Maharashtra Breaking News 9 May 2022 : पंजाबच्या मोहालीत इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीत स्फोट

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 May 2022 10:41 PM
पंजाबच्या मोहालीत इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीत स्फोट

मोहालीत इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीत स्फोट झाला आहे. रॉकेटसारखी वस्तू पडल्याची शक्यता आहे. स्फोटामुळे बिल्डींगमधील काचा तुटल्या असून रॉकेटसदृश्य वस्तू पडल्यानंतर स्फोट झाल्याची माहिती  मिळली आहे.

Maharashtra News : 18 मे पासून मंत्रालयात पास धारकांना मिळणार प्रवेश

Maharashtra News : मंत्रालयात 18 मे पासून मंत्रालयात पास धारकांना  प्रवेश मिळणार आहे. कोविडच्या कारणास्तव 16 मार्च 2020 पासून सर्वसामान्यांना मंत्रालयात येण्यास  बंदी केली होती. कोविडचा संसर्ग कमी झाल्यानं राज्य सरकारचा निर्णय घेतला आहे

Bandra Fire : वांद्र्यातील जीवेश इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

वाद्र्यातील जीवेश इमारतीच्या 13 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली असून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या पोहोचल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही इमारत शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याशेजारी आहे. 

Bandra Fire : वांद्रे येथील 21 मजल्याच्या इमारतीला भीषण आग

वांद्र्यातील शाहरूख खानच्या इमारतीजवळील जीवेश इमारतीला आग लागली आहे.  21 मजली ही इमारत असून 13 व्या मजल्यावर  आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. 7.41 च्या सुमरस ही आग लागली आहे. 

Solapur News Update : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ येथे तीन लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू  

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शेटफळ येथे सायंकाळी तीन लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.  

Ulhasnagar News Update : उल्हासनगरमधील मोबाईल दुकान फोडून 18 लाख 72 हजारांचे मोबाईल लंपास, दोन तासांत चोरट्यांना अटक करून काढली धिंड 

उल्हासनगरमधील मोबाईल दुकान फोडून 18 लाख 72 हजारांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. परंतु, पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चोरट्यांना अटक करून त्यांची धिंड काढली. 

Asani Cyclone : असनी चक्रीवादळाचा परिणाम कोकणातही, सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी पाऊस

असनी चक्रीवादळाचा परिणाम कोकणातही जाणवू लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला तर सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण  आहे. पुढील दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला आहे. 

Navneet Rana : राणा दाम्पत्य लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला

Navneet Rana : राणा दाम्पत्य लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला दिल्लीला गेले आहेत. 



Bacchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी 11 मेपर्यंत पुढे ढकलली 

राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी 11 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अकोला जिल्हा न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर अकोला न्यायालयाच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलिसांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  

गांधीवादाने देशाची, महाराष्ट्राची फसवणूक केली : अॅड. गुणरत्न सदावर्ते

गांधीवादाने देशाची, महाराष्ट्राची फसवणूक केली आहे. देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा गांधीवादी राजकारण्यांचा प्रयत्न आहे असे अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची 2021-22 या आर्थिक वर्षात लक्षणीय कामगिरी, 1402 कोटींचा ढोबळ तर 602 कोटींचा निव्वळ नफा
देशातील कित्येक खाजगी बँका तसेच वित्त संस्था अडचणीत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षात लक्षणीय कामगिरी केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात राज्य सहकारी बँकेने 1402 कोटींचा ढोबळ नफा तर 602 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेचा एनपीए 0 टक्के असून प्रोविजन कवरेज रेशो 100 टक्के इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे बँकेची गेल्या आर्थिक वर्षातील उलाढाल 47028 कोटी इतकी राहिली आहे. ही गेल्या 111 वर्षांतील उच्चांकी उलाढाल आहे. सहकारी संस्थांना आर्थिक साहाय्य करण्याबरोबरच राज्य सहकारी बँक रिटेल व्यवसायात देखील उतरली आहे. बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाची पुनर्बांधणी करुन त्या कारखान्यांना जीवदान देखील दिलं आहे. राज्य सहकारी बँकेची आर्थिक वर्षातील कामगिरी देशातील खाजगी बँका पेक्षाही सरस असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केला आहे. देशातील सहकार टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सहकार बँकेचा ताळेबंद आदर्श मॉडेल ठरु शकतो अशी अपेक्षा त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 
Maharashtra News : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण, लवकरच निकाल जाहीर होणार

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण, निकाल तयार करण्याचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती. 10 जून पर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल, तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत निकाल जाहीर करणार असल्याची बोर्डाची माहिती. 



 



 

परभणीत निकृष्ट दर्जामुळे परभणीतील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधलेले 10 पैकी 7 भव्य पिलर पाडले

Parbhani News : परभणी शहरातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधण्यात आलेले भव्य असे सात पिलर पाडण्यात आले आहेत. कंत्राटदाराने या पिलर बांधकामात जे साहित्य वापरले ते साहित्य रेल्वेच्या निकषातील दर्जाचे नसल्याने रेल्वेच्या अभियंत्यांनी 10 पैकी जे 7 पिलर दर्जेदार झाले नाहीत ते पाडण्याचे आदेश दिल्याने हे पिलर पाडण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अगोदरच या उड्डाणपुलाचं काम संथगतीने सुरु आहे, त्यातच पुलाचे पिलरही दर्जेदार बांधले गेलेले नाहीत. त्यामुळे हे पिलर पाडून पुन्हा नव्याने उभारणी करण्यात येणार असल्याने हा उड्डाणपूल केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

'जितो' या तीन दिवसीय व्यापारी मेळ्यात पुणेरी पगडी घालून शरद पवारांचा सत्कार

Pune News : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो या तीन दिवसीय व्यापारी मेळ्याचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या या व्यापारी मेळ्यात सहभागी झालेल्या उद्योजक आणि राजकारण्यांना पुणेरी पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नवीन उद्योजकांना प्राईड ऑफ पुणे हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शरद पवारांनाही पुणेरी पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. मागे शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात पुणेरी पगडी वापरु नये, असा सल्ला दिला होता. त्यामुळे शनिवारी स्वत: शरद पवारांनाच पुणेरी पगडी घातल्याने त्याची लगेच चर्चा सुरु झाली. याच कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी उद्योजक गौतम अदानी हे आपले मित्र असल्याच सांगत त्यांच कौतुक केले. 

Navneet Rana Bail Maharashtra News : राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाकडून नोटीस, जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारचा कोर्टात अर्ज

जामीनासाठी असलेल्या अटींचा भंग झाल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. या अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे

Anil Deshmukh Maharashtra News : अनिल देशमुखांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची गरज नाही. देशमुखांच्या अर्जाला ईडीचा मुंबई सत्र न्यायालयात विरोध

अनिल देशमुखांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची गरज नाही. अनिल देशमुखांच्या अर्जाला ईडीने मुंबई सत्र न्यायालयात विरोध केला आहे.,  अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना खांदेदुखीचा त्रास आहे. या खांदेदुखीवर सर्जरीची आवश्यकता असल्याची देशमुखांच्या वकिलांनी कोर्टात म्हटले. 

Amravati News : इंधन दरवाढ विरोधात महिला काँग्रेसचं अनोखं आंदोलन, महिलांकडून उपहासात्मक श्रद्धांजली

Amravati News : इंधन दरवाढ विरोधात महिला काँग्रेसकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. राजकमल चौकात महिलांचा उपहासात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली. महाग झालेल्या गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलला श्रद्धांजली आणि लाकडाच्या मोळीची पूजा करण्यात आली

Railway Platform Ticket : आजपासून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

Railway Platform Ticket : मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ झाली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ही दरवाढ आजपासून 23 मे 2022 दरम्यानच्या 15 दिवसांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत 10 रुपयांऐवजी 50 रुपये इतकी असणार आहे. एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या 332 घटना घडल्या. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील खोजनवाडी गावात जबरी चोरी, चोरट्यांकडून सोन्याच्या दागिन्यांसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास
Sangli News : जत तालुक्यातील खोजनवाडी इथे जबरी चोरी  झाली. घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत चिदानंद सिदाप्पा संती यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रविवारी पहाटे ही घटना घडली. फिर्यादी चिदानंद संती यांचे कुटुंबीय शनिवारी रात्री जेवण करुन अकरा वाजता झोपी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घर फोडून कपाटातील दर साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र, चार तोळ्यांचे गंठण, पाच ग्रॅमची अंगठी, नेकलेस, दोन तोळ्यांची कर्णफुले, एक तोळ्याचे सोन्याचे 20 मणी ECf दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला. दरम्यान, पहाटे शेतीच्या कामासाठी चिदानंद संती उठले. त्यावेळी त्यांच्या स्वयंपाक खोलीचा दरवाजा कटावणीने तोडलेला दिसला. कपाटातील सर्व साहित्य विस्कटलेले दिसले. यानंतर चोरीची माहिती त्यांनी जत पोलिसांना दिली. 
मुंबईत 20 ठिकाणी एनआयएची छापेमारी, दाऊदशी संबंधित अनेक जणांवर एनआयएचे छापे

भोंगे हटवण्यासाठी हिंदू संघटना आक्रमक, बेळगावात मंदिरात हनुमान चालीसा, मंत्रपठण
Belgaum News : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थना स्थळावरील भोंगे हटवावेत या मागणीसाठी कर्नाटकात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून आज पहाटे बेळगावातील मंदिरात ध्वनिक्षेपक लावून हनुमान चालीसा आणि मंत्रपठण करण्यात आलं. सोमवारी सकाळपर्यंत प्रार्थना स्थळावरील भोंगे हटवा वेत अन्यथा मंदिरावर ध्वनिक्षेपक लावून हनुमान चालीसा आणि मंत्रपठण करण्याचा इशारा श्री राम सेना आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता. सोमवारी सकाळी बेळगावातील आरटीओ सर्कलमधील हनुमान मंदिरात श्री राम सेनेचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी मंदिरात आरती करुन हनुमान चालीसा आणि मंत्रपठण करण्यात आले. प्रार्थना स्थळावरील भोंगे हटवले नाही तर मंदिरात दिवसातून तीन वेळा मंत्रपठण करण्याचा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे.
हिंगोलीत शॉर्ट सर्किटमुळे धान्याचे कोठार जळून खाक, दोन शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान

Hingoli News : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील भानखेडा गावातील शेतकरी जगन्नाथ कोटकर आणि काशीनाथ कोटकर यांच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असलेल्या धान्याच्या कोठाराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण कोठार जळून खाक झाला असून कोठारातील तूर, सोयाबीन हा शेती माल जळला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने जवळपास पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. आग मोठ्या प्रमाणात लागल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, मात्र या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

Mumbai Local Update : मुंबईकरांची 'बॅड मॉर्निंग'; पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

Mumbai Local Update : मुंबईत पश्चिम रेल्वेची (Western Railway) लोकल (Mumbai Local) वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. काही वेळातच लोकल सेवा सुरळीत होईल अशी माहिती, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राणा दाम्पत्याचा जामिन रद्द होणार? 


खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर करत असताना कोर्टाने काही अटी घातल्या होत्या. त्या पाळल्या नाही तर जामीन रद्द करु असंही कोर्टने बजावलं होतं. आता रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर राणा दांम्पत्याने जामीनातील अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. सरकारी वकिल प्रदिप घरत यांनी अटींच उल्लंघन केल्या प्रकरणी राणा दांम्पत्याच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. काही व्हिडीओ माझ्याकडे आले आहेत. ते पाहिल्यानंतर न्यायालयाने घातलेल्या अटींचं त्यात उल्लंघन होत असल्याचं घरत यांनी सांगितलं.  


महापालिकेकडून राणांच्या घराची आज तपासणी?  


मुंबई महापालिकेचे पथक सकाळी 10 नंतर रवी राणा यांच्या खार येथील घरी जाण्याची शक्यता. यापूर्वी पालिकेनं दोनदा तपासणीकरता नोटीस बजावलीय. घर बंद असल्यानं तपासणी झाली नाही. मात्र आता राणा दांपत्य खार येथील घरी पोहोचल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा दांपत्याच्या वादाचा दुसरा अंक सुरु होणार. रिपोर्टर- मनश्री


एमआरआय मशिनजवळ फोटो काढला कसा? किशोरी पेडणेकर हॉस्पीटल प्रशासनाला जाब विचारणार


नवनीत राणा यांना लिलावती हॉस्पिटल प्रशासनानं हॉस्पिटलच्या आत व्हिडीओ शुटींग करण्यास परवानगी दिली. इतकंच नाही तर एमआरआय मशिनपर्यंत व्हिडीओ शुट झाले. यामुळे इतर पेशंटची गुप्तता, सुरक्षितता धोक्यात येतेय. असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलाय. आज किशोरी पेडणेकर लिलावती हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारण्यास जाणार आहेत. 


सोमय्या आज संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करणार 


किरीट सोमय्या हे आपल्या पत्नी आणि मुलांसहीत मुलुंड पोलीस ठाण्यात जावून, संजय राउत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीबाबात तक्रार दाखल करणार, त्यानंतर सात दिवसात काही कारवाई झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका ही दाखल करणार आहेत. सकाळी 11 वाजता ते मुलुंड येथील पोलिस स्टेशन मध्ये जातील.


थकबाकीदार उद्योगपतींमुळे उर्जाविभाग अडचणीत  


वीजबिल थकबाकी संदर्भात ऊर्जा विभागाने राज्यातील अनेक नेत्यांची नावे जाहीर केली. मात्र त्याच सोबत अनेक मोठे उद्योगजग आहेत की त्यांची ही मोठ्या प्रमाणावर ती थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे उर्जा विभाग  अडचणीत आले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोकणातल्या सर्व आमदारांची बैठक


शिवसेनेचं मिशन कोकण, मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज कोकणातल्या सर्व आमदारांची बैठक वर्षा निवास्थानी होणार आहे. या बैठकीत कोकणातील सध्य स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.  


मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे खास मिशन ऍडमिशन मोहीम 


पालिकेच्या शाळेत नव्या एक लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे लक्ष्य, 15 दिवसात 35 हजार ऍडमिशन मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी खास मोहीम महापालिका शिक्षण विभागाकडून राबवली जात असून मागील महिन्याच्या पंधरा दिवसात 35 हजार विद्यार्थ्यांची प्रवेश झाले आहेत एकच लक्ष्य एक लक्ष मोहिमेला सुरुवात झाली असून जून महिन्यापर्यंत एक लाख विद्यार्थ्यांचे नव्याने प्रवेश महापालिका शाळेत व्हावेत अशा प्रकारचे आव्हान स्वीकारले गेले आहे. आतापर्यंत इंग्रजी महापालिकेच्या शाळेत 13 हजार तर मराठी माध्यमांच्या शाळेत आठ हजार नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 


मुंबईला कोलकात्याच्या आव्हान, आज रंगणार सामना 


मुंबई आणि कोलकाता यांच्यामध्या आज आयपीएलचा 56 वा सामना रंगणार आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. मुंबईचे आयपीएलमधील आव्हान संपले आहे तर कोलकात्याच्या धुसूर आशा जिवंत आहे. मुंबईकडे गमावण्यासाठी काहीच नाही. तर कोलकात्याला विजय गरजेचा आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सात वाजता नाणेफेक होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.