Maharashtra Breaking News 05 June 2022 : मंत्रिमंडळाची उद्या बैठक, कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
....तर राज्यसभेसाठी अखेरच्या पाच मिनिटात मतदान करू ! - राज्यमंत्री बच्चू कडू..
धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र व राज्य सरकारने करावी अन्यथा त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील..
सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने जे खरेदीचे लक्षांक दिले ते कमी आहेत..
संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.पण आता केंद्र सरकारने खरेदीसाठी हात वर केले..
धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे.
केंद्राने खरेदी सुरू करावी याकरिता मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे..
खरेदी होत नसेल तर किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे..
असे न झाल्यास आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा..
आमचं मतदान भाजपला जाणार नाही मात्र आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करु..
उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा कलेक्शन एजंट हा अनिल परब - किरीट सोमय्या
सियाचीन येथे ऑपरेशन मेघदुतमध्ये शत्रुशी लढताना जखमी झालेले विपुल दिलीप इंगवले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतु, घरी त्रास झाल्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. विपुल यांचे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील भोसे हे आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी दहा वाजता गावात पोहोचणार आहे.
तीन मुलींनंतर चौथ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेचा गर्भपात करताना अतिरक्तस्रावाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सक्रिय आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बीड तालुक्यातील बकरवाडी गावातील शितल गाडे असं मयत गर्भवती महिलेचे नाव आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्य एडवोकेट संगीता चव्हाण यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.
सोमवारी चार वाजता मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत राज्यसभेच्या अनुषंगाने देखील चर्चा होणार
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 6 वाजता वर्षा निवास्थानी अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार असल्याची सुत्राची माहिती.
भाजपचे डावपेच पाहता त्यांना घोडेबाजाराला संधी मिळू नये म्हणून शिवसेनेने खबरदारी घ्यायची ठरवलंय - उद्योग मंत्री सुभाष देसाई
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
समाजात आराजकता वाढत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत या घटना रोखायचा असतील तर समाजात राष्ट्र पुरुषांचे विचार रुजविणे गरजेचे आहे हे लक्षात घेत जळगावातील सूमित अहिरे यांनी आपल्या मुलीच्या विवाहात आलेल्या सर्व वर्हाडी साठी राष्ट्र पुरुषांची पुस्तके वाटप करून एक आदर्श समाज पुढे निर्माण केला आहे
नागपूर शहरातील कुख्यात गँगस्टर आबू खान याला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. आज दुपारी नागपूर पोलिसांच्या झोन 4 च्या पथकाने आबू खान याला भंडारा येथून ताब्यात घेतले असून त्याला नागपुरात आणण्यात आले आहे. आबू खान नागपूरचा कुख्यात गुंड असून गेले अनेक वर्षे तो नागपूर शहरात तस्करीमध्ये सहभागी आहे. सहा महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनी त्याच्याविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलीस त्याला बेड्या ठोकतील याच्या भीतने तो फरार झाला होता. आबू खान विरोधात नागपूर शहरात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून गेल्या अनेक महिन्यांपासून तो नागपूर पोलिसांना चकमा देत कधी उत्तर प्रदेश, कधी छत्तीसगड, तर कधी गुजरातमध्ये लपून राहत होता. आबू खान भंडारा येथे लपून बसल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आज दुपारी त्याला अटक केली.
Ashadhi Wari 2022 : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडित झालेली शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानची पालखी उद्या सकाळी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. उद्या सकाळी सात वाजता आषाढी एकादशी निमित्त शेगावहून पंढरपूरसाठी पालखी निघणार आहे. शेगावच्या या दिंडीचे हे 53 वे वर्ष आहे. सातशे भाविकांसह उद्या सकाळी शेगाव येथील मंदिरातून ही दिंडी पायी 750 किमींचा पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहचणार आहे.
अंबरनाथमधील मुस्लिम जमातच्या खिदमत-ए-उम्मत कमिटीच्या वतीनं या इजतेमाई शादी म्हणजेच सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ११ जोडप्यांची लग्नं लावून देण्यात आली. या जोडप्यांना गृहोपयोगी वस्तू आहेर म्हणून देण्यात आल्या. तसंच दोन्ही बाजूच्या प्रत्येकी ५०-५० वऱ्हाडींची जेवणाची व्यवस्था या कमिटीकडून करण्यात आली. या कमिटीच्या वतीनं गेल्या ४ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून गेली २ वर्ष कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. मात्र यंदा पुन्हा एकदा कार्यक्रम आयोजित करून त्यात ११ जोडप्यांचं लग्न लावून देण्यात आल्याचं आयोजक जाफर लाला यांनी सांगितलं. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून लग्न झालेल्या वरांनी कमिटीचे आभार मानले.
शिवसेनेचे शिष्टमंडळ हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला विरारमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत, खासदार राजन विचारे देखील उपस्थित आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या केबिन मध्ये दोघांची चर्चा सुरू आहे.
आमचं ठरलंय महाराष्ट्रात दोन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करत 1 कोटी तरुणाना रोजगार देणार आहोत, असा संकल्प कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या वाढदिवशी केला आहे. आम्ही दोन दिवसा पूर्वी शिर्डी येथे नवसंकल्प अधिवेशन घेतले असून त्याच्या माध्यमातून जी भूमिका घेतली ती जनते पर्यन्त पोहचवने व महाविकास आघाडी सरकार कडून करवून घेण्यार असल्याचे ठरेल आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून निरीक्षक जाहीर करण्यात आले आहेत. ज्या ज्या राज्यात मतदानाद्वारे निवडणूक होत आहे, त्या ठिकाणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बीडच्या रंजेगावमध्ये सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.हत्या झालेल्या महिलेच नाव ज्योती अबुज असून घरामध्ये ती तिचा पती आपल्या दोन मुलांसह झोपलेले असताना पहाटेच्या वेळी अज्ञात दरोडेखोरांनी या घरावर दरोडा टाकला यामध्ये ज्योती यांच्या पतीचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात बोळा कोंबून त्यांना एका रूम मध्ये डांबून ठेवण्यात आलं. यावेळी या दरोडेखोरांना प्रतिकार करणाऱ्या ज्योती यांची गळा थांबून या दरोडेखोरांनी हत्या केली आहे सकाळी शेजारच्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर ज्योती अबुजा नग्नावस्थेत आढळून आल्या त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाला आहे की काय याचा तपास देखील आता पोलिस करत आहेत.या घटनेनंतर पोलिस अधीक्षकांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला असून आता या दरोडेखोराचा शोध पोलीस घेत आहेत.
Yavatmal : यवतमाळच्या प्रयासवन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सीडबॉल प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यवतमाळ शहरालगत दहा हजार वृक्षलागवड व संवर्धन अभियान प्रयासवन येथे राबविण्यात येत असून याठिकाणी विद्यार्थी व पर्यावरणस्नेहीना पाच पद्धतीचे प्रात्यक्षिकासह पर्यावरणपूरक सीडबॉल तयार करण्याचे मार्गदर्शन अमृता खंडेराव यांनी केले.
प्रशिक्षितांकडून घरोघरी याबाबत जनजागृती केल्या जाईल व तयार होणारे सीडबॉल वन व नदिलगतच्या क्षेत्रात फेकण्यात येणार आहे. यासोबतच नगर परिषद मुख्याधिकारी यांनी नो होम गारबेज, नो सिटी गारबेज या उपक्रमाची घोषणा केली.
Pune News : मावळ मधील इंद्रायणी नदीत बुडून माय-लेकराचा बुडून मृत्यू झाला. मुलाचे युवराज शिंदे तर आईचे पूनम शिंदे असं नाव आहे. काल आई, मुलगा आणि मावशी संगीता लायगुडे हे तिघेही इंद्रायणी नदी पात्रता गोधड्या धुण्यासाठी गेले होते, त्यावेळी युवराज हा नदी मध्ये पोहण्यासाठी उतरला. तेंव्हा नदी मधील खोल कुंडाचा अंदाज न आल्याने दम लागून तो बुडू लागला, त्यावेळी जवळ असणाऱ्या त्याच्या आई ने युवराज बुडत असल्याचे दिसताच, पाण्यात उडी घेत त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सूरु केले मात्र ते कुंड खोल असल्याने दोघ त्यात बुडाले. तेंव्हा संगीता लायगुडे ह्यांनी देखील या दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्या अपयशी ठरल्या. कामशेत मधील खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले
Shivrajyabhishek 2022 : उद्या होणाऱ्या 348 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. अहमदनगरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे यानिमित्तानं 5 बाय 9 फूटाची रांगोळी साकारण्यात येत आहे. परभणी येथील युवा कलाकार प्रमोद उबाळे हा शिवराज्यभिषेक सोहळ्याची ही रांगोळी काढत असून ही रांगोळी पूर्ण होण्यासाठी 18 तास लागणार आहे. उद्या दुपारपर्यंत ही रांगोळी पूर्ण होणार आहे. ही रांगोळी काढण्यासाठी स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी, शेतकरी संघटनेने प्रमोदला निमंत्रित केलं आहे. विशेष म्हणजे, प्रमोद ही रांगोळी काढण्यासाठी कोणतंही मानधन घेणार नाही.
Jammu Kashmir : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या असून त्या एकापाठोपाठ एक काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) तसेच इतर लोकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच सुरक्षा दल अनेक संवेदनशील भागात शोधमोहीम तीव्र करत दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत.
Maharashtra Monsoon Updates : सध्या राज्यात उष्णतेच्या लाटेनं हैराण केलं आहे. उकाड्यानं हैराण झालेला प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्यानं मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात यंदा मान्सून (Monsoon) लवकर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं खरंतर वर्तवला होता. मात्र पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यानं गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सून कर्नाटकातच थबकल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली. पण असं असलं तरी पुढील 5 दिवसांत राज्यातल्या अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहणार आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेचा दुसरा दिवस. यात जयंत पाटील 9:30 वाजता, वळसे पाटील दोन वाजता सहभागी होणार आहे. तर दुपारी 3 ते 5 या कालावधीत राज्य स्तरीय पुरस्कारांचे शरद पवार यांच्या हस्ते वितरण होणार आहे.
PM Modi : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ‘मिट्टी बचाओ’ अभियानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Congress : उदयपूर, शिर्डी आणि त्यानंतर आता पनवेल अशा तीन ठिकाणी काँग्रेसचे चिंतन शिबीर होतंय. महाविकास आघाडीत अस्वस्थ असलेली कॉंग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही अस्वस्थच आहे. वॉर्ड आरक्षणामुळे 21 नगरसेवकांचे वॉर्ड खालसा झालेत. अल्पसंख्यांक नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण प्रक्रियेत ठरवून अडचणीत आणले गेले असा कॉंग्रेसचा आरोप आहे.
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. शिवसेना आमदार आणि समर्थक लहान पक्ष तसेच अपक्ष आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेनं येत्या 6 जून रोजी संध्याकाळी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि समर्थक लहान पक्ष तसेच आमदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे. त्याच बरोबर येत्या 8 ते 10 जून पर्यंत सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी ट्रायडंट हाँटेलमध्ये राहण्याची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र भाजपनेही ट्रायडंट हाँटेलमध्येच त्यांच्या आमदारांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे, कोणताही धोका किंवा गोंधळ टाळण्यासाठी आता शिवसेनेनंही हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Navi Mumbai News : वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी असा 2 किलोमीटरचा उड्डाणपूल होणार आहे. उड्डाणपुलासाठी 400 झाडे काढण्यात येणार आहेत. याला विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड 'चिपको' आंदोलन करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता याच ठिकाणी भाजपा आमदार गणेश नाईक या झाडांच्या संरक्षणाबरोबरच नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत जनजागृती लाँगमार्च काढणार आहेत.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचं चिपको आंदोलन
वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी असा 2 किलोमीटरचा उड्डाणपूल होणार आहे. उड्डाणपुलासाठी 400 झाडे काढण्यात येणार आहेत. याला विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड 'चिपको' आंदोलन करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता याच ठिकाणी भाजपा आमदार गणेश नाईक या झाडांच्या संरक्षणाबरोबरच नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत जनजागृती लाँगमार्च काढणार आहेत.
राज्यसभेसाठी राजकीय पक्षांचं हॉटेल मॅनेजमेंट
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. शिवसेना आमदार आणि समर्थक लहान पक्ष तसेच अपक्ष आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेनं येत्या 6 जून रोजी संध्याकाळी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि समर्थक लहान पक्ष तसेच आमदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे. त्याच बरोबर येत्या 8 ते 10 जून पर्यंत सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी ट्रायडंट हाँटेलमध्ये राहण्याची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र भाजपनेही ट्रायडंट हाँटेलमध्येच त्यांच्या आमदारांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे, कोणताही धोका किंवा गोंधळ टाळण्यासाठी आता शिवसेनेनंही हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या सलग तीन चिंतन शिबीरांमधून काय साध्य होणार?
उदयपूर, शिर्डी आणि त्यानंतर आता पनवेल अशा तीन ठिकाणी काँग्रेसचे चिंतन शिबीर होतंय. महाविकास आघाडीत अस्वस्थ असलेली कॉंग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही अस्वस्थच आहे. वॉर्ड आरक्षणामुळे 21 नगरसेवकांचे वॉर्ड खालसा झालेत. अल्पसंख्यांक नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण प्रक्रियेत ठरवून अडचणीत आणले गेले असा कॉंग्रेसचा आरोप आहे.
पंतप्रधान मोदी ‘मिट्टी बचाओ’ अभियानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ‘मिट्टी बचाओ’ अभियानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सायकल रॅली
पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
प्रवाशांच्या सामानाला ग्रीन टॅग लावणार
तिरुअनंतपुरम येथे पर्यावरण दिनानिमित्त विमानतळावर प्रवाशांच्या सामानाला ग्रीन टॅग लावण्यात येणार आहे. या टॅगमध्ये भाजांच्या बिया, जडी- बुटी आणि फुलं दिली जाणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेचा दुसरा दिवस
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेचा दुसरा दिवस. यात जयंत पाटील 9:30 वाजता, वळसे पाटील दोन वाजता सहभागी होणार आहे. तर दुपारी 3 ते 5 या कालावधीत राज्य स्तरीय पुरस्कारांचे शरद पवार यांच्या हस्ते वितरण होणार आहे- मिकी
योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रृजभूषण सिंग यांनी 51 क्विंटलचा लाडू तयार केला आहे.
ओडिसाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा काल राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे
5 जून : जागतिक पर्यावरण दिन
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -