Maharashtra Breaking News : महाराष्ट्रात 8 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Sep 2022 11:32 PM
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भाजपचे नेते राणे कुटुंबीयांच्या गाडीचा छोटासा अपघात

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भाजपचे नेते राणे कुटुंबीयांच्या गाडीचा छोटासा अपघात झाला. उर्से टोल नाक्यावर ही घटना सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. मुंबईवरून नितेश राणे यांचं कुटुंब पुण्याला येत होतं. उर्से टोल नाक्याच्या रांगेत त्यांची चारचाकी उभी होती, तेव्हाच मागून आलेला ट्रक त्यांच्या चारचाकीला येऊन धडकला. गाडीचं मागून किरकोळ नुकसान झालं, सुदैवाने गाडीतील कोणालाही इजा पोहचली नाही. त्यानंतर शिरगाव-परंदवाडी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं होतं.



Nagpur Breaking : कोर्टातून जेलमध्ये नेताना आरोपीकडे सापडले 12 MD पॅकेट अन् मोबाईल

Nagpur : नागपूर जिल्हा कोर्टातून जेल मध्ये घेऊन जाताना मकोका च्या आरोपी कडे, चार्जशिट मध्ये 12 MD चे पॉकीट व एक मोबाईल सापडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून पुढील करवाई सुरु असल्याची विश्वसनीय माहिती.

दिशाभूल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका : निलम गोऱ्हे  

मविकास आघाडी सरकारने जे काम केलं ते लोकांनी विसरून जावं यासाठी हे सगळं सुरू आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला, सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला, नितीन गडकरी यांनी बैठका घेतल्या. दिशाभूल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे, असा आरोप शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी भाजपवर केली आहे.  

मालेगावमध्ये गणपती बाप्पासह रस्त्यावर बसून आंदोलन 

मालेगावमध्ये मध्यवर्ती गणेशोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती बाप्पासह रस्त्यावर बसून आंदोलन केले. शहरातील खड्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. खड्डे बुजवण्याची वारंवार  मागणी करून ही खड्डे बुजविले जात नसल्याने मालेगाव मध्यवर्ती गणेश उत्सव समिती पदाधिकारी रस्तावर उतरले आहेत. समिती पदाधिकाऱ्यांनी  गणपती घेऊन महानगरपालिके विरोधात आंदोलन केलं. विसर्जन मिरवणुकीपर्यंत तरी खड्डे बुजवावे अशी मागणी समिती पदाधिकाऱ्यांनी केली.

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात 8 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज 

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात 8 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिमुसळधारेची शक्यता


आज मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, तर ८ आणि ९ सप्टेंबर रोजी देखील मुसळधारेचा अंदाज 


आज आणि उद्या विदर्भात सर्वत्र पावसाच्या सरी तर ९ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज 


९ सप्टेंबरसाठी कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट

washim rain update: वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात 

washim rain update: वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत दिल्यानंतर जिल्ह्यात आज सकाळपासून अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरीपाच्या सोयाबीन तूर  पिकाने माना टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र पासून बरसणाऱ्या पावसाने नवसंजीवनी मिळणार आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये  आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरी नक्षलवाद प्रकरण; आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला 

शहरी नक्षलवाद प्रकरण; आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला, प्रा. गौतम नवलखा यांना एल्गार परिषद प्रकरणात एप्रिल 2020 मध्ये अटक करण्यात आली होती

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीनं कोठडीत वाढ, 19 सप्टेंबरपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीनं कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. 

रायगड : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूरनजीक खाजगी बसचा अपघात, पाच प्रवासी जखमी

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूरनजीक खाजगी बसचा अपघात, पाच प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बस पलटी, पहाटे ही घटना घडली आहे. खाजगी बस रस्त्याच्या दुभाजकामध्ये पलटी झाली. जखमी प्रवाशांना नवीमुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नंदुरबार : आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षक आक्रमक

आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षक दिनाच्या दिवशीच नंदुरबार जिल्हयातील शिक्षक आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांवर शिक्षकांनी काळया फिती लावून निषेध केला. प्रशांत बंब यांनी माफी मागावी, अशी शिक्षकांची मागणी आहे.

पुणे : पुण्यातील मेट्रोतून आता रात्री 11 पर्यंत प्रवास करता येणार

पुण्यातील मेट्रोतून आता रात्री 11 पर्यंत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या मेट्रोची वेळ रात्री दोन तासाने वाढवण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. 





कोल्हापूर : इराणी खाणीत बाप्पांच्या विसर्जनासाठी रॅम्प

आज घरगुती गणेश विसर्जन होणार आहे. कोल्हापुरात अत्याधुनिक पद्धतीने बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. पंचगंगा नदीत विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इराणी खाणीत बाप्पांचे विसर्जन होणार आहे.  प्रशासनाकडून एक रॅम्प बनवण्यात आला असून या रॅम्पवरूनच बाप्पाचं विसर्जन केले जाणार आहे. इराणी खाण प्रचंड खोल आहे. त्यामुळे विसर्जनाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा रॅम्प बनवण्यात आला आहे.

कोल्हापूर : डॉक्टरांसमोरच बसलेल्या रुग्णाचे हृदय अचानक बंद पडलं, समयसूचकता दाखवत डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण

नियमित तपासणीसाठी आलेली आणि डॉक्टरांसमोरच बसलेल्या रुग्णाचे हृदय अचानक बंद पडलं. समयसूचकता दाखवत डॉक्टरांनीही या रुग्णावर उपचार करत रुग्णाला जीवदान दिलं. कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये डॉ. अर्जून आडनाईक यांच्यासमोरच हा प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. डॉ. अर्जून आडनाईक यांनी दाखवलेल्या समयसुचतेमुळे देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय संबंधित रुग्णाला आला आहे.





Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार; जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता

Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना थोड्याच वेळेत कोर्टात हजर करण्यात येणार आहे. संजय राऊत हे सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत. राऊतांकडून आज जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. 

नाशिक-मुंबई महामार्गावर ट्रक पलटी होऊन अपघात, तीन जण जखमी

नाशिक मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेनं जाताना ट्रक पलटी होऊन तीन जण जखमी झालेत. पहाटेच्या सुमारास गोंदे जवळ लोखंडाने भरलेलल्या ट्रक चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्यान ट्रक पलटी झाला. महामार्गावरील खड्ड्यात जाऊन आदळला. यात ट्रकचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने ट्रक पलटी झाल्याची शक्यता व्यक्त होतं आहे. यामध्ये ओमप्रकाश सिंह, रफिक रहीम खान, दिलीपकुमार सिंह हे तिघेही जखमी झाले असून ते उत्तरप्रदेशचे राहणारे आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना उपचारासाठी घाटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. 





बुलढाणा : डोनगाव बंदला मोठा प्रतिसाद

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली डोनगाव येथील ग्रामसेवकाने गावच्या नवख्या असलेल्या महिला सरपंचाला भ्रष्टाचाराचे पाठ शिकवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 'जनता ही बदमाश असून एकाही चोराने पैसे न घेता तुम्हाला मतदान केलं नाही, म्हणून पैसा खाणे हा आपल्याला मिळालेला अधिकार आहे', असं व्यक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे गावातील ग्रामस्थ अक्रमक झाले असून संबंधित ग्रामसेवकावर कारवाईची मागणी करत आज डोनगाव बंद पुकारण्यात आला. गावातील मुख्य बाजारातील सर्व आस्थापनं आज बंद असून मुंबई-नागपूर महामार्गावर असणाऱ्या या गावात आज शुकशुकाट बघायला मिळत आहे.

बांग्लादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आजपासून 8 तारखेपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. शेख हसिना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. शेख हसिना या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. 


Nitish Kumar Delhi Visit : नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर

Nitish Kumar Delhi Visit : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून ते या दरम्यान काही विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार आहेत. भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र आले तर 2024 साली भाजपला 50 जागाही मिळणार नसल्याचं ते म्हणाले होते. 




 


Cyrus Mistry Death in Car Accident : सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार शक्य

Cyrus Mistry Death in Car Accident : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं रविवारी एका कार अपघातात दुर्दैवी निधन झालं. काल दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास ते अहमदाबादवरुन मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार शक्य आहे. 

अमित शहांचा मुंबई दौरा; लालबागच्या राजासह काही मंडळांत गणेश दर्शनासाठी उपस्थिती

Amit Shah On Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. काल (रविवारी) संध्याकाळी ते मुंबईत दाखल झाले. या दौऱ्यात ते लालबागचा राजाचे दर्शन घेतील.  आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भोजन आणि बैठकीसाठी जातील.-तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळालाही ते भेट देणार आहेत. याशिवाय अमित शाह यांचा मुंबई दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची अवघ्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 


अमित शाह काल (रविवारी) मुंबईत दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी साडे दहा वाजता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते त्यांच्या नियोजित बैठकांना उपस्थित राहतील.   


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 


सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार शक्य
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं रविवारी एका कार अपघातात दुर्दैवी निधन झालं. काल दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास ते अहमदाबादवरुन मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार शक्य आहे. 


अमित शाह यांचा मुंबई दौरा 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असून ते महत्त्वाच्या बैठका आणि भेटी-गाठी घेतील. सकाळी साडे दहा वाजता अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जातील. अमित शाह आज भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार असून त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीविषयी रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून ते या दरम्यान काही विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार आहेत. भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र आले तर 2024 साली भाजपला 50 जागाही मिळणार नसल्याचं ते म्हणाले होते. 


बांग्लादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आजपासून 8 तारखेपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. शेख हसिना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. शेख हसिना या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.