणथड़ी नदी ओवर फ्लो झाल्याने तुमसर तालुक्यातिल बपेरा येथे महाराष्ट्र - मध्यप्रदेश जोड़नाऱ्याला पुलावरुन पाणी वाहु लागले आहे।त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता हा मार्ग जिल्हा प्रशासनने बंद केल्याने  महाराष्ट्र - मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला आहे।त्यामुळे भंडारा वरुण बपेरा मार्ग मध्यप्रदेशाच्या जाणाऱ्या विचार करीत असाल तर पाण्याची स्थिति लक्षात घेता प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

मातोश्री वर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट





माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि सुनील तटकरे मातोश्री येथे दाखल झाले आहेत.ही एक सदिच्छ भेट असल्याचे सांगितले गेले असले तरीही नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच भेट होत आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि नवीन सरकार मधील अंतर्गत वाद-विवाद या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होते आहे.

 

 





















मोहरम विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवल्याने गुन्हा दाखल

अहमदनगर येथे मोहरम विसर्जन मिरवणुकीत विनापरवाना जास्त आवाजात डीजे वाजवल्याने डीजे मालक आणि जामा मस्जिद यंग पार्टी मंडळाचे अध्यक्षावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...जामा मस्जिद यंग पार्टी मंडळाचे अध्यक्ष आवेज निसारअहमद शेख आणि डिजेचे मालक विवेक सुभाष खोमणे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय...अहमदनगर शहरातील जुन्या कोर्टाच्या मागे जामा मस्जिद यंग पार्टी मंडळच्या अध्यक्षांनी शरबत वाटपाची परवानगी मागितली होती..त्यावेळी डीजे लावण्यात आला होता...डीजेच्या डेसिबलवर निर्बंध असताना मोठ्या आवाजात डीजे लावण्याने डीजे मालकावर  गुन्हा दाखल करण्यात आलाय...याबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश खामकर यांनी फिर्याद दिलीये.

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करा;खासदार भावना गवळी यांची मागणी
 यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. अनेक भागात पुरामुळे शेती खरडून गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने दिलासा देण्यासाठी

खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विदर्भाला विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी केली आहे.

 


यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातील यवतमाळ व वाशीम जिल्हयामध्ये गेल्या आठ दिवसापासून कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला.  त्यामुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पीके पाण्याखाली गेली असून बऱ्याच ठिकाणी पुरामुळे शेकऱ्यांच्या जमीनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे  दोन्हीही जिल्हयातील शेतकरी हवालदील झालेला असून शेतकन्यांना शासकीय मदतीची अत्यंत आवश्यक्ता आहे.

 

तरी नैसर्गीक प्रकोपामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेती नुकसानाचे कृषी व महसूल विभागाकडून सर्वेक्षण करून शासनाकडून नुकसान भरपाई म्हणुन विशेष पॅकेज जाहीर करून त्वरीत आर्थीक मदत उपलब्ध करून दयावी व पीक विमा योजना कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात यावे अश्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणीचे पत्र देऊन केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सणांच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या सणांच्या माध्यमातून आपण निसर्ग, मानवी नातेसंबंध आणखी दृढ व्हावेत‌. त्यातून आपण सर्व समृद्धीकडे वाटचाल करूया,असा विश्वासही व्यक्त केला आहे.


मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, समुद्राला जीवलगाप्रमाणे जीव लावणारे आपले कोळी बांधव  "नारळी पौर्णिमा" सण उत्साहात साजरा करतात, ही एक निसर्गपूजाच आहे. त्यांचे समुद्राशी अतूट नाते आहे. तर रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याला आणखी दृढ करणारा, त्यामध्ये गोडवा वाढवणारा सण आहे. या दोन्ही सणांच्या माध्यमातून निसर्गाशी असलेले आपले नाते आणि मानवी नातेसंबंध दृढ व्हावेत. अशा क्षणांतून आपण एकमेकांशी असलेले प्रेम आणि विश्वासाचे नाते वृद्धींगत करूया, समृद्धीकडे वाटचाल करूया अशा मनापासून शुभेच्छा.'

ब्रेकिंग: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता थेट 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. 12 ऑगस्टला होणारी सुनावणी सुप्रीम कोर्टात दहा दिवसांनी लांबणीवर गेली आहे. आता याप्रकरणी थेट 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

Maharashtra Cabinet : आज संध्याकाळी खातेवाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर खाते वाटप, पालकमंत्री आणि कोणाला कोणता बंगला द्यायचा यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. 


मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकारी बाहेर आले आता मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू.


आज संध्याकाळी खातेवाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

नाशिकमध्ये पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत खेळत असताना तोल जाऊन दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Nashik News : पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत खेळत असताना तोल जाऊन खाली रस्त्यावर पडल्याने एका 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली. पवननगर परिसरातील साईज्योत अपार्टमेंटमध्ये खैरनार कुटुंब वास्तव्यास असून रविवारी (7 ऑगस्ट) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील 18 महिन्यांची चिमुकली समृद्धी ही बाल्कनीत खेळत असतानाच तिचा तोल गेला आणि ती थेट खाली कोसळली. या घटनेनंतर तिला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने रात्रीच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खैरनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमडळ विस्तारानंतर पहिलीच कॅबिनेट थोड्याच वेळात, सर्व मंत्री मंत्रालयात दाखल

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज पहिलीच कॅबिनेट मीटिंग होणार आहे. त्यासाठी सर्व मंत्री मंत्रालयात पोहोचले असून थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 

खड्ड्यांविरोधात वसई-विरार महापालिकेवर मनसेचा मोर्चा, उपायुक्तांना खड्ड्यांची फोटो फ्रेम भेट

Vasai Virar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज वसई विरार शहर महानगरपालिकाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डयाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. या खड्डयांमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच महापालिकेच्या विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे. गणेशोत्सवालाही आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे गणेशोत्सावाआधी वसई-विरारमधील रस्ते खड्डे मुक्त करण्याची मागणी मनसेने केली आहे. यावेळी उपायुक्तांना मनसेने खड्डयांची फोटो फ्रेम ही दिली आहे. 

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी सोमय्या पितापुत्रांना हायकोर्टाचा दिलासा, सोमय्यांची अटकपूर्व जामिनाची याचिका हायकोर्टाने निकाली काढली

आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या पितापुत्रांना हायकोर्टाचा दिलासा


तूर्तास आर्थिक घोटाळा केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, मुंबई पोलिसांची हायकोर्टात कबुली


किरीट आणि नील सोमय्या यांना अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस देणं आवश्यक - हायकोर्ट


सोमय्यांची अटकपूर्व जामिनाची याचिका हायकोर्टाने निकाली काढली


मुंबई पोलिसांसमोर चौकशीकरता हजर राहण्याचं नवं समन्स जारी होणार


किरीट सोमय्यांची 17 ऑगस्ट तर नील सोमय्यांची 18 ऑगस्टला पुन्हा होणार चौकशी

शहरी नक्षलवाद प्रकरण, आरोपी वरवरा राव यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

Kolhapur Rains : राधानगरी धरण 100 टक्के भरलं

Kolhapur Rains : एकीकडे राज्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब होऊन पूरस्थिती निर्माण झाली असताना धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे काही धरणं भरली असून काही धरणं भरण्याच्या वाटेवर आहेत. यातच कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण (Radhanagari Dam) 100 टक्के भरलं आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरल्याने कोल्हापूरकरांच्या (Kolhapur) पाण्याची चिंता मिटली आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Rains : कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. मुंबईसह परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच दुसरीकडे राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त हुकणार?

Buldhana News : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण येत्या 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा देखील मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. राज्यातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि समृद्धी महामार्गाचं काही पॅकेजेसमध्ये अजूनही अपूर्ण असल्याच्या बाबींचा हवाला देत ही माहिती समोर आली आहे. मात्र सरकार आणि MSRDC कडून या महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, कधीही तारीख जाहीर होऊ शकते असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा देण्यात आलेला तिसराही मुहूर्त पुढे ढकलला जाऊ शकतो अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार आल्या आल्या 15 ऑगस्ट ही तारीख जवळपास निश्चित झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याबाबतीत आता सरकार नवीन तारीख जाहीर करते किंवा घाईघाईत लवकरच लोकार्पण करत हे पाहणे महत्त्वाचे आहे

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...


Maharashtra Cabinet Expansion : कोणी एकदा, तर कोणी तीनदा पक्ष बदलला! शिंदे-फडणवीस सरकारमधील 6 मंत्र्यांची फिरती राजकीय निष्ठा न्यारीच! 


Maharashtra Cabinet Expansion : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून फक्त 2 जणांवर कारभार चाललेल्या राज्यातील शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे तब्बल 40 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्याला किमान 20 जणांचे मंत्रिमंडळ मिळाले आहे.


आज राजभवनात शपथविधी पार पडला. यामध्ये भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  


18 पैकी 6 मंत्र्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली तेच भाजपमध्ये नेते सामील झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या चौकशीचे पुढे भाजपमध्ये जाऊन काय होते? याचे उत्तर कधीच मिळत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांनी सुद्धा भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची चौकशी सुरुच ठेवली का? याचेही कधीच प्रामाणिक उत्तर दिलेलं नाही.


राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा प्रवास
विखे पाटील घराण्याला मोठा सहकार आणि राजकीय वारसा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांना पहिल्यांदा शपथ देण्यात आली. त्यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. जवळपास सहा मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी काम केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सक्षम जबाबदारी पार पाडण्याऐवजी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता. 


मनोधैर्य योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष, मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची संख्या कमी, चित्रा वाघ यांचे आरोप


बलात्कार पीडित महिला तसेच लैंगिक छळाच्या प्रकरणातील अल्पवयीन मुलींना त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा जीवनात उभारी घेता यावी, या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकार गेले अनेक वर्षांपासून मनोधैर्य योजना राबवीत आहे. मात्र गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेकडे सरकारचा दुर्लक्ष होत आहे का अशी शंका निर्माण झाल्याचे सांगत भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात आघाडी सरकारवर आरोप केले आहे. काय म्हणाल्या चित्रा वाघ?


शासन पातळीवर निधी मिळत नव्हते
एका बाजूला बलात्कार तसेच लैंगिक छळाच्या घटना वाढत असताना वर्षागणिक मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची आणि मुलींची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेमध्ये मदत मिळवून नव्याने जीवन सुरू करणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेतली तर सातत्याने निधी मिळवणाऱ्या पीडितांची संख्या खाली घसरत असल्याचे दिसून येते. वर्ष 2014-15 मध्ये मनोधैर्य योजनेत निधी मिळवणाऱ्या महिलांची संख्या 2 हजार 502 होती. ती वर्ष 2019-20 पर्यंत 462 पर्यंत खाली आली आहे. असं सांगत चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.