07 march 2022 Breaking News LIVE Updates : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायलयीन कोठडी; विशेष पीएमएलए कोर्टाने सुनावली कोठडी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Mar 2022 01:17 PM
Sachin Joshi : अभिनेता-निर्माता सचिन जोशीला अखेर पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर

अभिनेता-निर्माता सचिन जोशीला अखेर पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. 30 लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका झाली आहे. ओंकार बिल्डरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन जोशीला फेब्रुवारी 2021 मध्ये अटक झाली होती. पासपोर्ट तपासयंत्रणेकडे जमा करत देशाबाहेर न जाण्याचे साचिन जोशीला निर्देश देण्यात आले आहेत.

Russia Ukraine War : बेलारूसमध्ये तिसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी रशियन आणि युक्रेनचे शिष्टमंडळ भेट 

 बेलारूसमध्ये तिसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी रशियन आणि युक्रेनचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. ह्युमॅनिटरिअन ग्राऊंडवरच तिसऱ्या भेटीत देखील चर्चा होणार असल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे. रशियाच्या वाटाघाटी करणाऱ्या मुख्य प्रवक्त्याने युक्रेनवर नागरिकांसाठी ह्युमॅनिटरियन कॉरिडॉर अडवल्याचा आरोप करत हा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. मागील दोन चर्चांच्या फेरीत ठोस निर्णय न झाल्याने जगभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

Crime News : उल्हासनगरात दुचाकी चोरांचा  सुळसुळाट

उल्हासनगर येथील गणेश नगर भागात खत्री भवन समोर रात्री दहा वाजता योगेश करोतीया यांनी आपली दुचाकी उभी केली होती, रात्री दोन वाजेच्या सुमारास ती दुचाकी दोन चोरांनी घेऊन पोबारा केला, हि घटना सीसीटीव्ही कैमेरता मध्ये चित्रीत झाली आहे. या प्रकरणात उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरात  दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्याने पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Rain Update : नंदुरबारमध्ये पाऊस, काही भागात गारपीट

Rain Update :   हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात गारपीट झाली आहे. शहादा तालुक्यातील बामखेडा परिसरात गारपीट गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता. आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण...

Bmc Election 2022: मुंबईत आमचा भगवाच राहणार : किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकेची (Bmc) मुदत आज संपणार आहे. निवडणूक न झाल्याने मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात येईल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं, पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल



 


Hingoli News Update : घरगुती कारणावरून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून, हिंगोली जिल्ह्यातील पिंपळाचौरे गावातील घटना 

Hingoli News Update : घरगुती कारणावरून पतीने पत्नीचा निर्घृण खून केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पिंपळाचौरे गावात ही घटना घडली आहे. पिंपळाचौरे गावातील शेत शिवारात घरगुती भांडणातून पतीने कोयत्याने वार करून पत्नीचा खून केला. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

Osmanabad District Bank Election : उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर काँग्रेसचा कब्जा

Osmanabad District Bank Election : उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसचे बापूराव पाटील अध्यक्ष झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे मधुकर मते यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

ओला उबरसारख्या ॲप टॅक्सी कंपन्यांना हायकोर्टाचा निर्वाणीचा इशारा, या बेकायदेशीर टॅक्सी सेवा आम्ही तात्काळ बंद केल्या तर सर्वसामान्य लोकांचे हाल होतील - हायकोर्ट

ओला उबरसारख्या ॲप टॅक्सी कंपन्यांना हायकोर्टाचा निर्वाणीचा इशारा


या बेकायदेशीर टॅक्सी सेवा आम्ही तात्काळ बंद केल्या तर सर्वसामान्य लोकांचे हाल होतील - हायकोर्ट


ॲपवर टॅक्सी चालवणा-या कंपन्यांनी परवान्यांकरता 16 मार्चपर्यंत रितसर अर्ज सादर करावेत


प्रादेशिक परिवहन कार्यालयानं त्यावर 15 दिवसांत निर्णय घ्यावा


परवान्याचे अर्ज जर काही कारणानं रद्द झाले तर मात्र त्या कंपनीला सेवा तात्काळ बंद करावी लागेल - हायकोर्ट


राज्य सरकार याबाबत 2021 ची नियमावली बनवत नाही तोपर्यंत केंद्र सरकारचा साल 2020 ची नियमावली या कंपन्यांना लागू राहिल

Share Market : सेन्सेक्स 1 हजार 900 हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी 500 हून अधिक खाली

Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायलयीन कोठडी; विशेष पीएमएलए कोर्टाने सुनावला निर्णय

Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायलयीन कोठडी; विशेष पीएमएलए कोर्टाने सुनावला निर्णय. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केलीय अटक

पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला अन त्याचवेळी पुणे मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ही ऐरणीवर आला!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखविलेल्या पुणे मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न पहिल्याच दिवशी ऐरणीवर आला. कारण याच मेट्रोच्या काचांना उद्घाटनावेळीच तडे गेल्याचं समोर आलंय. ही बाब पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गावर निदर्शनास आली. पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन करत, गरवारे कॉलेज ते आनंदनगर मार्गावर प्रवास सुद्धा केला. तेंव्हाच पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर सुद्धा मेट्रो धावली. त्या मेट्रोच्या काचांना तडे गेले होते. दोन खिडकीच्या काचांना भेगा गेल्या असताना सुद्धा ती मेट्रो पहिल्या दिवशी धावली. मेट्रोच्या या भोंगळ कारभारामुळे भाजप अडचणीत आलेली आहे. याबाबत भाजपला छेडलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली तर मेट्रो प्रशासनाने तांत्रिक कारण पुढं करत वेळ मारून नेहली. पण पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पुणे मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न पहिल्याच दिवशी ऐरणीवर आला. 

 
Buldana : गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी गावकाऱ्यानी अडवला जालना खामगाव राष्ट्रीय महामार्ग

Buldana : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही गावातून जालना खामगाव राष्ट्रीय महामार्ग जातो. हा मार्ग गावातील मुख्य बाजारपेठेतून असल्यानं आणि महामार्गावरून भरधाव वाहनं रात्रंदिवस सुरू असतात. येथे नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असल्यानं गावातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेकदा मागणी करूनही गतिरोधक न बसविल्यानं आज गावातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी जालना खामगाव राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला आहे. प्रशासनानं तात्काळ येथे गतिरोधक बसविण्याची मागणी गावकरी करीत आहेत. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस

मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर यांचाही आज कामकाजाचा शेवटचा दिवस. आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत किशोरीताईंच्या वाट्याला कोरोनाच्या रुपात मुंबई महापालिकेसाठीचा सर्वात कठीण काळ आला. परंतु या सर्व आव्हानांना भक्कमपणे तोंड देत आघाडीवर राहत किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांची सेवा केली. मुंबईच्या प्रथम नागरिक या नात्याने जसा मानसन्मान मिळतो, तश्या या काटेरी मुकूटाच्या जबाबदाऱ्या देखील खूप मोठ्या असतात. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांवरही अनेकदा आरोप करण्यात आले. मात्र तरीही किशोरी पेडणेकर लढत राहिल्या तसेच त्यांनी पक्षाची बाजूही निडरपणे ठासून मांडली. लवकरच किशोरी पेडणेकर एक आत्मचरित्रही प्रकाशित करण्याच्या तयारीत आहेत. 

सोन्याचा भाव आज 54 हजारांवर, युक्रेन रशिया युद्ध सुरू होण्यापूर्वी 48 हजारांच्या जवळपास सोन्याचा प्रति तोळा भाव होता

सोन्याचा भाव आज 54 हजारांवर, युक्रेन रशिया युद्ध सुरू होण्यापूर्वी 48 हजारांच्या जवळपास सोन्याचा प्रति तोळा भाव होता


मागील 12 दिवसात सोन्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत.


युद्ध पुढील काही दिवस असेच सुरू राहिले तर सोन्याचा भाव 58 हजारांच्या जवळपास जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे


कोरोनाच्या काळात 58 हजारांपर्यत सोन्याचा भाव याआधी गेला होता

डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाटचाल ७७ रुपये प्रति डॉलरकडे? चलनाच्या घसरणीमुळे आयातीदरम्यान अधिकचे पैसे मोजावे लागणार


डॉलरचा तुलनेत रुपयाची वाटचाल ७७ रुपये प्रति डॉलरकडे? , डॉलरच्या तुलनेत रुपया उघडताच ७६.९५ रुपये प्रति डॉलरवरच्या उच्चांक पातळीवर, 


चलनाच्या घसरणीमुळे आयातीदरम्यान अधिकचे पैसे मोजावे लागणार *


निफ्टी बॅंक निर्देशांक १७ मे २०२१ नंतर पहिल्यांदाच ३३ हजारांखाली


बॅंकांच्या समभागात देखील मोठी घसरण


एनएसईचं कामकाज आता सुरळीत पार पडत असल्याची एनएसईची माहिती 

Share Market : शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स 1 हजार 300 हून अधिक अंकांनी गडगडला, तर निफ्टीत 350 अंकांची घसरण

हिंगोलीतील येलदरी जलाशयात परदेशी पक्ष्यांचे आगमन

थोडी थंडी कमी झाली आणी उन्हाळ्याची चाहूल लागताच हिंगोली जिल्ह्यातील एलदरी धरण परिसरात परदेशी पाहुण्यांच आगमन झाल आहे. एशियन पान पक्षी म्हणून या सर्व परदेशी पाहुण्यांना ओळखलं जातं. यामध्ये हिवाळी स्थलांतरित पक्षी निवळी तलावावर पट्ट कादम बार हेड गुज आदी प्रजातींच्या पक्षाचे जवळपास शंभरच्यावर पक्षाचे थवे आढळून आले आहेत. हे पक्षी थंडी वाढताच स्थलांतर करुन मंगोलीयेतून 4 हजार 300 किलोमीटर प्रवास करुन भारतात येतात. येलदरी धरणाच्या जलाशयात 67 प्रकारचे पक्षी दिसून आले असून पक्षी मित्र गणेश कुरा आणि अनिल उरवाड यांनी हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आज लोकसंघर्ष मोर्चाचं मंत्रालयासमोर आंदोलन

आदिवासींच्या मागण्यांसाठी आज सकाळी लोकसंघर्ष मोर्चाने मंत्रालयासमोर आंदोलन केलं. आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यातून 400 ते 500 आदिवासी बांधव मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करायला बसले आहेत. वन हक्क अधिकार कायद्याची अंमलबजावणी आणि आदिवासीना त्यांचा अधिकार मिळावा, वनविभागाकडून आदिवासींना देण्यात येणारा त्रास कमी व्हावा या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत आदिवासी विकास मंत्री, मुख्यमंत्री यात लक्ष घालून भेट देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत


 

Russia Ukraine War: 2012 नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका ABP Majha

Petrol-Diesel Price : युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर 130 डॉलर्सवर, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर कडाडणार?

Petrol-Diesel Price : रशिया युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. आजही युद्धाचा वणवा पेटताच आहे. युक्रेनमधील मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्यानं जोरदार हल्ले सुरू ठेवले आहेत. दुसरीकडे या युद्धामुळे आता कच्च्या तेलाच्या दरांनी रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केलेय. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 130 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचली आहे. 2012 साली ही किंमत 128 डॉलर्सवर पोहोचली होती. मात्र आता तोही रेकॉर्ड तुटलेला आहे. कच्च्या तेलासोबत सोबतच अॅल्युमीनियम, कॉपर, झींकनं देखील 15 वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय. युद्धामुळे मागील आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. या आठवड्यातही बाजारावर युद्धाचे विपरित परिणा दिसण्याची शक्यता आहे. 

BMC Standing Committee Meeting : शेवटची स्थायी समिती बैठक वादळी ठरणार?

BMC Standing Committee Meeting : मुंबई महापालिका निवडणुकीआधीची ही शेवटची स्थायी समितीची बैठक आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत जवळपास 180 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील काही प्रस्तावांना भाजपने विरोध केला होता. त्यामुळे काही प्रस्ताव राखून ठेवण्यात आले. आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून स्थायी समितीमधील प्रस्ताव मंजूर करण्याचे प्रयत्न असतील. तर, भाजपकडून याला विरोध होण्याची दाट शक्यता आहे. भाजपने याआधीच स्थायी समितीमधील एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. 


यशवंत जाधव यांच्याविरोधात भाजप आक्रमक?


स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर खात्याने धाड टाकली होती. जवळपास चार दिवस आयकर विभागाने त्यांच्या घरी ठाण मांडले होते. जाधव यांच्याविरोधात असणाऱ्या कारवाईच्या मुद्यावरदेखील भाजपकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. 


काय असतील प्रस्ताव?


स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांमध्ये पर्जन्य जलवाहिन्यांचे बळकटीकरण, मलनि:सारण वाहिन्या,  जलाशय बोगदा. महापालिका रुग्णालयांसाठीचे विविध प्रस्ताव, अग्निशमन दलासाठीचा प्रस्ताव आदींचा समावेश आहे. 

BMC Standing Committee Meeting : मुंबई महापालिकेची मुदत आज संपणार, आज स्थायी समितीची शेवटची बैठक

BMC Standing Committee Meeting : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची मुदत आज 7 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची बैठक आज पार पडणार असून 160 अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची दाट शक्यता आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे हे प्रस्ताव असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर पालिकेचा कारभार 8 मार्चपासून प्रशासकाच्या माध्यमातून सुरू राहणार आहे.  मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर गेल्यानंतर काही दशकांनतर पहिल्यांदाच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Pune Metro : उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपूरात ही हवेतून उडणारी बस, नितीन गडकरींचं वक्तव्य

Pune Metro : पुणेकरांना काल मेट्रोची भेट मिळाली आहे. यापाठोपाठ आता नागपूरकरांनाही मोठी भेट मिळणार आहे. नागपूरात लवकरच आपल्याला जमिनीवर नाही, तर हवेत बस उडताना दिसणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपूरात ही हवेतून उडणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर केले. यासाठी गडकरी यांनी आराखडा तयार करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 35 ते 40 सीटर ही केबल बस सध्या फिलिपिन्समध्ये चालवली जात असून त्याच धर्तीवर नागपूरात ही केबल बस सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले आहेत. नागपूरातील ही केबल बस पारडीहून रिंगरोड मार्गे लंडन स्ट्रीटपर्यंत जाईल. तेथून हिंगणा टी पॉईंट, डिफेन्सवाडी येथून व्हेरायटी चौकापर्यंत पर्यंत असणारेय.

Maharashtra Budget Session 2022 : आज अधिवेशनात 'हे' मुद्दे गाजणार

Maharashtra Budget Session 2022 : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी घडत गेल्या आहेत. यावरूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे. नवाब मलिक यांच्या मुद्द्यांवर प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्यांवरील आरोप, केंद्रीय पथकांच्या वापरासह केंद्रातील घडामोडींवर सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.


राज्यातील वीजेचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यासह विविध मुद्यांवर विरोधकही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीबाबत आज नेमकं काय घडणार याकडेही लक्ष लागून आहे. 


गाजणार 'हे' मुद्दे 



  • आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारचे आरोप

  • नवाब मलिक यांचा राजीनामा

  • किरीट सोमय्यांवर झालेले आरोप

  • नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई

  • केंद्रीय यंत्रणांचा वापर 

  • ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण 

  • कोरोना काळातील भ्रष्टाचार

  • शेतकऱ्यांची वीजबील माफी

  • दिवसा शेतकऱ्यांना दहा तास वीज द्यावी (यासाठी राजू शेट्टींचं आंदोलन सुरु आहे) 

  • केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानुसार राज्य सरकार आता काय तरतुदी करते यावरून लक्ष ठेवून भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Budget Session 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा, ओबीसी राजकीय आरक्षणावर विशेष विधेयक मांडलं जाणार

Maharashtra Budget Session 2022 :  राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. नवाब मलिक, ओबीसी आरक्षणासह अन्य काही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन आज विधिमंडळात विधेयक मांडणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra Budget Session : अधिवेशनाचा दुसरा आठवडा; आज ओबीसी आरक्षणासाठी विधेयक मांडणार, 'हे' मु्द्देही गाजणार


Maharashtra Budget Session 2022 :  राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. नवाब मलिक, ओबीसी आरक्षणासह अन्य काही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन आज विधिमंडळात विधेयक मांडणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती. 


दरम्यान, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. याचा प्रत्यय अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये दिसून आलाच आहे.


महाविकास आघाडीमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर विरोधी पक्षाच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहामध्ये गाजणारा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे. यासह, आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर या आणि अशा अनेक मुद्द्यांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.  


Petrol-Diesel Price : देशात निवडणुकांचे वारे थांबरणार, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची धास्ती, उच्चांक गाठणार?


Petrol-Diesel Price Today 7 March 2022 : रशिया-युक्रेन युद्धामुळं (Russia-Ukraine War) जगाची चिंता वाढली आहे. अशातच दोन देशांतील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 130 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचली आहे. 2012 नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे. असं असलं तरी देशात मात्र गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर (Changes in Petrol Diesel Rtae) आहेत. अशातच देशात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळेच देशातील पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) च्या किमती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. 


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ (Petrol-Diesel Price) होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे ( 5 State assembly election) दरात वाढ झाली नसल्याचं मानलं जात आहे. आता 7 मार्चला निवडणुकांची सांगता आणि 10 मार्चला निकाल यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती लोकांमध्ये आहे. 


रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 100 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. पण सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. अशातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे 7 मार्च नंतर देशातील पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 9 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.