Maharashtra Breaking News 07 May 2022 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर `सर्वांसाठी पाणी´ हे महापालिकेचे नवे धोरण

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 May 2022 11:28 PM
Navneet Rana : खासदार नवनीत राणांना उद्या मिळणार डिस्चार्ज

खासदार नवनीत राणा यांना उद्या सकाळी 11 वाजता लिलावती  रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर त्या माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत. डिस्चार्ज झाल्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी लिलावती रूग्णालयात रवनीत राणा यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 

Dombivli News Update : डोंबिवलीतील संदप गावात खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू   

डोंबिवलीतील संदप गावातील खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. हे सर्व जण या खदाणीत कपडे धुण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली आहे.  


अपेक्षा गायकवाड (30), मीरा गायकवाड  (वय 55), मयुरेश गायकवाड ( वय 15), मोक्ष गायकवाड ( वय 13) आणि निलेश गायकवाड ( वय 15 ) अशी पाच मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाने पाच ही मृतदेह बाहेर काढले आहेत. 

Bhandara News Update : जास्त भाजी न दिल्याने कैद्यांमध्ये मारामारी, भंडारा जिल्हा कारागृहातील प्रकार 

जेवन करताना जास्त भाजी न  दिल्याने कैद्यांमध्ये मारामारी झाली. भंडारा जिल्हा कारागृहात ही घटना घडली असून या प्रकरणी भंडारा पोलिसांनी चार कैद्याविरोधात दाखल नोंद केला आहे.  शेख रफीक शेख रहमान (केदी क्रमांक 4 ), महेश आगासे  (केदी क्रमांक 3), मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल यूसुफ शेख ( कैदी क्रमांक 45 ) आणि राहुल पडोळे ( कैदी क्रमांक 44 ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 


देवेंद्र राऊत भंडारा कारागृहतील कैदी असून त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना बरेक जबाबदार म्हणून काम दिले आहे. ते सकाळचे जेवण वाटप करत असताना  शेख रफीक शेख रहमान ने देवेंद्र यांना जास्त भाजी मागितली. मात्र, देवेंद्र यांनी नकार दिल्याने आरोपीने त्यांच्या सोबत भांडण काढले. यावेळी शेख याच्या मदतीला आणखी तीन कैदी आले आणि त्यांनी देवेंद्र यांना मारहाण केली.  

Pandharpur : पुरातत्व विभागाचे पथक पंढरपुरात दाखल, विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची पाहणी करणार

भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दाखल झाले असून विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी पाहणी करणार आहेत. एबीपी माझाच्या बातमीनंतर शासन सक्रिय झालं असून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 

Wardha News Update : वर्ध्यातील वाघाडी नदीजवळ टेम्पोची कारला धडक, सात जण गंभीर जखमी 

समुद्रपूर तालुक्यातील वर्धा मार्गावरील वाघाडी नदीजवळ चंद्रपूरवरुन वर्ध्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या मालवाहू टेम्पोने वर्ध्याकडून समुद्रपुरकडे येत असलेल्या कारला धडक दिली. या भीषण अपघात कारमधील पाच आणि टेम्पोमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Thane : ठाण्यातील माजिवाडा परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Thane : ठाण्यातील माजिवाडा परिसरात भीषण आग लागली आहे. या आगीत मोकळ्या जागेतील भंगार गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही घटना कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, आग वाढू नये यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत. 

Washim News Update :  17 लाखांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना 36 तासांत अटक, वाशीम पोलिसांची कारवाई 

Washim crime News :  17 लाखांची चोरी करणाऱ्या चार आरोपींना 36 तासांत अटक करण्यात आली आहे. वाशीमच्या सिंधी केम्प भागातून  अल्हाडा  प्लॉट भागात घरी जाणाऱ्या  एका  55 वर्षीय  व्यापाऱ्याची  त्यांच्याच दुकानातील नोकराने 17 लाखांची लूट केली होती. 


व्यापाऱ्याच्या गाडीला धक्का देऊन त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या जवळील 17 लाख रुपये असलेली थैली घेऊन  पसार झाले. चंद्रकांत शौकीराम जिवनानी यांनी याबाबत वाशीम शहर पोलीस ठाण्यात तक्रदार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली. अनुपम मदन चिंचाबेकर (वय 23 ), बादशाह उर्फ अजय शिवराम राऊत  (वय 21) , अरुण भारत खडसे  (वय 23 ) आणि आकाश आत्माराम चोपडे  (वय 22 )  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखेने  वाशिम शहर परिसरात शोध घेत असताना चार आरोपींना अटक केली.  

BMC : सांडपाणी प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात; घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या निविदाप्रक्रियेत महाघोटाळा झाल्याचा आरोप भाजपनंतर आता काँग्रेसनेही केला आहे. केवळ दीड वर्षात एकाच प्रकल्पाकरता लागणाऱ्या अंदाजित खर्चात महापालिका प्रशासनाकडून तब्बल 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरता  मुंबई महापालिकेकडून 29,652 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. काँग्रेस आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. 

Cycle Track in Powai Lake : ऋता आव्हाड यांच्याकडून पवई सायकल ट्रॅकसंबंधित न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पवई तलावाच्या सभोवती सायकल ट्रॅक उभारण्यात येत होता. या सायकल ट्रॅकला कालच मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णया नंतर आता महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्वीट करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आभार मानत स्वागत केलंय. चुकीची गोष्ट कुणीही केली ती चुकीचीच असते, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. सगळ्या पर्यावरणप्रेमींचे अभिनंदनही या ट्वीटमध्ये त्यांनी केलंय. महाविकास आघीडीतील पर्यावरण मंत्री त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतात, नंतर त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यावर महाविकास आघाडीतीलच बड्या मंत्र्यांच्या पत्नीने त्या निर्णयाला विरोध करणारे ट्वीट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. 


 


 





महाराष्ट्रातल्या मोठ्या कुक्कूटपालक अनुराधा देसाई यांनी केली अंड्यांचे दर वाढविण्याची मागणी

महाराष्ट्रातल्या मोठ्या कुक्कूटपालक अनुराधा देसाई यांनी अंड्यांचे दर वाढविण्याची मागणी केली आहे. 

BMC : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर `सर्वांसाठी पाणी´ हे महापालिकेचे नवे धोरण

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा व्यवस्थेवर यंदाच्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात आली आहे. मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी मिळणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता 200 कोटींती तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खा-यापाण्यातून 200 दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा तलावावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प , 80 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरउर्जा प्रकल्प यासाठी 10.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

Megablock Palghar : मेगाब्लॉकमध्ये पालघरला जाणाऱ्या या गाड्या रद्द, काही अंशत: रद्द तर काही शॉर्ट टर्मिनेट

Megablock Palghar :  रविवार दि. ०८ मे २०२२ रोजीचा मेगाब्लाँक
दि. ८-५-२०२२ रोजी अप मेन लाईन वर सकाळी ८:१५ ते ९:१५ वाजेपर्यंत १ तासाचा मेगाब्लाँक तर डाऊन मेन लाईन वर सकाळी ६:३० ते दुपारी १४:३० पर्यंत ८ तासांचा मेगाब्लाँक घेण्यात येणार आहे. 
ब्लाँक दरम्यान रद्द करण्यात आलेल्या डाऊन लाईन च्या गाड्या पुढिल प्रमाणे
१. १२९३५ बांद्रा सुरत सुपरफास्ट इंटरसीटी एक्सप्रेस
२. १९०१५ मुंबई पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस
३. ०९१४३ विरार वलसाड शटल (विरार: ११:३०)
४. ०९१५९ बांद्रा वापी पँसेंजर 
५.९३००७ चर्चगेट डहाणू रोड लोकल (५:२४ चर्चगेट)
६.९३०१५ बोरीवली डहाणू रोड लोकल ( १०:३१ बोरीवली)
ब्लाँक दरम्यान रद्द करण्यात आलेल्या अप लाईन च्या गाड्या पुढिल प्रमाणे
१. १२९३६ सुरत बांद्रा सुपरफास्ट इंटरसीटी एक्सप्रेस
२. १९०१६ पोरबंदर मुंबई सौराष्ट्र एक्सप्रेस.
३. ०९०८४ डहाणू रोड बोरीवली मेमू (४:५५ डहाणू रोड)
४. ०९१४४ वापी विरार शटल ( वापी १४:००)
५. ९३०२४ डहाणू रोड दादर लोकल (डहाणू रोड-१५:२०)
६. ९३०२८ डहाणू रोड विरार लोकल  (डहाणू रोड - १७:२०)


पुढिल गाड्या अंशत: रद्द किंवा शाँर्ट टर्मीनेट करण्यात आल्या आहेत


अ. डाऊन लाईन वरील मेल एक्सप्रेस
१. २२९२१ बांद्रा गोरखपूर एक्सप्रेस बांद्रा ते वापी स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती वापी स्थानकातून सुटेल
२. २२९५३ मुंबई सेंट्रल अहमदाबाद गुजरात एक्सप्रेस मुंबई सेंट्रल ते उंबरगाव स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती उंबरगाव स्थानकातून सुटेल
३. १२४८०  बांद्रा जोधपूर सुर्यनगरी एक्सप्रेस बांद्रा ते सुरत स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती सुरत स्थानकातून सुटेल
४. १२९३३ मुंबई सेंट्रल अहमदाबाद कर्णावती एक्सप्रेस मुंबई सेंट्रल ते वापी स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती वापी स्थानकातून सुटेल
ब. डाऊन लाईन वरील मेमू
१. ०९०८५ बोरीवली वलसाड मेमू बोरीवली ते डहाणू स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती डहाणू रोड स्थानकाहून सुटेल.
२. ०१३३८ डोंबीवली बोईसर मेमू पालघर ते बोईसर स्थानका दरम्यान रद्द असून ती पालघर ला टर्मीनेट होईल.
क. डाऊन लाईन वरील लोकल
१.९३००३ विरार डहाणू रोड लोकल चा प्रवास वाणगाव स्थानकात संपेल ( विरार- ५:३५)
२. ९३००५ चर्चगेट डहाणू रोड लोकल चा प्रवास बोईसर स्थानकात संपेल ( चर्चगेट- ४:५८)
३. ९३००९ अंधेरी डहाणू रोड लोकल चा प्रवास वाणगाव स्थानकात संपेल ( अंधेरी- ७:३८)
४. ९३०११ चर्चगेट डहाणू रोड लोकल चा प्रवास बोईसर स्थानकात संपेल ( चर्चगेट- ७:४२)
५.९३०१३ चर्चगेट डहाणू रोड लोकल चा प्रवास बोईसर स्थानकात संपेल ( चर्चगेट- ८:५६)
६. ९३०१७ चर्चगेट डहाणू रोड लोकल चा प्रवास बोईसर स्थानकात संपेल ( चर्चगेट- १०:०३)
७. ९३०१९ विरार डहाणू रोड लोकल चा प्रवास बोईसर स्थानकात संपेल ( विरार- ११:५५)
८. ९३०२१ विरार डहाणू रोड लोकल चा प्रवास बोईसर स्थानकात संपेल ( विरार- १२:१५)
९. ९३०२३ विरार डहाणू रोड लोकल चा प्रवास बोईसर स्थानकात संपेल ( विरार- १३:२०)
१०. ९३०२५ विरार डहाणू रोड लोकल चा प्रवास बोईसर स्थानकात संपेल ( विरार-१५:०५)


ड. अप लाईन वरील मेल एक्सप्रेस
१. १२४७९ जोधपूर बांद्रा सुर्यनगरी एक्सप्रेसचा प्रवास सुरत स्थानकात संपेल व सुरत ते बांद्रा टर्मीनस दरम्यान गाडी रद्द असेल. 
२. १२९३४ अहमदाबाद.मुंबई कर्णावती एक्सप्रेस चा प्रवास वापी स्थानकात संपेल व वापी ते मुंबई सेंट्रल दरम्यान गाडी रद्द असेल. 
३.१९००२ सुरत विरार शटल चा प्रवास वलसाड स्थानकात संपेल व वलसाड ते विरार दरम्यान गाडी रद्द असेल. (पालघर येथिल सकाळी ९:०६ ची शटल)
इ. अप लाईन वरील मेमू
१. ०१३३७ बोईसर दिवा मेमू पालघर हून सुटेल.


फ. अप लाईन वरील लोकल
१. ९३००६ डहाणू रोड चर्चगेट लोकल वाणगाव स्थानकातून सुटेल ( वाणगाव ७:३०)
२.९३००८ डहाणू रोड बोरीवली  लोकल बोईसर स्थानकातून सुटेल ( बोईसर ९:०२)
३.९३०१० डहाणू रोड विरार लोकल वाणगाव स्थानकातून सुटेल ( वाणगाव ९:५०)
४. ९३०१२ डहाणू रोड विरार लोकल बोईसर स्थानकातून सुटेल ( बोईसर - १०:२८)
५. ९३०१४ डहाणू रोड विरार लोकल बोईसर स्थानकातून सुटेल ( बोईसर ११:३३)
६. ९३०१६ डहाणू रोड विरार लोकल बोईसर स्थानकातून सुटेल ( बोईसर १२:४३)
७. ९३०१८ डहाणू रोड चर्चगेट लोकल बोईसर स्थानकातून सुटेल ( बोईसर १३:०५)
८. ९३०२० डहाणू रोड विरार लोकल बोईसर स्थानकातून सुटेल ( बोईसर १३:४३)
९. ९३०२२ डहाणू रोड दादर लोकल बोईसर स्थानकातून सुटेल ( बोईसर १४:२८)
१०. ९३०२६ डहाणू रोड विरार लोकल बोईसर स्थानकातून सुटेल ( बोईसर १६:२८)


टीप:
१२४७१ बांद्रा जम्मूतावी स्वराज एक्सप्रेस ला वाणगाव व डहाणू रोड स्थानकात थांबा दिला जाईल.


१२९२५ बांद्रा अमृतसर पश्चिम एक्सप्रेस ला वाणगाव स्थानकात थांबा दिला जाईल.

Aurangabad News : व्यावसायिक वापराचा गॅस दारात वाढ झाल्याने हॉटेलमध्ये जेवण महागणार

औरंगाबाद  व्यवसायिक वापराचा गॅस दारात वाढ झाल्याने  हॉटेलमध्ये जेवण महागणार .  औरंगाबादेत हॉटेल्स असोसिएशनचा 20 टक्के दर वाढविण्याचा निर्णय.. वाढत्या महागाईत य सध्याच्या रेटमध्ये जेवण पुरवणं शक्य  नाही . या आठवड्यात हॉटेल व्यावसायिक यांची बैठक होईल आणि त्यानंतर हे दर लागू होतील,गेल्या वर्षीच्या तुलनेत सिलेंडर चे दर 1 हजारांनी वाढले आहेत, सोबत धान्य पालेभाज्या सगळंच महागले आहे, त्यामुळं ही महागाई आता सोसण्याजोगी नाही असं हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे . त्यामुळं आता दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं औरंगाबाद हॉटेल व्यावसायिक संघटना सांगत आहेत.

Jalna News : जालना येथे बॉम्बने उडवून आत्मघाती हल्ला करण्याची धमकी 

 जालन्यातील बदनापूर येथे एका तरुणाला जालना शहरात बॉम्बने आत्मघाती हल्ला करण्याची धमकी आल्याने खळबळ उडालीय. बदनापूर येथील तरुण शेख अतिक शेख आयुब याच्या मोबाईल वरील व्हॉट्सअॅप वर त्याचाच फोटो वापरून हा धमकीचा मॅसेज आलाय. आज 7 तारखेला आपण हा धमाका करणार असल्याची धमकी या अज्ञात आरोपीने दिलीय. विशेष म्हणजे आपण इसिस संघटनेच काम करत असल्याचं सुद्धा या मॅसेजमध्ये सांगण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांनी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा तपास सायबर पोलीस देखील करत आहेत.. दरम्यान सदर मॅसेज आंध्रप्रदेशातून आल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे..

Gadchiroli News :  गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंग विरोधी वाहनाला अचानक लागली आग, अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भूसुरुंग विरोधी अवजड वाहनाला आग लागल्याने खळबळ
Gadchiroli News :  गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंग विरोधी वाहनाला अचानक आग लागली. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भूसुरुंग विरोधी अवजड वाहनाला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. हे वाहन अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयातून गडचिरोली मुख्यालयात जात होते.  आष्टी मार्गावर दीना नदीच्या पुलाजवळ  अचानक ही आग लागली. आग लागल्यानंतर तातडीने या वाहनातील जवान खाली उतरले. अहेरी नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळ गाठत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले.  ही आग नक्की कशामुळे लागली याबाबत मात्र स्पष्टता नाही. याच वाहनातुन अतिदुर्गम - अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात नक्षल विरोधी पथक जवानांची ने आण होते. या आगीमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्स पोहोचले अतिदुर्गम बिनागुंडामध्ये, आरोग्य सेवेसोबतच बिनागुंडा गावातील आदिवासी कुटुंबासोबत घालवला दिवस
Gadchiroli News :  गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्स भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे दाखल झाले. आरोग्य सेवेसोबतच बिनागुंडा गावातील आदिवासी कुटुंबाच्या सोबत त्यांनी दिवस घालविला. इथल्या आदिवासी नागरिकांच्या आरोग्य तपासणीत अनेकांमध्ये  आढळले रक्ताचे प्रमाण कमी आढळले. आपल्याच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील खाजगी डॉक्टरांचे सेवाकार्य ठरले महत्वपूर्ण ठरले आहे. जिथं खायला अन्न मिळणं कठीण जातं, तिथं आरोग्य सुविधा तर अत्यंत अत्यल्पचं. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही व्यथा गडचिरोली शहरातील खासगी डॉक्टरांच्या लक्षात आली. सामाजिक बांधिलकी जोपासत या मंडळींनी एक विडा उचलला आणि अतिदुर्गम बिनागुंडा गावात आरोग्य सेवा पोहोचली. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा हे दुर्गम पण तेवढंच निसर्गरम्य असे स्थळ आहे. याठिकाणी अत्यंत गरिबी आणि मागासलेपण आहे. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना वैद्यकीय सुविधा मिळणेही मोठे कठीण होते. डॉ. शिवनाथ कुंभारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली आणि हा दौरा घडवून आणला. संपूर्ण आरोग्य व वैद्यकीय तपासणी, औषधे, रक्तघटक तपासणी, वस्त्रभेट, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू वितरण, मच्छरदाणी वाटप, अन्नदान असे उपक्रम दौऱ्यात राबविण्यात आले. या उपक्रमाने बिनागुंडा येथील नागरिक भारावून गेले होते. बिनागुंडा, फोदेवाडा, तूर्रेमर्का, कुवाकोडी, गुंडेनुर, या गावातून जवळपास ३५०-४०० लोकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला.
Dhule News : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, रिक्षात राहिलेली रोख रक्कम आणि दागिणे केले परत

Dhule News  ; लग्न समारंभानिमित्त धुळे शहरात आलेल्या एक महिला आपल्या गावी म्हणजेच नाशिक येथे परतत असताना धुळे शहरातील प्रकाश टॉकीज येथून ही महिला रिक्षात बसून स्टॅन्ड कडे निघाली सोबत मुलगी, एक बॅग, पर्स होती. धुळे बस स्टँड येथे उतरताना महिलेकडून पर्स रिक्षेत राहिली यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि इतर साहित्य होते. रिक्षा गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आले की आपली पर्स रिक्षात राहिली यानंतर महिलेने शोधाशोध सुरू केली परंतु रिक्षा चालक संध्याकाळ झाली म्हणून घराकडे निघाले रिक्षा चालक घरी थांबले असता रिक्षाच्या मागील बाजूस एक पर्स दिसली रिक्षाचालक गणेश थोरात यांनी माणुसकी दाखवित ही पर्स आझादनगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केली. तत्पूर्वी महिलेच्या नातेवाईकांनी बस स्टॅन्ड परिसरात शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता शहर पोलिसांनी तुमची पर्स आझाद नगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाने आणून दिली आहे. असे सांगितले त्यानंतर नातेवाईक महिला आझादनगर पोलीस ठाण्यात गेले असता आझाद नगर पोलिसांनी ही पर्स महिलेच्या हाती सुपूर्द केली. यावेळी महिलेला पर्स घेताना आनंदाश्रू अनावर झाले आणि त्यांनी रिक्षाचालकाचे आभार मानले तसेच नातेवाईकांनी रिक्षाचालकाचा सत्कार केला. हमाल मापाडी कॉलनीत राहणारे गणेश थोरात यांच्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Dhule Crime : 90 तलवारी जप्त प्रकरणी नवीन माहिती समोर, 300 रुपयात विकत घेतलेली तलवार बाराशे रुपयांना होणार होती विक्री 



Dhule Crime : धुळे तालुक्यातील सोनगिर जवळ गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तब्बल 90 तलवारी जप्त केल्या होत्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी आतापर्यंत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सहा जणांना ताब्यात घेतले असून या धारदार शस्त्र प्रकरणी वेगाने तपास सुरू आहे या घटनेनंतर राज्यातील गुप्तवार्ता विभाग अलर्ट झाला असून सुमारे तीनशे रुपयात खरेदी केली तलवार बाराशे रुपयाला विक्री केली जाणार असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांनी यापूर्वी राजस्थानमधून 12 तलवारी घेतल्या होत्या धुळे मार्गे त्याची वाहतूक देखील करण्यात आली होती या तलवारीची छुप्या पद्धतीने विक्री झाल्यामुळे या चौघांनी मोठ्या शस्त्रांची खरेदी करण्याचे ठरवले होते ही शस्त्रे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय करणाऱ्या आणि वाहन पुरवणाऱ्या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही हत्यारे खरेदी करण्यासाठी जालना येथील खालीद बासाद याने 52 हजार रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे....




मुंबईतील लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत दोन गुन्हे दाखल

मुंबईतील लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत


सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.


परंतु वांद्रे येथील नुरानी मशिदीच्या व्यवस्थापनावर नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे, त्यामुळे वांद्रे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कलम ३७ (१), (३), १३५ नुसार तक्रार दाखल केली आहे. कायदा आणि ध्वनी बंदी नियमांचे कलम. 33 (R)(3) अंतर्गत गुन्हा दाखल


याशिवाय मुंबईच्या सांताक्रूझ पोलिसांनी लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीशी संबंधित लोकांवरही नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Washim Crime: वाशिमच्या केकतउमरा परिसरातील दुर्गा मंदिरात पुजाऱ्याची हत्या

वाशिम : वाशिमच्या केकतउमरा परिसरातील दुर्गा मंदिराचे पुजारी मारोती पुंड वय 52 वर्ष यांची  मंदिरच्या दानपेटी लुटीतून डोक्यात रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. सकाळी त्यांच्या मुलाच्या लक्षात ही घटना आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.  मंदिर गावापासून दूर  रस्तालगत असल्याने नेमकी हत्या कुणी केली याचा सुगावा लागला नाही. मात्र वाशिम ग्रामीण पोलिसांचं  पथक आणि गुन्हे शाखेचे पोलीस या घटनेचा तपास करत आहे

सोलापुरात सीएनजी पंपावर अनर्थ होता होता टळला

Solapur News :  काल सोलापुरात सीएनजी पंपावर अनर्थ होता होता टळलाय. सीएनजी पाईप गाडीला लावलेले असताना देखील गाडी पुढे घेतल्याने मोठा आवाज होऊन पाईप पंपापासून वेगळा झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. काल सोलापुरातल्या ग्रामीण पोलिस पंपवर ही घटना घडली. सीएनजी भरल्यानंतर कर्मचारी लगेच पाईप न काढता दुसरीकडे गेला तर गाडी चालकाने देखील पाईप काढलं की नाही हे न पाहताच गाडी पुढे घेतली. त्यामुळे पाईप पंपापासून वेगळा झाला. यावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी हानी या घटनेत झाली नाही. आधीच सोलापुरात सीएनजीच्या दरात मोठी वाढ़ झाल्याने लोक हैराण झालेत. त्यात या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सीएनजी भरताना नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर पोलिसांच्या ताब्यात, गेल्या दोन दिवसांपासून होते फरार

मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर पोलिसांच्या ताब्यात, गेल्या दोन दिवसांपासून होते फरार,  राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मशिदी समोर भोंगे लावण्या संदर्भातील आंदोलन प्रकरणी घेतले ताब्यात


- दिलीप दातीर आंदोलनात सहभागी नव्हते मात्र आंदोलनाचे प्लॅनिंग केल्याचा ठेवण्यात आला होता ठपका

पृथ्वी अभूतपूर्व वेगानं गरम होत असल्याचं नासाच्या नोंदीनुसार स्पष्ट, गेल्या 20 वर्षांत जागतिक तापमानवाढीचा दर तिप्पट 

पृथ्वी अभूतपूर्व वेगानं गरम होत असल्याचं नासाच्या नोंदीनुसार स्पष्ट, गेल्या २० वर्षांत जागतिक तापमानवाढीचा दर तिप्पट 


नासाच्या नोंदींनुसार पृथ्वी क्षेत्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या उष्णतेचा समतोल राखल्या जात नसल्याचं समोर


पृथ्वीचं तापमान गरम करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा उपलब्ध होत असल्यानं सिस्टिम इम्बॅलेन्स, १.६४ व्हॅट प्रति मीटर स्क्वेअर ऊर्जेची नोंद 


पृथ्वीच्या प्रणालीत अतिरिक्त ऊर्जा उपलब्ध, ज्याचा वापर महासागर, जमीन, वातावरण तापवण्यासाठी, बर्फ वितळण्यात आणि समुद्राची पातळी वाढवण्यासाठी उपलब्ध

Navi Mumbai Fire :  पावणे अग्नितांडव, दोन बेपत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एकाचा मृतदेह सापडला

नवी मुंबई -  पावणे अग्नितांडव, दोन बेपत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एकाचा मृतदेह सापडला,  एन एस नायर असं मृताचं नाव, गुदमरून मृत्यू झाला  असल्याचे  स्पष्ट,  निखिल पासीलकर या  तरुणाचा शोध सुरू

Nagpur News : नागपुरात पाण्यासाठी युवक काँग्रेसचं आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून काँग्रेस कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन

नागपुरात पाण्यासाठी युवक काँग्रेसचं आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून काँग्रेस कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन

Mumbai Fire : मुंबईतील विलेपार्लेमधील एलआयसी कार्यालयाला मजल्यावर मोठी आग

मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेत एस व्ही रोड वर असलेला एलआयसी कार्यालयामध्ये आज सकाळी आठच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर मोठी आग लागली आहे, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे

Kirit Somaiya : किरीट सोमय्या मनसुख हिरेन यांच्या कुटुंबाच्या भेटीला

किरीट सोमय्या मनसुख हिरेन यांच्या कुटुंबाच्या भेटीला, यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर देखील उपस्थित आहेत

नागपूर उमरेड मार्गावर तवेरा कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

नागपूर उमरेड मार्गावर विहीरगाव जवळील अड्याली फाट्याजवळ तवेरा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू  झाल्याची माहिती मिळत आहे. नागपूर - उमरेड मार्गावर विहीरगाव जवळ भरधाव तवेरा कारने ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातामध्ये तवेरा कार चक्काचूर झाली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिलेसह चार पुरुषांचा समावेश आहे. तर इतर दोघे जखमी झाले आहेत.

मुंबई एअरपोर्टवरुन 10 लाखांचं ड्रग्ज जप्त, DRI ची कारवाई, विदेशी महिलेला अटक, तिच्या पोटातून वीस हेरॉईनच्या कॅप्सूल मिळाल्या

मुंबई एअरपोर्टवरुन 10 लाखांचं ड्रग्ज जप्त, DRI ची कारवाई, विदेशी महिलेला अटक, तिच्या पोटातून वीस हेरॉईनच्या कॅप्सूल मिळाल्या

OBC Reservation : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणीची बैठक

OBC Reservation : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणीची बैठक आज वसंत स्मृती दादर येथे होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. 

ओझर येथील विमानतळाशेजारी आगीमध्ये अंदाजे 40 ते 50 एकर जमिनीवरील गवत जळाले, धावपट्टीला धोका नाही, आग पूर्णपणे विझली

आज दिनांक 6 मे 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास  ओझर येथील विमानतळाशेजारी आग लागली सदर आगीमध्ये अंदाजे 40 ते 50 एकर जमिनीवरील गवताला आग लागल्यामुळे सदर गवत जळाले. सदर आगी मध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसल्याबाबत एचएएल प्रशासनाचे प्रमुख यांनी सांगितले. सदर विमानतळ परिसरामध्ये असलेल्या सोलर प्लांट हा सुखरूप असून त्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. सदरील आग ही धावपट्टी पासून दूर संरक्षक भिंतीच्या लगेच झाल्याने धावपट्टी तसेच एटीसीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही. घटनास्थळी HAL यांच्या चार अग्निशामक दल तसेच नाशिक महानगरपालिका यांच्याकडील दोन आणि पिंपळगाव ग्रामपंचायत यांची एक सिन्नर नगरपालिका यांची एक अग्निशामक दल हजर झाले. घटनास्थळी HAL प्रशासन प्रमुख तसेच नगरपालिका मुख्याधिकारी तहसीलदार निफाड प्रांत अधिकारी घटनास्थळी हजर झाले. आता आग पूर्ण विझलेली आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

Petrol-Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 7th May 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण आतंरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या दरांत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर कडाडले (Crude Oil Price) आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अशातच, अद्याप तरी देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत. 


मुख्य आर्थिक सल्लागारांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटलं होतं की, जोपर्यंत क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 110 डॉलरच्या खाली आहे, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. कच्च्या तेलाची किंमत जर 110 डॉलरच्या वर गेली तर मात्र सरकार, तेल कंपन्या आणि ग्राहकांना मिळून त्याचा भार सहन करावा लागेल. त्यामुळे आज जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल (Diesel Price) पुन्हा महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Buldhana News :  MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना आंतरवासीता (इंटर्नशिप) कालावधीत महाविद्यालय बदली करता येणार नाही, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

Buldhana News :  MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना आंतरवासीता (इंटर्नशिप) कालावधीत महाविद्यालय बदली करता येणार नाही, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय.


या आधी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात आंतरवासीता कालावधीसाठी महाविद्यालय बदलीची होती सोय.


यानिर्णयामुळे आता MBBS झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात करावा लागणार आंतरवासीता कार्यकाळ पूर्ण.

Nashik Fire : ओझरच्या एअर फोर्सच्या भागातील काल सायंकाळी लागलेली आग तीन तासांनी आटोक्यात, जवळच विमानतळ असल्यानं यंत्रणांची उडाली होती धावपळ

Nashik Fire : ओझरच्या एअर फोर्सच्या भागात पेटला वनवा, वारा असल्याने आग मोठ्या आग मोठ्या प्रमाणात पसरली, काल सायंकाळी लागलेली आग, शर्थीच्या प्रयत्नानंतर तीन तासांनी आग आटोक्यात, नाशिक तसेच आसपासच्या परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळच विमानतळ असल्यानं यंत्रणांची धावपळ उडाली होती, प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने सर्वसामान्यांना जाण्याची परवानगी नाही

Sangli News Updates : सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी आणि अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Sangli News Updates : सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी आणि अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात


3 शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी ६० हजार असे 1 लाख 80 हजार रूपयांची केली होती मागणी 


विष्णू मारूतीराव कांबळे आणि विजयकुमार अशोक सोनवणे अशी लाच स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची नावे 


१ लाख ७० हजार रूपयेची लाच  स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  रात्री दोघाना लाच रक्कमसहीत पकडले


दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल

Phone Tapping Case : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलीस नाना पटोलेंचं स्टेटमेंट रेकाॅर्ड करणार

Phone Tapping Case : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलीस आज नाना पटोले यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहेत. पुणे पोलीस मुंबईत येऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहेत. काग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावाने नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यांत आला होता.

Rabindranath Tagore : रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस

Rabindranath Tagore : देशाच्या साहित्य विश्वासाठी 7 मे हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आहे. कवी, लघुकथा लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, निबंध लेखक आणि चित्रकार म्हणून इतिहासातील युगपुरुषाचा दर्जा असलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. भारतीय संस्कृतीची पाश्चात्य जगाला ओळख करून देण्याचे श्रेय त्यांना जाते.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलीस आज नाना पटोले यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार


रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलीस आज नाना पटोले यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहेत. पुणे पोलीस मुंबईत येऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहेत. काग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावाने नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यांत आला होता.


आमदार रोहित पवार आज अयोध्येला जाणार 


राष्ट्रवादीचे रोहित पवार आद अयोध्या धामला भेट देणार आहेत. रोहित पवार हनुमान गढी आणि कनक भवनलाही आज भेट देणार आहेत.


ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणीची बैठक  
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाची कार्यकारणीची बैठक आज वसंत स्मृती दादर येथे होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. 


खासदार नवनीत राणा अजूनही लीलावती रुग्णालयात  
अपक्ष खासदार नवनीत राणा सध्या जामीन मिळाल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारी जामीन मिळाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  


भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना हरियाणामध्ये ठेवण्याची पंजाब सरकारची विनंती हायकोर्टाने फेटाळली, कोर्ट आज सुनावणी करणार


भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना ताब्यात न देण्याची आणि त्यांना हरियाणात न ठेवण्याची पंजाब सरकारची दिल्ली पोलिसांची विनंती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. यावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.


झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त, आजही छापे सुरू राहू शकतात


अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथक शुक्रवारी सकाळपासून झारखंड केडरच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि राज्याच्या विद्यमान खाण सचिव पूजा सिंघल यांच्या घरावर आणि तिच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापे टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15 कोटींहून अधिक किमतीचे रोख दागिने आणि गुन्ह्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.  छाप्यादरम्यान या घोटाळ्यातील धागे दोरे झारखंडच्या काही राजकारण्यांपर्यंत पोहोचू शकतात, असे संकेतही मिळाले आहेत.


राहुल गांधी आज हैदराबादमधील गांधी भवनात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार 
काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी आज हैदराबादमधील गांधी भवनात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार असून इतर अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत.
 
गडू घागरीचे तेल आज बद्रीनाथला पोहोचणार 
भगवान बद्रीविशालच्या दैनंदिन अभिषेकासाठी वापरण्यात येणारे तिळाचे गडू घागरी तेल कलश यात्रा लक्ष्मी नारायण मंदिर डिमर येथून पायी चालत कर्णप्रयागला पोहोचली. यादरम्यान भाविकांनी भगवान बद्रीविशालला तिलक लावून दर्शन घेतले. 8 मे रोजी दरवाजे उघडण्यापूर्वी भगवान बद्रीविशालच्या गर्भगृहात हे तिळाचे तेल स्थापित केले जाईल.


श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून पुन्हा आणीबाणी 


गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या मीडिया विभागाचा हवाला देत श्रीलंकन ​​माध्यमांनी ही माहिती दिली. 


रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस  
देशाच्या साहित्य विश्वासाठी 7 मे हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आहे. कवी, लघुकथा लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, निबंध लेखक आणि चित्रकार म्हणून इतिहासातील युगपुरुषाचा दर्जा असलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. भारतीय संस्कृतीची पाश्चात्य जगाला ओळख करून देण्याचे श्रेय त्यांना जाते.


1907 : पहिली इलेक्ट्रिक ट्राम कार मुंबईत दाखल झाली 


1912 : कोलंबिया विद्यापीठाने विविध श्रेणींमध्ये पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्याच्या योजनेला आजच्या दिवशी म्हणजे 7 मे 1912 मान्यता दिली. जोसेफ पुलित्झर यांनी त्याची स्थापना केली होती.  


आज आयपीएलमध्ये डबल धमाका  
शनिवारी आयपीएलमध्ये डबल धमाका असणार आहे. दुपारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात रॉयल सामना होणार आहे. तर संध्याकाळी लखनौचे नवाब कोलकात्यासोबत भिडणार आहेत. पुण्याच्या एमसीए मैदानावर लखनौ आणि कोलकाता यांच्यात सामना रंगणार आहे. तर वानखेडे स्टेडिअमवर दुपारी पंजाबच्या किंग्ससमोर राजस्थानचे रॉयल आव्हान असणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.