08 march 2022 LIVE Updates : बोईसर तारापूर येथील निर्भय कंपनीला भीषण आग
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर N69 मधील निर्भय कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनाही अधिकार आहेत. पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करणार ; संजय राऊत यांचा इशारा
Sanjay Raut : किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र तुरूंगात जातील. नील सोमय्या हे वाधवान यांच्यासोबत निकॉन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut : पीएमसी बॅंक घोटाळ्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Sanjay Raut : शंभरहून जास्त बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी घेतली ; संजय राऊत यांचा आरोप
Sanjay Raut : जितेंद्र नवलानी रॅकेट विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली करणार आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ईडीचे काही अधिकारी तुरूंगात जातील ; संजय राऊत यांचा इशारा
Sanjay Raut : चार ईडी अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करतील : संजय राऊत
Sanjay Raut : जितेंद्र नवलानी हे ईडीचे रॅकेट चालवतात. ईडीने दिवाण हाऊसिंगचा तपास सुरू केला. हा तपास सुरू केल्यानंतर दिवाण हाऊसिंगकडून अधिकाऱ्यांच्या नावावर 25 कोटी रूपये ट्रान्सफर केले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut : किरीट सोमय्या भाजपचे वसुली एजंट आहेत. भाजपकडून ईडीच्या अधिकाऱ्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जात आहे. ईडिकडून व्यावसायिक आणि बिल्डरांना धमकावले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut : ईडी भाजपची एटीएम मशीन आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut : बेनामी संपत्ती असलेल्या भाजपच्या नेत्यांची नावं पंतप्रधान मोदींना देणार आहे. याबातचे पुरावे आमच्याकडे आहेत : संजय राऊत
Sanjay Raut : आयटी आणि ईडीला आतापर्यंत आम्ही 50 जणांविरोधात पुरावे दिले आहेत. परंतु, ईडीकडून फक्त सरकार पाडण्याच्या हेतूने महाराष्ट्रात धाडी टाकल्या जात आहेत. ईडीने आतापर्यंत सर्वात जास्त धाडी महाराष्ट्रात टाकल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut : सरकार पाडण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी ईडीवर केला आहे.
Sanjay Raut : शिवसेनेलाही धाडी टाकण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये फक्त धाडी कशा पडत आहेत? असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
बीड शहरातील गोळीबार प्रकरणी रवींद्र क्षीरसागर यांना बीड न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बीड शहरातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. रवींद्र क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील आहेत. पाचवे जिल्हा सत्र न्यायमूर्ती एस टी डोके यांच्या न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला.
Beed Crime News : बीड शहरातील गोळीबार प्रकरणी रवींद्र क्षीरसागर यांना बीड न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बीड शहरातील रजिस्ट्री ऑफिस मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. रवींद्र क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील आहेत. पाचवे जिल्हा सत्र न्यायमूर्ती एस. टी. डोके यांच्या न्यायालयाने दिला अंतरिम जामीन.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिवसा वीज मिळावी यासाठी सुरु केलेलं बेमुदत धरणे आंदोलन 15 दिवसांसाठी स्थगित केलं आहे. पंधरा दिवसांत राज्यभर दौरा करुन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. 5 एप्रिल रोजी स्वाभिमानीची कोल्हापुरात राज्य कार्यकारिणी बैठक होणार आहे. 15 दिवसात अपेक्षित निर्णय न घेतल्यास राज्य कार्यकारिणी बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. 5 एप्रिलनंतर राज्यभरात आगडोंब उठणार, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
राज्यात पंधरा हजार 426 पदांचा अनुशेष असून राज्यात 2 लाख 30 हजार पदे रिक्त आहेत. राज्यातील रिक्त पदे तातडीने भरणार आहे. एमपीएससीच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील एक दोन नव्हे तर चक्क 800 पेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. याचं कारणही तसंच आहे. 2020-21 मध्ये जिल्ह्यात 527 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यात राखीव प्रवर्गातून ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या वर्गातील उमेदवारांनी निवडणूक लढवली. निवडून आल्यावर नियमाप्रमाणे निकाल लागण्याच्या एक वर्षाच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. पण आता एक वर्ष उलटून गेल्यावरही जवळपास 800 पेक्षा जास्त सदस्यांनी अजूनही जातवैधता प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना सादर केलेलं नाही. त्यामुळे अशा 800 सदस्यांना 31 मार्चच्या आत प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम नोटीस दिली आहे. आता जे सदस्य प्रमाणपत्र सादर करु शकणार नाहीत ते अपात्र घोषित होणार आहेत. त्यामुळे अशा सदस्यांची भांबेरी उडाली असून ते धावपळ करताना दिसत आहेत.
Pune : पिंपरी चिंचवडमध्ये आज महिलांना पुणे मेट्रोतून सफर घडविण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्ताने याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात सेवा देणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात आलं आहे. शहरातील महिलांना पिंपरी ते फुगेवाडी आणि परतीचा मेट्रो प्रवास आज दिवसभर करता येणार आहे.
ISKP Case : आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयातून एनआयएनं कोंढवा परिसरातील तल्हा खान या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरी छापेमारी केली आहे.. या छापेमारीदरम्यान एनआयएनं कागदपत्र आणि डिजिटल साहित्य जप्त केल्याचं कळतंय. तल्हा खान हा इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे.. एनआयएनं हानझीब वानी आणि हिना बशीर बेग या काश्मिरी दाम्पत्याला मार्च 2020 मध्ये अटक केली होती. यांच्या चौकशीनंतर आणखी चौघांना अटक केली होती. संशयित तल्हा खान त्यांच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे.
Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील आणि त्यांचं वाटोळं होईल असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलंय. अकोल्यातल्या कौलखेडमध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना यूट्यूबर्सवर ते जोरदार बरसले. आपल्या कीर्तनाच्या जीवावर अनेक लोकांनी यूट्यूबकडून कोट्यवधी कमावले आणि त्यावरून आपल्याला अडचणीत आणलं असं ते म्हणाले.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Sanjay Raut Press Conferance : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद होणार आहे. याआधीही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केला होता. तसेच, भाजप नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावरही संजय राऊतांनी बोट ठेवलं होतं. मागच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्यांना (Neil Somaiya) तुरुंगात टाकणार असल्याचंही राऊत म्हणाले होते. तसेच मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरही राऊतांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करुन पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. याआधी राऊतांनी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या निशाण्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या होते. तसेच, पत्रकार परिषदेनंतर जेव्हा-जेव्हा संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या-त्या वेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाहीतर, लवकरच हे पिता-पुत्र तुरुंगात जाणार असल्याचा दावाही संजय राऊतांनी वारंवार केला आहे. त्यामुळं आता आज ते कोणता बॉम्ब फोडणार? कोणते नेते त्यांच्या निशाण्यावर असणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा 13 वा दिवस; तिसऱ्या फेरीतील चर्चाही निष्फळ
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 13 दिवस युद्ध सुरू आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून कडवा प्रतिकार सुरू आहे. एका बाजूला युद्ध सुरू असताना दुसरीकडे दोन्ही देशांकडून शांतता चर्चा सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये झालेली तिसऱ्या फेरीतील चर्चा निष्फळ ठरली आहे.
रशिया आणि युक्रेन दरम्यान तिसऱ्या फेरीतील चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाली. युक्रेनच्या शिष्टमंडळातील सदस्य पोडोलीक यांनी सांगितले की, परिस्थितीत सुधारणा होईल, काही ठोस निर्णय घेतला जाईल अशी चर्चा झाली नाही. मात्र, युद्धबंदी आणि सुरक्षेच्या हमीसह इतर मुद्यांवर चर्चा सुरूच राहणार आहे. तर, रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख मेडिंस्की यांनी सांगितले की, युक्रेनसोबत झालेल्या चर्चेत आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. राजकीय आणि लष्करी मुद्यावर चर्चा सुरू आहे. लवकरच काही सकारात्मक निर्णय होईल असे म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी म्हटले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -