Maharashtra Breaking News 8 April 2022 : दिवसभरातील महत्वाच्या बातम्याचे लाईव्ह अपडेट्स...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार अवकळी पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू या पिकाचं मोठं नुकसान होत आहे.
महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आहे. आज जनता नाराज झाली आहे. लोकशाही मार्गाने आम्ही याचा धिक्कार करतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरचा हा हल्ला आहे. एखाद्या चुकीच्या हातात कामगारांचं नेतृत्व गेलं की असा परिणाम होतो. विरोधकांचा सन्मान करायचा असतो, असं पवार साहेब म्हणाले होते. आज त्यांची नात पत्नी घरात होते. पवार यांचा जनतेवर जास्त विश्वास आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
शिवसेना पक्ष राज्य चालवायला असमर्थ आहे. प्रत्येक वेळी वर्गणी काढतात पण हिशोब कोणाला देत नाहीत, असे नारायण राणे म्हणाले.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यामधील एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरासंमोर आंदोलन करायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.
एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या, हायकोर्टाच्या निकालाची प्रत जारी
कामगारांनी 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू व्हावं
कामावर परतणा-या कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये - हायकोर्ट
संपात भाग घेतला म्हणून महामंडळानं कोणतीही कारवाई करू नये
या कारणासाठी जर कामगारांवर कारवाई आधीच केलेली असेल तर ती रद्द करण्यात यावी
ज्या कामगारांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आलेल्या होत्या त्यांनासुद्धा कारवाईतून दिलासा देण्यात यावा
महामंडळ यापुढे फौजदारी कारवाई करणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे - हायकोर्ट
संपाच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या त्या कर्मचाऱ्यांना बदल्या रद्द करून संपाआधी ज्या ठिकाणी ते कार्यरत होते तिथेच त्यांचं परत पोस्टिंग करा
कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले त्यांना 23 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या काळात प्रतिदिन 300 रुपयाचा जाहीर भत्ता तातडीनं द्या
महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्माचाऱ्यांचा थकीत पीएफ कायद्यानुसार दिलेल्या कालावधीत त्वरित अदा द्या
कोविड काळात मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना चार आठवड्यात कायदेशीर भरपाई द्यावी
आम्हाला आशा आहे की, न्यायालयाने घेतलेला निर्णय कामगारही मान्य करतील आणि कामावर परततील
परंतु जे कामगार कामावर रूजू होणार नाही त्यांच्यावर कारवाईस महामंडळाला मुभा
त्रिसदस्यीय समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांच्या बाबतीत योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा कोर्टाकडून कामगारांना सल्ला
Akola News Update : 'माझा'च्या बातमीचा दणका. अकोल्यात स्वयंरोजगाराच्या नावाखाली तब्बल अडीच हजारांवर महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचं प्रकरण. अकोल्यात फसवणुक केल्याचा आरोप असलेली राष्ट्रवादीची पदाधिकारी संगिता चव्हाण पोलिसांच्या ताब्यात. सकाळी 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर शहरातील खदान पोलिसांनी घेतलं ताब्यात. अटकेची प्रक्रिया सुरू. पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या बोगस कंपनीच्या नावाखाली सुरू होता गोरखधंदा.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत असून, बाजार समितीत 973 या गव्हाच्या वाणाला विक्रमी दर मिळाला आहे. तो आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. आतापर्यंत बाजार समितीत कधीही गव्हाला इतका दर मिळाला नव्हता. गव्हानं बाजार समितीत 5000 हजारांचा टप्पा पार केला आहे.
बाजार समितीत गव्हाच्या वाणानुसार दर ठरत आहेत. बाजार समितीत सध्या गव्हाला 2 हजार 200 ते 5 हजार 451 रुपयांचा दर मिळाला आहे. बाजार समितीत दररोज 4000 क्विंटल गव्हाची आवक होत आसल्याने बाजार समितीच्यावतीनं लिलावाचे नियोजन करण्यात येत आहे. ब्रेड आणि गव्हापासून तयार होणाऱ्या इतर वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल 44 गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य बाब म्हणजे पोलिसांनी वेशांतर करुन रत्नागिरी तालुक्यातील पावसनजिकच्या चांदोर येथील एका चिरेखाणीवरुन ताब्यात घेतले आहे. खाण कामगार, ट्रक्टर चालक म्हणून पोलीस तब्बल तीन दिवस खाणीवर काम करत होते. आरोपी संदीप भोसले हा बीडमधील विजय नारायण भोसले असल्याचं सांगत परिसरात वावरत होता. गेले अनेक दिवस संदीपने चांदोर येथे वास्तव्य केल्याने त्याने या भागातही चोरीचे गुन्हे केले आहेत का? त्याचा उलगडा लवकरच होणार आहे. राज्यभरात गुन्हे करुन मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने संदीपने रत्नागिरीतच आश्रयासाठी जागा का निवडली असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
Pune MNS : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून एक धक्का बसला आहे. मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे दिला राजीनामा दिला.
Maharashtra : वसंत मोरेंनी गुरुवारी मेसेज करुन राज ठाकरेंना भेटण्यासाठी वेळ मागीतली. मात्र राज ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात कोसळलेल्या सॅटेलाईटची पाहणी करण्यासाठी आज ISRO ची टीम भेट देणार आहे, साधारण 11.30 पर्यंत ही टीम पोहोचण्याची शक्यता आहे.
पुणे : राज ठाकरेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसकडून आज पुण्यातील कोंढवा भागात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी अडीच वाजता हा मोर्चा मनसेचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या प्रभागात असणार आहे. या मोर्चाला मनसेने कालच ज्यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवलं त्या वसंत मोरेना आपण आमंत्रण देणार असून ते मोर्चात सहभागी झाले तर त्यांच स्वागत करु, असं मोर्चाच आयोजन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हाजी गफुर पठाण यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी कोंढवा भागातील नागरिकांकडून मागणी झाल्यास ज्योती चौकामध्ये हनुमान चालीसा लावू असंही पठाण म्हणाले.
पिंपरी चिंचवड : शहराची तहान भागवणाऱ्या पवना नदीच्या पाण्यावर कालपासून तेलाचा तवंग आला आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं तर पिंपरी चिंचवडकरांच्या आरोग्याबाबत प्रश्न उभा राहिला. काल पॉवर जनरेशनमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला होता. त्याच पॉवर जनरेशनची दुरुस्ती करताना ऑईलचा वापर करण्यात आले. तेच ऑईल पाण्यात मिक्स झाल्याचं धरण प्रशासनाचं म्हणणं आहे. हे तेल काही तासांत वाहून जाईल असा दावा ही त्यांनी केला आहे. पण हा दावा फोल ठरला तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
मुंब्रा येथील मनसे कार्यालय फोडले, काल रात्री 12 नंतर काही लोकांनी येऊन इरफान सय्यद यांच्या कार्यालयावर केला हल्ला, हे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असल्याचा सय्यद यांचा आरोप, पोलीस घटनास्थळी येऊन परिस्थिती सध्या नियंत्रणात, याच मनसे कार्यालयातील बोर्ड हटवण्याची राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली मागणी, त्यानंतर 1 दिवस होता पोलीस बंदोबस्त , मात्र काल बंदोबस्त नसताना काही तरुणांनी येऊन या कार्यालयावर केली दगडफेक
राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर राज्यपालांच्या भेटीला, 12 वाजता भेट, महाविकास आघाडीच्या कोट्यातून 12 आमदारांच्या यादीत नाव असेल तर वगळण्याची राज्यपालांना करणार विनंती
Karla Ekvira Devi News : महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व कोकणी, कोळी बांधवांचे कुलदैवत असलेल्या वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकवीरा देवी यात्रा मागील दोन वर्षांपासून कोरोना काळामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र आजपासून या यात्रेला सुरुवात होत आहे . आईच्या मंदिराच्या सजावटीचा मान भिवंडीच्या खारबांव येथील कल्पेश पाटील यांना मिळाला आहे . यामध्ये मंदिराची संपूर्ण सजावट फुलांनी करण्यात आले आहे . मागील दोन वर्षांपासून कार्ला येथील श्री एकवीरा देवी मंदिरावर प्रशासक नेमणूक करण्यात आली आहे . तसेच भाविकांसाठी होणारी समस्या दूर करण्यासाठी व मंदिराच्या पायऱ्या जीर्ण झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे मागणी करणार असल्याचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी सांगितले. या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने भाविकांनी नियमांचं पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे
Ahmednagar News : अहमदनगर येथील यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा जामीन अर्ज औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीविरूद्ध पुरेसे पुरावे असल्याने त्याला जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या गुन्ह्यात बोठेला गेल्यावर्षी 13 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो तरुंगात आहे. 30 नोव्हेंबर 2020 ला रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये जामीन मिळण्यासाठी आरोपीतर्फे गेल्यावर्षी नगरच्या सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयातही आरोपीचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
Chandrapur News : जिल्ह्यात दोन वर्षानंतर सक्रिय कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर. 2 मे 2020 रोजी आढळला होता जिल्ह्यात पहिला रुग्ण, अनेकदा नव्या बाधितांची संख्या शुन्यावर आली असली तरी सक्रिय रुग्णाची नोंद मात्र कायम होती. जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण नाही असा एकही दिवस दोन वर्षात नोंदला गेला नाही. गुरुवार 7 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्यात सक्रिय रुग्णाची संख्या झाली निरंक, जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 960 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
Corona News : चंद्रपूर जिल्ह्यात दोन वर्षानंतर सक्रिय कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर आली आहे. 2 मे 2020 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला होता. अनेकदा नव्या बाधितांची संख्या शुन्यावर आली असली तरी सक्रिय रुग्णाची नोंद मात्र कायम होती. जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण नाही असा एकही दिवस दोन वर्षात नोंदवला गेला नाही. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 960 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
Russia Ukraine War : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगातून रशियाला निलंबित करण्यात आलं आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अतिशय महत्त्वाची मानली जातेय. रशियाला आयोगातून वगळण्याच्या मसुद्यावर काल मतदान झालं. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ 93 सदस्यांनी मतदान केलं. 24 सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान कंले. तर, 57 सदस्य देश मतदानापासून दूर राहिले. युक्रेनच्या बुचा येथील रस्त्यावर काही शेकडो नागरिक मृतावस्थेत आढळले होते. या घटनेवरुन युक्रेनने रशियावर गंभीर आरोप केले होते. मात्र, रशियाने युक्रेनचे सर्व आरोप फेटाळले आहेत. बुचा हत्याकांडाचा निषेध करत भारताने संयुक्त राष्ट्रातील ठरावावर मतदान करणे टाळलं. तसंच बुचा येथील हत्येच्या स्वतंत्र तपासाच्या आवाहनाला पाठिंबा दिला.
Maharashtra News : एकीकडे उन्हाळा मी मी म्हणत वाढत असताना दुसरीकडे राज्यावर भारनियमनाचं संकट उभं ठाकलंय. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातल्या वीजेच्या मागणी-पुरवठ्याबाबत परिस्थितीची माहिती दिली आणि भारनियमनाचा इशाराही दिलाय. या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी आपत्कालीन कराराद्वारे 800 ते 1 हजार मेगावॅट वीज खरेदी करण्याबाबत आज तातडीची बैठक होणार आहे. उन्हाळ्यात राज्यातली वीजेची मागणी वाढतेय मात्र कोळसाटंचाईमुळे वीजेचं उत्पादन वाढवण्यावर मर्यादा येत आहेत त्यामुळे वीजेच्या मागणी-पुरवठ्याचं संतुलन डळमळीत व्हायला लागलं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Kirit Somaiya : देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा!, सामना अग्रलेखातून शिवसेनाचा टीकेचा बाण
Kirit Somaiya vs Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि ईडी असा सामना रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापलं. शिवसेनेकडून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करण्यात आले. सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेले 58 कोटी रुपये हडपल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. आता सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. ‘देशद्रोही सोमय्यांना जोडो मारा’ या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडण्यात आला आहे.
सोमय्या व त्यांच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले -
'विक्रांत' युद्धनौका वाचविण्यासाठी जमा केलेले 58 कोटी हडपले आहेत. देशातल्या लाखो लोकांनी किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र व देशात फिरवलेल्या डब्यांत पैसे टाकले. त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कोठे पोहोचला? किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले. भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून 'कमळा'च्या साक्षीने त्यांनी हिंदुत्वाशी हा व्यभिचार केला. कायद्याने कारवाई होईलच, पण अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा. जातील तिथे फाटक्या जोडय़ांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे. सैनिकांच्या बलिदानाचा, हिंदुस्थानी युद्धनौकेचा अपमान देश सहन करणार नाही!
Explained : 9 एप्रिलला इम्रान खान यांचा अविश्वास प्रस्तावात पराभव का निश्चित आहे? जाणून घ्या
Pakistan Political Crisis : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे इम्रान खान (Imran Khan) यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का मानला जातोय. इम्रान खान यांना आता संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार आहे. इम्रान यांना या परिस्थितीचा सामना कधीच करायचा नव्हता, आपल्याकडे बहुमत नाही हे त्यांना माहीत होते. 9 एप्रिलला अविश्वास ठरावावर मतदान होत असताना इम्रान खान यांचा पराभव का ठरवला जाईल? जाणून घ्या
इम्रान यांनी बहुमत गमावले
सत्ताधारी आघाडीचा प्रमुख पक्ष MQM-P विरोधी पक्षात सामील होण्याच्या घोषणेने इम्रान खान यांनी बहुमत गमावले. MQM-P चे 7 खासदार आहेत. याआधी सरकारचा आणखी एक मित्र पक्ष आणि पाच खासदार असलेल्या बलुचिस्तान अवामी पार्टीने (बीएपी)ही विरोधकांसोबत जाण्याची घोषणा केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -